डाळ टमाटे ( हिरवे भेद्रं अन डाळ )

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ - गावरानी असनं त जास्त चांगल नै त का..अडला हरी ..
मुंगसोल - पाववाटी

तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
हिरवी मिरची - ३ ४
तिखट - १ चमचा
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

मुंगसोल पाण्यात १०मिंट भिजु घाला..
तवर टमाटे चिरुन घ्या.. कांदा, ८ १० लसनाच्या पाकळ्या अन उल्लीसकं अद्रक किसनीवर किसुन घ्या..
नेहमी देतो तशी भाजीची तेलात फोडणी द्या..
पयले डाळ मंग टमाट्याच्या फोडी टा़का..
नैच राहवलं तुमाले त उल्लीशी साखरं टाका अन शिजु द्या..
पाणी टाकाची गरज नाई.. टमाट्यात शिजते डाळ .. वरुन सांभार टाका अन ताटात वाढा ..

तसा हा फटू टाकाची गरज नवती पन काढलाच म्हणुन देला चिटकवून..

वाढणी/प्रमाण: 
दोघाले बी पुरते अन चौघाले बी..
अधिक टिपा: 

फटूतल्या भाजीचा रंग काश्मिरी तिखटाचे दुष्परिणाम होय..

लाल टमाट्याची सुद्धा अशि भाजी बनवता येते..छान लागते Happy

डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुधी भोपळ्याची अशीच भाजी करतात आमच्यात Happy

मृणाल आणि साती, वेगळा धागा काढून लिहा तुमच्या रेस्प्या. करायचा मुहूर्त लागला की नेमकीच कृती सापडत नाही.

मलापण डाळ व भाजी एकत्र करुन भाजी करायला आवडते, खायलाही आवडते आणि २ वेगळे पदार्थ करायला नको. (आम्ही विदर्भातले वगैरे नाही).
छान आहे कृती.
टिना, मंजुडीला अनुमोदन. लिहायचे तर सर्व पदार्थ नीट साहित्यात लिहीलेले बरे. मीठ तर काय घालतोच म्हणुन लिहायचेच नाही असे न केलेल बरे, नवखे कोणी असले, नसले तरी.

प्राप्ती , राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ Wink

जाई,
तु पन ना..
टप्पर टुप्पर गदी का माल आहे..
सोनी सायबरशॉट १२.१ मेगापिक्सेल..
माझी फटूग्राफी लय बोर आहे जे मला चांगलच ठाऊक आहे गं Lol
पिकासा जिंदाबाद..

मृणाल आणि साती, वेगळा धागा काढून लिहा तुमच्या रेस्प्या. >> +१

मस्त

छान हो छान.
टीना बाईंचा (वैदर्भीय) पाककृती शो किंवा मोहोत्सव असाच दणक्यात चालू राहो.

हिकडं पुन्यात ढेमसं पन नाय करत कुनी बी >>
आता इथे परत प्रांतवाद नको. पुण्यात ढेमसं मिळतात आणि भाजीही करतात.

काल मी ही भाजी केली होती. मस्त झाली होती.
(मी त्यात कांदा-आलं-लसणाऐवजी खोबरं आणि जरासा गूळ घातला. नाहीतर घरच्या मेंब्रांनी खाल्ली नसती भाजी Wink )

ही पुणेरी ढेमस गुळचट चवीची असतात … अन त्यात परत काळ्या बिया … कससच होत!
एकदा भरले ढेमस करायचा प्रयत्न केला असल्याचा अनुभव Happy

बाकी माका ही कच्या टमाट्याची भाजी नायी आवडत लहानपणी जबरदस्ती खावी लागायची Lol .

अरे परवर वेगळे आणी ढेमसे वेगळे. ढेमश्याला हिन्दीत टिन्डे म्हणतात. शोधा नेटवर. गोल, कडक, पिस्ता कलरवाले. परवर बन्गाली कृतीत वापरतात, ती भाजी वेगळी. एकदा मोठी तोन्डली समजुन मी परवर आणणार होते.

परवर तोंड्ल्याचा चुलत भाऊ. गुजराथमध्ये पण परवर फेमस आहे. त्यात पोषणमुल्ये चांगली असतात. आम्ही करतो त्याची भाजी, कधीतरी.

वरदा,
नाही ते वेग वेगळेच. ते दोन कॉमेंट एकत्र टाकल्याने झालाय अस वाटतंय Happy

वावे,
ढेमसे आणि परवर वेगळे, खास देशी भाज्या आहेत ह्या.

ढेमसे - टींडे :- https://en.wikipedia.org/wiki/Tinda (Apple gourd or Indian baby pumpkin)
परवर - Striped Pear Gourd

Pages