Submitted by आरती on 31 July, 2015 - 11:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मध्यम आकाराचे १ बीट.
चमचाभर तीळ
तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून)
बारीक चिरून कोथिंबीर
अर्धीपळी कच्चे तेल
थोडे पाणी
चिमुटभर साखर
चवीप्रमाणे मिठ, हळद,हिंग
क्रमवार पाककृती:
बीट बारीक किसणीने किसून घ्या.
त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या.
थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा.
पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.
वाढणी/प्रमाण:
आहारावर अवलंबुन.
अधिक टिपा:
पाणी न घालता, फक्त बिटात मावेल तेवढी कणिक भिजवून केलेले पराठे थोडे उग्र लागतात.
पराठा प्रखर आचेवर भाजला किंवा फार जाड केला तर थोडा कच्चट लागतो.
चटणी-लोणच्या बरोबर चांगले लागतातच पण नुसते पण मस्त खरपुस लागतात.
माहितीचा स्रोत:
मैत्रिण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा .. रंग सुंदर आहे ..
अरे वा ..
रंग सुंदर आहे .. अधिक टिपा वाचून यशस्वी चवीचा पराठा करणं एकदम तारेवरची कसरत आहे की काय असं वाटलं ..
उग्र चव स्टॅबिलाइज करायला आणखी काही करावं का?
ह्यात मी आल लसुण पेस्ट आणि
ह्यात मी आल लसुण पेस्ट आणि धने जिरे पावडर घालते. त्याने पण मस्त लागतात.
उत्तम प्रकार सांगितलात!
उत्तम प्रकार सांगितलात!
दिसतोय तर फारच भारी.
छान... फोटो बघितल्यावर करुन
छान... फोटो बघितल्यावर करुन बघण्याचा मोह आवरत नाही...
अरे व्वा..आणखी एक पाकृ.. मी
अरे व्वा..आणखी एक पाकृ..
मी पन करत असते पण बीट किसते कधी कधी तर कधी मिक्सर मधुन पन काढते
मी पाण्याच्या ऐवजी घरात
मी पाण्याच्या ऐवजी घरात असलेलं वरण किंवा आमटी ढकलते पराठ्यांच्या कणकेत
सशल बिट उकडुन घेतल तर कमी
सशल बिट उकडुन घेतल तर कमी उग्र लागेल जोडिला गाजर वैगरे घालता येईल..करुन बघ प्रयोग!
रन्ग मस्त आलाय,
स श ल, यशस्वी चवीचा पराठा
स श ल,
यशस्वी चवीचा पराठा करणं >> बिटाचा पराठा - होय
पालक-मेथी सारखे बीटाची कच्ची चव पटकन जात नाही. म्हणुनच तेल थोडे जास्त घातले आहे भिजवताना आणि बारीक किसणीने किसले आहे.
त्यतल्या त्यात तु बीट शिजवुन घेउ शकतेस किंवा फक्त रंगापुरते घालायचे किंवा जोडीला एक उकडलेला बटाटा कुस्करुन घलायचा.
जाडसर आणि मोठ्ठ्या गॅसवर भाजलेला पराठा अगदीच घशाखाली उतरला नव्हता माझ्या
वरदा, माझ्याकडे वरण, पालेभाजी
वरदा,
माझ्याकडे वरण, पालेभाजी नेहमीच थालपिठात जाते. जोडीला भरपुर कांदा
ह्यात मी आल लसुण पेस्ट आणि धने जिरे पावडर घालते. >>
अनुश्री, मला बीट आणि हिरवी मिरची याची एकत्र्स चव खुपच आवडली आहे. त्यामुळे मी बाकी काहीच नाही घालत.
Chhanach rang aalaay, malaa
Chhanach rang aalaay, malaa aadhee kalingaDaachee foDach vaaTalee ( mag chashma laavalaa )
( mag chashma laavalaa ) >>
( mag chashma laavalaa ) >>