मांसाहारी खीमा करंज्या - दिवाळी स्पेशल

Submitted by मामी on 7 November, 2015 - 10:43

खीमा हा मांसाहारींचा फारच आवडता. कारण हाडं चोखत न बसता मस्त पैकी आस्वाद घेत खाता येतो. लहान मुलं देखिल आवडीनं खातात.

खीमा करण्याचा अनेक पद्धती आहेत. भारतीय मराठी संस्कृतीत मुख्यत्वे मटणाचा खीमा आणि चिकन खीमा असे दोन प्रकार आवर्जून खाल्ले जातात.

खीमा हा अतिशय व्हर्सटाईल प्रकार आहे. त्यामुळे शाकाहारींना जसा बटाटा, पनीर प्रिय तसा मांसाहारींना खीमा आणि अंडी प्रिय हा सृष्टीचा नियम आहे. सृष्टी सध्या इयत्ता चौथीत शिकते पण तरीही तिला हा नियम माहित आहे. कारण ती नव्या पिढीची आणि नव्या विचारांची पाईक आहे. सिअ‍ॅटलमधील पाईक प्लेस मार्केट खूप प्रसिद्ध आहे आणि त्यात खुप प्रकारचा मांसाहार ऐन दिवाळीतही मिळतो. दर्दी लोकं तिथे आवर्जून खरेदीला जातात.

तर आज आपण दिवाळी निमित्त खीम्याची एक छानशी पाककृती शिकणार आहोत.

आपल्या आवडीनुसार खीमा करून घ्या. मटणाचा अथवा चिकनचा कोणताही केला तरी चालेल. मात्र तो सुका हवा. पाणी असेल तर करंज्यांऐवजी रॅविओली खायची वेळ येईल.

खीमा करण्याच्या अनेक पाककृती मायबोलीवर आहेत. या पाककृतींत सांगितल्या प्रमाणे कोणतीही एक पद्धत निवडून त्याप्रमाणे खीमा करून घ्या. :

खिम्याचे पॅटीस - जागू - http://www.maayboli.com/node/41987

खिमा-पाव - डीडी - http://www.maayboli.com/node/48814

थाय स्टाईल चिकन खीमा - वर्षू नील - http://www.maayboli.com/node/42328

मटन कबाब - अनिश्का. - http://www.maayboli.com/node/39754

अंडा घोटाला - वर्षू नील - http://www.maayboli.com/node/54324

मटण खीमा सीख कबाब - अंजली - http://www.maayboli.com/node/4142

हा खीमा आपल्या नेहमीच्या करंजी / कानवल्याच्या पारीत नेहमीच्या शाकाहारी सारणाऐवजी भरा. मग या करंज्या तळा अथवा बेक करा.

प्रत्येक दिवाळीत अशाच प्रकारच्या करंज्या करण्याऐवजी असाही प्रकार करून बघता येईल.

खीमा भरलेल्या मिरच्या - रायगड - http://www.maayboli.com/node/41674

दिवाळीचा तोच तोच फराळ आणि गोडाधोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यावर हा एक अप्रतिम उतारा मांसाहारींकरता उपलब्ध आहे. घरी कोणी मांसाहारी आले तर त्यांनाही खिलवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,
नवर्‍याला कालच आठवण झाली होती खीम्याच्या कानोल्यांची. माझी नणंद सुगरण आहे. ती फार सुरेख करते खीम्याचे कानोले, एकदम हलके पापुद्रे असलेले!

हायला ! मामी _/\_ Proud

खीम्याच्या करंज्या एकदम इनोवेटिव दिसत आहेत. गोड करंज्यांना मस्त पर्याय आहे. खिमा पावही बर्याच दिवसात खाल्ला नाहिये. आता खायलाच हवाय

रच्याकने <<< सृष्टी सध्या इयत्ता चौथीत शिकते पण तरीही तिला हा नियम माहित आहे. कारण ती नव्या पिढीची आणि नव्या विचारांची पाईक आहे>>>> Rofl

काय हे मामी!
किती अपेक्षेने धागा उघडला होता.
नांव वाचून तुमच्या त्या ह्या लोकांच्या (बघा बघा मी जातीवाचक उल्लेख टाळला! Happy ) जगप्रसिद्धं खिम्याच्या करंज्यांची पाकृ दिली असशील असे वाटले.
उद्या ब्रे फा ला बनवायला एक आयटेम मिळाला असे वाटले.
पण तू तर महत्त्वाच्या स्टेप गाळून डायरेक्ट जंप केलीस पाकृ!

हे चालणार नाही, व्यवस्थित त्या ह्या लोकांच्या स्पेशल रेसिपीला स्टेपवाईज टंकून टाक.

.

