श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Submitted by webmaster on 26 January, 2009 - 22:30

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज

यापूर्वीचे हितगुज इथे पहा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराजांच्या काळी जसे आनंदसागर, ब्रम्हानंद किंवा भाऊसाहेब असे अधिकारी सत्पुरुष होते, तसे आताही कोणी आहेत का?

सुप्रभात!

मागच्या वर्षी सप्टेंबरमधे मायबोलीकर शोभाच्या आग्रहामुळे श्री. क्षेत्र गोंदवले येथे प्रथमच जायला मिळाले. वाढदिवसाला कुठल्या तरी तीर्थस्थळी जायचे ही इच्छा होती. ती अशा रितीने पुर्ण झाली आणि खुपच संस्मरणीय ठरली. पहाटेच्या काकडआरतीपासुन संपुर्ण कार्यक्रमांना हजेरी लावली. सकाळी सकाळी होणारी महाराजांची, त्यांच्या गुरुमहाराजांची, आईसाहेबांची, अगदी तुळशीची, गाईची काकडआरती अजुनही आठवतेय. गोंदवल्यातील सगळ्या मंदीरांचे दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीचे अगदी डोळेभरुन दर्शन झाले. महाराजांनी स्थापन केलेल्या राममंदीरातील मुर्ती खुपच सुरेख आहेत.

महाराजांची आज पुण्यतिथी आहे. खुप आठवण येतेय. आपण तिथे हजर राहु शकत नाही याची खंत आहेच. पण आपल्या मायबोलीकर शोभाचे परमभाग्य की महाराजांच्या ९९व्या पुण्यतिथीचा हा सोहळा तिला आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोय. चला,आपणही दिवसभर मनाने तरी श्री क्षेत्र गोंदवले इथेच राहुया.

||श्रीराम जयराम जय जय राम||

श्रीराम जय राम जय जय राम !!...
'अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय '

महाराजांची आज पुण्यतिथी आहे. आज घरीच गुलाल केला.

श्री क्षेत्र गोंदवले इथेच असावे अशी फ़ार इच्छा होती! मनाने तरी तिथे आहे असे कल्पूया!

||श्रीराम जय राम जय जय राम ||

श्री राज जय राम जय जय राम!
अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज, सद्चिदानंद सदगुरु श्री. ब्रम्हचैतन्य महाराज की जय!

मी गोंदवल्याहून आजच आले. तिथून ऑफ़िसातच आल्यामुळे उद्या फोटो दाखवण्यात येतील. Happy
सगळेच कार्यक्रम इतके शिस्तबद्ध झाले, की तिथून यावसं वाटतच नव्हत. Happy

गोंदवले आहेच इतके सुंदर की एकदा तिथे गेले की सारखी आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यानिमित्ताने तरी मन महाराजांच्या जवळ नामात राहते.

बाफ कोणता ? चाललय काय ? अ‍ॅडमिन कृपया योग्य ती कारवाई करण्यात यावी हि विनंती.

दिनांक ७ जानेवारी रोजी, महाराजांची ९९ वी पुण्यतिथी होती. महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. (मी या वर्षी ७ तारखेला गोंदवल्याला होते. )
दत्तजयंतीपासून उत्सवाला सुरुवात झाली. इतके असंख्य भक्त जमले होते की, आलेले अनेक भक्त, मंडपातच राहिले होते. दिवसभर विविध कार्यक्रम होत होते. मला माहित असलेले कार्यक्रम :
१. अखंड नामपहारा.
२. पहाटे, काकड आरति, भजन.
३. सकाळी, प्रवचन, अभिषेक, पालखीची ग्राम प्रदक्षिणा, आरती.
४. संध्याकाळी, किर्तन, गायन-वादनाचे कार्यक्रम आरती, पालखीची मंदिर प्रदक्षिणा.
५. रात्री, भजन.

सोमवारी पहाटे पहिली घंटा २.५५ ला झाली. आणि १२.०० -१२.३० पासून उठून, आवरून, रागंत बसलेलेल भक्त दर्शनाला उठले. दर्शन वरूनच मिळाले. (समाधी जवळ जायला देत नव्हते.) नंतर सभा मंडपात काकडाआरती झाली. आणि नंतर गुलालाच्या कार्यक्रमाकरिता सर्वांना भोजन कक्षात पाठविण्यात आले. (आदल्या दिवशीच, तिथली टेबल उचलून तिथे सजावट केली होती. ) काही भक्तांनी सभामंडपात, तर अनेक भक्तांनी भोजन कक्षात हजेरी लावली. प्रथम, नामस्मरण करण्यात आले. नंतर बेलसरे महाराजांच्या प्रवचनाची सीडी लावण्यात आली.
आणि नंतर मंदिरात सुरु असलेले ’श्री राम! ’ लाऊडस्पीकरवरून भोजन कक्षात ऐकू येत होते. व त्यांच्या मागोमाग भक्त ’श्री राम! ’ म्हणत होते. त्यावेळचा अनुभव खूपच वेगळा होता. नंतर ५.५५ ला गुलालमिश्रीत फुले उधळण्यात आली. नंतर सभामंडतपात भजन, प्रवचन वगैरे कार्यक्रम झाले.

