अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
.
अनिरुद्धबापू म्हणवून घेणारे एक प्रस्थ अनेक वर्ष महाराष्ट्र राज्यात आहे. हे बापू शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. कदाचित वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अध्यात्मातल्या गुरूगिरीचा बाजार मोठा असल्याचे त्यांनी वेळीच ओळखल्यामुळे ते इकडे वळले असावेत.
ते स्वत: शिर्डीचे साईबाबा, राम व विष्णु यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते. ते शाळेत असल्यापासूनच ते शिर्डीचे साईबाबा असल्याचे त्यांना वाटे म्हणे. म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना कुठल्या तरी विद्यापीठाने डॉक्टरकीची पदवी दिली असे समजुयात. त्यांना राम म्हणावे, तर त्यांची पत्नी सीता व त्यांचा एक भाऊ किंवा जवळचा मित्र हनुमान. त्यांना विष्णु म्हणावे तर त्यांची पत्नी लक्ष्मी व तो मित्र किंवा भाऊ शेषनाग असा मौजेचा मामला आहे.
मध्यंतरी या मित्राचे किंवा भावाचे त्यांच्याशी मतभेद झाले व त्याला बदलून दुसरा त्या जागी आला. काही भक्तांनी सांगितले की तो आधीचा लक्ष्मण किंवा शेषनाग फ्रॉड होता, आताचा हा खरा आहे असे बापूंनी सांगितले. इतक्या लोकांचे अवतार असलेल्या बापूंना तो फ्रॉड आहे हे आधीच कसे कळले नाही असे प्रश्न यात विचारायचे नाहीत.
बापू हेलिकॉप्टरने जेथे जेथे जातात तेथे त्यांना हार घालण्याची इच्छा असलेल्यांना २५,००० रू. वगैरे मोजावे लागतात असे अनेक उल्लेख माहितीजालावर दिसतात.
त्यांचा भक्तपरिवार अफाट आहे. याचाच अर्थ आपले डोके त्यांच्याकडे गहाण टाकलेल्यांची संख्या बरीच आहे. अर्थात आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही. यातले अनेकजण सुशिक्षित आहेत बरे का! त्यांना सावध करायला जा तर त्यांचा फणकारा पहायला मिळतो इतक्या घातक प्रमाणावर त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आहे. आसाराम व त्याचा दिवटा नारायण यांचे धंदे माहित होऊनदेखील ते नराधम तसे करणारच नाहीत याची खात्री असलेले लोक अजुनही त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत, तसेच.
कोणाला वाटेल लोक बापूंच्या निमित्ताने देवधर्माच्या मागे लागले आहेत तर त्यात वाईट काय आहे?
काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण झाले, त्यानंतर काही दिवसात या महाभागाने एक प्रवचन झोडले. त्यात बलात्काराच्या संदर्भात त्याने जे तारे तोडले, ते ऐकताना एक सुशिक्षित म्हणायला अक्षरश: लाज वाटते. त्यांनी तोडलेले तारे पहा. त्यांनी पाच कलमे सांगितली.
१. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.
२. जी व्यक्ती रोज पाच वेळा गुरूक्षेत्र मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. अगदी १०० लोक जरी बलात्कार करायला गेले तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषदातले दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
४. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल किंवा अगदी मुक्या व्यक्तींनी मनातल्या मनात जरी अनिरुद्ध अनिरुद्ध असे म्हटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु म्हणजे बापू स्वत: करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
५. अहिल्या संघाच्या माध्यमातून ते असे काही तंत्र शिकवणार आहेत की ती स्त्री बलात्का-याला जागच्या जागी छक्का (त्यांच्याच भाषेत) करून टाकू शकेल.
