डाळ टमाटे ( हिरवे भेद्रं अन डाळ )

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ - गावरानी असनं त जास्त चांगल नै त का..अडला हरी ..
मुंगसोल - पाववाटी

तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
हिरवी मिरची - ३ ४
तिखट - १ चमचा
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

मुंगसोल पाण्यात १०मिंट भिजु घाला..
तवर टमाटे चिरुन घ्या.. कांदा, ८ १० लसनाच्या पाकळ्या अन उल्लीसकं अद्रक किसनीवर किसुन घ्या..
नेहमी देतो तशी भाजीची तेलात फोडणी द्या..
पयले डाळ मंग टमाट्याच्या फोडी टा़का..
नैच राहवलं तुमाले त उल्लीशी साखरं टाका अन शिजु द्या..
पाणी टाकाची गरज नाई.. टमाट्यात शिजते डाळ .. वरुन सांभार टाका अन ताटात वाढा ..

तसा हा फटू टाकाची गरज नवती पन काढलाच म्हणुन देला चिटकवून..

वाढणी/प्रमाण: 
दोघाले बी पुरते अन चौघाले बी..
अधिक टिपा: 

फटूतल्या भाजीचा रंग काश्मिरी तिखटाचे दुष्परिणाम होय..

लाल टमाट्याची सुद्धा अशि भाजी बनवता येते..छान लागते Happy

डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीठ मसाला कै नै का? अळणीच खायची का भाजी? Wink

आज फयल्यांदाच टीनाच्या पाकृच्या फटूत जादाचं तेल दिसत न्हाई Biggrin

आम्ही मूगडाळ घालून लाल टॉमेटोची भाजी करतो बऱ्याचदा. लेकीची आवडती भाजी आहे. हिरव्या टोमॅटोची करून बघण्यात येईल.

मंजू,
ती 'नेहमीचं फोडणीचं सामान' या अंतर्गत मीठ इन्क्ल्यूड करत असेल.
Wink
तिला विचारलं तर म्हणेल 'आता मीठ टाकाचं पण सांगाले लागल तं माये तू सयपाकाचे नादाले लागू नाही'
Wink

दोघींनापण ' दिवे!'

टीना, पाकृ मस्तं आणि वेगळी आहे.

आता मीठ टाकाचं पण सांगाले लागल तं माये तू सयपाकाचे नादाले लागू नाही>> Lol हे बाकी खरं!

'तसा मीठ टाका हे सांगाले गरज नाही पन माये मी टाकलं म्हणून तं देला लिहून' असं लिहायला हरकत नाही.

टीना, वरच्या वाक्यात भाषा आहे का बरोबर?

किती दिवसानंतर "भेन्द्रे" शब्द ऐकला. अनेकांना अगदी विदर्भात सुद्धा अनेकांना हा शब्द/हे नाव माहिती नसेल हिरव्या टोमॅटोसाठी.

माझी आई पण अशीच भाजी करते भेन्द्र्याची. फार चवदार लागते.

हिरवा टोमाटो + हरभरा डाळ हे आमच्या घरच कॉम्बीनेशन हिरवी मिरची घालून
उद्या सकाळी भाजी करायची तर ह डाळ मात्र रात्री भिजत घालतो
लसूण आणि साखर हवीच
हिरवे टोमाटो परतून , त्यात पंढरपुरी डाळ बारीक करून जी चटणी करतात ती पण खूप आवडते

हिरवे टोमाटो परतून , त्यात पंढरपुरी डाळ बारीक करून जी चटणी करतात >>> मृणाल१, कृपया या चटणीची कृती लिहाल का?

हिरवे टोमाटो परतून , त्यात पंढरपुरी डाळ बारीक करून जी चटणी करतात >>आमच्याकडे तीळ घालुन करतात

पंढरपुरी डाळ म्हणजे चिवड्यातल्या डाळी ना? त्याची चटणी अगदी फिकी फिकी लागते. इथे तमिळ लोक भातात मिसळून खातात ही चटणी.

