बीटाचा पराठा.

Submitted by आरती on 31 July, 2015 - 11:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराचे १ बीट.
चमचाभर तीळ
तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून)
बारीक चिरून कोथिंबीर
अर्धीपळी कच्चे तेल
थोडे पाणी
चिमुटभर साखर
चवीप्रमाणे मिठ, हळद,हिंग

क्रमवार पाककृती: 

बीट बारीक किसणीने किसून घ्या.
त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या.
थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा.
पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.

ParathaPost.jpg

वाढणी/प्रमाण: 
आहारावर अवलंबुन.
अधिक टिपा: 

पाणी न घालता, फक्त बिटात मावेल तेवढी कणिक भिजवून केलेले पराठे थोडे उग्र लागतात.
पराठा प्रखर आचेवर भाजला किंवा फार जाड केला तर थोडा कच्चट लागतो.
चटणी-लोणच्या बरोबर चांगले लागतातच पण नुसते पण मस्त खरपुस लागतात.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा .. Happy

रंग सुंदर आहे .. अधिक टिपा वाचून यशस्वी चवीचा पराठा करणं एकदम तारेवरची कसरत आहे की काय असं वाटलं .. Happy

उग्र चव स्टॅबिलाइज करायला आणखी काही करावं का?

सशल बिट उकडुन घेतल तर कमी उग्र लागेल जोडिला गाजर वैगरे घालता येईल..करुन बघ प्रयोग!
रन्ग मस्त आलाय,

स श ल,
यशस्वी चवीचा पराठा करणं >> बिटाचा पराठा - होय Happy

पालक-मेथी सारखे बीटाची कच्ची चव पटकन जात नाही. म्हणुनच तेल थोडे जास्त घातले आहे भिजवताना आणि बारीक किसणीने किसले आहे.

त्यतल्या त्यात तु बीट शिजवुन घेउ शकतेस किंवा फक्त रंगापुरते घालायचे किंवा जोडीला एक उकडलेला बटाटा कुस्करुन घलायचा.

जाडसर आणि मोठ्ठ्या गॅसवर भाजलेला पराठा अगदीच घशाखाली उतरला नव्हता माझ्या Happy

वरदा,
माझ्याकडे वरण, पालेभाजी नेहमीच थालपिठात जाते. जोडीला भरपुर कांदा Happy

ह्यात मी आल लसुण पेस्ट आणि धने जिरे पावडर घालते. >>
अनुश्री, मला बीट आणि हिरवी मिरची याची एकत्र्स चव खुपच आवडली आहे. त्यामुळे मी बाकी काहीच नाही घालत.

Chhanach rang aalaay, malaa aadhee kalingaDaachee foDach vaaTalee ( mag chashma laavalaa )