अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी

Submitted by Rajesh Kulkarni on 16 December, 2015 - 00:04

अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
.
अनिरुद्धबापू म्हणवून घेणारे एक प्रस्थ अनेक वर्ष महाराष्ट्र राज्यात आहे. हे बापू शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. कदाचित वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अध्यात्मातल्या गुरूगिरीचा बाजार मोठा असल्याचे त्यांनी वेळीच ओळखल्यामुळे ते इकडे वळले असावेत.

ते स्वत: शिर्डीचे साईबाबा, राम व विष्णु यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते. ते शाळेत असल्यापासूनच ते शिर्डीचे साईबाबा असल्याचे त्यांना वाटे म्हणे. म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना कुठल्या तरी विद्यापीठाने डॉक्टरकीची पदवी दिली असे समजुयात. त्यांना राम म्हणावे, तर त्यांची पत्नी सीता व त्यांचा एक भाऊ किंवा जवळचा मित्र हनुमान. त्यांना विष्णु म्हणावे तर त्यांची पत्नी लक्ष्मी व तो मित्र किंवा भाऊ शेषनाग असा मौजेचा मामला आहे.

मध्यंतरी या मित्राचे किंवा भावाचे त्यांच्याशी मतभेद झाले व त्याला बदलून दुसरा त्या जागी आला. काही भक्तांनी सांगितले की तो आधीचा लक्ष्मण किंवा शेषनाग फ्रॉड होता, आताचा हा खरा आहे असे बापूंनी सांगितले. इतक्या लोकांचे अवतार असलेल्या बापूंना तो फ्रॉड आहे हे आधीच कसे कळले नाही असे प्रश्न यात विचारायचे नाहीत.

बापू हेलिकॉप्टरने जेथे जेथे जातात तेथे त्यांना हार घालण्याची इच्छा असलेल्यांना २५,००० रू. वगैरे मोजावे लागतात असे अनेक उल्लेख माहितीजालावर दिसतात.

त्यांचा भक्तपरिवार अफाट आहे. याचाच अर्थ आपले डोके त्यांच्याकडे गहाण टाकलेल्यांची संख्या बरीच आहे. अर्थात आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही. यातले अनेकजण सुशिक्षित आहेत बरे का! त्यांना सावध करायला जा तर त्यांचा फणकारा पहायला मिळतो इतक्या घातक प्रमाणावर त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आहे. आसाराम व त्याचा दिवटा नारायण यांचे धंदे माहित होऊनदेखील ते नराधम तसे करणारच नाहीत याची खात्री असलेले लोक अजुनही त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत, तसेच.

कोणाला वाटेल लोक बापूंच्या निमित्ताने देवधर्माच्या मागे लागले आहेत तर त्यात वाईट काय आहे?

काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण झाले, त्यानंतर काही दिवसात या महाभागाने एक प्रवचन झोडले. त्यात बलात्काराच्या संदर्भात त्याने जे तारे तोडले, ते ऐकताना एक सुशिक्षित म्हणायला अक्षरश: लाज वाटते. त्यांनी तोडलेले तारे पहा. त्यांनी पाच कलमे सांगितली.
१. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.
२. जी व्यक्ती रोज पाच वेळा गुरूक्षेत्र मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. अगदी १०० लोक जरी बलात्कार करायला गेले तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषदातले दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
४. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल किंवा अगदी मुक्या व्यक्तींनी मनातल्या मनात जरी अनिरुद्ध अनिरुद्ध असे म्हटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु म्हणजे बापू स्वत: करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
५. अहिल्या संघाच्या माध्यमातून ते असे काही तंत्र शिकवणार आहेत की ती स्त्री बलात्का-याला जागच्या जागी छक्का (त्यांच्याच भाषेत) करून टाकू शकेल.