मात्र हे सारे काही टर्म्स व कंडिशन्सवरच अवलंबून आहे बरे का! जसे जाहिरातींमध्ये fine print असते तसे. कारण बापू सांगतात की तुमची बापूंवर भक्ती, प्रेम व श्रद्धा असेल तरच हे शक्य होईल. आता कळले की निर्भया प्रकरणानंतरही देशातच काय सा-या जगात बलात्कार चालूच का आहेत? कारण त्यांची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही. आता बलात्कारावरचा एकच उपाय, तो म्हणजे सा-या जगाला बापूंच्या चरणी घालायचे. तरीही तसे काही प्रकरण झालेच, तर खुशाल समजायचे की त्या बलात्कारित स्त्रीची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही किंवा नव्हती. इतका साधा मामला आहे. अर्थात श्रद्धा आहे की नाही हे तपासायला बॅटरीचा चार्ज किती आहे ते तपासू शकेल असे लाल-पिवळा-हिरवा असे रंग दाखवणारे यंत्र काही बापू देत नाहीत बरे का! म्हणजे तुमची त्यांच्यावर पुरेशी श्रद्धा अाहे की नाही हे बापूच ठरवणार. आहे की नाही गंमत.
हे सारे प्रवचन युट्युबवर आहे बरे! बापूंना काही दिव्य शक्ती असल्या तरी त्यांना हे प्रवचन देताना मधूनमधून खोकला मात्र येतो बरे! मुळात डॉक्टर असल्यामुळे मध्येच अर्धे-एक वाक्य इंग्रजीतही बोलतात.
बलात्कार झालेल्या स्त्रीला आयुष्यभर त्याचे ओझे वहावे लागते अशा अर्थाचे तारे पण तोडलेले आहेत. कोठेही हे सांगणे नाही, की जे झाले त्यात त्या स्त्रीची काहीही चूक नाही, जे झाले ते विसरून पुढे पाहिले पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे, वगैरे.
बापूंचे हे असे बरळणे चालू असताना त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांपैकी, माफ करा, भक्तांपैकी एकाही मुर्खाच्या लक्षात आला नाही. म्हणजे डोके वा मेंदू गहाण ठेवणे हे कुठल्या थराला जाऊ शकते ते पाहून अंगावर काटा येतो. तो जादुटोणा कायदा इतका अर्थहीन केला गेला की यांच्यासारखे लोक त्यात अडकू शकणारच नाहीत.
हे एक प्रवचन झाले. आणखीही आहेत. पहा, ऐका व धन्य व्हा.
आता सांगा अशा धार्मिक गुरूंची जागा तुरूंगात हवी की मनोरुग्णालयात? आणि त्यांच्यासमोर बसून हा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेणा-यांचे काय करावे? आपण अशा ठिकाणी नसतो ना, हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आपलीच की.
या धन्य प्रवचनाची आठवण येण्याचे कारण म्हणजे काही शाळांमध्ये प्रवचने नियमितपणे आयोजित केली जातात यासंबंधीची बातमी. तर अशा शाळांमधील मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ते वेगळेच.
मागे मी चेन्नईतल्या कल्कीमहाराजाच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित कुटुंबाबद्दलही लिहिले होते.
मनीष, नाही पण एक मात्र आहे
मनीष, नाही
पण एक मात्र आहे हे लोक समाजोपयोगी बरीच काम करत असतात अस मला वाटत.
मो, आर्ट ऑफ लिव्हिंग की काय?
मो, आर्ट ऑफ लिव्हिंग की काय?
मो, आर्ट ऑफ लिव्हिंग वाटतं ?
मो, आर्ट ऑफ लिव्हिंग वाटतं ?
त्या नित्यानंदाचे सेक्स स्कँडल बाहेर आल्यावर तरी त्याचे दुकान बंद होईल असे वाटले होते. पण कसचे काय, अजून जोरात सुरु आहे.
बाकी बापूंच्या सचित दा च्या जागी दुसरा कुणी आला आहे का ?
भक्त तर हल्ली सर्वांचेच
भक्त तर हल्ली सर्वांचेच असतात.
राजकारणातील नेत्यांपासून ऐतिहासिक पुरूषांपर्यंत. भारत हा भक्तांचा देश होत चालला आहे.
अगदी पुरोगामीही कुणाचे न कुणाचे भक्त होत आहेत...
मो, AOL ना? मी श्री. श्रीं.
मो, AOL ना? मी श्री. श्रीं. चं एक लेक्चर ऐकायला गेले होते. ते काय बोलले पार डोक्यावरून गेलं... कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नुस्तं गोलम-गोल, ते नाजूक-साजूक हसणं काही झेपलं नाही. आपल्या बुद्धीचा दोष म्हणून गप्प बसले! मध्यंतरी हा एक ब्लॉग हाती लागला. http://artoflivingfree.blogspot.com/
असो. या बाफचा तो विषय नाही.
