प्रसंग पहिला, स्थळ, नवीन पनवेल, सुखापुर.
काल सकाळी व्हॉटस अॅप वर बायकोला तिच्या मैत्रिणीचे मेसेजेस आले त्यात तिने आम्हाला उद्देशुन सतर्क राहायला सांगितल, विषय होता तिच्या घरी झालेल्या घरफोडी बद्दल. तब्बल सतरा तोळं सोनं आणि काही रक्क्म घर फोडुन चोरांनी पळ काढला होता.
त्यानंतर तिला केलेल्या कॉल मधुन सविस्तर कळालेला व्रुत्त्तांत असा. "घरात ते तिघेच रहातात. ति, तिचा नवरा आणि त्यांची लेक. त्या मैत्रीणीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब लोणावळ्याला फिरायला गेले असताना हा प्रकार घडला.
खबर ऐकताच मी सर्वप्रथम बायकोला हा प्रश्न विचारला "कि एवढ सोन कोणी घरात ठेवत का?" त्यावर तिने सांगितल की "मी पण हाच प्रश्न सर्वप्रथम तिला विचारला होता." त्यावर अस कळालं की याच आठवड्यात तिच्या दिराच लग्न असल्यामुळे त्यांनी ते दागिने बॅंकेतुन घरी आणले होते. सोसायटीच्या वॉचमनला विचारल असता त्याने झोप लागली होती अस सांगितल. वर "त्यांनी माझ्या जिवाच काही बर वाईट केल तर?" असा प्रतिप्रश्न सोसायटी मेंबर्स आणि पोलिसांना केला. पोलिस पंचनामा करुन गेल्यानंतर त्यांच्या शेजारच्या बाईने तिला सांगितल की "काल रात्री दोन ते अडीच च्या सुमारास तुमच्या घरातुन तोडफोडीचे आवाज येत होते पण घाबरुन आम्ही गप्प बसलो." वर तुम्ही पोलिसां समोर का नाही बोललात यावर तिने आम्हाला फार भिती वाटत होती अस सांगितल.
सविस्तर पोलीस कंप्लेंट वैगरे देऊन सुद्धा दोनच दिवसांनी त्यांच्याच बाजुच्या बिल्डिंग मध्ये सेम प्रकार घडला.
प्रसंग दुसरा, स्थळ, बोरीवली,
कालचा घडलेला प्रसंग ताजा असतानाच ऑफिस मधल्या मित्राच्या बिल्डिंग मध्ये एकाच रात्रीत तिन घरफोड्या झाल्या. सर्वात विषेश वरील सर्व प्रसंगात घरातील सर्व व्यक्ती काही ना काही कारणास्तव घराबाहेर गेल्या होत्या.
आता काही विचार करण्यासारखे मुद्दे.
१) मी सतर्कता म्हणुन आमच्या सोसायटीत काही लोकांना फोन करुन हा प्रकार कळवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती. "तशी आपली बिल्डिंग रोड साईडला असल्यामुळे आपल्याला एवढी भिती नाहीये."
२) सर्व सोसायटीत वॉचमन असुन सद्धा सर्रास असे प्रकार घडतायत.
३) गेले काही दिवस चड्डी बनियान गॅंग सक्रिय झाल्याच टी.व्ही. वर पाहिलय.
४) हे लोक टोळीने अथवा हत्यारबंद अवस्थेत असल्यामळे स्वताच्या जीवाला घाबरुन लोक घरात राहणे पसंद करतात.
५) आपला मेहनतीचा पैसा कोणीतरी असा अचानक लुबाडुन नेऊन सुद्धा आपण फिर्यादी पलीकडे काहीच करु शकत नाही.
६) असे प्रकार घडत असतानाही रात्रीचे गस्त घालणारे पोलीस कुठे असतात? अथवा १०० नंबर वर फोन केल्यास तात्काळ मदत येते का?
७) सोसायटी अधिनियमात कंपलसरी सी.सी. टीव्ही बसवण्या बाबत काही तरतुद आहे का?
८) एखाद्या आमदार, खासदार, सरपंच अथवा स्थानिक नेत्याच्या घरावर कधी दरोडा पडल्याच कधी ऐकल नाहीये.
९) दागिन्याचा अथवा मौल्यवान चीजवस्तु अथवा कागदपत्रांचा विमा उतरवल्यास कितपत परतावा मिळु शकतो.
१०) अशा वातावरणात घर बंद ठेऊन बाहेरगावी, फिरायला जायचं असल्यास काय खबरदारी घ्यावी?
एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. कित्येक लोकांना अशा प्रसंगी कसं वागल पाहीजे अथवा काय उपाय योजना केल्या पाहिजेत हेच मुळात माहित नसतं काही लोक माझ्या घरावर तर प्रसंग नाही आलाय ना म्हणुन गप्प बसतात.
