श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Submitted by webmaster on 26 January, 2009 - 22:30

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज

यापूर्वीचे हितगुज इथे पहा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पहातेय आता..छान आहे.थँक्स शेअर केल्याबद्दल...तुमचे फेबु फोटो नाही बघता आले.

.तुमचे फेबु फोटो नाही बघता आले.>>>>>>>>>>तुमचा फेबु आयडि सांगा. मी तुम्हाला अ‍ॅड करते. मग पहाता येतील. Happy

आज महाराजांची, गोंदवल्याची खुप आठवण येतेय! तोंडाने सारखं नामस्मरण सुरु आहे. पण डोळे भरुन येत आहेत. Sad

" श्रीराम जय राम जय जय राम! "
प्रचि इथेच टाकले तर बरे होईल.>>>>>>>गमभन, मी पिकासावर अपलोड करून इथे लिंक देतेय. बघा दिसतात का. Happy
१. https://picasaweb.google.com/106450631900580625713/November29201305?auth...

२. https://picasaweb.google.com/106450631900580625713/November29201315?auth...

गोंदवलेकर महाराज यांच्यावरचे हे लिखाण आज पाहिल्यान्न्दाच बघितले....अगदी घरी जाऊन आल्यासारखे
वाटले.आमच्या गावापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे गोंदावले...त्यामुळे बर्यापैंकी जाण येण व्हायचं.

अगदी घरी जाऊन आल्यासारखे
वाटले.आमच्या गावापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे गोंदावले...त्यामुळे बर्यापैंकी जाण येण व्हायचं.>>>>>>>>>>.भाग्यवान आहात. Happy

पण आता खूप दिवस जायला झालंच नाही..शेवटच बहुतेक बी इ ला असताना २ वर्षांपूर्वी गेले होते त्यावरती नाहीच गेले अजून मी Sad

Discourses of Shri Brahma Chaitanya Gondavalekar Maharaj
श्रीगोंदवलेकर महाराज शतसांवत्सरिक पुण्यतिथी महोत्सव 2013 कार्यक्रमाचे चे live प्रक्षेपण आपण घरबसल्या बघू शकता. बुधवार दि. 18 डिसेंबरला कोठी पूजन कार्यक्रमाचे live प्रक्षेपण पहाटे 06.15 ते 08.15 दाखवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि.27 डिसेंबर 2013 ला live प्रक्षेपण पहाटे 04.30 ते 06.00 या वेळेत दाखवण्यात येणार आहे. तो कार्यक्रम बघण्यासाठी क्लिक करा : http://68.233.237.91/mandir/ (Live Webcast of Gondavalekar Maharaj Samadhi Mandir link)
आपण याचे थेट प्रसारण "Z 24 Tass" या टीव्ही चॅनेलवरदेखील पाहू शकाल.
तसेच दिवाळी 2013 मधील लक्ष्मीपूजन (recorded) बघण्यासाठी क्लिक करा: http://www.youtube.com/channel/UCm8hLIsL7Y-v8FD5kaKsikw
Gondavalekar Maharaj Samadhi Mandir Laxmi Poojan 2013 (recorded)
Gondavale Sansthan has launched its official website: http://gondavalekarsamadhimandir.org/
बघा व इतर भक्त परीवाराला कळण्यासाठी शेअर करा. आपल्या मित्रांच्या timeline वर शेअर करा.
बऱ्याच भक्तांना याबद्दल माहिती नाही. विशेषतः वृद्ध व्यक्तीना , परदेशातील लोकांना किंवा ज्यांना गोंदवल्यास येणे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी फार चांगली सोय झाली आहे. त्याबद्दल संस्थानचे ट्रस्टी यांचे अत्यंत आभार.

.

श्रीरामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा!
sitrama.jpg
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला

गीतरामायण वाचा,ऐका फेसबुकवर व मोबाईल अ‍ॅप वर....
https://www.facebook.com/egeetramayan
मोबाईल अ‍ॅप वर....
https://play.google.com/store/apps/details?id=com.reverbnation.artistapp...

मी_आर्या : धन्यवाद, रामनवमीच्या दिवशी तुमच्यामुळे रामाचे दर्शन झाले. Happy

आज मार्गशीर्ष कृ. दशमी. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी.

महाराजांच्या चरणांना नमन करुन हा धागा वर काढत आहे.

|| श्री राम जय राम जय जय राम ||

करीता नामस्मरण , उपजे सदबुद्धी
आनंद परमावधी रामनाम !!

नाम घेता घेता , जातील अवगुण
रामपदी मन अर्पी सदा !!

मन हे निष्काम , होईल निश्चित
जपता सदोदित राम राम !!

अंतरी शांतता, येईल तत्वता
नित्य वाचे म्हणता , राम राम

सादर प्रणाम

अमोल केळकर
www.kelkaramol.blogspot.in

आर्यातै, तू गेलेलीस का आज?
आई-बाबा जाऊन आले. तांदुळ भरून केलेल्या पुरचुंड्यांमधून साकारलेला महाराजांचा फोटो कसला अप्रतिम आहे. आत्ताच पाहिला Happy
खुप मस्त झाला म्हणे कार्येक्रम Happy

उफ्फ सॉरी... आता पाहिला हा धागा! मी नव्हते गेले ग रिया या वेळेस. Sad शोभा गेली होती. तिच्याकडुन ऐकला सगळा समाचार.

Pages