बुंदीचे लाडू - boondiche ladu

Submitted by आरती. on 6 November, 2015 - 02:52
boondi ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन - अर्धा किलो,
साखर - अर्धा किलो,
साजूक तूप - अर्धा किलो,
केसर - २ टी स्पून किंवा १ टी स्पून हळद ,
वेलची पावडर - १ टि स्पून

क्रमवार पाककृती: 

बुंदीचा झारा. मी कोटीच्या मार्केटमधून विकत घेतला. कुठे ही मिळेल.

jhara.jpg.jpg

१. साखरेत १ पेला पाणी घालून त्यात केशर घालून उकळवायला ठेवा.
Kesar Pak.jpg

२. बेसन चाळून त्यात पाणी घालून मिक्स करून फेटून घ्या. पिठाच्या गुठळ्या चमच्याने मोडून काढा. पिठाची कंन्सिस्टंसी फोटोमध्ये दाखवली आहे.

Pitha Chi Consistancy.jpg

३. लाडूच पीठ तयार होईपर्यंत दोन तारी पाक तयार होतो.
Pak.jpg

४. कढईत पाव किलो तूप तापवून घ्या. बुंदीचा झारा पाण्याने धुवून पुसुन घ्या. बुंदीच्या झार्‍यामध्ये एक चमचा तयार केलेल बेसन पीठ घालून चमच्याने पसरवा. तुपात बुंदी सहज पडतात. बुंदी तळून झाल्यावर गाळून घ्या. आणि तूप निथळल्यावर लगेच पाकात घाला.

Talaleli Boondi.jpg

५. पीठ संपेपर्यंत झार्‍याने बुंदी तळून व गाळून पाकात घाला. बुंदी पाकात घातल्यावर चमच्याने थोड हलवा.
God Boondi.jpg

६. सर्व बुंदी पाकात घातल्यावर नीट ढवळून घ्या. त्यात वेलची पावडर मिक्स करा. आवडत असेल तर लवंगा, काजू तुकडा लावून एकेक लाडू वळा.

Boondi Ladu.jpg

वाढणी/प्रमाण: 
साजूक तुपातील लाडू खाल तेवढे. :)
अधिक टिपा: 

१. डालडा किंवा तेल वापरू नका. चवीत खूप फरक पडतो.
२. बुंदीचा झारा नसेल तर तळायच्या झार्‍याने करू शकता.
३. मोतीचूर लाडूसाठी पाकातील बुंदी मिक्सरमध्ये एक सेकंद फिरवा. त्याचे लाडू वळा.
४. खारी बुंदी हवी असेल तर बेसन पीठात मीठ, ला.मि.पू. किंचित हिंग घालून तेलात तळा. किंवा नुसत मीठ बेसनमध्ये घालून तेलात तळा.

माहितीचा स्रोत: 
अम्मा, आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव ग्रेट. पीठाच्या कन्सिटन्सीचा वगैरे फोटो टाकायची कल्पना छान आहे. तरी पण आम्ही केजी वाली लोकं या वर्गात बसणार नाहीच Wink

धन्यवाद सर्वांना. Happy

हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत. आणि अजिबात बिघडत नाहीत. पाक घट्ट करू नका. पातळ राहीला तरी काही फरक नाही पडत. मस्त नरम लाडू होतात.

मेधाव्ही, रायगड, झार्‍याचा फोटो वर अपलोड केला आहे.

खास दिवाळीसाठी ही रेसिपी दिली आहे Wink माबोकरांनो झब्बू नक्की द्या. Happy

Pages