लागणारे जिन्नस:
एक वाटी तुरडाळीचे वरण
पाणी - तांब्या भर (साधारण पाउण लिटर थोडे कमी जास्त चालेले)
कोथिंबिर - ४ काड्या
टोमेटो - १ बारिक चिरून
गुळ - छोटासा तुकडा
फोडणीसाठी :
तेल- २ चमचे (साधारण १० मिली)
गोडा मसाला - २ चमचे
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ मध्यम चिरलेला (गरज वाटल्यस तशी आवश्यकता नाही)
लसुण - २ पाकळ्या सोललेले
मिरची - १ ( हो एकच)
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
कढिपत्ता - ४ - ५ पाने (कोथिंबीर घेताना कढीपत्ता फुकट मिळते म्हणुन जास्त घालू नये.)
क्रमवार पाककृती:
वरण डावाच्या सहाय्याने हलकेच एकजीव करावे पुर्णा गोळा करु नये डाळ दिसली पाहिजे. गॅस पेटवून त्यावर कढई ठेवा. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. निट तापल्यावर प्रथम मोहोरी टाका ती तडतडल्यावर लगेच तेलात फोडणीच साहित्य टाका. फोडणी थोडी खमंग झाली पाहिजे. आता त्यात वरण घालण्यापुर्वी मिरची काढुन टाका. फोडणी जळण्यापुर्वी त्यात वरण, मिठ आणि पाणी घाला आणि चांगली उकळी फुटे पर्यंत गरम करा, गुळाचा तुकडा आणि टोमॅटो टाका.
वरून कोथिंबिर टाका.
वाढणी -
पोळी बरोबर किंवा भातावर घेता येईल.
अधिक टिपा:
आमटी शक्यतो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस केली जाते. सकाळची थोडी भाजी, पोळी आणि गरम आमटी भात असा झकास बेत होतो.
तिखटाचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्यामुळे लहान मुलांना विशेष करून आवडते. रात्री झोपताना जळजळ, वगैरे प्रकार होत नाहीत
ज्यांना जळजळ होत नाही त्यांनी ती फोडणितून बाजुला काढलेली मिर्ची तेल मिठा बरोबर तोंडी लाउन खावी.
हिच पाककृती मुगाच्या डाळीचे वरण वापरूनही करता येईल
पुणेरी डाळ तडका असे नाव देण्याचे कारण मी ही पाककृती पुण्यातच पाहिली अन्यत्र कुठे उपलब्ध असल्यास निव्वळ योगा-योग समाजावा.
फोटो - उपलब्ध झाल्यावर चिटकवेन
सोलापूर अजूनतरी पुण्यात पडत
सोलापूर अजूनतरी पुण्यात पडत नाही, ससेभौ
आम्ही पेठ पुणे आमटीविशेषाबद्दल बोलतोय
शेपू डाळ नंतर ह्याचा नंबर.
शेपू डाळ नंतर ह्याचा नंबर.
पुण्यात हवामान चांगले आहे
पुण्यात हवामान चांगले आहे वाटतं निदान चार काड्या आणि गूळ तरी घालतात.
आमटीत शेंगादाण्याचा कुट न
आमटीत शेंगादाण्याचा कुट न घातल्याने सोलापुर कडच्या स्मिता ने सुद्धा खेद व्यक्त केला आहे <<<
हे आपली आवडला पत्रे पाठवणार्यांच्या नावाच्या जंत्रीसारखं वाटलं.
फोडणीची आमटी ?? आमटी म्हणजेच
फोडणीची आमटी ?? आमटी म्हणजेच फोडणी घातलेलं वरण / दाळ ना ?? आमच्याकडे नाय बा असे म्हणत !!
धागा येउन इतके दिवस झालेत …
धागा येउन इतके दिवस झालेत … अजून शंभरी पण नाय गाठली. १ - ४ वेळेत उघडला होता का हो?
१ - ४ वेळेत उघडला होता का
१ - ४ वेळेत उघडला होता का हो?>>>>>:हाहा:
पुणेरी दाल तडका
पुणेरी दाल तडका ..................................अर्थात फोडणीची आमटी
स_सा | 26 August, 2015 - 14:13
(No subject)
१ ते ४ राहुकाळ होता काय
१ ते ४ राहुकाळ होता काय ??
अ_वै मी पोस्ट केली तेव्हा १ वाजायचा होता
स_सा | 26 August, 2015 - 12:43
अहो राहु काळ नव्हे, पुणेकर
अहो राहु काळ नव्हे, पुणेकर त्या दरम्यान वामकुक्षी घेतात. ( मी एकटी भटकायची त्यावेळी चितळे सोडुन बाकी उघडे असायचे.:फिदी:)
मी एकटी भटकायची त्यावेळी
मी एकटी भटकायची त्यावेळी चितळे सोडुन बाकी -->> उघडे असायचे <<< बापरे
स_सा | 26 August, 2015 -
स_सा | 26 August, 2015 - 14:13
माझ्याकडे पण हेच दिसतंय
त्यांनी संपादन केले त्याची
त्यांनी संपादन केले त्याची वेळ आपल्याला दिसतेय का ?
टाईमझोन प्रकरण दिसतंय!
टाईमझोन प्रकरण दिसतंय!
