प्रसंग पहिला, स्थळ, नवीन पनवेल, सुखापुर.
काल सकाळी व्हॉटस अॅप वर बायकोला तिच्या मैत्रिणीचे मेसेजेस आले त्यात तिने आम्हाला उद्देशुन सतर्क राहायला सांगितल, विषय होता तिच्या घरी झालेल्या घरफोडी बद्दल. तब्बल सतरा तोळं सोनं आणि काही रक्क्म घर फोडुन चोरांनी पळ काढला होता.
त्यानंतर तिला केलेल्या कॉल मधुन सविस्तर कळालेला व्रुत्त्तांत असा. "घरात ते तिघेच रहातात. ति, तिचा नवरा आणि त्यांची लेक. त्या मैत्रीणीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब लोणावळ्याला फिरायला गेले असताना हा प्रकार घडला.
खबर ऐकताच मी सर्वप्रथम बायकोला हा प्रश्न विचारला "कि एवढ सोन कोणी घरात ठेवत का?" त्यावर तिने सांगितल की "मी पण हाच प्रश्न सर्वप्रथम तिला विचारला होता." त्यावर अस कळालं की याच आठवड्यात तिच्या दिराच लग्न असल्यामुळे त्यांनी ते दागिने बॅंकेतुन घरी आणले होते. सोसायटीच्या वॉचमनला विचारल असता त्याने झोप लागली होती अस सांगितल. वर "त्यांनी माझ्या जिवाच काही बर वाईट केल तर?" असा प्रतिप्रश्न सोसायटी मेंबर्स आणि पोलिसांना केला. पोलिस पंचनामा करुन गेल्यानंतर त्यांच्या शेजारच्या बाईने तिला सांगितल की "काल रात्री दोन ते अडीच च्या सुमारास तुमच्या घरातुन तोडफोडीचे आवाज येत होते पण घाबरुन आम्ही गप्प बसलो." वर तुम्ही पोलिसां समोर का नाही बोललात यावर तिने आम्हाला फार भिती वाटत होती अस सांगितल.
सविस्तर पोलीस कंप्लेंट वैगरे देऊन सुद्धा दोनच दिवसांनी त्यांच्याच बाजुच्या बिल्डिंग मध्ये सेम प्रकार घडला.
प्रसंग दुसरा, स्थळ, बोरीवली,
कालचा घडलेला प्रसंग ताजा असतानाच ऑफिस मधल्या मित्राच्या बिल्डिंग मध्ये एकाच रात्रीत तिन घरफोड्या झाल्या. सर्वात विषेश वरील सर्व प्रसंगात घरातील सर्व व्यक्ती काही ना काही कारणास्तव घराबाहेर गेल्या होत्या.
आता काही विचार करण्यासारखे मुद्दे.
१) मी सतर्कता म्हणुन आमच्या सोसायटीत काही लोकांना फोन करुन हा प्रकार कळवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती. "तशी आपली बिल्डिंग रोड साईडला असल्यामुळे आपल्याला एवढी भिती नाहीये."
२) सर्व सोसायटीत वॉचमन असुन सद्धा सर्रास असे प्रकार घडतायत.
३) गेले काही दिवस चड्डी बनियान गॅंग सक्रिय झाल्याच टी.व्ही. वर पाहिलय.
४) हे लोक टोळीने अथवा हत्यारबंद अवस्थेत असल्यामळे स्वताच्या जीवाला घाबरुन लोक घरात राहणे पसंद करतात.
५) आपला मेहनतीचा पैसा कोणीतरी असा अचानक लुबाडुन नेऊन सुद्धा आपण फिर्यादी पलीकडे काहीच करु शकत नाही.
६) असे प्रकार घडत असतानाही रात्रीचे गस्त घालणारे पोलीस कुठे असतात? अथवा १०० नंबर वर फोन केल्यास तात्काळ मदत येते का?
७) सोसायटी अधिनियमात कंपलसरी सी.सी. टीव्ही बसवण्या बाबत काही तरतुद आहे का?
८) एखाद्या आमदार, खासदार, सरपंच अथवा स्थानिक नेत्याच्या घरावर कधी दरोडा पडल्याच कधी ऐकल नाहीये.
