आलू के पराठे

Submitted by स्नू on 10 August, 2015 - 03:56
aaloo parathe
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारण :
1. ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
२. १ बारीक चिरलेला कांदा
३. २ चमचे लाल मिरची पाऊडर किंवा ३-४ हिरव्या मिरच्या
४. २ चमचे धणेपूड
५. मीठ चवीनुसार
६.१ चमचा कसूरी मेथी
७. १ चमचा ओवा
८. ३ चमचे कोथिंबीर

पारीसाठी:

पानी,तेल/ तूप घालून मीठाशिवाय भिजवलेली कणिक .

क्रमवार पाककृती: 

१. उकडलेले बटाटे सोलून हातानेच कुस्ककरून घ्यावेत.
२. सारण ह्या शीर्षकाखाली असलेले सर्व साहित्य बटाट्यात मिसळून मिश्रण एकजीव करावे. मी शक्यतो बटाटे जास्त कुस्करत नाही. पुरणासारखे एकजीव केलेल्या सारणामुळे पराठा पीठूळ लागतो.

20150809_094319.jpg
३. कणकेची अत्यंत छोटा तुकडा घेवून त्यास पोळी लाटतो त्या प्रमाणे पातळ लाटावे.
४. पोळीच्या मधोमध कणकेचा तुकडा घेतला त्याच्या दीडपट आकाराचा सारणाचा गोळा ठेवावा.

20150809_094821.jpg

५. सगळ्या बाजूने पारी बंद करावी.

20150809_100631.jpg20150809_100703.jpg

६. ज्या बाजूने पारी बंद केली ती बाजू पोळपाटावर येईल असे बघून पुन्हा पारी जितकी बारीक लाटता येईल तितकी लाटावी.

20150809_095457.jpg

७. तवा व्यवस्थित तापल्यावरच पराठा तव्यावर टाकावा. तव्याचे अचूक तापमान साधण्यासाठी आमच्याकडे त्याच तव्यावर आधी २-३ फुलके/ पोळी करण्याची पद्धत आहे.
८. एका बाजूने पराठा थोडाफार शेकला की लगेच उलटावा. शेकलेल्या बाजूला चमच्याने तूप लावावे. तूप सगळीकडे नीट पसरले जाईल याची काळजी घ्यावी.

20150809_095547.jpg

९. तूप नीट पसरले गेले की पुन्हा एकदा पराठा उलटावा व दुसर्‍या बाजूला नीट तूप लावावे.

20150809_095623.jpg

१०. पराठा मध्यम आचेवर खमंग भाजला जातो.

20150809_101805.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. एक पराठा साधारण २-३ चमचे तूप पितो Happy
२. घरचे लोणी/ लोणचे/ पुदिना चटणी/ दही यापैकी एक गोष्ट सोबत हवीच.
३. कुठल्याही परठ्याचे सारण ओले असले तर पराठा लाटतांना त्रास होतो. पराठा चिकटतो किंवा फाटतो.
4. ३ - ४ पराठे झाले तवा कापडाने/ टिशूने पुसून घ्यावा. सुक्या पीठाचे कान जळून पराठा कडसर होण्याची शक्यता असते.

माहितीचा स्रोत: 
पंजाबचा पारंपारिक पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलू पराठा एकदम आवडता आहे. मी सारणात आलं-लसूण घालते. चिमुटभर साखर पण हवीच Happy

ओवा Uhoh नाही कधी घातला.

कणकेतही थोडे तिखट-मीठ घालतो आम्ही.

आऊटडोअर्स,
अगदी बरोबर..म्हणुन मी कधीही आलुपराठा तयार करताना किसनीने किसुन घेते म्हणजे गुठळी राहायचा सवालच नै आणि कांदा वगैरे ची फोडणी देते..माझ्या अनुभवानुसार कच्ची मिरची असो कि तिखट असो पोटाला झोंबण्याची दाट शक्यता असते..वरुन कांस्याने तुटण्याची भिती आहेच..

स्नू मस्तच गं..रेसिपी पे रेसिपी डाले जा रही हो..मज्जाच मज्जा.. मी फक्त आय विटॅमिन घेतेय पण Wink

छान आहे. फोटो पण सुंदर.

मी आले-लसूण-मिरची ठेचा आणि कोथिंबीर घालते. कसुरी मेथी मात्र कधीच घातली नाही.

आऊटडोअर्स, बारीक चिरला की नाही येत.
टीना, कांदा किसल्यावर पाणी सूटतं ना ? शक्यतो सारण कोरडं असलं की भरपूर घालता येतं. ओलं सारण असलं की पराठा चिकटतो किंवा फुटतो.

टीना, अगं आजकाल घरी स्वयंपाक करायचं प्रमाण वाढलं आहे. उत्साह टिकून राहण्यासाठी हे उद्योग Happy

तुमच्यात आलं नाही घालत पराठ्यात?

आमच्या घरच्या आलु पराठुयात बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आलं (चिरलेलं जास्त आवडतं.. दाताखाली येतं ना मध्ये मध्ये म्हणून) , चिरलेला कांदा (हा चिरलेलाच लागतो. किसल्याव्र ती मजा येत नाही), बारीक चिरून हिरवी मिरची, कोथिंबीर, धण्याची पावडर, किचीतसा गरम मसाला, ओवा आणि आमचुर पावडर आणि मीठ (आणि हो उकडून किसलेले बटाटे :फिदी:) असतात.
गोबी पराठ्यात - अद्रक, ओवा, हि मि, धणे पुड, गरम मसाला आणि कोथिंबीर. मुली के पराठे मध्ये सुद्धा हेच पदार्थ.