मी खूप खूप वर्षांपूर्वी आर्ट
मी खूप खूप वर्षांपूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंग चा तिन दिवसांचा क्लास केला होता. बहूतेक ९७ मध्ये. त्यावेळी रवीशंकरांच्या आधी बहूतेक श्री श्री लागलं नव्हतं.. त्यावेळी त्यात फक्त प्राणायाम असायचा. एका पुर्ण नास्तिक असलेल्या काकांनी तो कोर्स कंड्क्ट केला होता.
काही वर्षांनंतर त्या काकांच्या घरी गेले तर मला धक्काच बसला. आख्खं कुटूंब श्री श्री च्या भजनी लागलेलं. घरात त्यांचे मोठमोठे फोटो, प्रत्येक गोष्टीत गुरुजी गुरुजी करणं.. वर्षातून दोनेक वेळा बंगलोरला जावून येणं... सिनेमाची तिकीटं मिळाली तरी ती गुरुजींच्या कॄपेनी मिळाली असं एका टिनेज कझिननी त्यावेळी मला सांगितलं होतं. ज्या वयात मुलींच्या खोल्यांमध्ये सिनेस्टार किंवा क्रिकेट्पटूंचे फोटो असतात त्या वयात तिच्या खोलीत सगळीकडे गुरुजी होते.
ते कोहम्कोहम सोहम्सोह्म
ते कोहम्कोहम सोहम्सोह्म प्रकरण जाम इरिटेटिंग असतं. दर रविवारी पहाटे माझ्या घरासमोरच्या हॉलमधे मोठे स्पीकर लावून चालवलेल्या हायपरव्हेंटिलेशन बोंबा मी बंद पाडल्या आहेत. आता ते लोक तिथे फिरकतही नाहीत.
मला वाटतं एखाद्यावर श्रद्धा/
मला वाटतं एखाद्यावर श्रद्धा/ भक्ती असणं चुकीचं नाही. ते जर त्यांचे विचार तुमच्यावर थोपत असतील तर चुकीचं आहे.
सिनेमाचं तिकिट माझ्या भवानी आईच्या कृपेनेच मिळालं हे तर मीही म्हणते.....माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला भगवंत कारणीभूत आहे हे मी मानतेच. प्रत्येक आनंदाच्या क्षणाचा उपभोग त्याच्याचमुळे मला घेता येतोय हे देखील माझं मत आहे.......ते असो
लोकं हे सगळं मानतात/करतात त्यामागे त्यांना आलेले अनुभव असतात. त्यांचं समर्थन नाही करतेय पण त्यांना नावं ठेवण्यासारखं काही यात जाणवलं नाही.
कोणाच्याकामुळे असेना, लोकं सत्कर्म करतायेत, पॉझिटिव्ह रहातायेत, संकटांना सामोरे जाऊन पार करतायेत ते जास्त महत्वाचं
बाकी बाबा - बुवांना माना अगर मानू नका पण ते जे सांगतायेत त्यातलं काय ऐकायचं काय नाही हे मात्र बुद्धी शाबूत ठेवून समजून घ्या एवढंच.
रीया अनुमदोन. विशेषतः मला
रीया अनुमदोन. विशेषतः
मला वाटतं एखाद्यावर श्रद्धा/ भक्ती असणं चुकीचं नाही. ते जर त्यांचे विचार तुमच्यावर थोपत असतील तर चुकीचं आहे.
बाकी बाबा - बुवांना माना अगर मानू नका पण ते जे सांगतायेत त्यातलं काय ऐकायचं काय नाही हे मात्र बुद्धी शाबूत ठेवून समजून घ्या एवढंच.
विरोध करणारे "लोकांच्या श्रद्धेचा गैर्फायदा घेणा-या बाबाचा विरोध करण्याऐवजी आणि नुकसानकारक परंपरांचा विरोध करण्याऐवजी" सरसकट विशिष्त पंथ / धर्म (काफिरांना मारा असे स्पष्ट लिहिलेले नसताना ही त्या धर्माचा) / जातीचाच विरोध करतात / बदनामी करतात तेव्हा अशा सेकुलर ईंटेलिजनांस आणि त्यांच्या विचांराचा विरोध करावासा वाटतो.