९) दागिन्याचा अथवा मौल्यवान चीजवस्तु अथवा कागदपत्रांचा विमा उतरवल्यास कितपत परतावा मिळु शकतो.
१०) अशा वातावरणात घर बंद ठेऊन बाहेरगावी, फिरायला जायचं असल्यास काय खबरदारी घ्यावी?
एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. कित्येक लोकांना अशा प्रसंगी कसं वागल पाहीजे अथवा काय उपाय योजना केल्या पाहिजेत हेच मुळात माहित नसतं काही लोक माझ्या घरावर तर प्रसंग नाही आलाय ना म्हणुन गप्प बसतात.
एक मायबोलीकर म्हणुन माझी सर्वांना विनंती आहे. "आपण यावर काय उपाय योजना करु शकतो अथवा प्रसंगावधान राखुन अशा प्रकारांना कसा आळा घालु शकतो याबाबत शक्य ते मार्गदर्शन करावे."
कारण सर्व सुरक्षा मंत्र्या-संत्र्यांच्या मागे असताना तुमच्या आणि माझ्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. कारण उद्या कदाचित ही वेळ आपल्या वरही येऊ शकते.
थोडे अवांतर, पण येथेच सुचले
थोडे अवांतर, पण येथेच सुचले म्हणुन तुलना आवश्यक वाटली असे.
>>>>> काही नियम पाळतो. वेष साधाच असावा. अति ब्रँडेड कपडे, भपकेदार कॉस्च्युम जूलरी, महगड्या वस्तू आम्ही घरात ठेवत नाही. वापरत नाही. <<<<<
आयला, चोर/दरोडेखोरांपासुन वाचायला वेष असावा बावळा हे पाळले जावे असे मत दिसते
पण "वासनांध" लोकांच्या घातक नजरेपासुन जपायला "पूर्ण अंगभर साधे" कपडे असावेत असे म्हणले तर मात्र लगेच स्त्रीस्वातंत्र्यावरचा "संस्कृतीरक्षकांचा" घाला वगैरे आठवते.
चोरदरोडेखोरांचे समोर नवरा/भाऊ/बाप काही करु न शकता शेपुट घालुन बसतील हे तथ्य पटवुन घेतले जाते पण त्यांना त्याबद्दल दोष दिला जात नाही...
मात्र स्त्रीबाबत काहीएक वासनांध मवाली गुंड त्रास देऊ लागल्यास घरचे पुरुष काही करु न शकल्यास मात्र त्यांच्या षंढ ठरविण्याकडे कल....
या बाबी पटल्या नाहीत बोवा....
वरील सर्व उपायांमधे, कोणीही स्वरंरक्षण करण्याकरता आक्रमण करावे अशा स्वरुपाचा सल्ला चुकुनही येत नाही, याचा अर्थ काय समजायचा?
वर एक उदाहरण आलय, कोण आहे कोण आहे विचारत गेल्यावर ते चोर त्याच्याच घरात घुसले. तर नि:शस्त्ररित्या असे जाणे वेडगळ पणाचेच आहे. नुसते शस्त्र घेऊन नव्हे, तर ते ते शस्त्र उदा. लाठीकाठी चालविता येण्याचीही मानसिक शारिरीक धमक पाहिजे...! हे नसेल्,तर सरळ घरात गप्प बसणे व १०० नम्बरला फोन करणेच श्रेयस्कर.
बायदिवे, लॅण्डलाईनवरुन १०० ला फोन होतो, तसा तो मोबाईलवरुन कसा करायचा?
मध्यंतरी एक बातमी आली
मध्यंतरी एक बातमी आली होती.
नवरा बायको आय्.टी मध्ये. दोघे रोज दिवसभर बाहेर. बिल्डिंगमध्ये कुणाशी संपर्क नाही!
एके दिवशी कुणी तरी एक ट्रक घेऊन आले. दिवसा ढवळ्या संपूर्ण फ्लॅट रिकामा केला. शेजार्यांना वाटले की हे लोक बदली होऊन दुसर्या गावी जात आहेत. कुणी विचारलेसुद्धा नाही!