एक मायबोलीकर म्हणुन माझी सर्वांना विनंती आहे. "आपण यावर काय उपाय योजना करु शकतो अथवा प्रसंगावधान राखुन अशा प्रकारांना कसा आळा घालु शकतो याबाबत शक्य ते मार्गदर्शन करावे."
कारण सर्व सुरक्षा मंत्र्या-संत्र्यांच्या मागे असताना तुमच्या आणि माझ्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. कारण उद्या कदाचित ही वेळ आपल्या वरही येऊ शकते.
जर सोनं बॅकेच्या लॉकरमध्ये
जर सोनं बॅकेच्या लॉकरमध्ये असेल तरी त्याचा विमा काढा.>>>> ही काय प्रोसेस आहे? बरेच वेळा दागिने लॉकरमधून काढतो आणि का दिवसांनी परत तिथे ठेवतो.विमा उतरवल्यास दागिने नेता आणता येतात का?
१७ तोळे सोन आणि रोख जर घरी
१७ तोळे सोन आणि रोख जर घरी असेल तर भारतात काय जगाच्या पाठीवर कुठल्याही ठिकाणी घरफोडी होईल. ह्या रकमेतुन बरेच महिने ऐष करता येते. माझ्या सिंगापुरच्या तेलगु मित्राच्या घरी अशी घरफोडी झाली होती. दुपारी बायको मुलाला शाळॅत सोडुन परत येईपर्यन्त १ तासात चोरानी सोने व रोख लंपास केले होते. अश्या बर्याच घरफोड्या केल्यावर पोलिसानी त्याना पकडले होते. आणि पकडल्यावर पोलिसानी मित्राला रिपोर्ट दिला होता. त्यानुसार दोन चोर आठवडाभर त्याचा घरावर पाळत ठेउन होते. चोरानी त्या दुपारी १ तासात सेफ्टी आणि मेन दरवाजा मास्टर की नी उघडुन सोने व रोख घेउन पलायन केले होते. तेव्हा सिंगापुर पोलिसानी त्याना सोने किंवा किमती वस्तु घरात न ठेवता बॅकेत ठेवायचा सल्ला दिला होता.
सामानाची लोकल होम डिल्वहरी
सामानाची लोकल होम डिल्वहरी शक्यतो टाळा. >> हे काही कळालं नाही. नक्की काय ?>>
नाक्यावरच्या भाजीवाल्याला/ फळविक्रेताला घरुन फोन करुन भाज्या/ फळे घरी मागविणे वगैरे..
सगळंच काही आपण स्वतः आणून शकत नाही पण जिकडे अशी लोकल होम डिल्वहरी असेल ती टाळावी...
नॉन लोकल होम डिल्वहरी - फिल्फ्कार्टची होम डिल्वहरी त्यांचा कुरियर कंपनीने होते.. अशा ठिकाणी कुरियर बॉय
बहुतेक चौकशी ठेवलेला असावा...
ओह ओके. कळालं
ओह ओके. कळालं
१०० नंबरवर अवश्य फोन करा.
१०० नंबरवर अवश्य फोन करा. नक्की प्रतिसाद मिळतो. ( आमच्या घरातून एका लहान मुलाने फोन केला होता. तरीही पोलिसांनी परत फोन करून चौकशी केली. )
>>>
हो लहान मुलाने फोन केल्यास परत कन्फर्म करायला रिटर्न कॉल येतो. पण १०० नंबर चा अनुभव आतापर्यंतच्या माहितीवरून चांगलाच आहे.
खरे तर मला या घरफोडी आणि चोरी प्रकरणाबद्दल काही सांगता नाही येणार कारण आमच्याईथे आजही एखाद्या उन्हाळ्याच्या रात्री गरम होतेय म्हणून दारे सताड उघडे ठेवून झोपलो तरी टेंशन नाही असे आहे. त्यामुळे कधी मी जबरी चोरी वा घरफोडीचा असा किस्सा ऐकला नाही. फार तर भुरट्या चोराने हात साफ केला तर तेवढेच.
आणि येस्स याला कारण म्हणजे शेजारसंस्कृती.. वर कोणीतरी उल्लेख केलाय तसा सुरक्षिततेच्या द्रुष्टीने तरी शेजारसंबंध गरजेचा. आणि ऑफकोर्स याचे ईतरही बरेच फायदे असतात. चोरीप्रणव क्षेत्रात तर शेजार्यांनी एकत्र येत प्लान रेडी ठेवायला हवा. शेजारच्या घरातून तोडाफोडीचा आवाज येत होता आणि आम्ही घाबरलो हे कारण माझ्यासाठी हास्यास्पद आहे. हि वृत्ती जिथे असते तिथेच तर मग चोर डल्ला मारतात.
