रंग रेषांच्या देशा.... - तुझे रुप चित्ती राहो...

Submitted by प्रदीपा on 24 September, 2015 - 04:33

या विभागात सगळ्यात पहिला आलेला मल्लीनाथ चा गणपती पाहिला आणि ठरवले की आपण ही टाकू इकडे एखादे चित्र.. असंच झटपट काढून...

तसे भरपूर गणपती काढून झालेत... शाळेत असताना पेन्सील ने गणपती काढायचे वेगवेगळ्या मूडमधले... असा छंदच लागत असे गणपतीची सुट्टी पडली कि,

पण.. अजुन पेन्सील हातात घ्यायला सवडच झाली नाहीय... तोवर आठवलं .. मागे कधीतरी रंगां चे फटकारे मारुन एक समर्थ आणि गणपती काधलेला आहे... सध्या नवा काढुन होइपर्यन्त तो द्यावा.. माय्बोलीच्या गणेशोत्सवात आपला पण सहभाग...:)

चित्र पिवळ्या रंगाच्या हॅंडमेड पेपर वर 0 आणि 2 नंबरच्या ब्रुशने वॉटर कलर ने रंगवले आहे. आणि सोबत लेटरींग- ते तर खुप आवडीचे काम. Happy

बघा बर जमलयं का ते...

gaNesha .jpg

मागे कधीतरी आमच्या सोसायटी मधे चित्र प्रदर्शन भरले होते.. त्यावेळी एक चित्र दिलेलं.. त्याचा एक छोटासा फोटो आहे नीट दिसत नाहीय.. पण मला खुप आवडलेल्ला तो बाप्पा...

myganeasha2.jpg

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद....
आशिका, आत्मधून, शब्दाली....

ते चित्र सरळ करायची उचापत करतच होते ... तितक्यात आशिकाचा प्रतिसाद सुध्धा आला.. कित्ती प्रॉम्प्ट... Happy

मग ते जसे आहे तसेच राहु दिलय...:)

मस्त !