पण "वासनांध" लोकांच्या घातक
पण "वासनांध" लोकांच्या घातक नजरेपासुन जपायला "पूर्ण अंगभर साधे" कपडे असावेत असे म्हणले तर मात्र लगेच स्त्रीस्वातंत्र्यावरचा "संस्कृतीरक्षकांचा" घाला वगैरे आठवते. >> आता भरकटवायचाच असेल धागा तर कुत्रं जास्त बरं ऑप्शन आहे वासनांधांपेक्षा, काय?
कुत्रं काय वासनांध काय,
कुत्रं काय वासनांध काय, वासनांध कुत्रं काय ... भरकटलाच !
शरदबाबू... ऐकलाय किस्सा हा. रादर वाचलाय.
वासनांध कुत्रं <<
वासनांध कुत्रं
<<
>>>आपण बाहेरगावी जाणार तेव्हा
>>>आपण बाहेरगावी जाणार तेव्हा कुत्रं केनेलमधे ठेवायचं तर मग कुत्र्याचा उपयोग काय राखणदार म्हणून?
बाकी फ्लॅटसारख्या अडनिड्या जागेत कुत्रं ठेवणे हे कुत्र्यावर अत्याचार आहेत असं माझं कुत्रा अनफ्रेण्डली मायबोलीला जागणारं मत.<
आता भरकटवायचाच असेल धागा तर
आता भरकटवायचाच असेल धागा तर कुत्रं जास्त बरं ऑप्शन आहे वासनांधांपेक्षा, काय? >>
लॅण्डलाईनवरुन १०० ला फोन
लॅण्डलाईनवरुन १०० ला फोन होतो, तसा तो मोबाईलवरुन कसा करायचा? <<
या प्रश्नासाठी लिंब्या तुला काही गोष्टी माफ.
कोणीतरी पिलीज उत्तर द्या.
माझ्याकडे लॅण्डलाइन नाहीये. मोबाइलच आहे फक्त.
माझ्या आईच्या शाळेत जबरा
माझ्या आईच्या शाळेत जबरा किस्सा झाला होता चोरीचा. २००२ च्या आसपास.
एके रात्री अडीच वाजता आमच्या घरी फोन आला, की सरांना(माझे बाबा. आई-बाबा एकाच शाळेत शिकवत. आई प्रायमरी आणि बाबा हायस्कूलात. दोन्ही शाळा समोरासमोर. आमचं घर शाळेजवळ). बोलावलंय शाळेत चोरी झालीये. बाबा पटकन तयार होऊन गेले. मग जरा वेळाने आईला फोन, की तू ये, तुमच्या शाळेत चोरी झालिये. अवेळी तिने एकटीने नको जायला म्हणून मीपण निघाले. बाबांनी शाळेतून शिपाईमामा पाठवले.
मग किस्सा समजला तो असा, की त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. रात्री कीर्तन संपल्यावर एक परिचित स्नेही शाळेसमोरून जात असताना पोलीसांनी त्यांना अडवून "ही शाळा माहितिये का? कोणी ओळखीचं आहे का?" वगैरे विचारलं. त्यांनी शाळेच्या शिपाईमामांना कळवलं आणि तिथूनच बाबांना बोलावलं. मग जिथे अॅक्चुअल चोरी झाली ती प्रायम्री शाळेची बिल्डिंग होती त्यामुळे आईला फोन आला.
आता पोलीसांनी कसं हटकलं? तर साक्षात चोरांनीच त्यांना चोरी केलेली जागा दाखवली. कशी? तर हे चोर चोरी करून चालत चालत बरंच पुढे गेले. एक किलोमीटर गेल्यावर तिथे फिरणार्या रात्रीच्या गस्तपथकाने त्यांच्या हातातला (चोरलेला) मोठा टेपरेकॉर्डर बघितला आणि त्यांना या दोघांचा वेष आणि तो टेपरेकॉर्डर यांची संगती न लागून संशय आला. जरा जोरात रागवून विचारल्यावर त्यांनी "हात मारलाय" म्हणून सांगित्लं. त्यांना गाडीत घालून पोलीस चोरीच्या जागी, म्हणजे शाळेशी आले. मग ही फोनाफोनी. मग खुद्द चोरांनीच कटावणि घेऊन कपाट फोडलेलं दाखवलं. (शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत लागणारा टे.रे. होता तो)
पुढे केस उभी राहिली. आई मुख्याध्यापिका होती, त्यामुळे अगदी साक्षीदाराच्या पिंजर्यात वगैरे उभी राहून, शपथ घेऊन साक्ष द्यावी लागली होती. शाळेतून झालेली चोरी, मुद्देमालासह पकडलेले चोर यामुळे पुरावे देऊन का होईना, सगळं परत मिळालं. घरगुती वस्तू वगइरे असत्या तर मिळाल्याच नसत्या असं खुद्द पो मा खासगीत म्हणाले होते!