मामे, छे छे छे घोर पाप!!! कुफेहेपा... Rofl Biggrin भारतीय खीमा संस्कृती.. श्या!!! मेले हसून हसून!!!

हरे राम...

Proud

चिनूक्सच्या "अन्नं वै..." प्रमाणे सीतेची आवडीची 'डिश' हरणाचं मांस घालून शिजवलेला भात म्हणजे आपली बिर्याणी! मग सीता नक्की कुठली यावर संशोधन करण्यास वाव आहे. बिर्याणीच्या रेस्प्यापण येऊ द्यात.

चिनूक्स | 7 November, 2015 - 21:29 नवीन

Kheema parathe nahi karat ka koni? Tyanchihi recipe yeu dya'.>>>> अय्या, चिन्मय तू त्या ह्या प्रदेशाचा ना ! मग तुला कस माहित खिम्याचे पराठे ? तू ही खातोस वाट्ट Wink ( दिव्यांची माळ घे रे बाबा )

वाह मामे क्या बात है , दिवाळीचा तोच तोच गौडधोड फराळ आजकाल पाहीला की खावासाही वाटत नाही , पण खीम्याची करन्जी वर्षभर खाल्ली तरी कन्टाळा येणार नाही ग

Proud
खरे तर काय असणार कल्पना होतीच Wink तरीही काहीतरी खीमा स्पेशल वाचायला बघायला मिळेल अशी वेडी आशा होती कारण खीमा माझ्या चिक्कार आवडीचा, आमच्याकडे बनवतातही छान, आणि शेवटचे खाल्ल्याला अजून २४ तासही उलटले नसल्याने चव अजूनही जीभेवर रेंगाळतेय Happy

अवांतर - अंड्याच्या कालवणात दिवाळीची तिखट शेव आणि पोह्यांचा चिवडा टाकून मिसळ ट्राय करा. जमल्यास वर शंकरपाळ्या कुस्करा. गॅरंटी मी घेतो.

शब्दखुणा Rofl
मेरी विल रिमेंबर यु इन हर प्रेअर्स टुडे.
दिवाळीच्या सुमुहुर्तावर मांसाहारी करंज्या म्हणजे शिव, शिव, शिव.

शब्दखुणा आता पहिल्या Proud

चनस, तुम्हाला खाणार्‍याची जास्त काळजी आहे की संस्कृतीची, ते सांगा ग्यारंटी त्याची घेतो Wink

मेरी संस्कृती महान, मेरी आणि मेरीचे सर्व नातेवाईक महान>> Lol
गॅरंटी मी घेतो >> कोणाची ? संस्कृतिची का खाणार्याची >>> बहुतेक संस्कृती बालगुडेची असावी Proud

अर्रर!!! आम्ही शुद्ध शाकाहारी असुनही ही शुध्द मांसाहारी पाकृ वाचुन येथे हजेरी लावून जातोय. Happy

परवाच उत्तनला गेलो होतो. तिथे दिवाळी निमित्त जवळ्याची रांगोळी नि सुक्या बोंबिलांची तोरणं बांधली होती.

पण आपल्या इथे तसं नसतं ना!

जाऊ द्या काय करणार साडेसातीचा परिणाम आहे हा...

तुम्ही सगळे मांसाहारी अवेळी म्हातारे होणार बघा. Wink

मामे आपण सुशिक्षित आणि सुस्र्कुंत नाही राहीलोत गं , आपण दगडासारखे झालोत खीमे खाउन Lol

भर दिवाळीत हे वाचावं लागलं. अहो पापम्! आता गोमुत्र शिंपडून घ्यावं लागणार!

गोमुत्रावरून आठवलं - खिमा बीफचा पण चालतो ना करंजीत??

वाचल्यापासून सारखा खिमा खावासा वाटत होता. फ्रीजमधे चिकन होतं जे उद्या पास्त्याबरोबर स्वाहा होणार होतं, म्हटलं आजच वापरू. मामींनी खिम्याची रेसेपी म्हणून दिलेले सगळे धागे वाचले पण त्यात तयार खिमा वापरून करायच्याच कृती आहेत. मग गूगलल्यावर फ्रीजमधील चिकन तसंच उकडून बारीक करायची कृती पाहीली.मग खिमा पाव ही डीडी यांची पाकृ वाचून त्याप्रमाणे पुढे सगळं केलं. चपातीबरोबर खाल्ला. लय्यच भारी झाला होता. हे वापरून उकडीचे मोमो किंवा मोदक करेन पुढच्यावेळी. अगदीच डाएटसाठी हवं असेल तर असं उकडून बारीक केलेल्या चिकनमधे कच्चा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकून चिकन भेळ छान होईल.
Kheema.jpg

Pages