मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by webmaster on 30 August, 2015 - 22:04

या गणेशोत्सवात मायबोलीला १९ वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेमतेम पंधरा दिवस उरलेत! इथे एक सुचवावंसं वाटतं की अशा कार्यक्रमांना आवश्यक असलेल्या स्किलसेटच्या लोकांनी प्लीज उत्स्फूर्तपणे पुढे यावं उदा. चित्रकार मंडळी, टीझर्स बनवणारी मंडळी, शुध्दलेखन तपासणारी मंडळी. संयोजकांना ही माणसं शोधायचं, त्यांना विनंत्या करायचं, फॉलोअप ठेवायचं जास्तं काम पडतं तेव्हा याआधी ही कामं केलेल्या लोकांनी आपण होऊन पुढे आलं तर जरा हातभार लागेल. आणखी एक, ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी गणपतीच्या दहा दिवसात आपण किती दिवस उपलब्ध असू हे ही आवर्जून सांगावे. शिफ्ट ठरवून दहाही दिवस कोण ना कोणतरी संयोजक इथे हजर असावा. पूर्वानुभवातून साभार.
गेल्या वर्षीप्रमाणेच मी तयार आहे संयोजनासाठी. गणपती बसायच्या दिवशी मी संध्याकाळी चार नंतर उपलब्ध असेन. (नवीन मंडळी आली तर मला नाही निवडलं तरी चालेल. कमी तिधे आम्ही म्हणून नाव दिलंय. Happy )

वेमा , तुम्ही मागच्या वर्षाचे गणेशोत्सवाचे दुवे दिलेत त्यात आणि नवीन लेखनाच्या डाव्या बाजूस 2014चा गणेशोत्सव दिसत नाही

२००८ मध्ये गणेशोत्सवासाठी काम केले होते.... यंदा परत काम करायला आवडेल
स्पर्धा नियोजन, टीझर्स आणि इतर प्रसिद्धी संदर्भात कामे करायला आवडेल Happy

जेमेतेम १५ ते १६ मिळणार यावेळेसच्या संयोजकांना. खूपच टाईट डेडलाईन Uhoh
गणपती १७ सप्टेंबरला बसणार!

मी कालच विचार करत होते की हा धागा अजुन कसा आला नाही Happy

आशू +१

या वेळेला नवे लोक जास्त तयार होतायेत तेंव्हा आम्हाला (अ‍ॅटलिस्ट मला तरी) लास्ट नंबर वर ठेवा Happy

१५ दिवसांमधेही मस्त संयोजन होऊ शकतं जर तुम्हा संयोजकांमधे एकी असेल (मागच्या वर्षीचा अनुभव)
तेंव्हा नविन लोकांनी न घाबरता पुढे या आणि जबाबदारी घ्या Happy

शुद्धलेखन तपासणे करू शकेन.

त्याच काळात सहामाही सुरू असतील त्यामुळे संयोजनात भाग घेणे जमणार नाही Sad

मुशो, पावरपॉइंट इ. वापरून जाहिराती बनवणे इ. कामांमध्ये मदत करू शकेन मात्र फुल टाइम संयोजन वेळेचं त्रांगडं असल्यानं यंदा तरी शक्य नाही.

संयोजनात भाग घ्यायला आवडेल, पण अनुभव नाही.
मुशो, टीजर्स नक्की करू शकेन. संयोजनात EST आणि भारतातील सकाळ आणि संध्याकाळ या काळात वेळ देता येईल.

वा! चौदा प्रतिसादांपैकी सात संयोजनात भाग घेण्यासाठीचे, चार मदतनीसांचे! गुड स्टार्ट! नवीन लोकांनी पूर्वीचे गणेशोत्सव वाचून या. धमाल असते नुसती!

Art and craft challenged व्यक्ती चालणार असतील तर मला मदतनीस म्हणून पकडा. Available during PST

नवीन लोकांनी पूर्वीचे गणेशोत्सव वाचून या. धमाल असते नुसती! >>>> हो ! मंडळातली चर्चा वाचायला मिळाली असती तर अजून धम्माल कळली असती.. Wink

भावी मंडळाला शुभेच्छा. Happy

घरी इंटरनेट आहे, गणपती वगैरे काही नसतो, शाळा ऑफिसेस चालू आसल्यानं घर शांतच असेल. तस्मात, संयोजनात भाग घ्यायला जमत नसलं तरी मुशो आणि कंटेट साठी इतरही हवी असल्यास मदत करू शकेन.

घरीही इंटरनेट आहे. पण मी घरी फारसा कधी नसतो. Wink

संयोजनातली एक अट पूर्ण करू शकत नाही, तेव्हा त्याला पास. पण इतर कामात मदत करू शकतो. थोडीफार चित्रे काढता येतात. दवंडीच्या टेम्प्लेट्स इ. बनवू शकतो.

सर्वांना धन्यवाद. आणि हो उशीर झालाय हे कबूल, त्याबद्दल दिलगीर आहोत.

आशूडी, आत्मधून, स्वरुप, प्राजक्ता_शिरीन, अमितव, रायगड, चनस यांचे विशेष आभार. संयोजकांना शुभेच्छा!!

धन्यवाद ॲडमिन. तेवढा गेल्या वर्षीचा गणेशोत्सव मायबोली विशेष गणेशोत्सव विभागात दिसेल असे करा म्हणजे रेफर कता येईल नवीन संयोजकांना.
वर मदतीसाठी तयारी दाखवलेल्यांचेही आभार. गरज पडेल तेव्हा पहिली हाक तुम्हालाच असेल. Happy
गणपती बाप्पा मोरया!

मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे तरी यंदा सर्वच लोकांनी सांभाळून घेऊया.

आशूडी आणि इतर संयोजक. गरज लागल्यास कधीही हाक मारा. आम्ही रेडी आहोतच!!! Happy बेस्ट लक!!

बाकी गणेशोत्सवात झब्बू हा प्रकार हवाच आहे!!!!

Pages