देवकी, शेजारी तोडफोडीचे आवाज
देवकी,
शेजारी तोडफोडीचे आवाज येत आहेत, काय चालूय याचा अंदाजा आलाय आणि पोलिसांचा १०० नंबर डायल करायलाही भिती वाटणे हे मला नाही पटत. किंबहुना मी जवळच्या अनुभवांत असे किस्से ऐकलेले आहेत, म्हणून या प्रकाराची थोडीशी चीडही आहे. आज विषय चोरीचा आहे म्हणून एखाद्याची हलगर्जी माफ करू, पण उद्या शेजारी खून होत असेल, बलात्कार घडत असेल.. त्यामुळे मुळातच ही वृत्ती बदलायला हवी.. आणि हो, पोलिस तुम्हाला नाव नाही विचारत की बाहेर नाही फोडत, तर कोणी तुमचा बदला घेणार नसतो. हे सर्वांपर्यंत पोहोचायला हवे.
बाकी आपण दिलेल्या उदाहरणाशी सहमत आहे. चौकशी करायला जाण्याचा शहाणपणा आपल्या अंगात कितीही रग असली तरी बिनधास्त अन बेफिकीरपणे करायला जाऊ नये. जे वाईट घडणार आहे त्यापेक्षा वाईट घडू नये याची आधी काळजी घेणे उत्तम.
नेहमी सारखंच १०० dial करून
नेहमी सारखंच १०० dial करून call बटण दाबायचं की लागतो फोन
मी केला होता एकदा मुंबईत.
नेहमी सारखंच १०० dial करून
नेहमी सारखंच १०० dial करून call बटण दाबायचं की लागतो फोन >>>>>>
अवांतर. :- असा कॉल केलाकी तो बहुतेक तुमचा फोन क्र ज्या पत्त्यावरुन घेतला आहे त्या शहरामधे जातो.
आम्ही एकदा कोल्हापुर वरुन पुण्याला येताना रस्त्यावर एका रिक्षाचा अपघात झाला होता. पोलिसांना बोलवाय्ला मी पटकन मोबाईल वरुन १०० डायल केला तर तो पुण्यामधील कंट्रोल रुमला गेला.
धागा अतिशय चांगला आहे. खर
धागा अतिशय चांगला आहे.
खर सांगायच तर धागा वाचतानाच मनात भिती निर्माण होतेय. हिवाळ्यात जास्त घरफोड्या होतात.
असा कॉल केलाकी तो बहुतेक
असा कॉल केलाकी तो बहुतेक तुमचा फोन क्र ज्या पत्त्यावरुन घेतला आहे त्या शहरामधे जातो.<< नाही. जवळच्या पोलिस कंट्रोल रूमला. (खरंतर भलत्याच कंट्रोल रूमला)
मी मागच्या आठवड्यांत चेन्नई पोलिसांना फोन करण्यासाठी प्रयत्न करत असताना १०० नंबर दाबला की गोवा पोलिस कंट्रोल रूमला फोन गेला. तो पोलिस म्हणाला. ०४४१०० असा नंबर लावा मग तो नंबर "चुकीचा" आला. परत त्यालाच फोन केल्यावर मात्र त्या सद्गृअहस्थाने (रात्री साडेतीन वाजता) मला चेन्नईमधील जवलच्या पोलिस स्टेशनांचे फोन नंबर दिले. त्यांनीदेखील तत्परता दाखवून लगेच आवश्यक माहिती दिली. हे एक अवांतरच! पण असो.
>>>(खरंतर भलत्याच कंट्रोल
>>>(खरंतर भलत्याच कंट्रोल रूमला) <<<
धागा अतिशय चांगला आहे.....
धागा अतिशय चांगला आहे..... अनुमोदन.