हिरवे टोमाटो परतून , त्यात पंढरपुरी डाळ बारीक करून जी चटणी करतात ><< आमच्याकडे डाळं किंवा तीळ किंवा शेंगदाणे घालून करतात ही चटणी. सॅंडविचसाठी एकदम परफेक्ट चटणी होते. Happy

थोडे तीळ कढईत भाजून बाजूला घे. त्याच कढईत चमचाभर तेल घालून लसून टाकायचा, मग हिरवीमिरची , मग कडक हिरवे टोमाटो पातळ चिरून टाकायचे. तेल अगदी कमी कि भाजल्याचा फील आला पाहिजे.थोडे काळपट होऊ दे टोमाटो . मग मिक्सर मध्ये आधी तीळ बारीक करून ,नंतर त्यात डाळ बारीक करून मग त्यातच कढई मधले सगळे बारीक करून . चवीप्रमाणे मीठ , साखर . हवी तर वरून हिंग मोहरीची फोडणी

मंजूडी, नॉर्थ कर्नाटकाची आमची कृती अशी-

अर्धा किलो हिरवे टोमॅटो धुवून पुसून त्यातल्या बियांचा भाग काढून टाकून फोडी फक्तं घ्या.
एका कढईत तेल टाकून त्यात पहिले पाव किलो (किंवा यथाशक्ती Wink )मिरच्या परतून काढून घ्या, मग हे टोमॅटिचे तुकडे परतून काढून घ्या.
खलबत्त्यात पहिल्यांदा थोडं जिरं, मूठभर कोथिंबीर, लसूण टाकून भरड करा. मग मिरच्या टाकून ठेचा.
त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून ठेचा.
ह्या मिश्रणात दोन मुठी दाण्यांचं कूट आणि एक मूठ कारळाचं कूट घाला आणि मिक्स करा.
आणि हो-- मीठ घाला.

चुकूनही मिक्सरात करायचा विचार करू नका.
फ्लोईंग चटणी होईल.
हिची कन्सिस्टन्सी ठेचून केलेल्या वांग्याच्या भरतापेक्षाही थोडी कोरडी हवी.

साती, आमच्याकडे पण अशीच करतात ही चटणी. मला खूप आवडते. हिरव्या टॉमॅटोची भाजी सहसा करत नाही आई, चटणीच खूप आवडते घरी. तिच केली जाते.

या पद्धतीने करून बघेन भाजी जर हिरवे टॉमॅटो मिळालेच तर.

टीना, मस्त.

हिरव्या टोमाटोची नाही केली कधी पण लाल टोमाटोची करते दोन्ही डाळींची मुग आणि चणाडाळ.

साती, छान चटणी. मी जरा वेगळ्या प्रकारे करते.

तिला विचारलं तर म्हणेल 'आता मीठ टाकाचं पण सांगाले लागल तं माये तू सयपाकाचे नादाले लागू नाही'. सही साती. Lol

हैला!! हिरव्या टोमॅटोच्या चटणीने डाळटोमॅटो हायजॅक केला.. Wink

मृणाल१ आणि साती, दोघींनाही धन्यवाद. दोन्ही चटण्या करून खाऊन बघणार नक्की.

का असे करता तुम्ही लोक्स हं..
मी म्हटल मला दिसल नाहि म्हणुन तस लिहिलयं याचा अर्थ आंधळ प्रेम कसं ते एकवारी समजावून सांगा...
उगा अर्थाचा अनर्थ काढताय अरेरे

परत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..
नै खोबरं..त्यातहि ओल मी कधीच टाकत नै..

परत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात>>

टीना, असं नाही. मायबोलीवरच्या पाककृती बर्‍याच जणांसाठी हक्काचा आधार असतात. अगदीच स्वयंपाक करण्यात नवखं कोणी असेल त्याने इथे लिहिल्याबर हुकूम पाकृ केली तर त्याला काय चव लागेल? इथल्या किंवा कुठल्याही, रुचिरा, पार्टीपार्टीसारख्या पुस्तकातल्या पाकृ काय किंवा संजीव कपूर, तरला दलालसारखे मुरलेले स्वयंपाक तज्ज्ञ काय, प्रत्येक जण पाकृ लिहिताना 'नमक स्वादानुसार' असं लिहितंच. त्यामुळे आपल्या पाकृची चव वाचणार्‍याच्या/ करणार्‍याच्या पाकृत उतरायला हवी असेल तर कृतीनुसार पाकृचं लिखाणही हवं.

मंजू +१
टिना, तू लिहितेस मस्त. पण सगळे सांगतायत त्याप्रमाणे घ्यायचे साहित्य वगैरेमधे एक ठराविक ढाचा राहूदेत. कृती लिहितेस तेव्हा तुझ्या ढिंगच्याक्क स्टाइलने लिही.

पाकृ इंटरेस्टिंग. मला मूग डाळ घातलेल्या भाज्या फारश्या आवडल्या नाहीयेत आजवर. पण अश्याप्रकारे करून बघेन. मी डाळ घातलेल्या करते भाज्या तेव्हा असंच डाळ भिजवून परतून करते पण ती जनरली हरभरा डाळ किंवा वालाची डाळ असते (दुधीमधे घालायला).
कमी तिखट घातलं तरी चांगली लागेल ना?

डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये. Rofl

Pages