डायलॉगबाजी...

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

मागच्या आठवड्यात एके दिवशी घरी गेल्या-गेल्या लेक मिठी मारून म्हणाली,

'बाबा, सोमवारी मला 'कल्मिनेटींग अ‍ॅक्ट'चे डायलॉग मिळणार आहेत !!!!!'

कल्मिनेटींग अ‍ॅक्ट म्हणजे यांच्या नवीन शाळेत बसवलेली छोटी छोटी नाटके किंवा पथनाट्ये.

मागच्या वेळेस "बाई मलाही डायलॉग देतील देतील" म्हणून खेळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. अगदी अ‍ॅमेलिया बेडेलिया नाही तरी रस्त्यावरची चिन्हे किंवा आग लागल्यावरच्या सूचनांचे कथन तरी मिळेल! पण शेवटच्या दिवसापर्यंत लागलेली आशा धुळीला मिळालेली. मग भाग घेतलेल्या वर्गमित्रांच्या गप्पांमध्ये सामिल होण्यावाचून हाती काही शिल्लक नव्हते.

आताची बातमी सांगून झाल्यावर आनंदाची भरती जरा ओसरल्यावर मग हळूच म्हणाली की, "पण मला वाटलेच नव्हते, की मला डायलॉग मिळतील! मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग! पण मला पण मिळणार आहेत!!"

तो शनिवार रविवार याच आनंदात गेला.

म्हटले, बरे झाले! एकदाचे मिळाले हिला डायलॉग!

पण सोमवारी शाळा सुटल्यावर, "... बाकीच्यांना दिले आणि मला नाही दिले डायलॉग!" अगदीच आता फोनवर बांध फुटायच्या मार्गावर.

अरे बाप रे !!!! हे काय आता? "पण मला वाटलेच नव्हते, की मला डायलॉग मिळतील! मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग! पण.. मलापण मिळणार!! एवढी मार्गक्रमणा केल्यावर आता हा धक्का कसा पचवायचा? तशी सहसा उघडपणे थयथयाट करत नाही. पण आतल्या आत चालू असते. त्याचा उद्रेक कुठेतरी होतोच एवढे नक्की! शाळेतले पण आधी आशा लावून ठेवतात आणि मग का लटकवतात?

आज परत शाळेतून आल्या आल्या फोन!
"बाबा !!!!!
मला डायलॉग मिळाले !
म्हणजे पेपरवर मिळाले !
माझ्या नावाचा पेपर !!! आणि त्यावर लिहिलेले डायलॉग !!!
म्हणजे ते माझेच आहेत ! म्हणजे चुकून दुसर्‍या कोणाचे तरी मला दिलेले नाहीत !
थांबा, मी वाचूनच दाखवते ! ऐका ! थांबा, आणि फोटो पण काढून पाठवते !!!
आता मी दोन दिवस काही अभ्यास करणार नाही आणि खेळणार नाही ! डायलॉग्जचीच प्रॅक्टीस करणार !
मला आज शाळेतही जरा फ्री वेळ मिळाला तर मी हेच करत बसले होते !

मला तर, मलाच डायलॉग मिळालेत इतका आनंद झाला.

तिचे डायलॉग्ज बघितले तर पाचसहा ओळीच असतील. ते बघून मला "काय हे एवढेसे डायलॉग" असे वाटले. पण मग वाटले की नाही, जो सादर करणार आहे त्याच्यासाठी डायलॉग्जची लांबी किती आहे यावर त्यांचे महत्त्व अवलंबून नसावे. हातात डायलॉग मिळाल्यापासून (नव्हे ते मिळायच्या आधीपासूनच !!) ते सादर करेपर्यंत आणि सादरीकरणानंतर स्टेजवरून पायउतार होऊन त्याची झिंग उतरेपर्यंतचा प्रवास हा दोन ओळीच्या सादरीकरणात आणि दोन पानाच्या सादरीकरणात सारखाच असणार! स्टेजवरचा काळ तेवढा बदलेल.

प्रकार: 

सशल, कुमार कला केन्द्र >>> यप्प. मी कुककें च्या हस्ताक्षर स्पर्धेत बर्‍याचदा भाग घेतलाय शाळेतर्फे.

खारुताईचा गेट अप नाही मिळंत?? खरंतर सर्वच प्राणी-पक्ष्यांचे 'कपडे' असतात ना कपडे भाड्याने देणार्‍यांकडे?? वाढदिवसासाठी जे 'मास्क' असतात त्यात खारीचा असल्यास तो तोंडाला लावता येईल. बाकी तपकीरी रंगाचा पूर्ण हाताचा टी-शर्ट व त्याच रंगाची लेग-इन वगैरे घालुन खारीचा ड्रेस नाही होणार कां??

