अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
.
अनिरुद्धबापू म्हणवून घेणारे एक प्रस्थ अनेक वर्ष महाराष्ट्र राज्यात आहे. हे बापू शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. कदाचित वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अध्यात्मातल्या गुरूगिरीचा बाजार मोठा असल्याचे त्यांनी वेळीच ओळखल्यामुळे ते इकडे वळले असावेत.
ते स्वत: शिर्डीचे साईबाबा, राम व विष्णु यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते. ते शाळेत असल्यापासूनच ते शिर्डीचे साईबाबा असल्याचे त्यांना वाटे म्हणे. म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना कुठल्या तरी विद्यापीठाने डॉक्टरकीची पदवी दिली असे समजुयात. त्यांना राम म्हणावे, तर त्यांची पत्नी सीता व त्यांचा एक भाऊ किंवा जवळचा मित्र हनुमान. त्यांना विष्णु म्हणावे तर त्यांची पत्नी लक्ष्मी व तो मित्र किंवा भाऊ शेषनाग असा मौजेचा मामला आहे.
मध्यंतरी या मित्राचे किंवा भावाचे त्यांच्याशी मतभेद झाले व त्याला बदलून दुसरा त्या जागी आला. काही भक्तांनी सांगितले की तो आधीचा लक्ष्मण किंवा शेषनाग फ्रॉड होता, आताचा हा खरा आहे असे बापूंनी सांगितले. इतक्या लोकांचे अवतार असलेल्या बापूंना तो फ्रॉड आहे हे आधीच कसे कळले नाही असे प्रश्न यात विचारायचे नाहीत.
बापू हेलिकॉप्टरने जेथे जेथे जातात तेथे त्यांना हार घालण्याची इच्छा असलेल्यांना २५,००० रू. वगैरे मोजावे लागतात असे अनेक उल्लेख माहितीजालावर दिसतात.
त्यांचा भक्तपरिवार अफाट आहे. याचाच अर्थ आपले डोके त्यांच्याकडे गहाण टाकलेल्यांची संख्या बरीच आहे. अर्थात आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही. यातले अनेकजण सुशिक्षित आहेत बरे का! त्यांना सावध करायला जा तर त्यांचा फणकारा पहायला मिळतो इतक्या घातक प्रमाणावर त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आहे. आसाराम व त्याचा दिवटा नारायण यांचे धंदे माहित होऊनदेखील ते नराधम तसे करणारच नाहीत याची खात्री असलेले लोक अजुनही त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत, तसेच.
कोणाला वाटेल लोक बापूंच्या निमित्ताने देवधर्माच्या मागे लागले आहेत तर त्यात वाईट काय आहे?
काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण झाले, त्यानंतर काही दिवसात या महाभागाने एक प्रवचन झोडले. त्यात बलात्काराच्या संदर्भात त्याने जे तारे तोडले, ते ऐकताना एक सुशिक्षित म्हणायला अक्षरश: लाज वाटते. त्यांनी तोडलेले तारे पहा. त्यांनी पाच कलमे सांगितली.
१. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.
२. जी व्यक्ती रोज पाच वेळा गुरूक्षेत्र मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. अगदी १०० लोक जरी बलात्कार करायला गेले तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषदातले दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
४. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल किंवा अगदी मुक्या व्यक्तींनी मनातल्या मनात जरी अनिरुद्ध अनिरुद्ध असे म्हटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु म्हणजे बापू स्वत: करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
५. अहिल्या संघाच्या माध्यमातून ते असे काही तंत्र शिकवणार आहेत की ती स्त्री बलात्का-याला जागच्या जागी छक्का (त्यांच्याच भाषेत) करून टाकू शकेल.