मला मुळात पुणेरी दाल तडका
मला मुळात पुणेरी दाल तडका ह्या हेडिंगवर मज्जा वाटली … पुणेरी आमटी वगैरे ठीके … पण तडका :D! पुण्यात तडका वगरे नक्कोच … मानवणार नाही तो …
छान चिंच गुळ घालून केलेलं आंबटगोड वरण किंवा … आमटी कित्ती यम्मी …
आमटी कित्ती यम्मी …>>>भाता
आमटी कित्ती यम्मी …>>>भाता बरोबर खाल्ली की भरपेट भरते टम्मी.:खोखो::दिवा:
(No subject)
पुणेरी दाल तडका
पुणेरी दाल तडका ..................................अर्थात फोडणीची आमटी
स_सा | 26 August, 2015 - 09:43
माझ्याकडे हे दिसतंय ! आमटी नेमकी किती वाजता करायची ? सातच्या आत का ?
इंडियन टाईम झोन पकडावा
इंडियन टाईम झोन पकडावा बहुतेक!
आमटी कित्ती यम्मी …>>>भाता
आमटी कित्ती यम्मी …>>>भाता बरोबर खाल्ली की भरपेट भरते टम्मी
>>
पोळी भाजी नाही लागली करावी ... म्हणून खुश झाली मैग्गी मम्मी
आमटीला जुन्या पुण्यात (पेठ
आमटीला जुन्या पुण्यात (पेठ संस्कृती) "आमटी"च म्हणतात, तडका वगैरे म्हणत नाहीत.
) किंवा बनवणारी व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत. अत्यंत कमी पदार्थ व तेही अगदी मोजक्याच प्रमाणात वापरून हे पारंपारीक स्वर्गीय रसायन बनते.
पुण्यातल्या गोडसर चवीच्या आमटीची चव सुरेख असते. चिंच, गूळ, घरी बनवलेला पारंपारीक पद्धतीचा गोडा मसाला, कोथिंबीर, कढिपत्ता, ओले खोबरे, हिंगाची चिमूट ह्याच्या परफेक्ट प्रमाणाने बनलेल्या "पातळसर"आमटीची चव जरा जास्त उकळल्याने वाढते.
वय आणि संसारिक आयुष्य वाढत जाईल तसे गृहीणीच्या हातची आमटीची चव वाढत जाते. फक्त चारच कोथिंबिरीच्या काड्या,चारच कढिपत्त्याची पाने व चारच मेथीदाणे घालूनही चविष्ट आमटी बनते.
पुण्यात कोथिंबिरीबरोबर कढिपत्ता फुकट मिळत नाही, विकत आणावा लागतो. आणि खूप व फुकट मिळालाच तरी दिसेल त्या पदार्थात तो घालत न सुटता त्याची चटणी वगैरे केली जाते जेणेकरून तो व्यवस्थित वापरला जातो
ही आमटी पातळच असते, (डाळ महाग असो वा स्वस्त, विकत असो वा फुकट
पुणेकर सोडून इतर कोणास ही आमटी भिक्कार वाटली, तरी पुणेकरांची त्यास हरकत नसते
मेधा
मेधा
हुश्श्य!!! खरोखरच वरण्/आमटी
हुश्श्य!!! खरोखरच वरण्/आमटी आहे होय.. नैतर ,'तडका" वाचून धसकाच बसला आधी!!भलभलत्या ,थरकाप उडवणार्या कविता हैत कि काय वाटलं..
आमटी च्या निमित्ताने फोडणीचे प्रतिसाद लै भार्री!!!
+१०० मेधाव्ही!! बाकी
+१०० मेधाव्ही!!
बाकी कढीपत्त्याची चटणी ही का -
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103533.html?1134443826
अत्यंत कमी पदार्थ व तेही अगदी
अत्यंत कमी पदार्थ व तेही अगदी मोजक्याच प्रमाणात वापरून हे पारंपारीक स्वर्गीय रसायन बनते.<< १००%
पुण्यात कोथिंबिरीबरोबर कढिपत्ता फुकट मिळत नाही,<< मिळतो की आमच्या घराजवळ वाटा लाउन कोथिंबीर विकणार्या कडुन घेतल्यावर आजुनही कढीपत्त्याच्या ४-५ काड्या फुकट मिळतात. फुले मंडईत मात्र नाही देत.
आमटीमध्ये मसाला मुरावा तसा
आमटीमध्ये मसाला मुरावा तसा धागा कुर्मगतीने शम्भरीकडे सरकत आहे. अजून डाळशेपू इतके वलय या धाग्याला प्राप्त न झाल्याने एक अस्सल पुणेकर म्हणून मी नाराजी व्यक्त करत आहे. आशा आहे की दुपारी १ त ४ ही वेळ सोडुन धागा आपले शतक साजरे करेल.:फिदी::दिवा:
आम्ही आंबट वरण म्हणतो
आम्ही आंबट वरण म्हणतो ह्याला.
मी पण कांदा नाही घालत.
आमची हीच कृती आमची पुणेरी
आमची हीच कृती
आमची पुणेरी आजी सोडून आम्ही सगळे देशावरचे ह्याला फोडणीचे वरण म्हणतो. 
आमटीमध्ये मसाला मुरावा तसा
आमटीमध्ये मसाला मुरावा तसा धागा कुर्मगतीने शम्भरीकडे सरकत आहे. अजून डाळशेपू इतके वलय या धाग्याला प्राप्त न झाल्याने एक अस्सल पुणेकर म्हणून मी नाराजी व्यक्त करत.
>>
निषेध निषेध … असे राहिले
Pages