१) ५०० ग्रॅम्स- चिकन खीमा (अगदी बारीक)
२) ७,८ लसूण पाकळ्या , बारीक चिरून
३) बारीक चिरलेल्या २,३ ताज्या लाल (तिखट) मिर्च्या किंवा वाळक्या मिरच्या (हाताने क्रश करून घ्या)
४) 1/4 कप चिकन स्टॉक
५) १ कप फ्रेश थाय बेसिल लीव्ज
६) ३ (सांबारात वापरले जाणारे ) लहान कांदे- पातळ चकत्या करून
७) २ टेबल स्पून डार्क सोया सॉस
( १ टीस्पून ऑईस्टर सॉस- ऑप्शनल)
८) १ टेबलस्पून (किंवा चवीनुसार) ताज्या लिंबांचा रस
कृती
पॅनमधे थोडं तेल टाकून गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण गुलाबी रंग येईस्तोवर परता. आता कांद्याच्या चकत्या अॅड करा, पारदर्शक झाल्यावर चिकन खीमा आणी मिर्ची तुकडे घाला. एक दहा मिनिटं हाय फ्लेम वर परतला कि खीमा शिजेल. गॅस कमी करून सोया सॉस, चिकन स्टॉक ,लिंबाचा रस घालून झाकण ठेवून शिजवा. पाहिजे असल्यास मीठ टाका.
खीमा शिजल्यावर वरून थाय बेसिल लीव्ज अॅड करा. त्या दोन मिनिटात मऊ होतील. त्या खिम्यात नीट मिक्स करून गॅस बंद करा. खिम्याला अंगासरशी ग्रेवी असली पाहिजे.
स्टीम राईस बरोबर सर्व करा.
साईड डिश म्हणून काकडी,गाजर्,उकडलेल्या फ्रेंच बीन्स,सॅलड लीव्ज आणी फुल फ्राईड अंड त्यावर मीठ मिरपुड स्प्रिंकल करून सर्व करा.
फ्रेश बेसिल लीव्ज
तय्यार डिश
.
.
मस्त वर्षू नील. हेच लेट्युस
मस्त वर्षू नील. हेच लेट्युस मध्ये टाकून बनवलेले रॅप्स पण भारी लागतील. पीएफ चँग मध्ये मिळतात तसे.
छान दिसतोय खीमा चिकन रॅप्स
छान दिसतोय खीमा
चिकन रॅप्स मधे पण चांगला लागेल. थाय राईस नुडल्स वर पण चालेल बहुदा....
लाजो, थाय राईस नुडल्स वर मस्त
लाजो, थाय राईस नुडल्स वर मस्त लागतो. वरून सोया सॉस + विनिगर+ तिखट ,लाल / हिरव्या बारीक कापलेल्या मिर्च्यांच मिश्रण... यम्म्म्म्म लागतं
स्वाती.. लेट्यूस मधेरॅप करायला थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला खीमा असतो. चिकन वापरलं असेल तर त्याला ,' लाप काय' म्हणतात..
इथे मी दिलेल्या रेसिपी ला ,' बायकपाव' असं नांव आहे...
वर्षू, मस्त दिसतेय डिश.. (
वर्षू, मस्त दिसतेय डिश.. ( माझा नेहमीचा प्रश्न विचारला नाही बर्का ! )
दिनेश दा.. आप सोया खीमा का
यम्मी. नूडल्सवर भारीच लागेल.
यम्मी. नूडल्सवर भारीच लागेल.
यम्मी
यम्मी
म हा न फोटो. अगदी तोंपासू.
म हा न फोटो. अगदी तोंपासू. बाकी माझ्याकरता खिमाकायकामाची?
मस्तय हे..
मस्तय हे..
कित्ती कित्ती धागे बघायचे राहून गेले तुझे ..