मात्र हे सारे काही टर्म्स व कंडिशन्सवरच अवलंबून आहे बरे का! जसे जाहिरातींमध्ये fine print असते तसे. कारण बापू सांगतात की तुमची बापूंवर भक्ती, प्रेम व श्रद्धा असेल तरच हे शक्य होईल. आता कळले की निर्भया प्रकरणानंतरही देशातच काय सा-या जगात बलात्कार चालूच का आहेत? कारण त्यांची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही. आता बलात्कारावरचा एकच उपाय, तो म्हणजे सा-या जगाला बापूंच्या चरणी घालायचे. तरीही तसे काही प्रकरण झालेच, तर खुशाल समजायचे की त्या बलात्कारित स्त्रीची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही किंवा नव्हती. इतका साधा मामला आहे. अर्थात श्रद्धा आहे की नाही हे तपासायला बॅटरीचा चार्ज किती आहे ते तपासू शकेल असे लाल-पिवळा-हिरवा असे रंग दाखवणारे यंत्र काही बापू देत नाहीत बरे का! म्हणजे तुमची त्यांच्यावर पुरेशी श्रद्धा अाहे की नाही हे बापूच ठरवणार. आहे की नाही गंमत.
हे सारे प्रवचन युट्युबवर आहे बरे! बापूंना काही दिव्य शक्ती असल्या तरी त्यांना हे प्रवचन देताना मधूनमधून खोकला मात्र येतो बरे! मुळात डॉक्टर असल्यामुळे मध्येच अर्धे-एक वाक्य इंग्रजीतही बोलतात.
बलात्कार झालेल्या स्त्रीला आयुष्यभर त्याचे ओझे वहावे लागते अशा अर्थाचे तारे पण तोडलेले आहेत. कोठेही हे सांगणे नाही, की जे झाले त्यात त्या स्त्रीची काहीही चूक नाही, जे झाले ते विसरून पुढे पाहिले पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे, वगैरे.
बापूंचे हे असे बरळणे चालू असताना त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांपैकी, माफ करा, भक्तांपैकी एकाही मुर्खाच्या लक्षात आला नाही. म्हणजे डोके वा मेंदू गहाण ठेवणे हे कुठल्या थराला जाऊ शकते ते पाहून अंगावर काटा येतो. तो जादुटोणा कायदा इतका अर्थहीन केला गेला की यांच्यासारखे लोक त्यात अडकू शकणारच नाहीत.
हे एक प्रवचन झाले. आणखीही आहेत. पहा, ऐका व धन्य व्हा.
आता सांगा अशा धार्मिक गुरूंची जागा तुरूंगात हवी की मनोरुग्णालयात? आणि त्यांच्यासमोर बसून हा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेणा-यांचे काय करावे? आपण अशा ठिकाणी नसतो ना, हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आपलीच की.
या धन्य प्रवचनाची आठवण येण्याचे कारण म्हणजे काही शाळांमध्ये प्रवचने नियमितपणे आयोजित केली जातात यासंबंधीची बातमी. तर अशा शाळांमधील मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ते वेगळेच.
मागे मी चेन्नईतल्या कल्कीमहाराजाच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित कुटुंबाबद्दलही लिहिले होते.
प्रसाद, तुम्ही दिलेल्या
प्रसाद,
तुम्ही दिलेल्या लिंकवर मिळालेले मौक्तिक,
"
Why do you love us so much?
On the 30th of March, at 7:30 am, about 10 volunteers from Kalyan and Shahad Centers, left by a Sumo vehicle to coordinate upasana at two places near Kasara in a region called Vashala. Another set of 10 volunteers from Bhandup (East and West) centers, also traveling by a Sumo, met us near Kasara. To reach the village of Veluk one has to traverse a short ghat section after passing the Central School at Vashala. While driving up the ghat section at a steep blind corner; our Sumo suddenly left its path in an attempt to give way to another vehicle coming from the opposite direction. The driver had stepped on the accelerator instead of the brakes. The car kept rattling along the rugged terrain, bumping and sliding at places. All of us kept screaming “Bapu Bapu”. The car just would not stop. Finally on seeing a huge deep ditch in front of us, we just closed our eyes and braced ourselves to face the imminent final moments of our lives. Right at that moment, everyone called out to Bapu in shear desperation and the car just halted as it is. When we opened our eyes, to our amazement, the car had been stopped by just a feeble dry shrub. A few moments later, the shrub fell into the ditch. Instead of us falling in the ditch, it was the shrub that had fallen into the ditch."