मात्र हे सारे काही टर्म्स व कंडिशन्सवरच अवलंबून आहे बरे का! जसे जाहिरातींमध्ये fine print असते तसे. कारण बापू सांगतात की तुमची बापूंवर भक्ती, प्रेम व श्रद्धा असेल तरच हे शक्य होईल. आता कळले की निर्भया प्रकरणानंतरही देशातच काय सा-या जगात बलात्कार चालूच का आहेत? कारण त्यांची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही. आता बलात्कारावरचा एकच उपाय, तो म्हणजे सा-या जगाला बापूंच्या चरणी घालायचे. तरीही तसे काही प्रकरण झालेच, तर खुशाल समजायचे की त्या बलात्कारित स्त्रीची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही किंवा नव्हती. इतका साधा मामला आहे. अर्थात श्रद्धा आहे की नाही हे तपासायला बॅटरीचा चार्ज किती आहे ते तपासू शकेल असे लाल-पिवळा-हिरवा असे रंग दाखवणारे यंत्र काही बापू देत नाहीत बरे का! म्हणजे तुमची त्यांच्यावर पुरेशी श्रद्धा अाहे की नाही हे बापूच ठरवणार. आहे की नाही गंमत.

हे सारे प्रवचन युट्युबवर आहे बरे! बापूंना काही दिव्य शक्ती असल्या तरी त्यांना हे प्रवचन देताना मधूनमधून खोकला मात्र येतो बरे! मुळात डॉक्टर असल्यामुळे मध्येच अर्धे-एक वाक्य इंग्रजीतही बोलतात.

बलात्कार झालेल्या स्त्रीला आयुष्यभर त्याचे ओझे वहावे लागते अशा अर्थाचे तारे पण तोडलेले आहेत. कोठेही हे सांगणे नाही, की जे झाले त्यात त्या स्त्रीची काहीही चूक नाही, जे झाले ते विसरून पुढे पाहिले पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे, वगैरे.

बापूंचे हे असे बरळणे चालू असताना त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांपैकी, माफ करा, भक्तांपैकी एकाही मुर्खाच्या लक्षात आला नाही. म्हणजे डोके वा मेंदू गहाण ठेवणे हे कुठल्या थराला जाऊ शकते ते पाहून अंगावर काटा येतो. तो जादुटोणा कायदा इतका अर्थहीन केला गेला की यांच्यासारखे लोक त्यात अडकू शकणारच नाहीत.

हे एक प्रवचन झाले. आणखीही आहेत. पहा, ऐका व धन्य व्हा.

आता सांगा अशा धार्मिक गुरूंची जागा तुरूंगात हवी की मनोरुग्णालयात? आणि त्यांच्यासमोर बसून हा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेणा-यांचे काय करावे? आपण अशा ठिकाणी नसतो ना, हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आपलीच की.

या धन्य प्रवचनाची आठवण येण्याचे कारण म्हणजे काही शाळांमध्ये प्रवचने नियमितपणे आयोजित केली जातात यासंबंधीची बातमी. तर अशा शाळांमधील मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ते वेगळेच.

मागे मी चेन्नईतल्या कल्कीमहाराजाच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित कुटुंबाबद्दलही लिहिले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भर रस्त्यात बस उभी करुन सगळ्यांना चांगले आरोग्य / सदबुद्धी मिळू दे ई. मोठ्याने गाणे लावणारे ते हेच ना?
डोक्यात जातो तो आवाज आणि ती गाणी. असे ध्वनी प्रदुषन करुन कसे सगळ्यांना आरोग्य लाभेल? लांबुन जरी ते कानावर पडले तरी डोके दुखायला सुरुवात होते.

भर रस्त्यात बस उभी करुन सगळ्यांना चांगले आरोग्य / सदबुद्धी मिळू दे ई. >> ते बहुधा वामनराव पै..

राजेश कुलकर्णी लेख आवडला, त्यात मान्डलेले विचारही आवडले.

मी या विषयावर वेळोवेळी मत मान्डलेले आहेत. बापूला तो किती सामान्य आहे हे माहित आहे... ठकवले केवळ भक्त जातात. बापून्सारखे लोक समाजाला जास्त धोकादायक आहे. निर्भयाच्या वेळचे वक्तव्य मुर्खपणाचा कळस आहे.

पुढचा लेख.... आसुमल वर असणार आहे का?

<<जुन्या बीबी ची लिंक कुणी देईल का? आम्ही तिकडून इकडे कॉपी पेस्ट मारू.>>
----- जुन्या मायबोली वर या विषयावर चर्चा / वाद झालेले आहेत हे आठवते....