सकाळी पालखी ग्राम प्रदक्षिणेला पालखी पाटांवरून (पालखी घेतलेली माणसे पाटांवरऊन चालतात. )नेली जाते. त्यावेळी, संपूर्ण मार्गावरून जाताना पालखीपासून पुढे १५-२० पाट मांडलेले होते आणि नंतर जशी पालखी पुढे जाईल तसे, १५-२० मुले वाकून तयारीत असतात व पागचा रिकामा पाट पुढे असा पाठविला जातो आणि ही मुले तो पुढे पुढे देत पालखीच्या पुढे १५-२० पाटांपुढे ठेवतात. त्यामुळे ही पाटांची रांग अखंड रहाते. त्या मुलांचे खरेच कौतुक वाटले. ग्रामस्थांनी चहा, कॉफीची व्यवस्था पालखी बरोबर असणार्‍या सर्व लोकांसाठी केली होती.
राम मंदिरा समोर पालखी समोर भारूडाचा कार्यक्रम झाला.

त्यातील हे काही फोटो.

http://smundale.phootime.com/photostream

मला गोंदवल्याचे सगळ्यात जास्त तीव्रतेने आठवते ते तेथिल आवारातील बकुळीचे झाड (खरतर वृक्षच) अन खाली पडलेला फुलान्चा खच, अन सर्वत्र दरवळलेला त्यान्चा सुवास Happy असो.
श्रीराम जय राम जय जय राम

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला |
जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ती |
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमुर्ती ||

फार छान,
नामाची आवड निर्माण होण्या करता महाराजानी माझ्या कडुन एक सोपा प्रयोग करवुन घेतला.
श्री राम जय राम जय जय राम हा नाम मन्त्र वेगवेगळ्या गाण्याच्या चालीवर म्हणावे असे वाटले व म्हणत गेलो. साधारण पणे आपल्या आवडीचे कोणते ही गाणे निवडा आणी बोला श्री राम जय राम जय जय राम
जय श्री राम.

http://www.youtube.com/watch?v=HmphBV0GyIY
मला ही चाल आवडली. आधीच्या श्लोकातील शेवटचा 'राम' शब्द पुढच्या श्लोकात गुंफुन केलेली. सध्या असाच सराव सुरु आहे. Happy

|| श्रीराम जयराम जयजयराम ||
महाराज तुम्ही धन्य आहात . तुमच्या || श्रीराम जयराम जयजयराम || या मन्त्राने आम्हाला सर्व काही मिळाले.

धन्स विश्वयशश्री!! Happy

या ब्लॉगवर लिहिलेला महाराजांच्या चरित्रातील हा भाग अतिशय आवडला.