पनवेल विभागात चोर्या बरेच होतात बहुधा. आमच्या ऑफिसमध्येही किस्से ऐकतो काही. आमच्या ऑफिसमधीलही काही जणांनी कुठेतरी निर्जन जागी घरे घेतली आहेत वा जाताना मध्ये निर्जन रस्ता लागतो तर सुरक्षिततेच्या द्रुष्टीने काळजी व्यक्त करत असतात. पण मला बरेचदा समजत नाही की लांबवर जिथे जागेचे रेट कमी आहेत तिथे २ बी एच के घेण्या ऐवजी लोकवस्तीत सुऱक्षित जागी लोक १ बी एच के वगैरे म्हणजे तुलनेत छोटे घर घेऊन शांत सुरक्षित वातावरणात समाधानाने का जगत नाहीत ??
अहो १७ तोळे सोने म्हणजे जास्त
अहो १७ तोळे सोने म्हणजे जास्त नाही.
चार बांगड्या घरात असतात, एक बांगडी १ ते दीड तोळ्याची, मजबूत केली तर २ तोळे. बायकांकडे २ मंगळसूत्र असतात एक १० ग्राम पर्यंत, नेहमीच्या वापरातले आणि एक ३ ते ४ तोळ्याचे समारंभासाठी. एक हार असतोच ज्याच्यात ३ ते ४ तोळे जातात. अजून सटर फटर कानातले, अंगठी, चेन वगैरे धरून आरामात दीडशे ग्राम म्हणजे १५-१६ तोळ्यापर्यंत गणती जाते.
१७ तोळे = १७० ग्रॅम =
१७ तोळे = १७० ग्रॅम = ४,२५,००० रुपये. चोरीचा म्हणून विकला तर २ लाख मिळतील समजा.
दिवसभर घर रिकामं ठेवून बाहेर जात असाल, तर इतका ऐवज घरात ठेवू नये, मिळणार्या पैशात चोरांना भरपूर दिवस ऐश करता येते, ते टेम्प्टेशन खूप जास्त आहे, असं त्यांनी वर सांगितलं आहे.
*
काय करू / काय करू नये या यादीत :
१. घराच्या मुख्य दरवाजाच्या किल्ल्या दाराजवळच भिंतीवर, टेबलावर, शूरॅकवरच्या आराशीत इ. मांडून ठेवू नयेत.
घरात कॅज्युअल कारणाकरता आलेल्या कुणालाही त्याचा ठसा घेणे शक्य होते. कोथरूडात माझ्या भाचीकडे झालेल्या चोरीत जवळच राहणार्या एका बाईने याप्रकारे चोरी केली. चोरी सापडल्यावरही गोळाच मिळाला. एक गळ्यातला दागिना तिने सरळ, हा मला आवडला आहे, परत देणार नाही, असे सांगून ठेवून घेतला. ४ टगे येऊन सांगून गेले, 'जितकं परत मिळालंय त्यात खुश रहा. चोरीच्या आरोपाखाली १ जण जेलमधे गेलो तरी बाकीचे आम्ही इथेच आहोत, जगणं मुश्किल करून टाकू.' का ही ही करता आलं नाही. तिथल्या पोलिसांशी त्यांची अरे-कारेची मैत्री दिसतच होती. मनस्ताप नको म्हणून हेच लोक घर सोडून दूर रहायला गेले.
२. गळ्यात खरे दागिने, मंगळसूत्र इ. घालून मॉर्निंग वॉक वगैरे रिकामी कामं करू नयेत. फार हौस असेल तर १ ग्रॅमवाले किंवा सरळ बेंटेक्सचे दागिने घालावेत.
(क्रमशः)
जित क्यास तितके हा विचार
जित क्यास तितके हा विचार नेहमी आचरानात आणावा
कुत्र्याला गुंगीचे औषध देवून
कुत्र्याला गुंगीचे औषध देवून चोरी झाल्याचे ऐकले आहे
छान आहे धागा म्हत्वाची माहिती
छान आहे धागा म्हत्वाची माहिती मिळत आहे.
गुंगीचे औ श ध. >> हो ह्या
गुंगीचे औ श ध. >> हो ह्या साठी कुत्र्याला दुस र्या बाहेरच्या मान्साची फार सवय लावू नये. आप्ल्या हातीच त्याचे खाणे लालन पालन असावे. तो दुसर्याला पॅक लीडर समजू लागला तर त्या माणसाने चोरांची टोळी आन ल्यास कुत्रा गप्प बसेल. त्याच्या हाताने काहीही खाईल.
सेपरेट प्रॉपर्टी असल्यास वॉचमन, स्वयंपाकी, मो लकरणी हे संगनमताने डल्ला मारू शकतात. हैद्राबाद साइ ड ला जसे विश्वासू रीटेनर्स ची पद्धत आहे तो विश्वास मुंबाईकडील स्टाफवर टाकू नये. ओरिसा, यू पी बिहार मधील लेबर्स, कार्पें टर,
वे टर, वाहन चालक वगैरेंच्या वेगळ्या प्रायोरिटीज अस्तात. फार गरीबीतून येतात हे लोक. गावाकडे लग्न आहे. बायकोची डिलिवरी असल्या खर्चांसाठी सुद्धा चोरी करू शकतात. माल गेला तरी चालेल, पन जिवाला धोका पोहोचल्यास काय करायचे हे आपले नक्की असावे.