एक अनुभव- जुन्या नोकिया मो.फोन वरुन १०० ला फोन केला होता. अत्यंत उत्तम अनुभव. रस्त्याच्या कडेला एक महीला अगदी निपचित पडली होती--इतक्या रहदारिच्या रस्त्यावर पुरेसे कपडे ही नव्ह्ते (वेडि असवी-आसपास चे दुकानदारांचे म्हणणे), तर कंट्रोल रुम मधुन एका लेडि ने घेतला,काय प्रोब्लेम आहे हे अत्यंत उत्तम भाषेत विचारले. (उत्तम-समुपदेशकाची असते तशी). पुर्ण पत्ता -जिथे बाई पडली आहे तो पत्ता विचारला. मग माझे नाव विचारले जे मी नाही सांगणार असे सांगितले- तर त्या लेडि ने असे सांगीतले- 'तुम्ही चांगले काम करत आहात. घाबरु नका. तुमचे नाव गुप्त ठेवले जाते. तरिही नसेल सांगायचे तर तुमचा तो अधिकार आहे.'
त्या नंतर ५ मिन. एका कॉन्स्टेबल चा फोन आला. त्याने तो कुठल्या दिशेने येतोय आणि नेमके कुठले ठिकाण इ. विचारुन घेतले.
वेळे अभावी तिथे थांबता आले नाही. पण नंतर कळले की, म न पा ची अम्बुलन्स येवुन त्या वेड्या बाइला घेवुन गेली.
परत एकदा १०० डायल ची वेळ आली, तर तेंव्हा स्मार्ट फोन होता- त्यावरुन हा १०० नुसता १०० असा डायल झाला नाही. मग ०२०१०० असा लावला तोही झाला नाही. मग PCओ वरुन १०० डायल केला जो लागला.
साधा फोन व स्मार्ट फोन मधे काय फ़रक हे अनाकलनीय पण डायलींग चा अनुभव जसा आला तसा मांडला आहे.
जवळच्या पोलिस कंट्रोल रूमला.
जवळच्या पोलिस कंट्रोल रूमला. (खरंतर भलत्याच कंट्रोल रूमला)> > > > >
असेल कदाचित. माझ्या अख्ख्या आयुष्यात १०० वर फोन करायचा हा एकमेव अनुभव आहे.
पण लॉजिकली मोबाईल वरुन १०० dial केल्यास तो सर्वात जवळच्या कंट्रोल रुमवर जायला हवा.
मी मोबाईलवरून बर्याचदा १००
मी मोबाईलवरून बर्याचदा १०० वर कॉल केलेला आहे. मुंबईत असताना फोन हमखास मुंबई कंट्रोल रूमलाच गेलेला आहे, रत्नागिरीमध्ये बर्याचदा लँडलाईनवरून केला होता. चेन्नई पुरात मात्र मोबाईलवरूनच १०० डायल केला. (१०१ देखील) तरीही अनुभव उत्तम आणि चांगला. पोलिसांनी तत्परतेनं मदत केली हेही नमूद करण्यासारखे आहे.
(चेन्नई पुरामध्ये आम्ही काही चेन्नईवासी चेन्नईबाहेर असताना ज्या पद्धतीने रेस्क्यु ऑपरेशन्समध्ये मदत करत होतो हा वेगळ्याच लेखाचा विषय आहे. त्यादरम्यान् मी चेन्नईमधल्या पन्नासेक पोलिस स्टेशननांना फोन लावला होता)
>>>चेन्नई पुरात मात्र
>>>चेन्नई पुरात मात्र मोबाईलवरूनच १०० डायल केला. (१०१ देखील) तरीही अनुभव उत्तम आणि चांगला. पोलिसांनी तत्परतेनं मदत केली हेही नमूद करण्यासारखे आहे. <<<
दक्षिण भारतात सिस्टीम्स अधिक प्रामाणिकपणे वापरल्या जातात. बहुधा संयमी आणि माणसाचा आदर ठेवणारी माणसे आहेत म्हणून!
वरील कोट केलेले विधान वाचून बरे वाटले.
या धाग्यावर तुमच्या घरात काय
या धाग्यावर तुमच्या घरात काय काय असते लिहू नका. उद्या चोराच्या कबुलीजवाबात या धाग्याचा उल्लेख केला तर ?

