अ:
४ वाटी ब्राऊन राईस (फुगीर ब्राऊन राईस, बासमती किंवा लाँग ग्रेन शक्यतो नको)
२ वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी हरभरा डाळ
थोडे (अंदाजे १ टी स्पून) मेथी दाणे
बः
३ वाटी ईंस्टंट ओट्स
अर्धी वाटी पोहे
१> नेहेमीच्या डोश्यासाठी भिजवतो त्या प्रमाणे ब्राऊन राईस व डाळी +मेथ्या वेगवेगळे भिजत घालणे.
ब्राऊन राईस नीट वाटला जाण्यासाठी चांगला भिजायला अंदाजे १०/१२ तास लागतील.
२>डोश्याचे डाळ, तांदूळ वाटण्याच्या आधी साधारण १५/२० मिनीटे ईंस्टंट ओटस + पोहे भिजत घालणे.
३>ग्राईंडर मध्ये भिजवलेल्या डाळी + मेथ्या मग भिजवलेला ब्राऊन राईस आणि मग शेवटी ओटस + पोहे असं थोड थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
४>आता वरील वाटलेलं एकत्र नीट मिसळून ते डोश्याचे पीठ उबेच्या जागी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवावे.
५>पीठ फर्मेंट झालं की लगेचच फ्रीज मध्ये ठेवावे. जास्त वेळ बाहेर राहिल्यास जास्त आंबुस होईल.
नंतर लागेल तसं आणि तेवढ पीठ बाहेर काढून त्यात मीठ घालून मग त्याचे डोसे करावेत.
६>तवा चांगला तापला कि डावभर पीठ डोसा डावानेच तव्यावर पातळ पसरून आवडीप्रमाणे वरुन किंचीत तेल घालणे.
७> डोश्याला सोनेरी रंग आला की तव्यावरुन काढून प्लेट मधे बटाट्याचा मसाला , चटणी, सांबार बरोबर सर्व्ह करावा.
१>ब्राऊन राईस फुगीर मिळतो तो घेतला कि डोसा जास्त चविष्ट वाटला लाँग ग्रेन किंवा बासमती वापरुन केलेल्या पेक्षा .
२>याच पीठाचे उत्तापे देखील छान लागतात
३>हे डोश्याचे पीठ ईथे अमेरिकेत फ्रिज मध्ये ४,५ दिवस छान रहाते.
५>१० मि. हा वेळ डोश्याचे पीठ तयार केल्यावर डोसा करण्यासाठीचा आहे. यात डाळ, तांदुळ भिजण्यासाठी ,वाटण्यासाठी लागणारा वेळ धरला नाही.
या प्रकारे केलेला डोसा :
वा,वा! जबरी आहेत फोटो.
वा,वा! जबरी आहेत फोटो.
वेका, बिल्वा धन्यवाद वेका,
वेका, बिल्वा धन्यवाद
वेका, मी सालवाली उडीद डाळ वापरून डोसे नाही केलेत आधी. ट्राय कर आणि ईथे सांग कसे होतात ते, मी पण करेन मग
रच्याकने, सालवाली मुगाची डाळ वापरून मुखी करते, त्याच्या चवीत फरक नाही जाणवला..
कातिल फोटो ! हेल्दी पाक्रु...
कातिल फोटो ! हेल्दी पाक्रु...
मी पु , डोश्याचा फोटो मस्तच.
मी पु , डोश्याचा फोटो मस्तच.
हे बघ ब्राऊन राइस आणि सालवाली
हे बघ ब्राऊन राइस आणि सालवाली उडिद डाळ वापरून केलेला दोसा. करणार्^याने तरी चांगला होतो म्हणून सांगितलं पण आमचे दोसे तुझ्यासारखे क्रिस्पी कधीच नसतात. तिने खूप तेल घातलं असेल अशी कमेंट मिळाली आहे असो. हरभरा डाळ मी चमचाभर घातली असेल कारण माझ्याकडे नव्हती बाकी अलमोस्ट वरची रेस्पि आहे.
कसला दिसतोय दोसा! अगदी
कसला दिसतोय दोसा! अगदी तोंपासु!
मीपु, रेसिपी आणि फोटो मस्त ..
मीपु, रेसिपी आणि फोटो मस्त ..
मंजूताई, आरती, अश्विनी, सशल
मंजूताई, आरती, अश्विनी, सशल धन्यवाद
वेका,
बरेच दिवसांनी ईथे बघितलं त्यामुळे रीप्लाय द्यायला उशीर झाला.
अरे वा, करुन बघितलास पण, चांगला दिसत आहे डोसा
डोसा तव्यावर जितका जास्त पातळ पसरला जाईल तितका जास्त क्रिस्पी होत असावा.
डोसा करताना मी नॉन्स्टिक तव्यावर करते त्यामुळे तेल अगदीच ना के बराबर घालून सुध्दा चालतं.
डोश्याचे पीठ खूप जास्त पातळ न करता तव्यावर डावाने पसरवताना अगदी थीन लेअर येइल अस पसरवून बघ अजून जास्त क्रिस्पी होतील तेल कमी घालून सुध्दा
Pages