दुपारी घरी असलेले ज्येना, बालके खूप व्हल्नरेबल आहेत.
घरात लग्नकार्ये वगैरे होणार
घरात लग्नकार्ये वगैरे होणार असतील तर तेव्हा जनरली कॅश आणि दागिने वगैरे घरातच असतं. अश्या वेळेला कधीही घराला कुलूप घालून बाहेर जाऊ नये. कुणीतरी एकतरी व्यक्ती घरात असावीच. अगदी घरातला सगळ्या कार्यक्रम गच्चीवर चाललाय आणि फ्लॅटला कुलूप घालून सगळेजण गच्चीवर आहेत. असला प्रकार नको.
अश्या वेळांना पाळत ठेवून माहितगार माणसे आपला हात साफ करून घेऊ शकतात.
आमच्या घरात घरफोडी झाली आहे
आमच्या घरात घरफोडी झाली आहे तेव्हा अस्मादिक खालच्या खोलीत एकटेच झोपले होते आणि चोर बाजूचा दरवाजा फोडत होते. सुदैवाची गोष्टः तेव्हा दोनी बाजूंची घरं असून मध्ये भिंत होती. बाजूचं घर रिकामं होतं त्यामुळे चोर वैतागून दुसर्या बंगल्यांत न्बिघून गेले. तिकडे त्यांनी बराच चांगला डल्ला मारला.
आम्ही घरात सोने ठेवत नाही. चांदीच्या वस्तूदेखील नाही. कॅश जेवढ्यास तेवढी. गरज पडली तर एटीएममधून आनतो.
मी चेन्नईला एकटीच दिवसबह्र घरात असल्यामुळे काही नियम पाळतो. वेष साधाच असावा. अति ब्रँडेड कपडे, भपकेदार कॉस्च्युम जूलरी, महगड्या वस्तू आम्ही घरात ठेवत नाही. वापरत नाही. आजूबाजूला बर्याचदा मी बोलाताना नवरा इलेक्ट्रीकल सुपरवायझर असल्याचे सांगत. पगार कुणी विचारला तर कमीच सांगत (सांगितलाच नाही तर लगेच संशय अति वाढतो हे लक्षात आले आहे) कुठे फिरायला गेल्यास त्याचे फोटॉ सोशल मीडीयावर केवळ फ्रेस्ड्सपुरतेच टाकतो. लोकेशन चेकिंगचा मोह बर्याचदा आवरला आहे.
सध्या मी राहते त्या सोसायटीत
सध्या मी राहते त्या सोसायटीत नवीन सिक्युरिटीची माणसे आहेत. फूड व इतर डिलिव्हरीवाल्यांबरोबर कायमच वरती येतात दुसर्या मजल्यावर.पण नेहमीच्यापेक्षा नवीन कोणी व्यक्ती घरी आली तरी त्यांच्याबरोबर दारापर्यंत येतात. दार उघडल्यावर या व्यक्तीला आम्ही ओळखतो ना अशी खात्री करून घेतात.
१) अश्या परिस्थितीत कुत्रा
१) अश्या परिस्थितीत कुत्रा घरी असणे जबरदस्त मदत होउ शकते. . आमचे कुत्रे मध्ये एक अगदी बारके व गो ड स्वभावाचे आहे पन चोराला ते माहीत नाही ते चावत नाही पण जोरात अंगावर गेल्यासारखे करते. व मस्त जोरात भुंकते. मुंबईत सर्व वर्किंग क्लास लोकांना जसे गाडी पुसे, दूध वाले, पेपरवाले , काम वाल्या व अर्थात चोर. सर्वाना कुत्र्याची भीती वातते असे माझे निरीक्षण आहे. एक बाईटने ते लोक्स पंधरा दिवस आउ ट ऑफ अॅक्षन होउ शकतात. कोणत्याही सीसीटी व्ही, म्हातारा वॉचमन इत्यादि पेक्षा हे उपयुक्त आहे. डॅशुड, रॉ ट वीलर जशे पाळलेत तर कोणी घराच्या आत येणार नाही.>>>>> अमा, तुमचे बरोबर असेलही, पण मुरलेले चोर-दरोडेखोर ( हो, साधे भुरटे चोर नाही) फार हलकट असतात. आमच्या ओळखीच्यान्च्या बन्गल्यात चोरी झाली तेव्हा त्या लोकानी सर्व दागिने घरीच ठेवले, ( कारण दिवाळीत दागिने घरी आणले, आणी पाडव्याला बॅन्क बन्द.) त्यान्चे पाळलेले अल्सेशीयन कुत्रे पण घरीच ठेवले होते आणी सगळे जण बाहेरगावी गेले. तर चोरानी ते कुत्रे भुन्कु नये म्हणून त्याला गुन्गीचे औषध असलेला पदार्थ खायला दिला, आणी पोत्यात घालुन कोन्डुन ठेवले. फार हाल झाले त्या कुत्र्याचे.:अरेरे: नन्तर बिचारे गेलेच. चोर सापडले नाहीत ते वेगळे.
