अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंद, या वेळेसचा सुपरबोल पाहाताना कुठलेच टेन्शन नव्हते. Happy शेवटच्या काही मिनीटात चांगली लढत बघायला मिळाली.

मुकुंद त्या शेवटच्या मिनीटात (३५ सेकंद राहिले असताना), तो कॅच घेतला त्यात ते मुख्य काय बघत होते? दोन्ही पाय टेकले होते का आणि किती वेळ वगैरे?

दोन्ही पाय टेकले होते का आणि किती वेळ वगैरे? >> झेल पकडल्यावर दोन्ही पाय आत टेकणे आवश्यक असते आणी खाली पडल्यावर चेंडु खेळाडुच्या पुर्ण नियंत्रणात असणेही आवश्यक असते. तसेच दोन्ही भागांतील शेवटच्या दोन मिनीटातील सगळ्या महत्वाच्या निर्णयांचा परत आढावा घेतला जातो.

तसेच दोन्ही भागांतील शेवटच्या दोन मिनीटातील सगळ्या महत्वाच्या निर्णयांचा परत आढावा घेतला जातो. >> घेतला जावा अशी अपेक्षा असते. घेणे न घेणे जरूरी नाही. जसे कि शेवटचा fumble होता का ते बघितले गेले नाही.

खाली पडल्यावर चेंडु खेळाडुच्या पुर्ण नियंत्रणात असणेही आवश्यक असते. >> माझ्या मते ह्याच्या सारखा subjective part नाही. एव्हढ्या वेगात धावणारा खेळाडू उडी etc मारून बॉल पकडतो, त्याच वेळी त्याला कोणीतरी धडकू शकतो. तेंव्हा त्याचा खरच control आहे का हे सांगणे जुगार आहे.

घेतला जावा अशी अपेक्षा असते. >> मला म्हणायचं होतं "सहसा" घेतला जातो. पंचांचा निर्णय असतो. तसेच सगळ्या plays चा आढावा घेता येत नाही. काही plays मध्ये पंचांनी पहिला दिलेला निर्णय बदलता येत नाही.

तेंव्हा त्याचा खरच control आहे का हे सांगणे जुगार आहे. >> माझ्या मते तरी (त्यांनी ठरवलेल्या निकषांप्रमाणे) ९५ टक्यांहुन अधिक वेळा हा निर्णय अचुक येतो अर्थात रिप्लेनंतर.

कुणी इंग्लिश प्रीमीअर लीग चे फॅन आहेत का?

ताबडतोब मला वि.पु मधे संपर्क करा... आमच्याकडे ते अकाऊंट नुकतेच आले आहे आणि फॅन ऑफ इंडिया अशी एक स्पर्धा सुरू होतेय.
लंडन्मधे फायनल बघण्याची संधी... त्वरा करा Proud
--------------
नंदिनी
--------------

टेनेसीने पिट्सबर्गला चांगलीच टफ दिली. स्टिलर्स पहिल्यांदा बॉल रन करत असल्याने (आणी ते फार जमत नसल्याने Happy ) जरा कंटाळवाणा होत होता सामना... पण शेवट मस्त झाला.

आता रविवारी बेअर्स पॅकर्स.. कटलर काय करतो बघायचं.. गो बेअर्स!!!! या वर्षी NFC North बघायला एकदम मजा येणार आहे.. कटलर, फाव्र, रॉजर्स... फाव्र त्याच्या जुन्या टीमविरुद्ध कसा खेळतो बघुतात..

ता. क. काल मॅडनची अनुपस्थिती फारच जाणवत होती.. तसंच इंडीचा गेम बघताना हॅरिसन, डंजी यांची अनुपस्थिती नक्किच जाणवेल.

इन्डी चा गेम चांगला झाला.

पेट्रियटस जरी जिंकले असले तरी ब्रेडी आणि रीसीवर्स मधे ताळ्मेळ नव्हता.

