उपासाचं थालीपीठ (फोटोसह)

Submitted by योकु on 1 September, 2015 - 14:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- उपासाची भाजणी (मी ही भाजणी वापरली)
- दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे
- तीन ते चार टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
- दोन ते तीन (किंवा तिखटाच्या आवडीप्रमाणे) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- पाव लहान चमचा लाल तिखट
- चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

- बटाटे सोलून, धूवून किसून घ्यावे.
- यात मिरची, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, मीठ घालावं.
- यात आता हळूहळू भाजणी घालावी. बटाटा + कूट याच्या प्रमाणात पीठ घालावं. मग जरूर पडल्यास थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ तयार करावं.
- तव्यावर तेल किंवा आवडीप्रमाणे तूप घालून थालीपीठं लावावी.
- मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस झाली की गरमच मटकवावी.
- बरोबर टीव्ही वरच्या डेली सोप्स (कारेदु, होसुमीयाघ, नासौभ, पैठणी इ) + नारळाची चटणी, लिंबाचं गोड लोणचं, लोणी इ आवडीप्रमाणे घेता येईल.

फटू -
IMG_01771.jpg

वाढणी/प्रमाण: 
माणशी दोन तरी हवीतच
अधिक टिपा: 

- मी शक्यतो याबरोबर काहीच घेत नाही, नुसतं खायलाच मस्त लागतं

माहितीचा स्रोत: 
दादरला पणशीकरांकडे एकदा खाल्लेलं होतं. त्यावरून प्रयोग + भाजणीच्या पाकीटावर लिहिलेल्या कृतीत जरासा बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..
मी तयार करताना शिंगाड्याच पिठ वापरते Happy
भाजणी ने करुन पाहते आता..
आजचा उपवास..सकाळी टा़़आयला हवी होती पाकृ योकु..
साबुदाण्याची उसळ खाऊन कंटाळा आलाय तसापन..असो.धन्यवाद पाकृ बद्दल Happy

साबुदाण्याची उसळ खाऊन कंटाळा आलाय तसापन>> त्याच पण थालिपिठ लावायच, साबुदाणा वड्याला भिजवतो तस आणी त्यापेक्षा किचित सैल पिठ भिजवायच आणी थालिपिठ लावायच मस्त लागतात.. पातळ लावले तर क्रिस्पी होतात, ..गरमच जास्त चान्गले लागतात.

छान.

बऱ्याचदा बटाटा उकडून घेते, क्वचित किसून घेते. मी थोडे भिजवलेले साबुदाणेपण घालते कधी कधी. कोथिंबीर चालते आम्हाला उपासाला त्यामुळे ती पण घालते.

काल उपासाची केली पण साबुदाणा आणि कोथिंबीर न घालता.

आम्ही कधी कधी बटाटा न घालताच करतो आणि उपलब्धतेनुसार हिरव्या मिरच्या / कोथिंबीर / लाल तिखट (उपासासाठी केलेले) असे घालतो.

माझ्याकडे पण (बाईंनी दिली तर) केप्रचीच भाजणी असते. पण पीठ भिजवलं की कोरडं पडतं त्यामुळे सुरूवातीला जरा सैल भिजवावं लागतं.

अन्जू, भाजणीच्या थालिपीठात थोडेसे साबुदाणे घातलेले मला पण आवडतात Happy

आम्ही पण कच्चा बटाटा आणि भिजवलेला साबुदाणा असेल तर तो घालतो यात. किसलेली काकडी घालून पण छान होतात ही थालिपीठं.

सिंडरेला :). छान होतात साबुदाणा घालून.

लाल भोपळा, सुरण पण घालते कधीतरी. पण जास्त करून बटाटा आणि साबुदाणा.

बिल्वा, आई करते काकडी घालून. रताळे मला नाही आवडत पण ते घालून पण करता येतं.

योकु थालीपीठाचा वरचा भाग थोडा मोडलेला दिसतोय. शबरीचं थालीपीठ दिसतंय जनू Wink

आणि बाजुला किबोर्ड कशाला? तो तू बडवतोयस ते दिसतंय की इथेच. बरं तो ७ आणि ८ पुसून घे वाईच.

मस्त! मी बटाटा किसायचा कंटाळा आला तर बटाट्याचे पीठ वापरते, होल फुड्स मध्ये मिळते. थोडेसे ट्केस्चर बदलते..

टीना, साबुदाण्याची उसळ म्हणजे खिचडी ना? माझ्या सासरचे काही नातेवाईक विदर्भात आहेत, त्यांच्याकडून कळले. Happy

बर्बर रिमोटच्या कीज. आमच्या घरचा रिमोट माझ्याकडे कधी येत नाही गं त्यामुळे रिमोट पाहायची सवय गेली. की दिसल्या की फक्त कि-बोर्ड एवढंच पापी पेटला कळतं.

योकु छान रेसिपी. उ.भा. मिळाली की ट्राय करेन. अन्जू त्यात भिजवलेला साबुदाणा घालायची आयडीया मस्त आहे.

वेका Proud

मस्त. मी असंच करते पण हि.मि घालते. साबुदाण्याचं थालिपीठ कित्ती दिवसात केलं नाहीये. करावं आता या वीकेण्डला.. तशीही घरातली भा संपली आहे Uhoh

वेका, नाही शबरीचं नाहीये थालीपीठ. मीच केलंय म्हणून मुळात त्याचा आकार गोल गरगरीत नव्हता अन एकाचे दोन अर्धे करतांना ते विचित्रच मोडलं.
बाजूचा रिमोटच आहे टिव्ही + सेट-टॉप बॉक्स + साऊंड सिस्टीमचा; म्हणून कीबोर्ड एवढा वाटतोय बहुतेक Wink

वेके, सगळ्यातल्याच चुका काढायला कुठून शिकलियेस गं? मॅनेजर झालीस की काय? Wink Light 1

आमच्याकडे सेम असच थालिपिठ बनतं, भाजणी मात्र केप्रचीच Wink

अय्यो रिया चुका काढणेला (आमच्या) आय टीत किवे म्हणतात किवे.
पण स्पिकिंग ऑफ डॅमेजरगिरी आमचे येथे सगळेच हे काम करतात Wink

पण सगळ्यातल्या म्हंजे आणखी कुठल्या गो? विपुत सांग हवंच तर Happy