खुपच उपयोगी धागा. छान माहिती
खुपच उपयोगी धागा. छान माहिती मिळतेय.
रश्मी, कुत्र्याला जास्त माणसाळावयाचे नाही. कुणीही परके आले तर त्याने जोरजोरात भुंकले तरी पाहिजे. घरातल्या माणसांशिवाय इतर कोणी काही घातले तर खाणार नाही अशीही सवय लावावी. तरच कुत्रा पाळून उपयोग होतो. या साठी गावठी कुत्रे पण उपयुक्त ठरतात (लॅब्रडोर अजिबातच कामाचा नसतो कारण त्याचा स्वभाव अगदीच मायाळू. असा स्वानुभव.)
फार हलकट असतात>> बरोबर आहे.
फार हलकट असतात>> बरोबर आहे.
चोरीमारीला संरक्षनासाठी
चोरीमारीला संरक्षनासाठी उपयुक्त कुत्री म्हणजे गावठी किंवा शिकारी कुत्री. आमच्याकडे शेतावर असली कुत्री पाळली आहेत. असली कुत्री फ्लॅट सिस्टममध्ये राहू शकतात का याबद्दल मी साशंक आहे.
शेजारच्या घरातून तोडाफोडीचा
शेजारच्या घरातून तोडाफोडीचा आवाज येत होता आणि आम्ही घाबरलो हे कारण माझ्यासाठी हास्यास्पद आहे. हि वृत्ती जिथे असते तिथेच तर मग चोर डल्ला मारतात.>>>>> माझ्या कलीगने सांगितलेली गोष्ट.तिच्या बिल्डिंगमधील एकजण रात्री १-२ च्या सुमारास बाथरूमसाठी उठला होता.त्याला,खालच्या मजल्यावर धाडधाड आवाज ऐकू आल्याने त्याला नवल वाटले कारण खालच्या मजल्यावरचे गावी गेले होते. "कौन है ,क्या कर रहा है' करत तो अर्धा जिना उतरला.तर ४-५ जण घराचे कुलूप फोडत होते. याला पाहिल्याबरोबर,चल तेरा घर दिखा' करत ते घर सोडून याच्याच घरी चोरी करून गेले.
ते घर सोडून याच्याच घरी चोरी
ते घर सोडून याच्याच घरी चोरी करून गेले. >>
काय कहर आहेत. (त्यांच्या हुशारीचे थोडे हसू ही आले मात्र
न फुटणार्या कुलूपावर टाईमपास करण्यापेक्षा जे उघड घर आहे त्यात चोरी केलेली बरी! नक्की बी-स्कूल ट्रेंड असणार.;))
(लॅब्रडोर अजिबातच कामाचा नसतो
(लॅब्रडोर अजिबातच कामाचा नसतो कारण त्याचा स्वभाव अगदीच मायाळू. असा स्वानुभव.)>>>
ऑब्जेक्शन माय लॉर्ड!
हे म्हणजे जनरलायझेशन झाले. अगदी लॅब्रडोर असला तरीसुद्धा परका माणूस असेल तर हमखास भुंकतो. आमची ग्रेस तर अपरात्री कुणी गेटजवळ वाहन उभे केले तरी भुंकते... अगदी आमची खात्री करून घेऊन तिला शांत करेपर्यंत!
करण्यासारख्या सोप्या आणि कामचलाऊ युक्त्या...
१. अलार्म सिस्टिम -- आपल्या घरातून शेजार्याच्या घरापर्यंत.
२. व्यक्ती ठरावीक अंतरावर आल्यावर आपोआप सुरू होणारे दिवे.
३. वॉचमनचा नंबर ठळक अक्षरात लिहिलेला.
४. घरात कुठलीही व्यक्ती रेफरन्स शिवाय कुठल्याही कामाला न ठेवणे.
५. बाहेरगावी जाणार असल्याचे फेसबुकवर किंवा वॉटस अॅपवर न टाकणे.
६. २ दिवसांपेक्षा जास्त बाहेरगावी जाणार असल्यास 'होम अलोन' मधील योग्य ती क्लुप्ती वापरणे.
७. बाहेरगावी जाणार असल्यास घरातील प्रत्येक खोलीतील एक एक लाईट ऑन ठेवणे.
८. कॅश आणि दागिने लपवून ठेवणे. सहसा रद्दी, पुस्तके, पिठे अशा गोष्टींकडे चोर पहातसुद्धा नाहीत. पायमोजे, अंडरवेअर हे सुद्धा ऑप्शन आहेत.