असामी, अश्विनि.. गेम पाहीला असेलच... अरेरे..! हातातला गेम घालवला तुम्ही.पण मला मॅच फिक्सिंग केल्यासारखे वाटले.. ४थ डाउन व २ मिनिट बाकी असताना बेलाचेकने.. तेही त्यांच्या स्वतःच्या ३० यार्डवर असताना ४थ डाउन चा प्रयत्न करावा? स्वतःच्या डिफेन्सवर एवढा अविश्वास? शो. ना. हो.!

एक मात्र नक्की.. या पराभवामुळे पॅट्सना प्लेऑफ्समधले होम फिल्ड अ‍ॅडव्हांटेज मिळणे आता जवळजवळ अशक्यच आहे..

त. टी.: मला तो ४थ डाउनचा अ‍ॅक्शन रिप्ले कन्क्ल्युझिव्ह वाटला नाही.. असो...

मी पण पाहिला पण मला काही कळल नाही.
आईला आमच दिवस रात्र क्रिकेट बघताना काय वाटत असेल ते मात्र कळल.

काय चालवलय ह्या मॅनिंग बंधूनी? Sad
मागच्या त्या ऐतिहासिक सुपरबोलच्या वेळेस पण शेवटच्या २ मिनिटात इलाय मॅनिंगने हेच केले. काल पेटनने तेच. संपूर्ण गेमभर पॅट्स डॉमिनेट करत होते. Sad

मुकुंद तुला अगदी अनुमोदन. बेलचेकचं चुकलच. पुढची १५ वर्षे त्याला ऐकून घ्यायला लागणार आहे ह्या एका डिसिजनबद्दल. तो कॉलपण त्याने आर्ग्यु करायला पाहिजे होता. असो.

कोल्टस मस्तच खेळतायत यावर्षी.. भारतात कुठल्या चॅनलवर दाखवतात का NFL?
I am badly missing it....

तो कॉलपण त्याने आर्ग्यु करायला पाहिजे होता. >> वेड्यासारखे २ टाइम आउट वाया घालवले त्यामुळे चॅलेंज करायला टाइम आउट शिल्लक नव्हता..

त. टी.: मला तो ४थ डाउनचा अ‍ॅक्शन रिप्ले कन्क्ल्युझिव्ह वाटला नाही.. असो... >> म्हणजे काय?

जबरीच झाला गेम.

माझ्या मते हे आहे हे असे आहे. बेलचेक always pushes the envelope like on one else. Rather it is specific reason I like to watch pats game. There is always something different on the cards. Mind you he is always within rulebook but always treading uncharted (uncommon ?) territories.

बहुधा कालचा सुद्धा असाच एक प्रयत्न होता. Brady ने सुद्धा तेच सांगितले ना कि best unit of pats was on the field, hence we decided to go with it. फक्त मला वाटते कि ह्यात थोडा over confidence झाला. payton manning ला एव्हढे ग्रुहित धरायचे ?

त. टी.: मला तो ४थ डाउनचा अ‍ॅक्शन रिप्ले कन्क्ल्युझिव्ह वाटला नाही>> मला तरी वाटला रे. अगदी मनात नसतानासुद्धा. Sad

वेड्यासारखे २ टाइम आउट वाया घालवले त्यामुळे चॅलेंज करायला टाइम आउट शिल्लक नव्हता.. >> पहिला टाईम आउट का घेतला मला कळलेच नाही Sad

कोल्टस मस्तच खेळतायत यावर्षी..>> नाही मला नाही वाटत असे. फारच चढ उतार आहेत. आधीच्या तीन गेम्समधेही तसेच होत होते. कालचाच गेम बघ. समजा, बेलचेकने तसे केले नसते तर जिंकण्यासाठी एक तरी extra ordinary pass लागला असता नि अगदी payton manning ला सुद्धा जड गेले असते. त्याचा interception नंतरचा चेहरा आठव. he knew they had lost the game at that point. (पुढे काय झाले हा भाग वेगळा.)