त्या ड्रायव्हरने बिचा-याने काही प्रयत्न केले असतील, त्यामुळे गाडीचा वेग कमी झाला असेल, त्याला धन्यवाद देण्याऐवजी हे मूर्ख बापू बापू म्हणत राहिले म्हणून ती गाडी थांबली या भ्रमात.
देव दिसत नाही, पण अनिरुद्ध
देव दिसत नाही, पण अनिरुद्ध बापू दिसतात.
विश्वास दिसणार्यावर ठेवायचा की न दिसणार्यावर? >> स्वतःवर!!!
कोणतेच बाबा/बुवा स्वतःवर विश्वास ठेवा असे सांगताना दिसत नाहीत!!
>> देव दिसत नाही आं?? मंग
>> देव दिसत नाही
आं?? मंग लोका चार चार घंटे शिद्दीविनायकच्या लायनीत हुबे रवान दर्शन घेतत ता कोनाचा?
>> कोणतेच बाबा/बुवा स्वतःवर
>> कोणतेच बाबा/बुवा स्वतःवर विश्वास ठेवा असे सांगताना दिसत नाहीत!!
आं?? माज्या नावाचो जप करा मगे मी बलात्काऱ्याचो इंष्टंट हिजडो बनवतंय असा बापू म्हणतंत. अजून इस्वास ठेवूक काय सांगाक लागता ता बोला
त्या जुन्या हितगुजच्या बाफवर
त्या जुन्या हितगुजच्या बाफवर मला एक सल्ला दिला गेला होता >> मला 'भेटण्याविषयी' मेल आली होती.
मला 'भेटण्याविषयी' मेल आली
मला 'भेटण्याविषयी' मेल आली होती. >>>> मलाही.
पण त्या बीबीवर सर्वात धम्माल किस्सा मृण्मयी या आयडीचा होता.
भेटून यायचं ना मग दुध का दुध
भेटून यायचं ना मग
दुध का दुध और पाणी का पाणी तिथेच झाले असते
हरि ओम श्रीराम अंबज्ञ
मला इमेल आली असेल तर माहित
मला इमेल आली असेल तर माहित नाही कारण त्याच दरम्यान माझा एक इमेल आयडी हॅक झाला आणि गेला. नवीन आयडी उघडून सगळीकडे तो बदलेपर्यंत हॅकरला गेली असतील प्रेमपत्रे.
येस्स आलेले आहेत बापूभक्त!
येस्स आलेले आहेत बापूभक्त!
बरोबर तेव्हाच कसा ओ हॅक झाला
बरोबर तेव्हाच कसा ओ हॅक झाला इमेल आयडी?
जुन्या मायबोलीवर धमाल आलेली
जुन्या मायबोलीवर धमाल आलेली ह्या बीबीवर. मी 'बापूभक्तांची टोळधाड त्या बीबीवर जशी आली तशी गायबही झाली' असं म्हणणारच होते तेवढ्यात एक आयडी वर दिसलाच. हा आयडीही त्या बीबीवर बहुतेक होता.
काही प्राचीन वादांचा पेटारा
काही प्राचीन वादांचा पेटारा उघडण्याची एक दुर्मीळ संधी चालून आलेली दिसत आहे. राकु, तुम्ही असेच उत्खनन यंत्रांचे काम अव्याहत सुरू ठेवा. निदान नवीन राजकीय ड्यु आय डी निघण्याचे प्रमाणतरी त्यामुळे आटोक्यात येईल.
