ब्राऊन राईस, ओट्स डोसा

Submitted by मीपुणेकर on 25 August, 2015 - 16:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अ:
४ वाटी ब्राऊन राईस (फुगीर ब्राऊन राईस, बासमती किंवा लाँग ग्रेन शक्यतो नको)
२ वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी हरभरा डाळ
थोडे (अंदाजे १ टी स्पून) मेथी दाणे

बः
३ वाटी ईंस्टंट ओट्स
अर्धी वाटी पोहे

क्रमवार पाककृती: 

१> नेहेमीच्या डोश्यासाठी भिजवतो त्या प्रमाणे ब्राऊन राईस व डाळी +मेथ्या वेगवेगळे भिजत घालणे.
ब्राऊन राईस नीट वाटला जाण्यासाठी चांगला भिजायला अंदाजे १०/१२ तास लागतील.

२>डोश्याचे डाळ, तांदूळ वाटण्याच्या आधी साधारण १५/२० मिनीटे ईंस्टंट ओटस + पोहे भिजत घालणे.

३>ग्राईंडर मध्ये भिजवलेल्या डाळी + मेथ्या मग भिजवलेला ब्राऊन राईस आणि मग शेवटी ओटस + पोहे असं थोड थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.

४>आता वरील वाटलेलं एकत्र नीट मिसळून ते डोश्याचे पीठ उबेच्या जागी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवावे.

५>पीठ फर्मेंट झालं की लगेचच फ्रीज मध्ये ठेवावे. जास्त वेळ बाहेर राहिल्यास जास्त आंबुस होईल.
नंतर लागेल तसं आणि तेवढ पीठ बाहेर काढून त्यात मीठ घालून मग त्याचे डोसे करावेत.

६>तवा चांगला तापला कि डावभर पीठ डोसा डावानेच तव्यावर पातळ पसरून आवडीप्रमाणे वरुन किंचीत तेल घालणे.

७> डोश्याला सोनेरी रंग आला की तव्यावरुन काढून प्लेट मधे बटाट्याचा मसाला , चटणी, सांबार बरोबर सर्व्ह करावा.

वाढणी/प्रमाण: 
५. ६ जणांना पोटभर
अधिक टिपा: 

१>ब्राऊन राईस फुगीर मिळतो तो घेतला कि डोसा जास्त चविष्ट वाटला लाँग ग्रेन किंवा बासमती वापरुन केलेल्या पेक्षा .
२>याच पीठाचे उत्तापे देखील छान लागतात Happy
३>हे डोश्याचे पीठ ईथे अमेरिकेत फ्रिज मध्ये ४,५ दिवस छान रहाते.
५>१० मि. हा वेळ डोश्याचे पीठ तयार केल्यावर डोसा करण्यासाठीचा आहे. यात डाळ, तांदुळ भिजण्यासाठी ,वाटण्यासाठी लागणारा वेळ धरला नाही.

या प्रकारे केलेला डोसा :

याच पीठाचा केलेला उत्तापा

माहितीचा स्रोत: 
नेहेमीच्या डोश्यात साध्या तांदुळाऐवजी ब्राऊन राईस + ओटस असा केलेला बदल, ट्रायल अँड एरर ने आवडलेले प्रमाण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका, बिल्वा धन्यवाद Happy

वेका, मी सालवाली उडीद डाळ वापरून डोसे नाही केलेत आधी. ट्राय कर आणि ईथे सांग कसे होतात ते, मी पण करेन मग Happy
रच्याकने, सालवाली मुगाची डाळ वापरून मुखी करते, त्याच्या चवीत फरक नाही जाणवला..

हे बघ ब्राऊन राइस आणि सालवाली उडिद डाळ वापरून केलेला दोसा. करणार्^याने तरी चांगला होतो म्हणून सांगितलं पण आमचे दोसे तुझ्यासारखे क्रिस्पी कधीच नसतात. तिने खूप तेल घातलं असेल अशी कमेंट मिळाली आहे Happy असो. हरभरा डाळ मी चमचाभर घातली असेल कारण माझ्याकडे नव्हती बाकी अलमोस्ट वरची रेस्पि आहे.

HealthyDosa1.gif

मंजूताई, आरती, अश्विनी, सशल धन्यवाद Happy

वेका,
बरेच दिवसांनी ईथे बघितलं त्यामुळे रीप्लाय द्यायला उशीर झाला.
अरे वा, करुन बघितलास पण, चांगला दिसत आहे डोसा Happy
डोसा तव्यावर जितका जास्त पातळ पसरला जाईल तितका जास्त क्रिस्पी होत असावा.
डोसा करताना मी नॉन्स्टिक तव्यावर करते त्यामुळे तेल अगदीच ना के बराबर घालून सुध्दा चालतं.
डोश्याचे पीठ खूप जास्त पातळ न करता तव्यावर डावाने पसरवताना अगदी थीन लेअर येइल अस पसरवून बघ अजून जास्त क्रिस्पी होतील तेल कमी घालून सुध्दा Happy

Pages