गणिताची गंमत

Submitted by कौतुक शिरोडकर on 12 January, 2009 - 05:57

गणिताची बघा कशी गंमत जम्माडी
शुन्यापासून नऊ, दहा अंकांची गाडी

हवे तसे फिरवा तुम्ही गाडीचे हे डबे
नवे नवे अंक जेव्हा राहती हे उभे
एककाच्या शेजारीच ठाकते दशक
दशकाच्या पुढे ठाम खडे रे शतक
शिकू पटापट, नको राहूया अनाडी

दोनामधे चार कधी आठामधे दहा
बेरीज केली आता अन झाले किती पहा
वजाबाकीचाही कसा खेळ मजेदार
जमामधून हळूच काही होतात पसार
बघ राहीला हातचा, धर, खेच त्याची नाडी

एकाची दुप्पट करू दुसर्‍याची तिप्पट
रक्कम गुणाकारी अशी वाढे पटापट
छोटे छोटे करू गट नाही कोणी बाकी
भागाकाराने ही झाली वाटणी सारखी
यांच्यासाठी हवी हाती पाढ्यांची माडी

गुलमोहर: 

थोडा आधी भेटला असतास तर 'एम ३' ला तुझीच ट्युशन लावली नसती ?

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

सर... २ - -२ = ४ कसे? ते सांगा ना ... प्लिज... Happy

बाप रे गणित... सर, मझ्या पोटात दुखतेय. मी घरी जाऊ?