ओह डाऊनटन! (अर्थात Downton Abbey memories)

Submitted by जिज्ञासा on 24 December, 2015 - 10:01

Spoiler Alert: जर मालिका पाहीली नसेल किंवा पहायची असेल तर ह्या धाग्यातील पोस्ट्स कदाचित रसभंग करणाऱ्या असू शकतील!

गेली सहा वर्षे British TV वर चालू असलेल्या Downton Abbey ह्या मालिकेचा शेवटचा भाग उद्या २५ तारखेला येईल. एकूण ६ सिझन चालू असलेली ही मालिका जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे (https://en.wikipedia.org/wiki/Downton_Abbey). एखाद्या गोष्टीची भट्टी जमून येणं म्हणजे काय हे ह्या मालिकेकडे बघितलं की समजतं. ह्या मालिकेतल्या सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट आहेत पण हिच्या यशात सगळ्यात महत्वाचा वाटा आहे कथा-पटकथा-संवादांचा. ह्या मालिकेच्या ह्या तीनही गोष्टी एका हाती सांभाळणारा जादुगार लेखक आहे ज्युलियन फॆलॊज (Julian Fellowes). Thank you Julian for these gems! धाग्याच्या सुरुवातीला ह्या मालिकेच्या एका पैलूवर मला लिहावसं वाटतंय ते म्हणजे मला ह्या मालिकेने काय दिलं? तर ह्या सहा सिझन्स कडे पुन्हा एकदा बघताना मला सापडलेल्या माझ्या दोन सगळ्यात मोठ्या आहा मोमेंट्स!

१. It is not my secret to tell – हे वाक्य बऱ्याच प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणतात. एका क्षणी मला लक्षात आलं की हे किती पॉवरफुल वाक्य आहे! कोणा एका व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सांगताना आपण हा विचार करतो का? भले ती गोष्ट फार गुप्त ठेवण्याजोगी नसेल. पण तरीही आपल्या नकळत आपण किती तरी गोष्टी अशा पसरवत असतो. I started giving a second thought before telling things that weren’t about me to others.

२. Let’s focus on what really matters – हे वाक्य दुसऱ्या सिझन मध्ये लेविनियाच्या अंत्यसंस्काराच्या नंतर Lord Grantham म्हणतो. Another very powerful sentence. कोणत्याही प्रसंगात प्रतिक्रिया देण्याआधी मी आपोआप हे वाक्य मनात म्हणायला लागले आहे. आणि ह्याचा खूप उपयोग होतो. आपल्याला चटकन लक्षात येतं की जगात अशा फारच कमी गोष्टी आहेत ज्या खरोखरी महत्वाच्या आहेत, ज्यांनी फरक पडतो. हा फोकस असेल तर तुम्ही बऱ्याच अनावश्यक गोष्टी/ड्रामा टाळू शकता.
माझ्याकडून सध्यातरी हे इतकंच! बाकी मायबोलीवर Downton चे बरेच चाहते आहेत. त्यांनी आपल्या प्रतिसादांनी धाग्यात भर घालावी! मी ही नंतर लिहीनच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल प्राइमचं नोटिफिकेशन आलं की मालिका पुन्हा बघू शकता. बहुधा त्यांच्याकडे अनेकांनी निषेध नोंदवला असेल Lol

मी लगेच ६वा सीझन बघायला सुरुवात केली. आधीचे सीझन्स पाहून ५-६ वर्षं तरी झाली असतील किमान, पण काल पाहताना ही गॅप अजिबात जाणवली नाही.
एरवी काही पात्रांची नुसती नावं वाचून कदाचित नीट आठवलं नसतं, उदा. मि.स्प्रॅट म्हटल्यावर हा कोण असतो असा प्रश्न पडला असता. पण तो ग्रँथम आजींचा बटलर काल स्क्रीनवर आल्यावर सगळं आठवलं. Lol

सहाव्या सीझनमध्ये (कपडेपटामुळे वगैरे) रॉबर्टला जरासा जाडसर दाखवलाय आणि ग्रँथम आजी, मिसेस ह्यूज जरा बारीक दाखवल्यात असं मला वाटलं.
एनीवे, पुन्हा सगळी लहान-मोठी पात्रं, येऊन गेलेल्या पात्रांचे संवादांमधून उल्लेख, अप्स्टेअर्स, त्यापेक्षा डाऊन्स्टेअर्स पाहून लहानपणीच्या आठवणीतल्या एखाद्या गावाला परत गेल्यासारखं वाटलं.

फा, उपाधी वेगळी बहुतेक. मला नात्यांमधले संबोधन म्हणायचे आहे. कारण उपाध्यांमध्ये तू म्हणतोस तशी बरीच विविधता आहे. उदाहरणार्थ, पंडित नावापूर्वी लावतात.
December is the best month to binge watch Downton! मी पण सुरू करते आता Happy

एक रॅण्डम आठवले. इडिथ पुढच्या सीझन्स मधे ज्याच्याबरोबर दाखवली आहे त्या अ‍ॅक्टरचे यातले नाव "बर्टी पेल्हॅम" आहे. या सिरीजच्या लेखकाने पी.जी.वुडहाउस चे नाव (पेल्हॅम) व त्याच्या सर्वात लोकप्रिय कॅरेक्टरचे नाव (बर्टी) हे एकत्र करून ते ठेवल्यासारखे वाटते.

