मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by webmaster on 30 August, 2015 - 22:04

या गणेशोत्सवात मायबोलीला १९ वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ संयोजक ह्या वेळी मैदानी खेळ पण घ्या.

१. पहिली वहिली मायबोली सायकल रेस. १० किमी गट स्त्री व पुरूष. वेगवेगळे विजेते. शिवाय ओपन अन सिनियर ह्या कॅटॅगिरीपण करता येतील.
२. ३ किमी, ५ किमी धावणे शर्यत.

एक हेल्दी उपक्रम होईल हा.

आयोजनात मी मदत करीन.

केदार-आशुडी, तसे झाले तर छानच होईल.
(फक्त जमल्यास, गौरी बसतात्/जेवतात ते दिवस ठरवु नका.... खूप पूजा सांगायच्या असतात हो त्या दिवशी...)

सायकल स्पर्धा मस्त आयडिया आहे.. मी नक्की भाग घेईन.. आणि झालीच तर १९, २०, २५, २६, ह्याच दिवशी करता येईल.. कारण बाकीचे दिवस मधले दिवस आहेत.. २५ ला बकरी ईदची सुट्टी असेल बर्‍याच जणांना.. आणि १९, २० शनि - रवि आहेत. पण तेव्हाच गौरी पण बसत आहेत..

एऽऽऽ गप्पे आशुडे....... आमाला हव्यात सुट्ट्या........ सायकलवरुनच जायचय, फक्त ऑफिसला नै, फिरायला जायचय!

घरी बनवलेल्या मातीच्या गणपतीची स्पर्धा घ्या. आणि तोच गणपती बसवा.

लहान मुलांसाठी गणपतीची आरती, अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन ह्याची स्पर्धा घ्या.

मोठ्यासांठी काव्यवाचनाची स्पर्धा घ्या. जी कुठली कविता तुम्हाला आवडली ती रेकोर्ड करुन पाठवा.

आणखी एक स्पर्धा सुचवतो: आमच्या शहरातील गणपती अशी एक स्पर्धा घ्या. ह्यामधे आपल्या शहरात जो गणपती तुम्हाला आवडला त्याचे सचित्र वर्णन पाठवा. तिथली रोशनाई, देखावे, प्रसाद ई.

@केदार, आपण सुचवलेला उपक्रम स्तुत्य आहे. परंतु हाती असलेला थोडा वेळ आणि नियोजित केलेल्या कार्यक्रमांचे काम बघता संयोजकांना यात सक्रिय सहभाग घेणे अवघड आहे. आपण पुढाकार घेऊन अशी स्पर्धा किंवा खेळ आयोजित करून त्यानिमित्ताने मायबोलीकरांची भेट घडवून आणू शकता. त्याचा सविस्तर वृत्तांत व क्षणचित्रे गणेशोत्सवादरम्यान प्रकाशित केल्यास उपक्रमात मोलाची भर पडेल. आपल्याला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न संयोजक मंडळ जरूर करेल ही खात्री बाळगावी. धन्यवाद!

आज खूप दिवसांनी काही कामासाठी मायबोलीवर आले. गणेशोत्सवात एकाहून एक सरस उपक्रम दिसत आहेत. संयोजकांचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!

छोट्यांसाठी लेखनाचा काही उपक्रम आहे क? मायबोलीवरील उपक्रमांमुळेच आमची मराठी लिहिण्याची सुरुवात झाली Happy

आयोजन मी करेल. मला त्यात मदत नकोय. फक्त एक दोन स्वयंसेवक लागतील.

पण इंट्रेस्ट किती आहे ते पाहण्यासाठी तुम्ही मायबोली सायकल स्पर्धा हा धागा काढू शकाल का? सध्या २० सप्टे ची सकाळ ८ ते ९ अशी वेळ ठेवा. त्यावरून मग आपण किती लोकं खरोखर येत आहेत वगैरे वरून, मी ती कुठे व कशी घ्यायची ह्याची आखणी करू शकतो.

पहिल्या पानावर हा उपक्रम कधी दिसणार ... सगळं अजुन २०१४ चे उपक्रम दिसत आहे....हायवे सोडुन
>> हे खूप जुने दु़:ख आहे. पहिले पान काही ठराविक गोष्टींपुरतेच अपडेट होते. बाकी सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष तशाच आहेत. प्रकाशचित्रे तर २०१३ पासुन खितपत पडलेली आहेत. अ‍ॅडमीनला विनंती करुनही ते अपडेट झालेले नाही. त्याकरता काही स्वयंसेवक हवे असल्यास मदत करायला तयार आहे.

सायकल स्पर्धा. आय सी. Happy

Pages