लागणारे जिन्नस:
एक वाटी तुरडाळीचे वरण
पाणी - तांब्या भर (साधारण पाउण लिटर थोडे कमी जास्त चालेले)
कोथिंबिर - ४ काड्या
टोमेटो - १ बारिक चिरून
गुळ - छोटासा तुकडा
फोडणीसाठी :
तेल- २ चमचे (साधारण १० मिली)
गोडा मसाला - २ चमचे
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ मध्यम चिरलेला (गरज वाटल्यस तशी आवश्यकता नाही)
लसुण - २ पाकळ्या सोललेले
मिरची - १ ( हो एकच)
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
कढिपत्ता - ४ - ५ पाने (कोथिंबीर घेताना कढीपत्ता फुकट मिळते म्हणुन जास्त घालू नये.)
क्रमवार पाककृती:
वरण डावाच्या सहाय्याने हलकेच एकजीव करावे पुर्णा गोळा करु नये डाळ दिसली पाहिजे. गॅस पेटवून त्यावर कढई ठेवा. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. निट तापल्यावर प्रथम मोहोरी टाका ती तडतडल्यावर लगेच तेलात फोडणीच साहित्य टाका. फोडणी थोडी खमंग झाली पाहिजे. आता त्यात वरण घालण्यापुर्वी मिरची काढुन टाका. फोडणी जळण्यापुर्वी त्यात वरण, मिठ आणि पाणी घाला आणि चांगली उकळी फुटे पर्यंत गरम करा, गुळाचा तुकडा आणि टोमॅटो टाका.
वरून कोथिंबिर टाका.
वाढणी -
पोळी बरोबर किंवा भातावर घेता येईल.
अधिक टिपा:
आमटी शक्यतो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस केली जाते. सकाळची थोडी भाजी, पोळी आणि गरम आमटी भात असा झकास बेत होतो.
तिखटाचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्यामुळे लहान मुलांना विशेष करून आवडते. रात्री झोपताना जळजळ, वगैरे प्रकार होत नाहीत
ज्यांना जळजळ होत नाही त्यांनी ती फोडणितून बाजुला काढलेली मिर्ची तेल मिठा बरोबर तोंडी लाउन खावी.
हिच पाककृती मुगाच्या डाळीचे वरण वापरूनही करता येईल
पुणेरी डाळ तडका असे नाव देण्याचे कारण मी ही पाककृती पुण्यातच पाहिली अन्यत्र कुठे उपलब्ध असल्यास निव्वळ योगा-योग समाजावा.
फोटो - उपलब्ध झाल्यावर चिटकवेन
फोडणीचे वरण म्हणजे तुरडाळ
फोडणीचे वरण म्हणजे तुरडाळ किंवा मुगडाळी च्या वरणाला लाल तिखट - लसुण घालून केलेली खमंग फोडणी आणि ती सुद्धा वरतून घातली जाते. वरणात पाण्याचे प्रमाण बरेच कमी असते.
तर आमटी मधे मसाला वापरून जास्त पाणी वापरून केलेली पाककृती
Pages