असो पण चोराला चोर
असो पण चोराला चोर म्हणण्यासाठी आपण सावच असले पाहिजे असे काही नाही.
>>
::हहगलो:
कोणाच्याकामुळे असेना, लोकं
कोणाच्याकामुळे असेना, लोकं सत्कर्म करतायेत, पॉझिटिव्ह रहातायेत, संकटांना सामोरे जाऊन पार करतायेत ते जास्त महत्वाचं >> रीया तोच प्रॉब्लेम आहे ग...एवढे सगळे ज्ञान घेऊन ही प्रत्यक्ष आयुष्यात ते इम्प्लीमेंट होत नाही. आणि ज्यांना सत्कर्मे करायची आहेत त्यांना बाबा आणि बेबीं ची काय गरज. उलट एवढे सगळे बाबाझ आणि बेबीझ निर्माण होवून ही दुष्कर्मे वाढत च आहेत.
बापूंच्या बायकोला ८ हजाराची पैठणी घेणारे एक कपल ओळखीत आहे.गरजूंसाठी तुम्ही एवढे पैसे खर्च्कराल का?
माझ्या एका मैत्रीणीने (BE -Electronics प्रोजेक्ट मॅनेजर), जॉब वैगरे सोडून श्री श्री साठी वाहून घेतले आहे. त्यांच्या कोर्सेस ची इन्स्ट्रक्टर झाली आहे ती.
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या हत्तीचं डोकं असलेल्या देवाच्या भक्तांना अनिरुद्ध बापूंच्या भक्तांवर निर्बुद्धपणाची टीका करायचा काहीही नैतिक अधिकार नाही
ज्या वयात मुलींच्या
ज्या वयात मुलींच्या खोल्यांमध्ये सिनेस्टार किंवा क्रिकेट्पटूंचे फोटो असतात त्या वयात तिच्या खोलीत सगळीकडे गुरुजी होते. मेलो हसून हसून.......: :))
पण एक मात्र आहे हे लोक
पण एक मात्र आहे हे लोक समाजोपयोगी बरीच काम करत असतात अस मला वाटत.
आमचा सलमानही करतो हो
मी मात्र काहीही करत नाही. यावरुन कर नाही तो(च) डरत नाही असा निष्कर्ष काढायला माझी काहीही हरकत नाही.
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या हत्तीचं डोकं असलेल्या देवाच्या भक्तांना अनिरुद्ध बापूंच्या भक्तांवर निर्बुद्धपणाची टीका करायचा काहीही नैतिक अधिकार नाही
>>> पॉईंट आहे!
पण मी कधीही पूजा करत नाही, माझ्या घरात देवघर नाही, देवाचा फोटोही नाही, मी देवळात जात नाही, मूर्तीपूजेवर माझा विश्वास नाही (आणि हे सांगायला मी घाबरत नाही;)
त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे.
हे नैतिक अधिकार प्रकरण एकदम
हे नैतिक अधिकार प्रकरण एकदम 'जा पेहले उस आदमीका साइन लेके आ...' टाइप झालंय..
(No subject)
हे असले सगळे बाबा, बुवा,
हे असले सगळे बाबा, बुवा, बाया, गुरूजी, इ. हिंदू धर्माला कल्टची लागलेली फार मोठी कीड आहे.
त्यातल्या त्यात अपवाद म्हणजे रामदेवबाबाचा. (मी त्यांचा भक्त / अनुयायी नाहीये)
पण रामदेवाने योगाचा प्रचार प्रसार करून त्याचा बागुलबुवा कमी केला आणि ते सुद्धा लोकांवर कोणत्याही प्रकारची बळजबरी न करता, हे उल्लेखनीय आहे.
अन्य कल्टवाले आणि रामदेव यांच्यात बराच फरक जाणवतो.
अन्य कल्टवाले आणि रामदेव
अन्य कल्टवाले आणि रामदेव यांच्यात बराच फरक जाणवतो.
<<
हो. रामदेव सरळ सरळ धंदा करतोय असे सांगतो. ताकाला जाऊन भांडे लपवत नाही.
बाबाच्या समोर स्टेडियमभर कार्यक्रम करायचे किती पैसे द्यावे लागतात ते ठाऊकेय का?
अन बाबा काय वाट्टेल तो आजार बरा करतात हेही ठाऊक आहे का?