रच्याकने, आम्हाला मराठी कविता म्हणण्याच्या स्पर्धेत तिसरे बक्षिस मिळाले. कविता आपल्याच 'कौतुक काकांची' -
गणिताची गंमत!

भ्रमा, वा! वा! मनवाला शाब्बासकी!!! Happy

भाड्याने देणार्‍यांकडे वाघ, सिंह, हत्ती, मिकीमाऊस वगैरे नेहमीचे हिट प्राणी वास करताहेत. खारूतै नाही.:(
आज इथे पुण्यात बघतो वेळ मिळाला तर शोधायला जमतेय का.

अनु, आठ-नऊ दिवस आहेत. अलीवर बघतो. धन्यवाद. एवढ्या दिवसात येईल का? नाहीतर एका दिवसाकरता हा आटापिटा आणि 'गोगलताई बारशाला जातात' सारखी गत व्हायची. Happy चेक करतो
वेळेत मिळाले/जुळले नाही तर जाड पुठ्ठ्याचा खारीचा मुखवटा करायचे ठरवले आहे. त्यासाठी एक नमुना गुगलून ठेवलाय.

शाळेने रोल दिला, डायलॉग्ज् पण .. पण हे सगळं पालकांनां आटापिटा करून खारूताई चा गेट-अप मिळतो किंवा नाही ह्यावर कन्डिशनल का? येन्यायनैअन्न्यायहै .. शाळा काहीच मदत करणार नाही का???

मला वाटते गेटअप मिळाला नाही मिळाला रोल तिचाच आहे, पण लहान मुले स्वतःची प्रतिष्ठा या गोष्टींवर अवलंबून ठेवतात☺,अली वर इतक्या शॉर्ट नोटिस ने मिळणार नाही, बाकी मगनलाल ड्रेसवाला वगैरे तुम्ही आधीच पाहिले असतीलच, अजून काही कळले तर सांगते

मला वाटते गेटअप मिळाला नाही मिळाला रोल तिचाच आहे, पण लहान मुले स्वतःची प्रतिष्ठा या गोष्टींवर अवलंबून ठेवतात <<< हो. Happy

हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम नाही. (तो डिसेंबरमध्ये झाला आणि खूप ताप आल्यामुळे इतका सराव केलेला असूनही तो हुकला झाला. डॅन्समध्ये भाग घेतला होता.)
हे कल्मिनेटींग अ‍ॅक्ट दर तीन महिन्यांनी साधारण काय नवीन शिकलो यावर असते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

संपादनः आम्हाला वेशभूषा मिळाली आणि सध्यापुरता जीव भांड्यात पडला आहे. (भांड्याला झाकण लावायची सोय हवी होती. Lol )

अनु, धन्यवाद.

खुप छान वाटलं वाचून Happy प्रतिसादही मस्त आहेत सगळ्यांचे.
डायलॉगबाजी झाल्यावरही कसं काय काय झालं ते नक्की लिही Happy

किती गोड! आता वाचलं हे!
मी कायम गॅदरींग मधे दत्तक दिल्यासारखी असायचेच. फक्त १ दा तिसरीत असताना डायलॉग विसरले होते, कारण १५ कॅरॅक्टर्स आणि त्यांची मी सुत्रधार असं काहितरी होतं, दर कॅरॅक्टर नंतर माझी बडबड असायची Biggrin
मस्त होते ते दिवस. इथे सिंगापूर मधे गॅदरिंग नसते, केवळ अभ्यास. कीव येते मुलांची. नुसतं प्रेशर बास! Sad

आज झाले स्किट एकदाचे!
भारी झाले.

वेळेत गेलात तर तुम्हाला वनराजाकडून बहुउपयोगी अशी साजेशी शेपूट मिळेल! Lol नाहीतर पाणघोड्यासारखा आळशीपणा कराल तर एवढुशे नावाला म्हणून असलेले शेपूट मिळेल. आणि सगळ्यांकडून चिडवून घ्यावे लागेल.

आम्हाला सिंहाने शेपूट दिले पण आम्हाला ते लवकर मागे चिकटवताच येईना. मग बाईंनी चिटकवून दिले आणि आम्ही नव्या शेपटीसह तुरूतुरू विहार करायला लागलो.

वाघाची पाळी आल्यावर सिंहाने चुकून त्याला झेब्र्याचे शेपूट उचलून दिले. ते वाघाला आवडले नाही. तो शेपूट घेईना. सिंह म्हणतो - अरे! टायगर, टेक ना!
वाघ म्हणतो - अबे भार्गव मैं झिब्रा दिख्रा हू क्या तेर्को? Lol

निवेदक दस्तुरखुद्द वनाधिकारी होते.
Culminating_act.JPG

Pages