खव्याच्या पंचामृती पोळ्या

Submitted by नंदिनी on 6 September, 2015 - 08:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. कणीक किंवा मैदा
२. तूप, दही, मध, साखर, केळं आणि दूध
३. खवा
४. भाजण्यासाठी तेल किंवा तूप

क्रमवार पाककृती: 

मागे देवकीनं बेत काय करावा मध्ये पंचामृताच्या पोळ्या सुचवल्या होत्या. तो प्रकार करून बघायचं खूप दिवस मनात होतं. अखेर आज मुहूर्त लाभला. नंतर त्यात दोन तीन व्हेरीएशन्स पण केलेत.

सर्वात आधी परातीमध्ये तूप, साखर, दही, मध घेऊन चांगलं फेसून घ्या. त्यात एक पिकलेलं केळं कुस्करून घाला, चवीनुसार साखर घाला. मी हे पीठ भिजवलं तेव्हा साख्र ठिक वाटली, पण पोळ्या भाजल्यावर गोडीला कमी वाटल्या म्हणून साखर जरा जास्तच घातली तरी चालेल. चांगले फेसल्यावर त्यात कणीक घाला. बसेल तशी कणिक घालायची असल्यानं नक्के प्रमाण सांगणं कठीण आहे. आता थोडं दूध घालून मऊसर कणीक भिजवून घ्या.
आता पोळ्या लाटायच्या आणि भाजायच्या. हे इतकंच काम अगदी दहा मिनिटांत सुद्धा होतंय.
पण आधे एम्हटलं तसं माझ्या या पोळ्या चवीला किंचीत कमी गोड झाल्या. खायला ठिक लागत होत्या, पण मजा नही आ रहा था.

फ्रीझमध्ये दोन तीन दिव्सांपूर्वी आणलेला खवा होता. इकडे चेन्नईत याला पालखोवा म्हणतात आणि यात आधीपासून साखर घातलेलीच असते. मिट्टगोड असतो. तो खवा किंचीत कुस्करून पोळीमध्ये सारण भरून वापरला. एकदम झकास खव्याची पंचामृती पोळी तयार. वरची पारी किंचित गोड, सारण अतिशय गोड यामुळे पोळ्या एकदम मस्त लागताहेत.

भरपूर तूप वापरून भाजल्यामुळे पोळ्या खुसखुशीत झाल्या आहेत. नंतर प्रयोग म्हणून दोन पोळ्यांच्या सारणासाटी खव्यामध्ये केशर वेलची सिरप वापरले तेही भन्नाट जमलंय आणि पोळ्यांचा रंग पण एकदम सही आला.

अजूनही इतर प्रयोग करता येतीलच. त्यानुसार सूचना-सल्ले-टिप्स येऊ द्यात.

पंचामृताच्य पोळ्या असल्यानं या "सोवळ्यांत" चालतील हा अजून एक फायदा आहे. सोवळ्याओवळ्याच्या कन्सेप्टस माहित नसतील तर जाने देओ. पण प्रवासाला नेण्यासाठी मात्र उपयुक्त आहेत हे नक्की. सकाळी नऊ वाजता केलेल्या पोळ्या अजून मऊ लुसलुशीत आहेत आणि कोरड्या देखील खाता येत आहेत.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

वरती दिल्यात त्याच उसवून इथं माराव्या लागतील.

माहितीचा स्रोत: 
शुभांगी संगवईंची रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो? मला आणि आईला पण करून बघायच्या आहेत. सध्या इथे एकजण उत्तम खवा घेऊन येतो त्यामुळे तेही व्हेरीएशन करता येईल.

वाढणी/प्रमाण:
खाल तसे.
अधिक टिपा:
वरती दिल्यात त्याच उसवून इथं माराव्या लागतील.>>>>> हे वाक्य मला जाम आवडले. पोळ्या करणार म्हणजे करणारच, पण खव्या ऐवजी पेढे वापरेन( चितळेन्चे) आणी साखर कमी घालेन.(पेढ्यान्मुळे)

वाह, मस्तं. एकदम हटके पाककृती. आवडली.
" पोळ्या करणार म्हणजे करणारच, पण खव्या ऐवजी पेढे वापरेन( चितळेन्चे) आणी साखर कमी घालेन.(पेढ्यान्मुळे)" ....सेम हीअर.