रामदेवबाबाच्या योगाच्या
रामदेवबाबाच्या योगाच्या प्रचार, प्रसार आणि सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते. अन्य चुकीच्या बाबी असतील तर त्या चुकीच्याच आहेत. त्याचे कौतुक नाही.
टग्या | 17 December, 2015 -
टग्या | 17 December, 2015 - 20:12
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या हत्तीचं डोकं असलेल्या देवाच्या भक्तांना अनिरुद्ध बापूंच्या भक्तांवर निर्बुद्धपणाची टीका करायचा काहीही नैतिक अधिकार नाही.
>>
मग कोणाले हाये?
सामी, मान्य आहे गं. मुळात
सामी, मान्य आहे गं. मुळात लोकांना कुठं थांबायचं तेच कळत नाही आणि मग सगळाच बाजार होतो
राधे मा आठवली मला हे वाचून.
राधे मा आठवली मला हे वाचून.
शि, ती वेडी बाई..... ती मा..
शि, ती वेडी बाई..... ती मा.. कमी आणि कार्टुन जास्त वाटते मला.... ;
अरेरे कुठे नेउन ठेवलाय माबो.
अरेरे कुठे नेउन ठेवलाय माबो.
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या
अंगावरच्या मळापासून बनवलेल्या हत्तीचं डोकं असलेल्या देवाच्या भक्तांना अनिरुद्ध बापूंच्या भक्तांवर निर्बुद्धपणाची टीका करायचा काहीही नैतिक अधिकार नाही
>>> पॉईंट आहे! >>>> अजिबात पोइंट वाटत नाही. सगुण- निर्गुण रूपात गणपती - अल्ला - येशू इ.इ. अशी जी काही शक्ती आहे, त्यावर विश्वास - श्रध्दा असो नसो तिच्याशी असल्या बाबा लोकांची तुलना होऊच शकत नाही. कारण माझी पुजा केली नाहीस तर तुझी तंतरवीन असे देव (स.नि.) कधीच म्हणणार नाही, तो देवच नाही. श्रध्दा असलीच तर ती डोळस असावी हेच माझे मत.
आणि घरात देव देव्हारे नसतानाही उपासना, पुजा करता येतेच.
अन दे.दे. ठेऊन उपासना करणा-यांची या अ.बा. व इतर भकतांशी तुलाना होऊ शकत नाही..
मला मृण्मयी ची कमेंट नाही
मला मृण्मयी ची कमेंट नाही सापडत आहे.कोणीतरी टाका ना.नाहीतर मृण्मयी तु स्व:त च लिही ना.
ज्यांना होमहवन करायचे आहेत
ज्यांना होमहवन करायचे आहेत त्यांनी करा.
पण त्या हवनात वड, पिंपळ, उंबर वगैरे झाडांच्याच समिधा लागतात अस ऐकले आहे. हि झाडं वाढण्यासाठी किती कालावधी लागतो हेही आपण जाणताच.
हे होमहवन या झाडांच्या मुळावर आलंय. मुरबाड कडील प्रदेशात रस्त्याकडील झाडे जाणून बुजून इंजेक्शन देऊन, मुळाला आग लाऊन पाडली जातात आणि नंतर त्यांची रवानगी या असल्या हवनासाठी केली जाते. अक्षरशः बेसुमार कत्तल चालू आहे. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये रानटी जनावरांसाठी उंबर हे एकमेव फळझाड उपलब्ध आहे. तेंव्हा त्यांच्या तोंडाचा घास कडून तो आगीच्या हवाली करण्याआधी हजारदा विचार करा. plssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss…हात जोडतो!
समिधा सोडा, पण बेल, आंब्याची
समिधा सोडा, पण बेल, आंब्याची पाने, अशोकपाने इ.इ. सगळे बंद करा हो.. झालच तर आपट्याची पाने.
>> कारण माझी पुजा केली नाहीस
>> कारण माझी पुजा केली नाहीस तर तुझी तंतरवीन असे देव (स.नि.) कधीच म्हणणार नाही, तो देवच नाही.
साधुवाण्याची गोष्ट ऐकली नाही का ताई तुम्ही?
>> श्रध्दा असलीच तर ती डोळस असावी हेच माझे मत
श्रद्धा नेहमीच आंधळी असते हे माझे मत.
Pages