बाकी पराठे तळण्याची पद्धत सेम टू सेम. गावाकडे दिवाळीच्यावेळी पराठे बनवणार्‍या मावशी चुलीशी बसून तुपाशिवाय पराठे भाजून ठेवतात. नाश्त्याला आपण हजर झालो की भरपुर देसी घी मध्ये पराठा तळून, मस्त करारा करून मोठ्ठा मख्खन चा गोळा आणि ग्लासभर लस्सीसकट देतात. आहाहा!!

अल्पना,आलं फक्त गोबी आणि मुलीच्या पराठ्यात. पण पुढच्या वेळेस आलू पराठ्यात घालून पाहीन.
खरं आहे, थंडी आणि करारे पराठे (पांढरे लोणी) सोबत दूध पत्ती चहा !! आपणही थंडीची वाट बघायला लागलो आहोत. लस्सी इज नॉट माय कप ऑफ टी Lol

पुढचे थंडी गटग देपूरला करूया काय ? Wink

हे हे हे हे..
नै नै..कादा किसत नै उकळलेले आलु किसत असते म्हटल..
कांदा फोडणीत टाकते जेणेकरुन मऊसर होईल Happy

माझी आलू पराठ्यांची पद्धत

बटाटे उकडून किसून घ्यायचे. हिरव्या मिरच्या, आलं आणि मीठ मिक्सरमधून वाटून घेऊन बटाट्यात घालायचे. थोडी कोथिंबीर (हवी तर) चिरून घालायची.

नंतर एक बटाट्याचं सारण मिक्स करताना त्यात एक चमचा तेल घालायचं. हे महत्त्वाचं कारण यामुळे सारण एकत्र राहतं. पराठा लाटताना बाहेर येत नाही.

कणीक मऊसर भिजवून घ्यावी. चपात्यांना मळतो त्यापेक्षाही सैल असली पाहिजे. यामुळे पराठा सहज कितीही मोठा आणि पातळ होतो. मी उंड्यात भरपूर सारण भरते पण सैल कणीक आणि सारणातील तेलामुळे पराठे लाटताना, भाजताना फुटत नाहीत.

उंडे बनवताना जी चपाती लाटतो, त्याच्या कडा पातळ ठेवायच्या. म्हणजे त्या सगळ्या कडा नंतर एकत्र आल्यातरी तिथे कणिक जास्त होत नाही.

उंडा बनवल्यावर त्याचं तोंड वरच्या बाजूला (आपल्या बाजूला) येईल अशा तर्‍हेने पोळपाटावर ठेऊन पीठावर लाटावे. पोळपाटावर उंड्याचं तोंड ठेवलं तर लाटताना पराठा उघडला गेला तर कळत नाही आणि मग तो फुटतो.

मस्त ! ओवा आम्ही पण नाही घालत.
अद्रक लसुण ठेचुन मस्ट
सारणात थोडा कैरीच्या लोणच्याचा खार टाकला की मस्त खरपुस टेस्ट येते. Happy

सारणात अनेक व्हेरियेशन्स आहेत . मस्त..मी:)

सारण कसही असो, मी कणकेची एक पातळ पोळी लाटून घेते. त्यात अर्ध्या भागावर सारण नीट पसरणे, नंतर उरलेला अर्धा भाग त्यावर ओढा, मग कडा दाबून करंजीप्रमाणे कापून काढा किंवा दुमडा. हलक्या हाताने लाटा. कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट सारण ह्या प्रकारात मावते मस्त तेला किंवा तूपावर भाजा .. एकदम मस्त होतो आणि २ पराठ्यात पोट भरू शकते. Happy

आमच्या क्वार्टसमध्ये राहणार्‍या पंजाबी आंटींनी शिकवलेली पद्धत, त्यांच्यामते आलू पराठ्यात आल - लसूण बिग नो. तसही आमच्या जेवणात लसूण नसतो त्यामूळे आम्हाला आवडला. तेल तापवून त्यात जीर तडतडल्यावर कांदा घालून परतून घ्या, तिखट, रजवाडी गरम मसाला घालून उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घालायचे, मीठ घालून व्यवस्थित ढवळायचे आणि कसुरी मेथी घालून लगेच गॅस बंद करा. बा.चि.को. घालून ढवळा.
माझा झब्बू

aalu paratha1.jpg

छान.

मामी मस्तच..मी पन तेल लावते तेलाच्या पोळ्यांना लावतात तसे आणि मग सारण भरते...
टीपा चांगल्या येत आहेत यावर Happy

आज केले आहेत आ प!
मी उकडलेल्या बटाट्याची मस्त भाजी करून त्याचे पराठे करते. भाजीत आमचूर घालतेच.

आज आलू पराठे केले आहेत...!?!
खल्लास झालो या मी!

मी उकडलेल्या बटाट्याची मस्त भाजी करून त्याचे पराठे करते.
भाजीत आमचूर घालतेच.

उह! जिभेवर चवच आली अगदी त्या भाजीची...
Proud

आलू पराठ्याचा शोध कुणी लावला असावा?
बटाटे आपल्याकडे १६व्या शतका नंतर आले, म्हणजे तशी ही आधुनिक पाककृती आहे Happy
यापेक्षा तर समोसे पुरातन असावेत. पण त्यात बटाटे नसावेत पुर्वी बहुदा.
त्यात चिकन आणि मटन असेल असे वाटते. मांस शृंगाटक असे समोस्याचे संस्कृत नाव कुठे तरी वाचल्याचे आठवते.

अवांतराबद्दल क्षमस्व!

Pages