घरफोडी बद्दल नाही पण अशाच इतर
घरफोडी बद्दल नाही पण अशाच इतर चोर्यांबद्दल आठवलेले
१. हल्ली जवळपास जाताना बायका स्लिंग बॅग/क्रॉस बॉडी बॅग वापरतात, सोयीची पडते आणि दोन्ही हात मोकळे राहतात, पण या क्रॉस बॉडी बॅग चा पुढचा महत्वाचा भाग नेहमी शक्यतो पोटावर आणि त्यावर एक हात असणे बरे पडेल. आमच्या सोसायटीबाहेर अशा क्रॉस बॉडी बॅग हिसके मारुन पळवलेल्या आहेत.
२. पी एम टी बस ने प्रवास करताना तिकीटाइतके पैसे घरातून निघतानाच हातात/खिशात ठेवणे, बसच्या गर्दीत पैशाच्या मुख्य सोर्स ची चेन उघडून तिकीटाचे पैसे देऊ नये. माझे ७०० रु आणि तीन क्रेडीट कार्ड ७-८ वर्षापूर्वी सातारा रोड-चिंचवड पी एम टी ने जाताना गर्दीत उभे असताना गेले आहेत. परवा माझ्या घरी येताना आईच्या मोठ्या पिशवीत असलेली पैशाची पर्स ती उतरताना चेन उघडून मागच्या तीन बायांपैकी एकीने पळवली.(इतके नक्की माहिती कारण बसलेला पूर्ण वेळ ती पिशवी वर हात ठेवून होती.) पी एम टी मध्ये उभा प्रवास करताना आपले लक्ष आणि कंट्रोल नसतोच, त्यामुळे पैसे अगदी आतल्या कप्प्यात किंवा खाली ठेवून त्यावर बर्याच जड वस्तू ठेवणे बरोबर राहिल.
३. बाहेर जाताना जवळ भाजी खरेदी आणि प्रसंगी रिक्षा करुन घरी जाता येईल इतकेच पैसे(साधारण ५०० किंवा कमी) असावे, विशेषतः महिना सुरुवातीला सर्वांना पगार द्यायला काढलेले पैसे असतात ते वेगळे घरी ठेवावे.
४. इतके करुनही पैसे कधी न कधी जातातच, ते कमीत कमी जावे आणि कार्डं लगेच ब्लॉक करता यावी(डॅमेज कंट्रोल) इतकी तयारी ठेवावी, स्वत;ला दोष देत बसू नये(मी किती व्यवस्थित असते/तो, माझ्यासोबत असा प्रकार घडलाच कसा,अशी चूक कशी झाली,लोक काय म्हणतील इ.इ.)
५. रस्त्यावरुन चालत जायचे असल्यास लोंबते मोठे मंगळसूत्र्/सोन्याच्या बांगड्या इ. स्ट्रिक्ट नोनो. 'काय लंकेची पार्वती' इ.इ. डायलॉक ऐकू येणार्या ठिकाणी(नातेवाईक लग्न/हळदीकुंकू) जायचे असल्यास हे सर्व ऐवज पिशवीत नीट ठेवून अगदी घराच्या दारात आल्यावर घालणे, घरातून बाहेर जाण्या आधीच परत काढून पिशवीत तळाशी. चांदीचा लुक असलेली खड्याची खोटी मंगळसूत्र २००० पर्यंत चांगली मिळतात आणि बहुतेक ड्रेस/साड्या/शर्ट ट्राउजर वर चांगली दिसतात, ती वापरणे उत्तम.
६. मोठ्या घरात रात्री एकटे असल्यास साधारण २-३ तासाने अलार्म लावून उठून वेगवेगळ्या खोल्यातले लाईट लावून आणि संडास लाईट लावून फ्लश वगैरे करुन परत झोपणे(लाईट चालू बंद करायला यंत्रं असतात, पण त्यांचा क्रम होम अलोन मधल्या सारखा गेस करता येत असावा.)
७. घरात असताना घरफोडी झाल्यास जीव आणि मुले वाचवणे ही पहिली प्रायोरीटी.परिचयातील एकांच्या रो हाऊस मध्ये रात्री ४ कटावण्या लावून घरात चार मोठी/२ लहान मुले असताना चोरीचा प्रयत्न झालेला आहे, चोरांनी सुरे रोखून पलंगावर थांबवून ठेवलं होतं, या गृहस्थांनी चोराला लाथ मारल्याने चोर चोरी न करता पळाले, फक्त दोन मोबाईल घेऊन गेले, पाठलाग करत असताना चोरांनी छातीवर मोठा दगड मारला आणि गेले(जास्त लागले नाही.) या गृहस्थांनी केले ते काही कारणानेच केले असेल, चोरी नीट करु दिली तरी चोर इतर काही नुकसान करणारच नाहीत(चेहरे पाहिले म्हणून मारणे, मुलांना त्रास देणे इ.) हे सांगता येत नाही. असा प्रसंग कोणावर येऊ नये, घर बंद असताना चोर्या झाल्या तरी ठीक असेच म्हणावेसे वाटते.