खरे गेम होताहेत ते NY Giants चे Lol

<<खरे गेम होताहेत ते NY Giants चे >> या वाक्यानंतर तुम्ही हसणारी बाहुली टाकली. मला रडू येते, पुनः त्यांचे गेम्स बघणार नाही. यातना सहन होणार नाहीत. जेट्स च्या बाबतीत हि तेच. आता माझा फुटबॉल प्ले ऑफपर्यंत बंद!

बेलेचेक बद्दल सहमत. कुठल्याही खेळाडुंना (आणी दर वर्षी चांगले खेळाडु गमावुन) घेउन त्याच्या सिस्टीम मध्ये बसवुन यश मिळवण्याची त्यांची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. गेल्या १-२ वर्षात त्याने काही वादग्रस्त निर्णय घेतलेत पण तेच जर यशस्वी झाले असते तर....

पहिला टाईम आउट का घेतला मला कळलेच नाही >> जो प्ले कॉल होता त्याला लागणारे खेळाडू फिल्डवर नव्हते म्हणुन..

यातना सहन होणार नाहीत. जेट्स च्या बाबतीत हि तेच. >> हाहाहाहा.... काल मोरिस जोन्स ड्रु नी गेमच केली.. Happy

मनीष, भारतात ESPN... STAR Sports वर सध्या सकाळी सकाळी दाखवतात की NFL. आता त्यातल्या कुठल्या मॅचेस बघायच्या ते तुम्हीच ठरवा...

असामी... मस्तच आर्टिकल आहे. प्रॉबॅबिलिटी चे समिकरण जबरीच..:) पण वेंट्झलच म्हणाला त्याप्रमाणे
फुट्बॉल गेम्(किंवा कोणत्याही खेळात) मधे बरेच इंटँजिबल व्हेरिएबल्स असतात.. असो.

नात्या.. मला तो अ‍ॅक्शन रिप्ले कन्क्ल्युझिव्ह वाटला नाही या वाक्यात न समजण्याइतके कठिण काय आहे?अ‍ॅक्शन रिप्ले कन्ल्युझिव्ह वाटला नाही म्हणजे अ‍ॅक्शन रिप्ले बघुन झाल्यावर (लाइनमने जो इंकप्लिट पास असे कन्क्ल्युजन काढले होते) तसे कन्क्ल्युजन काढता येत नव्हते.. गेम व खासकरुन तो अ‍ॅक्शन रिप्ले बघीतलास का नीट? उगाच आपल ती टिम आवडत नाही म्हणुन काहीही प्रश्न विचारु नकोस.:) वर असामीने दिलेली लिंक वाच. त्यातल्या लेखकाला जे वाटले तेच मला त्या ४थ डाउनचा अ‍ॅक्शन रिप्ले बघताना वाटले..

नात्या.. मला तो अ‍ॅक्शन रिप्ले कन्क्ल्युझिव्ह वाटला नाही या वाक्यात न समजण्याइतके कठिण काय आहे?अ‍ॅक्शन रिप्ले कन्ल्युझिव्ह वाटला नाही म्हणजे अ‍ॅक्शन रिप्ले बघुन झाल्यावर (लाइनमने जो इंकप्लिट पास असे कन्क्ल्युजन काढले होते) तसे कन्क्ल्युजन काढता येत नव्हते. >>> तुमच्या मुळ वाक्यातून दोन अर्थ निघतात. एक म्हणजे तुम्हाला जो अभिप्रेत होता तो (जो मला तुमच्या या पोस्टमुळे कळला) आणी दुसरा म्हणजे जर चॅलेंज करण्यासारखी परिस्थिती असती तरीही दिलेला कॉल बदलता येऊ शकला नसता असा.. असो..

Steelers lose to chiefs. that's a shame.. Happy

and now Bengals lose to Raiders.. wow..

Pages