हा आयडीही त्या बीबीवर बहुतेक
हा आयडीही त्या बीबीवर बहुतेक होता>>>>>> नव्हता
भ्रमरनी दिलेली लिंक वाचली .
भ्रमरनी दिलेली लिंक वाचली . धमाल बाफ आहे. मामी तुझ्या त्या धमाल बाफच्या हेडरमध्ये add कर ती लिंक . त्या लिंकवरची मृन्मयीची कमेंट धम्माल आहे .
बाकी या बापूंचे किस्से खूपजणांकडून ऐकलेत . माझ्या शेजारचे डॉक्टर काका ह्या बापूंचे बॅचमेट . त्यांनी ते केईएममधल प्रकरण सांगितलेलं . माझ्या मामीला देखील या बापूंच्या भक्तीचा नाद होता लग्नापूर्वी . मामाने लग्नानंतर बंद करून टाकायला लावलं हे प्रकरण
हरि ओम श्रीराम अंबज्ञ <<
हरि ओम श्रीराम अंबज्ञ

<<
बरोबर तेव्हाच कसा ओ हॅक झाला
बरोबर तेव्हाच कसा ओ हॅक झाला इमेल आयडी? <<
ते तुमचा बापूच जाणे.
मी काय संशय घेतला नव्हता कुणावर पण आता तुम्हाला नाराज कसं करणार. भक्तांनीच केला असेल असं म्हणते झालं.
नी
नी
मृण्मयीची कोणती कमेन्ट /
मृण्मयीची कोणती कमेन्ट / किस्सा ? तिथे इतकी पानं आहेत की कुठे बघावं हे कळेना!
शेवटच्या पाचसहा पानांमधे बघ.
शेवटच्या पाचसहा पानांमधे बघ.
ह्या मुली मला मार खायला
ह्या मुली मला मार खायला लावणार!
मी फार काही नव्हतं हो लिहिलं. पण तेव्हा मला एका भक्ताची प्रेमळ इमेल आली होती. अमेरिकेत कुठल्या सेंटरला जाता विचारलं होतं! काय सेंटर सांगणार कप्पाळ!?
(No subject)
बापरे, मी थोडं चाळलं तिकडचं.
बापरे, मी थोडं चाळलं तिकडचं. माझं डोकं गरगरलं. विनोदी वगैरे काही नाही वाटलं.
बापूभक्तांची झुंड आली तिकडे.
दीड मायबोलीकर आभाळातच बरे
दीड मायबोलीकर
आभाळातच बरे आहात.. उगाच कशाला जमिनीवरच्या गोष्टींमधे अडकताय
(No subject)
राजेश कुलकर्णी, तुमच्या
राजेश कुलकर्णी,
तुमच्या धाग्यावर आलेले हे नवीनच आय डी बघितलेत का? हे सगळे वेड्यासारखे कोणत्यातरी तिसर्याच विषयावर बोलत आहेत.
मृण्मयीची कोणती कमेन्ट /
मृण्मयीची कोणती कमेन्ट / किस्सा ? तिथे इतकी पानं आहेत की कुठे बघावं हे कळेना!
>>
कोणीतरी लिंक द्या हो! मी पण ७-८ पानं चाळली काहीच हाती सापडले नाही.
वॉर्निंग चुकून राहीली का ?
वॉर्निंग चुकून राहीली का ?
मृण्मयीची कमेंट पहिल्याच
मृण्मयीची कमेंट पहिल्याच पानावर आहे तिथे... १७ जानेवारी २००७ च्या.
मृणची कमेंट जबरी होती
मृणची कमेंट जबरी होती
अमेरीकेतलं सेंटर!
मला १८ जाने ०७ नंतरचीच पाने
मला १८ जाने ०७ नंतरचीच पाने दिसत आहेत. कोणीतरी पेस्टाना ते इथे प्लीज.
Pages