खव्याच्या पंचामृती पोळ्या

Submitted by नंदिनी on 6 September, 2015 - 08:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. कणीक किंवा मैदा
२. तूप, दही, मध, साखर, केळं आणि दूध
३. खवा
४. भाजण्यासाठी तेल किंवा तूप

क्रमवार पाककृती: 

मागे देवकीनं बेत काय करावा मध्ये पंचामृताच्या पोळ्या सुचवल्या होत्या. तो प्रकार करून बघायचं खूप दिवस मनात होतं. अखेर आज मुहूर्त लाभला. नंतर त्यात दोन तीन व्हेरीएशन्स पण केलेत.

सर्वात आधी परातीमध्ये तूप, साखर, दही, मध घेऊन चांगलं फेसून घ्या. त्यात एक पिकलेलं केळं कुस्करून घाला, चवीनुसार साखर घाला. मी हे पीठ भिजवलं तेव्हा साख्र ठिक वाटली, पण पोळ्या भाजल्यावर गोडीला कमी वाटल्या म्हणून साखर जरा जास्तच घातली तरी चालेल. चांगले फेसल्यावर त्यात कणीक घाला. बसेल तशी कणिक घालायची असल्यानं नक्के प्रमाण सांगणं कठीण आहे. आता थोडं दूध घालून मऊसर कणीक भिजवून घ्या.
आता पोळ्या लाटायच्या आणि भाजायच्या. हे इतकंच काम अगदी दहा मिनिटांत सुद्धा होतंय.
पण आधे एम्हटलं तसं माझ्या या पोळ्या चवीला किंचीत कमी गोड झाल्या. खायला ठिक लागत होत्या, पण मजा नही आ रहा था.

फ्रीझमध्ये दोन तीन दिव्सांपूर्वी आणलेला खवा होता. इकडे चेन्नईत याला पालखोवा म्हणतात आणि यात आधीपासून साखर घातलेलीच असते. मिट्टगोड असतो. तो खवा किंचीत कुस्करून पोळीमध्ये सारण भरून वापरला. एकदम झकास खव्याची पंचामृती पोळी तयार. वरची पारी किंचित गोड, सारण अतिशय गोड यामुळे पोळ्या एकदम मस्त लागताहेत.

भरपूर तूप वापरून भाजल्यामुळे पोळ्या खुसखुशीत झाल्या आहेत. नंतर प्रयोग म्हणून दोन पोळ्यांच्या सारणासाटी खव्यामध्ये केशर वेलची सिरप वापरले तेही भन्नाट जमलंय आणि पोळ्यांचा रंग पण एकदम सही आला.

अजूनही इतर प्रयोग करता येतीलच. त्यानुसार सूचना-सल्ले-टिप्स येऊ द्यात.

पंचामृताच्य पोळ्या असल्यानं या "सोवळ्यांत" चालतील हा अजून एक फायदा आहे. सोवळ्याओवळ्याच्या कन्सेप्टस माहित नसतील तर जाने देओ. पण प्रवासाला नेण्यासाठी मात्र उपयुक्त आहेत हे नक्की. सकाळी नऊ वाजता केलेल्या पोळ्या अजून मऊ लुसलुशीत आहेत आणि कोरड्या देखील खाता येत आहेत.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

वरती दिल्यात त्याच उसवून इथं माराव्या लागतील.

माहितीचा स्रोत: 
शुभांगी संगवईंची रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! खवा/ पेढे घालायची कल्पना मस्त आहे. Happy

सायो, मी या पोळ्या केलेल्या तेव्हा केळं/ खवा घातलं नव्हतं. माझ्याकडे कणकेत घातलेल्या डावाच्या एका मापात चार पोळ्या होतात, ते एक माप कणीक घेतली. त्यात प्रत्येकी चार टीस्पून दूध आणि दही, प्रत्येकी दोन-तीन (आता नीट आठवात नाहीये) टीस्पून पिठीसाखर आणि मध घेतला आणि दोन टीस्पून तूप घातलं. मिठाची एक कणी घालून कणीक भिजवली, पाणी अजिबात घालावं लागलं नाही. घडीच्या पोळ्या करून तेल/ तूप न लावता तव्यावर भाजल्या.

आज केल्या ह्या पोळ्या. मस्त लागत आहेत. माझ्या आणखी जरा गोड चालल्या असत्या पेण नेक्स टाईम. पुढच्या वेळी आधी प्लॅन करून पेढे मिळाल्यास घालायला हवेत. मग भारी लागतील.

मी साधारण ६ चमचे दूध, ६ चमचे दही, २,३ चमचे तूप, २ चमचे मध आणि अंदाजे साखर घालून फेटलं. त्यात चिमूटभर मीठ आणि लिंबाएवढा खवा कुस्करून घातला. भिजवायला पाणी अजिबात लागलं नाही. मस्त मऊ कणीक भिजवली गेली.

रेसिपी मस्त आहे. पुन्हा नक्कीच करणार.

नविन कल्पना मस्स्स्त!

ही पाककृति (आमच्या) यजमान-लोकात फेमस करायला हवी... पंचामृत कन्सेप्ट मुळे होइलहि.. आणि झालिच , तर आमचिहि सुटका होइल.. कायम ते पुरणपोळ्या , (हल्लिचं रेडिमेड..) अखंड श्रीखंड आणि जिलब्यां पासून!

फोटो टाकण्याकरता मुळात नेहमीच्या पोळीपेक्षा वेगळी दिसायला हवी ना? तसा फरक काही दिसत नाही म्हणून काढले नाहीत फोटो.

सुनिधी, खवा/ सारण न भरता नुसत्या पोळ्या कर. पंचामृताची अनुभूती फार सुरेख असते. म्हणजे, दही-दूध-तूप आवडणार्‍यालाच हे उमजेल.


आज केल्या होत्या... मस्त झाल्या. बेताच्या गोड झाल्या सगळ्या मध, केळ्याची चव छान जाणवत होती. खवा नव्हता घातला. एक छोट केळं घातलं

Pages