अगदी लॅब्रडोर असला तरीसुद्धा
अगदी लॅब्रडोर असला तरीसुद्धा परका माणूस असेल तर हमखास भुंकतो. आमची ग्रेस तर अपरात्री कुणी गेटजवळ वाहन उभे केले तरी भुंकते... अगदी आमची खात्री करून घेऊन तिला शांत करेपर्यंत!>>
म्हणून मी तसं म्हणाले. आणि अशीच परिस्थिती बर्याच लॅब बद्दल पाहिली आहे. तर ते असो.
मला जनरलायझेशन करायच नव्हतं.
काही अपवाद असतातच. माझ्या चार लॅब पैकी एकच ज्युली अपवाद होती. बाकीचे लॅब कुणी जवळ आलं की लगेच लाडात येतात.
काल्पनिक वाटेलसा खराखुरा
काल्पनिक वाटेलसा खराखुरा प्रसंग आहे.
आमच्या आधीच्या सोसायटीतल्या एक मध्यमवयीन बाई आहेत. स्वतःच्या हुषारीवर त्यांचा प्रचंड विश्वास. अधून मधून दुबईला शॉपिंगसाठी गेलं की सोन नाणं आणलंच. त्यांनी एक तिजोरी आणली होती. त्यात फक्त कागदपत्रं ठेवलेली. कपाटाच्या खणात आणि चोरकप्प्यात न लागणा-या वस्तू कोंबल्या होत्या. चोर तिजोरी आणि कपाट आधी फोडेल आणि त्यात अशा वस्तू पाहील्या की त्याला वाटेल , खूपच गरीबी दिसतेय. तिजोरीत चिंध्याचपाट्या आणि कपाटात सगळा भंगार माल. यांच्याकडे काही दिसत नाही म्हणून बिचारा वैतागून निघून जाईल.
नेमकं याच बाईंकडे चोरी झाली आणि आजूबाजूच्यांना हौसेने दाखवलेली दुबईची खरेदी, शिवाय वेळोवेळी घेतलेले दागिने आणि कॅश असा चार पाच लाखाचा ऐवज सहजच गेलडबे,गहू, ज्वारी, तांदळाचे डबे यात ठेवलेले सर्व दागिने गेले होते. डाळींसाठीच्या बरण्या होत्या, त्यातल्या अंगठ्या आणि सोन्याची नाणी गेली. कॅश अशीच कुठेतरी " स्मार्ट " पद्धतीने लपवली होती.
या बाईंना कुठलीही खरेदी केली की घरी बोलवून सर्वांना दाखवायची सवय होती. पोलिसात तक्रार दिल्यावर त्यांनी यांच्याकडून खोदून खोदून माहीती काढली तेव्हां कळालं की आपली हुषारी दाखवायची हौस असल्याने त्या घर आसांभाळणा-या मावशींना सगळं सांगायच्या. काही दिवसांपासून धुण्याभांड्याला एक तरूण बाई पण यायची. मावशींकडे किल्ल्या असायच्या पण १५ वर्षे कधीही चोरी झाली नव्हती.
पण या नव्या बाईने मावशींशी गोड बोलून मैत्री केली. दागिने दाखवा ना म्हणून गळ घातली. तेव्हां मावशींनी मालकीण स्वतःला कशी हुषार समजते असं म्हणत ही काय जागा आहे का लपवायची , तूच सांग म्हणत म्हणत दागिने दाखवले. त्या मोलकरणीने साथीदाराच्या मदतीने चोरी केली. मावशींना देवळात जायचं होतं, हिने लगेचच त्यांना मी सांभाळीन घर म्हणत आश्वासन दिलं आणि चोरी झाली.
मावशींची चूक असल्याने त्यांनी सुरुवातीला कबूलच केलं नव्हतं. पण पोलीसांच्या मा-यापुढे त्यांनी चुका कबूल केल्या. त्या बाईला अटक झाली. ओळखीमुळे बराचसा मुद्देमाल मिळाला.
यावरुन आठवलं. ऑनलाईन पैसे
यावरुन आठवलं.
ऑनलाईन पैसे पाठवणे आणि ए टी एम या गोष्टी भारतात चांगल्या प्रचलित व्हायला एक दोन वर्षं होती तेव्हा आई मला हॉस्टेलला कुरियर ने डी डी पाठवायची. कधी डी डी काढायला वेळ नसला तर कुरियर मधून पुस्तक पाठवून त्याच्या आत १५००-२००० च्या नोटा. (त्या काळी हे पैसे महिन्याच्या खर्चाला व्यवस्थित पुरायचे.) नंतर एकदा हे पैसे न मिळता नुसते पुस्तक मिळाले. आई जाऊन कुरियर वाल्यांना झापून आली होती. त्यांनी "पैसे पाठवायचे नाही असा नियम असताना तुम्ही पैसे का पाठवले" या मुद्द्यावर आणि आईने "पण तुम्हाला पैसे आहेत हे कळले म्हणजे तुम्ही प्रत्येक कुरियर उघडून पाहता म्हणजे तुमच्याकडे प्रायव्हसी नाही" इ. मुद्द्यांवर बराच काथ्याकूट केला आणि पैसे परत मिळाले होते.