बाय द वे तो अ‍ॅक्टर द क्राउन मधेही आहे.

ही सगळी मंडळी डाउनटन मध्ये ओळखीची झाली की मग सगळीकडे दिसायला लागतात!
Young Hugh Bonneville is the business guy who doesn't recognize Julia Roberts in Notting hill!
Tom is a team mate in the imitation game.
मजा येते असे ओळखीचे चेहरे दिसले की Happy
युट्यूबवर Downton Abbey (https://www.youtube.com/c/downtonabbeyus) म्हणून चॅनल आहे त्यावर खूप सार्‍या क्लिप्स, मुलाखती असा सगळा खजिना आहे. मी अधूनमधून त्यावरच्या क्लिप्स पहात असते. विशेष म्हणजे त्यावर सगळ्या पात्रांच्या क्लिप्स आहेत फक्त मुख्य पात्रांच्या नाहीत. ही गोष्ट मला आवडते.

Young Hugh Bonneville is the business guy who doesn't recognize Julia Roberts in Notting hill!>>> हो ,. मला नक्की आठवत नव्हता. त्या साठी Notting Hill जाऊन परत check केला.
Imitation Game मध्ये Talbot पण आहे Happy

ख्रिसमस ब्रेकमध्ये परत एकदा पाहिली. ह्यावेळी जास्त निवांतपणे, बरेच सीन्स, डायलॉग्ज रिवाईंड करुन मजा घेत पाहिली. वर जिज्ञासानी जी आहा मोमेंट्स दिली आहेत , ती ह्या वेळी बघतांना पुन्हा जाणवली. एक व्हायोलेट आजी आपल्याकडे पण असावी हे पुन्हा एकदा फार वाटलं . अगदी शेवटी टॉम मेरीला झाडतो ते पण परत आवडलं.
ह्या सगळ्यांच्या खोल्यात मेड्सना वगैरे बोलवायच्या बेल्सची दोरी असते ते बघतांना अचानक शेरलॉक होम्सच्या adventure of the speckled band गोष्टीची आठवण झाली. मला, ही गोष्ट शाळेत असतांना वाचली होती तेव्हा , खोल्यांमध्ये अश्या दोर्या का असतात आणि त्याचा बेलशी काय संबंध हा प्रश्न पडला होता तो आत्ता सुटला.
मला व्यक्तिशः व्हायोलेट आजी आणि इसाबेल आणि मेरी टॉम , इडिथ टॉम ही नाती फार आवडली.
पिक्चर युट्युबवर पेड व्हर्जन आहे. पण युट्युब पेड कधी वापरले नाहीये. नीट बघता येते का ? फायर स्टीक वापरुन टिव्हीवर बघता येइल का ?

प्राईमवर मराठीमध्येही सबटायटल्स आहेत. ती लाऊन बघा एकदा. धमाल येते. बर्याच ठिकाणी अगदी शब्दशः भाषांतर केलय. फार मजा येते बघतांना.

मला व्यक्तिशः व्हायोलेट आजी आणि इसाबेल आणि मेरी टॉम , इडिथ टॉम ही नाती फार आवडली. >>> अगदी! टॉम चे दोघींशी नाते फार प्युअर आहे. व्हायलेट आजी आणि इअसाबेल तर मज्जाच Happy

मेरी आणि कार्सनची केमिस्ट्री सुद्धा!

आत्ता मला ते टायटल्स सुरू असताना फुटपट्टी वापरून डिशच्या बाजूचे चमचे, फोर्क वगैरे योग्य अंतरावर आहेत ते मोजतात ते आठवले Happy

तर ह्या सहा सिझन्स कडे पुन्हा एकदा बघताना मला सापडलेल्या माझ्या दोन सगळ्यात मोठ्या आहा मोमेंट्स! >>> आणखी एक सापडली. त्या "ग्वेन" (गॉट मधली इग्रेट) कडे टाईपरायटर सापडतो तेव्हा खाली त्यावर मोठा वाद होतो. कार्सन विचारतो की तिने हे सिक्रेट का लपवून ठेवले. त्यावर तिची बाजू घेणारी अ‍ॅना म्हणते
"She kept it private, not secret. There is a difference"

सध्या पुन्हा बघत आहे. मधे फ्लाइट मधे बघायला सहज डाउनलोड करून सुरूवात केली तर पुन्हा इंटरेस्ट आला.