या नंबरवरुन आठवले म्हणा वा
या नंबरवरुन आठवले म्हणा वा माझे मलाच जाणवले, की (माझ्यासहित) आपणा कितीजणांकडे आपल्या एरियातील पोलिसचौकीचे फोननम्बर असतात? किती जणांना आपला एरिया कोणत्या पोलिस चौकी /ठाण्या अंतर्गत येतो हे माहित असते? किती जणांना ती पोलिसचौकी/ठाणे नेमके कुठे आहे हे माहित असते? माझ्या मते हे माहित करुन घ्यायला हवे व मोबाईल/घरात पोलिसचौकीचे नंबर लिहून ठेवलेले असावेत. (त्याचबरोबर अॅम्ब्युलन्स/हॉस्पिटल/सर्पमित्र वगैरेंचेही असावेत - मी अजुनही ठेवलेले नाहीत... आता ठेवतो)
आपणा कितीजणांकडे आपल्या
आपणा कितीजणांकडे आपल्या एरियातील पोलिसचौकीचे फोननम्बर असतात? किती जणांना आपला एरिया कोणत्या पोलिस चौकी /ठाण्या अंतर्गत येतो हे माहित असते? किती जणांना ती पोलिसचौकी/ठाणे नेमके कुठे आहे हे माहित असते? >>> माझ्याकडे ही माहिती कायम असते. शिवाय एरीया इन्स्पेक्टरचा मोबाईल नंबर. अँब्युलन्स पाणी, वीज, वर्तमानपत्रे, जवळचे पत्रकार, आमदार खासदार नगरसेवक्/ग्रापं सदस्य वगैरे अत्यवश्यक नंबर्स कायम असतात. गाव बदललं की असे नंबर गोळा करणे ही एक स्पेशल मोहीम घ्यावी लागतेच.
ग्रेट आहेस नंदिनी.
ग्रेट आहेस नंदिनी.
सिमिलर धागा :
सिमिलर धागा : http://www.maayboli.com/node/13941
ह्या लिंकवरील पीडीएफ फाईल
ह्या लिंकवरील पीडीएफ फाईल उतरवून घेणे. यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस कंट्रोल रूमचे व्हॉट्सॅप व लँडलाईन नंबर आहेत.
होय. व्हॉट्सॅपवरूनही पोलिसांना कळविता येते.
इथे कुणी लिहिलय की नाही
इथे कुणी लिहिलय की नाही माहिती नाही पण........
आपले व्हॉट्सअॅपचे स्टेट्स आणि डीपी ठेवताना जरा भान ठेवावे. हिकडे येंजॉइंग, तिकडे येंजॉइंग आणि डीपी वर तिकडचे फोटो हे आपण शेअर करतोय हे लक्षात असू द्यावे, कुणाच्या पण डोळ्यात येऊ शकते. जाऊन आल्यावर टाका काय टाकायचे ते.
इकडे पिंची महानगरपालिकेचे लोक
इकडे पिंची महानगरपालिकेचे लोक घरोघरी जाऊन प्रत्येकाचे "आधारकार्ड नंबर" वगैरे माहिती गोळा करीत आहेत.
पिंचि महानगरपालिकेस हे कशाला हवय? मुळात आधारकार्ड सक्तिचे नसताना सरसकट सर्वच ठिकाणी आधारकार्डचा बागुलबुवा दाखविला जातो.
सदरहु लोक पिंचिमनपाचेच असतील कशावरुन?
इथे विचारायचे सोडून
इथे विचारायचे सोडून महापालिकेत विचारा
पिंची महानगरपालिकेचे >> मी
पिंची महानगरपालिकेचे
>>
मी आत्तापर्यंत तुम्हाला पुण्याचे समजत होतो
>>>> मी आत्तापर्यंत तुम्हाला
>>>> मी आत्तापर्यंत तुम्हाला पुण्याचे समजत होतो <<<<
बरोबर समजत होता.... अस्सल पेठि पुणेकर अगदी जरि अमेरिकेत्/युरोपात्/गल्फमधे गेला तरी "वेगळा ओळखु" येतोच, पण तिथे गेला तरीही तो कायमच "पुणेकरच" अस्तो ! तेच ते हो.... "चाणाक्ष लोक"
Pages