नक्की करुन बघणार ... हल्दीरामचे केशर पेढे वापरुन ... असं म्हणत नाही कारण मध व केळ्याचा गोडवा बेताचा होईल व केलेरीज वाढणार नाही ...

माहितीचा स्रोत मधील माझे नाव काढाल का?शुभांगी संगवईंची रेसिपी मी फक्त शेअर केली होती.

बाकी त्यात खवा घालायची कल्पना मस्त आहे.

देवकी, चालेल. मी त्यांचेच नाव अ‍ॅड करते.

मी जो पालखोवा प्रकार वापरलाय तो पेढ्याच्याच चवीचा अस्तो पण टेक्चर जास्त रवाळ आणि दाणेदार असतं. त्यामुळे पेढे वापरले तरी चालतील फक्त ते जास्त मळून घ्यावे लागतील.

प्रयोग करत असल्यानं रेसिपी टाकेनच वगैरे ठरवलं नव्हतं त्यामुळे फोटो काढलेच नाहीत. नेक्स्ट टाईम. (तोपर्यंत इतरांनी झब्बू द्या)

मस्त रेसिपी.
केळं घालायलाच हवं का?
बाकी पंचामृताचं प्रमाण (प्रत्येकी) अंदाजे सांगू शकशील का? आणि खवा तू पोळ्या कमी गोड वाटल्यामुळे घातलास, पण मूळच्या पंचामृताच्या पोळ्यांमध्ये घालायची गरज नाही. बरोबर?
आता फोटो?

मस्त रेस्पी Happy यात मीठाची कणी जर घातली तर गोडवा अधिक खुलेल (का?)
प्लीज जरा प्रमाण देणार का? मोघमही प्रमाण चालेल.

मला पंचामृताचही प्रमाण नाही माहीती. सगळे घटक (पंचामृताचे) समप्रमाणात घ्यायचे की त्याचं काही एक विशिष्ट प्रमाण आहे?

सायो, केळ नाही घातलंस तरी चालेल. मी एकच घातलं होतं त्यामुळे खास चवीत बदल वाटला नाही. अतिपिकलेली केळी जरा जास्त घातली तर केळ्याच्या पुर्‍यांच्या आसपास जाणारी चव येते का बघायला हवं. मूळ पंचामृताची चव जर परफेक्ट गोड आली तर खवा घालायची गरज राहणार नाही.

मी सुरूवातीला साधारण चमचाभर तूप, मध आणि दही त्याहून थोडं जास्त घेतलं होतं. मग नंतर अ‍ॅडज्स्ट करत गेल्यानं नक्की प्रमाण सांगता येत नाहीये.

योकु, नन्दिनी लिहीलच बाकी प्रमाण. पण मध आणी तुप मात्र समसमान घेऊ नका. म्हणजे तुप अर्धा चमचा असेल तर मध नेहेमी १ चमचा ( फुल ) घ्यावा. तुप-मध समान घेऊ नयेत, ते बाधते असे म्हणतात.

.

जिज्ञासा, कंसातलं प्रमाण चमच्यांचं का?
नंदिनी, एकेक चमचाच घेतलंस मुळात? मला वाटलं कमीतकमी पाव वाटी नक्कीच असेल.

सायो, हो, पण तो रेशो आहे त्यामुळे ज्या प्रमाणात दूध घेऊ त्याप्रमाणात बाकीचे सारे घटक घेता येतील.

गूड! म्हणजे जर नैवेद्याची वाटी/ साधारण साईज चा डाव/ टेस्पू (किंवा ज्याला जे माप हवं ते) घेतलं तर --
दूध (८) टेस्पून
दही (२) टेस्पू
तूप (२) टेस्पू
मध (१) टेस्पू
साखर (१) टेस्पू
वर हवं असेल तर केशर!

पण मग या प्रमाणात साखर जास्त घ्यायला लागेल किंवा खवा/ पेढे असं काही वापरावं लागेल. पण माहीती मिळाली Happy
प्रयोग करण्यात येईलच Happy

ओके नंदिनी, धन्यवाद.

एकदा थोड्या प्रमाणात केळे घालून बघेन, एकदा न घालता बघेन आणि पेढे आणीन. सोपा मार्ग. Happy

Pages