हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ - गावरानी असनं त जास्त चांगल नै त का..अडला हरी ..
मुंगसोल - पाववाटी
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
हिरवी मिरची - ३ ४
तिखट - १ चमचा
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार
मुंगसोल पाण्यात १०मिंट भिजु घाला..
तवर टमाटे चिरुन घ्या.. कांदा, ८ १० लसनाच्या पाकळ्या अन उल्लीसकं अद्रक किसनीवर किसुन घ्या..
नेहमी देतो तशी भाजीची तेलात फोडणी द्या..
पयले डाळ मंग टमाट्याच्या फोडी टा़का..
नैच राहवलं तुमाले त उल्लीशी साखरं टाका अन शिजु द्या..
पाणी टाकाची गरज नाई.. टमाट्यात शिजते डाळ .. वरुन सांभार टाका अन ताटात वाढा ..
तसा हा फटू टाकाची गरज नवती पन काढलाच म्हणुन देला चिटकवून..
फटूतल्या भाजीचा रंग काश्मिरी तिखटाचे दुष्परिणाम होय..
लाल टमाट्याची सुद्धा अशि भाजी बनवता येते..छान लागते
डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये..
* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी
दुधी भोपळ्याची अशीच भाजी
दुधी भोपळ्याची अशीच भाजी करतात आमच्यात
मृणाल आणि साती, वेगळा धागा काढून लिहा तुमच्या रेस्प्या. करायचा मुहूर्त लागला की नेमकीच कृती सापडत नाही.
मलापण डाळ व भाजी एकत्र करुन
मलापण डाळ व भाजी एकत्र करुन भाजी करायला आवडते, खायलाही आवडते आणि २ वेगळे पदार्थ करायला नको. (आम्ही विदर्भातले वगैरे नाही).
छान आहे कृती.
टिना, मंजुडीला अनुमोदन. लिहायचे तर सर्व पदार्थ नीट साहित्यात लिहीलेले बरे. मीठ तर काय घालतोच म्हणुन लिहायचेच नाही असे न केलेल बरे, नवखे कोणी असले, नसले तरी.
छान वाटतेय भाजी . टीना तुझे
छान वाटतेय भाजी . टीना तुझे फोटो कोणत्या कॅमेराने काढ़तेस ? आणि कोणते app वापरतेस
प्राप्ती , राणी लक्ष्मीबाई
प्राप्ती , राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ
जाई,
तु पन ना..
टप्पर टुप्पर गदी का माल आहे..
सोनी सायबरशॉट १२.१ मेगापिक्सेल..
माझी फटूग्राफी लय बोर आहे जे मला चांगलच ठाऊक आहे गं
पिकासा जिंदाबाद..
मृणाल आणि साती, वेगळा धागा काढून लिहा तुमच्या रेस्प्या. >> +१
मस्त
मस्त
टीना, मस्त रेसिपी.
टीना, मस्त रेसिपी.
मस्त
मस्त
मुंगसोल काय आहे?
मुंगसोल काय आहे?
मुगाची डाळ..बिना सालीची..
मुगाची डाळ..बिना सालीची..
लय मस्त लिवलं आन लय मस्त भाजी
लय मस्त लिवलं आन लय मस्त भाजी !!
हिकडं पुन्यात ढेमसं पन नाय करत कुनी बी
ओके थँक्स हे टॉमेटो मिळाले की
ओके थँक्स हे टॉमेटो मिळाले की करून पाहते
छान हो छान. टीना बाईंचा
छान हो छान.
टीना बाईंचा (वैदर्भीय) पाककृती शो किंवा मोहोत्सव असाच दणक्यात चालू राहो.
हिकडं पुन्यात ढेमसं पन नाय
हिकडं पुन्यात ढेमसं पन नाय करत कुनी बी >>
आता इथे परत प्रांतवाद नको. पुण्यात ढेमसं मिळतात आणि भाजीही करतात.
पुण्यात ढेमसं मिळतात आणि
पुण्यात ढेमसं मिळतात आणि भाजीही करतात.>>> + १११
काल मी ही भाजी केली होती.
काल मी ही भाजी केली होती. मस्त झाली होती.
(मी त्यात कांदा-आलं-लसणाऐवजी खोबरं आणि जरासा गूळ घातला. नाहीतर घरच्या मेंब्रांनी खाल्ली नसती भाजी )
पुण्यात ढेमसं मिळतात आणि
पुण्यात ढेमसं मिळतात आणि भाजीही करतात.>>> + १११
पण मला नाही आवडत ढेमसं
मला पण आवडत नाही एवढी, पण घरी
मला पण आवडत नाही एवढी, पण घरी विदर्भातले मेंबर आहेत न
इकडे पण नको गं
इकडे पण नको गं
बरोबर आहे तुझे, नकोच ईकडे पण
बरोबर आहे तुझे, नकोच ईकडे पण
शब्दाली काडी टाकतेय्स का
शब्दाली काडी टाकतेय्स का इथंपन
आता इथे आले की काय सगळे????
आता इथे आले की काय सगळे????
(No subject)
टीना, मी तिकडे कायपण लिहीले
टीना, मी तिकडे कायपण लिहीले नाहीये हं
ही पुणेरी ढेमस गुळचट चवीची
ही पुणेरी ढेमस गुळचट चवीची असतात … अन त्यात परत काळ्या बिया … कससच होत!
एकदा भरले ढेमस करायचा प्रयत्न केला असल्याचा अनुभव
बाकी माका ही कच्या टमाट्याची भाजी नायी आवडत लहानपणी जबरदस्ती खावी लागायची .
ढेमसं आणि कच्चे टोमॅटो एकच?
ढेमसं आणि कच्चे टोमॅटो एकच?
ढेमसं म्हणजे परवर ना?
ढेमसं म्हणजे परवर ना?
अरे परवर वेगळे आणी ढेमसे
अरे परवर वेगळे आणी ढेमसे वेगळे. ढेमश्याला हिन्दीत टिन्डे म्हणतात. शोधा नेटवर. गोल, कडक, पिस्ता कलरवाले. परवर बन्गाली कृतीत वापरतात, ती भाजी वेगळी. एकदा मोठी तोन्डली समजुन मी परवर आणणार होते.
परवर आणि पडवळ एकच का ?
परवर आणि पडवळ एकच का ?
परवर तोंड्ल्याचा चुलत भाऊ.
परवर तोंड्ल्याचा चुलत भाऊ. गुजराथमध्ये पण परवर फेमस आहे. त्यात पोषणमुल्ये चांगली असतात. आम्ही करतो त्याची भाजी, कधीतरी.
वरदा, नाही ते वेग वेगळेच. ते
वरदा,
नाही ते वेग वेगळेच. ते दोन कॉमेंट एकत्र टाकल्याने झालाय अस वाटतंय
वावे,
ढेमसे आणि परवर वेगळे, खास देशी भाज्या आहेत ह्या.
ढेमसे - टींडे :- https://en.wikipedia.org/wiki/Tinda (Apple gourd or Indian baby pumpkin)
परवर - Striped Pear Gourd
Pages