घर बदलल्यावर आणि नव्या पत्त्यावर बँकेचा लॉकर मिळण्याचे एक दोन महिने सर्व ऐवज बॅगेत ऑफिसला घेऊन जायचे आणी परत आणायचे हे आठवले.(यासारखा चंपटपणा दुसरा नसेल पण सुदैवाने काही वेडेवाकडे झाले नाही.)
उपयुक्त धागा. मी_अनू, मस्त
उपयुक्त धागा. मी_अनू, मस्त पोस्ट्स.
आयुष्यातला प्रत्येक क्षण लगेचच्या लगेच चेक इन करुन फेसबुकावर मांडणे: एकदम नोनो. तुम्हाला तुमच्या परदेश वारी इ.इ. बद्दल फ्लाँट करायचं असेल तर सगळं नीट परत आल्यावर एका आठवड्याने वगैरे.>>>>+११
काहींना फारच हौस असते.
उपयोगी धागा. मी अनु आणि
उपयोगी धागा. मी अनु आणि सर्वांच्या पोस्ट छान आहेत.
दिमा, तुम्ही लिहीलेला किस्सा डेंजर आहे.
आमच्याकडे घडली होती चोरी आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा. चोरांनी कोपरा न् कोपरा धुंडाळला. पुस्तके , फायली,अगदी कॅरी बॅग्जसुद्धा . सगळीकडे सामानाची फेकाफेक केली होती. पण मुदलात आमच्याकडे काही नव्हतच. खरतर चोर समोरच्यांकडे आले होते. त्यांच्या गॅलरीतून आत न जाता आल्याने वळसा मारून समोरून आले आणि आमचे कुलुप दिसले. पण ज्यांच्या गॅलरीत खटपट करत होते त्यांना सुदैवाने जाग आली. त्यांनी पोलिसांना फोन करून पोलिस येईपर्यंत वेळ गेला. प़ण आमच्याकडे काही नव्हतच नेण्यासारखं, मोत्याचा नेकलेस सेट तो मात्र पळवला.
त्यान्चे पाळलेले अल्सेशीयन
त्यान्चे पाळलेले अल्सेशीयन कुत्रे पण घरीच ठेवले होते आणी सगळे जण बाहेरगावी गेले. तर चोरानी ते कुत्रे भुन्कु नये म्हणून त्याला गुन्गीचे औषध असलेला पदार्थ खायला दिला, आणी पोत्यात घालुन कोन्डुन ठेवले. फार हाल झाले त्या कुत्र्याचे. नन्तर बिचारे गेलेच>>
आपण गावी जाताना कुत्रे बांधून अन्न पाण्या शिवाय ठेवणे हाच एक गुन्हा आहे. त्याला केनेल मध्ये ठेवायला हवे होते. हे अगदी प्राथमिक आहे.
त्या भुकेल्या प्राण्याने समोर आलेले खाल्ले असेल. त्यात गुंगीचे औषध आहे इतके समज ण्याचे ज्ञान नसते व असले तरी भूक अगदी फर्स्ट इंस्टिंक्ट आहे. पोत्यात घालून ठेवले हा चोरांकरवी केलेला डॉग अब्युज आहे. सर्व प्रसंगात कुत्र्याची चूक नाही. तसा गैरसमज होउ नये म्हणून अवांतर पोस्ट प्रपंच.
बंगल्याचा/ प्रॉपर्टीचा राखण दार कुत्रा ठेवायचा असल्यास त्याचे सव्य अपसव्य केले पाहिजे. ट्रेनिन्ग दिले पाहिजे. इतके असूनही इमान दार प्राणी व चोर प्रवृत्तीचा माणूस ह्यांत काही बरोबरीच नाही.
आपण बाहेरगावी जाणार तेव्हा
आपण बाहेरगावी जाणार तेव्हा कुत्रं केनेलमधे ठेवायचं तर मग कुत्र्याचा उपयोग काय राखणदार म्हणून?
बाकी फ्लॅटसारख्या अडनिड्या जागेत कुत्रं ठेवणे हे कुत्र्यावर अत्याचार आहेत असं माझं कुत्रा अनफ्रेण्डली मायबोलीला जागणारं मत.
बाहेरगावी जाताना कुत्रा हा
बाहेरगावी जाताना कुत्रा हा ऑप्शन नाहीच आहे. गावातल्या गावात बाहेर गेल्यास मात्र आहे.
Pages