जी लोक या बापू, मॉं अश्या लोकांकडे जातात तर त्यांना जाऊदे ना, ज्याची त्याची श्रध्दा, वेळ आणि पैसा. तुम्हाला काय प्रॉब्लम आहे? आणि एवढचेच जर तुम्हाला त्या जनतेचे प्रबोधन करायचे असेल तर या बापू लोकांचे प्रवचन, निरुपण जिथे सुरु असते तिथे जाऊन करा मग बघा तुमचे गाल कसे टॉमटोसारखे होतील. इथे उगाच शिळ्या जिलब्या परत परत कश्याला पाडताय.

त्या जुन्या हितगुजच्या बाफवर मला एक सल्ला दिला गेला होता तो आता तुम्हाला देते राकु.
सांभाळून.

मला अनिरूद्ध बापूविषयी काडीचाही आदर नाहीये पण भक्तांची ताकद भरपूर आहे. घाबरून राहणे गरजेचे आहे.

वामन पैंची प्रार्थना चांगली आहे की.किते पॉझिटिव्ह आणि सुंदर अर्थ आहे त्यात. चांगल्याला (प्रार्थनेला) चागलं म्हणा की ओ स्पॉक. मला आवडते ती प्रार्थना, मी अगदी रोजच्या रोज मनापासून म्हणते.मी त्यांची भक्त नाही.

रच्याकने, निर्भया केसनंतरचे हे उद्गार मला वाटायचं आसारामचे आहेत. अनिरुद्ध बापुंचे आहेत हे ऐकुन वाईट वाटलं

ते बापुसा... खुपच भडक प्रतिसाद द्यायचे.

<<मला अनिरूद्ध बापूविषयी काडीचाही आदर नाहीये पण भक्तांची ताकद भरपूर आहे. घाबरून राहणे गरजेचे आहे.>>
------- सहमत... हे प्रत्येक ढोन्गी बापू , बाबा, स्वामी, माता बाबत खरे आहे.

आसुमलच्या लिला बघा... स्वत: तुरुन्गात आहे. बाहेर ८-१० साक्षिदारान्ना अकस्मित, अपघाती मृत्यु आलेला आहे, त्यान्चे दिवसाढवळ्या खुन झालेले आहेत. अजुन १-२ हल्ले नाकामी झालेत. हे कसे घडते ? कायदा सुव्यावस्था नावाची गोष्ट आहे का ?

हजारो कोटीचा व्यावहार या बुवाबाजीच्या पडद्यामागे चालतात.... नाहीतर पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमन्त्र्याच्या सरकारी निवासस्थानी ढोन्गी साईबाबाचे पाद्यपुजा कशाला व्हायला हवी ?

एक्झॅक्टली उदय.

रिया, त्या प्रार्थनेला कितीही चांगला अर्थ असला तरी सतत ती मंत्रासारखी कानावर पडणे हे डोके उठवणारे असू शकते. चांगलं म्हणलंच पाहिजे हे कशासाठी?

<<रच्याकने, निर्भया केसनंतरचे हे उद्गार मला वाटायचं आसारामचे आहेत>>
----- असुमल पण बरळले होते.... त्यान्नी समस्त भक्त परिवाराला पुराणातली गोष्ट सान्गितली होती. गुगलल्यावर त्याची लिन्क मिळेल. भक्त टाळ्या वाजवतात... काय म्हणायचे?

आसूमल म्हणाला होता की त्या मुलीने तुम्ही माझ्या भावाप्रमाणे आहात मला सोडा असे म्हणले असते तर त्यांनी सोडले असते. पण ती मुलगी अमुकसारखी रात्री बाहेर पडलीच कशाला? (एक्झॅक्ट शब्द लक्षात नाहीयेत)

बापू व्हिडिओमधे तुमच्यावर कुणी बलात्कार करायला आला तर ओम अनिरूद्धाय नमः याचा ४० वेळा जप करा समोरचा माणूस नपुंसक होईल असे मुक्ताफळ आहे.

दोन्हीही इक्वली कपालबडवती वक्तव्ये.