सहाव्या सीझन मधे त्यांच्या घरी नेव्हिल चेंबरलेन येतो तेव्हाचा एक संवाद या सिरीजच्या संदर्भात नाही पण चेंबरलेनच्या अनेक वर्षे नंतर हिटरलसंबंधीच्या फेमस धोरणाशी संबंधित सूतोवाच असलेला आहे Happy

तो तेथे म्हणतो की इथे मला लेक्चर ऐकायला बोलावले असेल असे मला वाटले होते पण इथे तर मोठे वॉर सुरू आहे (कारण तेथे हॉस्पिटल बद्दल मोठा वाद सुरू असतो व याला एक साइड घ्यायला बोलावलेले असते)
Cora: "Oh, don't you enjoy a good fight?"
Chamberlain: "I'm not sure I do"

बाय द वे याच एपिसोड मधे चेंबरलेन ज्या प्रॅंकचा उल्लेख करतो - ज्यातून - व्हायोलेटने त्याला उघड केलेले नसते व त्यामुळे तिच्या आमंत्रणावरून तो लगेच यांच्या घरी येतो - ती प्रँकही प्रत्यक्षात घडलेली आहे.

मला डाउनटन चे सिनेमे कुठे पाहता येतील? नवीन थिएटरमध्ये असेल पण आधीचे कोणत्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आहेत?

पहिला पिक्चर अमेरिकेत मी बहुधा एचबीओ किंवा प्राइमवर पाहिला. दुसरा तर आत्ताच रिलीज होतोय ना?

धनश्री, भारतात नेटफ्लिक्स वर दिसत नाहीये सिनेमा. सिरीजचे सगळे सिझन आहेत.
फा, ओके! प्राइम बघते. नाहीतर युट्यूबवर रेंट करता येईल असं दिसतंय. एकच सिनेमा झालाय का रिलीज? मला उगीच वाटलं की दोन झालेत आणि आता हा येणारा तिसरा आहे!

भारतात नेटफ्लिक्स वर दिसत नाहीये सिनेमा. सिरीजचे सगळे सिझन आहेत. <<<>>>>> काढलेला दिसतोय. गुगल मुव्हीज वर आहे, पण तो विकत घ्यावा लागेल किंवा रेंट भरुन.
पण अगदी विनोदी आहे हा सिनेमा. खरं तर खूप स्कोप होता पण टिपीकल किचन पॉलीटीक्स दाखवलय राजा आणि डाऊनटनच्या कर्मचार्यांमध्ये.

दुसर्यांदा बघतीये. एक प्रश्न पडला., मोलेस्ली बद्दल. ( मला हेही कॅरेक्टर आवडतं, फार बिचारा, गरीब, निमूट दाखवलाय, येईल ते हसून साजरं करणारा, शेवटी तो सेटल होतो हे बघून बरं वाटलं )
तर मॅथ्यू आणि त्याची आई क्रॉली हाऊ समध्ये रहायला येतात तेव्हा मोलेस्ली तिथला बटलर दाखवलाय. मॅथ्यू नंतर त्याची नोकरी जाते आणि मग तो पडेल ती कामं करुन राहात असतो. मग मॅथ्यू यायच्या आधी तो काय करत असतो ? क्रॉली हाऊस सांभाळत असणार ना ? मग तेच का करत नाही नंतर ? मॅथ्यूची आई इतकी उदार असते तर ती त्याला जायला का सांगते? ( ह्याचं स्पष्टीकरण असेल, पण आठवत नाहीये )

हो पण मला ती कॅरेक्टर्स इतकी आवडतात की नुसते कार्सन, मिसेस ह्यूज, मिसेस पॉटमोअर खाली किचन मधे किंवा वरती व्हायोलेट ई गप्पा मारताना दाखवले तरी मला आवडेल Happy

किंवा अ‍ॅबी मधले विविध प्रसंग व त्यावर कार्सन च्या प्रतिक्रिया इतकेही पुरे Happy

हो पण मला ती कॅरेक्टर्स इतकी आवडतात की नुसते कार्सन, मिसेस ह्यूज, मिसेस पॉटमोअर खाली किचन मधे किंवा वरती व्हायोलेट ई गप्पा मारताना दाखवले तरी मला आवडेल Happy <<<>>>>>> अर्थात. आपण एका बाजूला बघून बघतोय की काय असं वाटावं इतके जवळचे वाटतात.

क्रॉली हाऊस सांभाळत असणार ना ? मग तेच का करत नाही नंतर ? मॅथ्यूची आई इतकी उदार असते तर ती त्याला जायला का सांगते? >> ती जायला सांगते का? मला वाटले तोच सोडतो, तेथे रोल नसल्याने.

Maggie Smith...
श्रद्धांजली
Unforgettable Dowager Countess of Grantham

Unforgettable Dowager Countess of Grantham >> ओह श्रद्धांजली

सुपर फेवरिट कॅरेक्टर आहे ते डॉवेजर/व्हॉयोलेट. एकदा केवळ तिचे संवाद/सीन्स नीट पाहण्यासाठी पूर्ण सिरीज पाहिली आहे पुन्हा.

Pages