डाळ टमाटे ( हिरवे भेद्रं अन डाळ )

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ - गावरानी असनं त जास्त चांगल नै त का..अडला हरी ..
मुंगसोल - पाववाटी

तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
हिरवी मिरची - ३ ४
तिखट - १ चमचा
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

मुंगसोल पाण्यात १०मिंट भिजु घाला..
तवर टमाटे चिरुन घ्या.. कांदा, ८ १० लसनाच्या पाकळ्या अन उल्लीसकं अद्रक किसनीवर किसुन घ्या..
नेहमी देतो तशी भाजीची तेलात फोडणी द्या..
पयले डाळ मंग टमाट्याच्या फोडी टा़का..
नैच राहवलं तुमाले त उल्लीशी साखरं टाका अन शिजु द्या..
पाणी टाकाची गरज नाई.. टमाट्यात शिजते डाळ .. वरुन सांभार टाका अन ताटात वाढा ..

तसा हा फटू टाकाची गरज नवती पन काढलाच म्हणुन देला चिटकवून..

वाढणी/प्रमाण: 
दोघाले बी पुरते अन चौघाले बी..
अधिक टिपा: 

फटूतल्या भाजीचा रंग काश्मिरी तिखटाचे दुष्परिणाम होय..

लाल टमाट्याची सुद्धा अशि भाजी बनवता येते..छान लागते Happy

डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऊप्स
http://www.maayboli.com/node/25245
या कृतीने मी परवरांची भाजी केली आणि ती चांगली झाली होती. खरी ढेमशी मी अजून पाहिलीच नाहियेत किंवा कच्चे टोमँटो समजून घेतली नसतील Happy

कच्चे टोमॅटोची भाजी गुळ न घालता? आबन्टढोण होत असणार..,किन्वा तुमच्या विदर्भातले टोमॅटो आन्बट नसतिल.( काडि अशी टाकावि smiley2.gif)

Pages