अरेरेरे Sad
नी, अगं त्या प्रार्थनेनी डोकं उठू शकत याला आक्षेप नाहीये तर ती प्रार्थना चांगली आहे एवढंच म्हणणं आहे.
अवांतर - सध्या माझं डोकं असच कट्यारच्या गाण्यांनी उठलंय. लोकं थाबायचं नावच घेईना झालेत Sad

बापू व्हिडिओमधे तुमच्यावर कुणी बलात्कार करायला आला तर ओम अनिरूद्धाय नमः याचा ४० वेळा जप करा समोरचा माणूस नपुंसक होईल असे मुक्ताफळ आहे.
>>>>
Sad Sad Sad

मी ते मगाशी आमसुल असं वाचलं Lol

बाकी अ.बा.ची ती व्यक्तव्य चीड आणणारीच आहेच. निर्भया प्रकरणानंतर फेसबूकवर कुणीतरी त्याची लिंक टाकली होती. तिथेही मी जाहीर धिःक्कार नोंदवून आले होते.

https://www.youtube.com/watch?v=zKLBbRJV7ko

त्याचे मुळ वक्तव्य असेच आहे "टाळी एका हाताने नाही वाजत... आणि निर्भया पण तेव्हढीच (५० %) दोषी आहे." Angry

समविचारीन्चा भाईचारा आहे.

रीया, प्राथना चांगली किंवा वाईट हा मुद्दा नाहीये.
भर रस्त्यात असे मोठ्याने गाणे लावल्यामुळे येणा-या जाणा-यांना त्रास होतो त्याचे काय?
यांच्या आश्रमात किंवा भक्तांनी त्यांच्या घरी कितीही वेळा ऐकावी ती प्रार्थना. सतत तेच ते कडवे रिपीट करुन आणि आवाजाने खरेच डोके दुखते. नंतर नंतर तर मला जेव्हा यांची बस नुसती जाताना दिसली तरी ते आता इथे थांबुन गाणे लावतील अशा भितीने डोके दुखत असे.

तरी भ्रमर यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे हा ही दुस-या धाग्याचा विषय आहे! Proud Light 1
या धाग्यावर अनिरुद्ध बापु यांच्याबद्दल बोलुया!

Arere.....far vait vatle samajat ashi andh manse ahet ki ji konalahi dev mantat...jo swatala dev mhanaun gheto tyala ase vaktavya shobhat nahi....ya mansavar paisa udhalnya peksha anath or garibana madat keli tar dev bhetla ki ho...Tukaram tar asech mhanale na

>>खुर्च्या, जाजमं, लाह्या पाण्याच्या बाटल्या आणा पटापट. ह्यो खेळ लई रंगणार<<
लोड, तक्के, उश्या पण चालतील, लयं मज्जा येणार बग गो माय Lol

उदय,
धन्यवाद. आसुमल म्हणजे आसाराम का? त्याच्यावर अजून काही मोठे लिहिलेले नाही. चेन्नईच्या कल्कीवर मात्र लिहिले आहे. ते शोधून टाकेन.

प्रसाद,
जे जातात, त्यांची श्रद्धा, त्यांचा पैसा, त्यांचा वेळ हे बरोबर आहे. पण हे त्या व्यक्तीपुरते मर्यादित रहात नाही. त्याचे घरदार या मुर्खापायी या भोंदुंच्या नादी बांधले जाते. ही गोष्ट सामान्य समजू नका. याचे परिणाम भयानक आहे. अंधश्रद्धांचे परिणाम सगळ्या कुटुंबावर, समाजावर व पर्यायाने सा-या देशावर होतात.

लोड, तक्के, उश्या पण चालतील, >> लगे हाथ मंडप टाकूया काय? Proud
ही असली बुवाबाजी म्हणजे इल्युजन असते. काही लोकांना वास्तवाशी डोळे भिडवायला जमत नाही ते लोक अशा पळवाटा शोधतात आणि आयुष्यभर या बाबालोकांनी बहाल केलेल्या डिनायल फेज मध्ये जगतात. नुसत्या नामस्मरणाने मनःशांती मिळत असेल नक्की, माझी ना नाही, पण त्यातून मार्ग नाही मिळत.

आणि इतकेच पॉवरफुल असतील हे बाबा लोक तर यांना इतक्याल्या जमिनी, पैसे, लागतात कशाला?

Pages