श्रीमहाराज निरवा निरव करीत असावेत हे बरोबरच्या लोकांना जाणवत होते. अगदी निकट सहवासात असणारी तेव्हढीच मंडळी तेथे उरली.
अलीकडे श्रीमहाराजांच्या बोलण्यात, ' आपण लवकरच जाणार ' अशी भाषा येत असे. तसेच ' येणारा काळ कठीण व वाईट आहे, सांभाळा रे सांभाळा, कली फार मातेल, महागाई फार वाढेल, स्वार्थ फार बोकाळेल, अनीतीला जोर चढेल, भगवंताचा विसर पडेल, आणि रोगराई खूप पसरेल.' असेही ते सारखे लोकांना सांगत. यावर एकदा अम्माने प्रश्न विचारला, ' महाराज, हा पुढे येणारा काळ जर वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता ? ' हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज किंचित हसले व बोलले, ' माय, तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे. कितीही मोठा सत्पुरुष तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागतेच. प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यातच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते; आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात. आता समजले ना ! ' अम्मा ' होय ' म्हणाली आणि तो विषय तेथेच थांबला.
बापूसाहेब साठ्ये यांच्याबरोबर फडके नावाचे एक सब जज्ज श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. श्रीम्हाराजांबरोबर त्यांचा झालेला संवाद आणि श्रीमहाराजांनी व्यक्त केलेले विचार उद्बोधक आहेत. फडके विचारतात, ' सुधारलेल्या लोकांची संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही काय ? ' श्रीमहाराजांनी उत्तर दिले, ' माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या, पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत. जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय; आणि 'सु' म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते कारण, हित म्हणजे कल्याण, आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ? ते करणे सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा, कर्म करण्याचे साधन, आणि प्रत्यक्ष कर्म, अशा तीन गोष्टी असतात, यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते. पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे. जिवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत. या सगळ्याचा अर्थ असा कि जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला. अशा लोकांना संत म्हणतात; आणि ते जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्यापासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, नि:स्वार्थीपणा, आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील.'
त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा जे मंगल आहे त्याची धारणा होय. जे खरे मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचे नावदेखील असता कामा नये. या जगातली अशी एक तरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे ! या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही. कारण, जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते, जेथे उजेड तेथे अंधार असतो, जेथे मंगल असते तेथे अमंगल असते. जर दृश्य वस्तूमध्ये मंगल नाही तर ते सुक्ष्मातच असले पाहिजे. रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामाइतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. साहेबासारखे खाणे व पिणे, त्यांच्यासारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे व्यवहार करणे, हे सुधारणेचे लक्षण नसून, भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे. '
सुधारणा आणि संस्कृती यासंदर्भात श्रीमहाराजांचे विचार ऐकून फडके थक्कच झाले तरी त्यांना एक शंका होती की, नवनव्या शोध, सुधारणांमुळे होणाऱ्या सोयी यामुळे मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का ? या प्रश्नावर श्रीमहाराज सांगतात, ' नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत हे स्पष्टच दिसते आहे. पण यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय ? अधिक सुखी बनणे हेच सुधारणेचे फळ आहे. साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल, परंतु खरे सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही. ' मध्येच फडके म्हणाले, ' अहो, याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्त्व देत नाही.' श्रीमहाराज लगेच बोलले, ' महत्त्व का देत नाही ? देहाला आम्ही महत्त्व देतो, पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही. परमार्थाचे साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्त्व न देऊन कसे चालेल ? परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नदी लागून आत्म्याची कुचंबणा करणे हे आत्मघाताचे लक्षण आहे. तुम्ही सध्या जिला सुधारणा म्हणता तिचा प्रवाह या दिशेने जोराने वहात आहे. सर्व जग त्यात गुरफटले जात असून आणखी पाचपन्नास वर्षांनी या सुधारणेची कडू फळे खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही.' पुन्हा फडक्यांनी विचारले, ' महाराज, आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत, पण या पुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का ? श्रीमहाराज म्हणाले,' का नाही ? मार्ग आहेच आहे ! प्रत्येकाने, निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविले आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष, मत्सर, लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील. खरे ना ? '
' मी आजपासून नाम घेत जाईन ! ' असे म्हणून फडके निघून गेले.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

ज्यांना लिंक पहाता येत नसेल त्यांच्यासाठी.

Discourses of Shri Brahma Chaitanya Gondavalekar Maharaj

|| ग्रंथराज श्रीमद दासबोध || दशक तिसरा :: स्वगुणपरीक्षा || ३.० ||

समास पहिला : जन्मदुःखनिरूपण || ३.१ ||

जन्म दुःखाचा अंकुर | जन्म शोकाचा सागर |
जन्म भयाचा डोंगर | चळेना ऐसा ||१|| ॥श्रीराम॥

जन्म कर्माची आटणी | जन्म पातकाची खाणी |
जन्म काळाची जाचणी | निच नवी ||२|| ॥श्रीराम॥

जन्म कुविद्येचें फळ | जन्म लोभाचें कमळ |
जन्म भ्रांतीचें पडळ | ज्ञानहीन ||३|| ॥श्रीराम॥

जन्म जिवासी बंधन | जन्म मृत्यासी कारण |
जन्म हेंचि अकारण | गथागोवी ||४|| ॥श्रीराम॥

जन्म सुखाचा विसर | जन्म चिंतेचा आगर |
जन्म वासनाविस्तार | विस्तारला ||५|| ॥श्रीराम॥

जन्म जीवाची आवदसा | जन्म कल्पनेचा ठसा |
जन्म लांवेचा वळसा | ममतारूप ||६|| ॥श्रीराम॥

जन्म मायेचे मैंदावें | जन्म क्रोधाचें विरावें |
जन्म मोक्षास आडवें | विघ्न आहे ||७|| ॥श्रीराम॥

जन्म जिवाचें मीपण | जन्म अहंतेचा गुण |
जन्म हेंचि विस्मरण | ईश्वराचें ||८|| ॥श्रीराम॥

जन्म विषयांची आवडी | जन्म दुराशेची बेडी |
जन्म काळाची कांकडी | भक्षिताहे ||९|| ॥श्रीराम॥

जन्म हाचि विषमकाळ | जन्म हेंचि वोखटी
वेळ | जन्म हा अति कुश्चीळ | नर्कपतन ||१०|| ॥श्रीराम॥

पाहातां शरीराचें मूळ | या ऐसें नाहीं अमंगळ |
रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्यें जन्म यासी ||११|| ॥श्रीराम॥

अत्यंत दोष ज्या विटाळा | त्या विटाळाचाचि पुतळा |
तेथें निर्मळपणाचा सोहळा | केवी घडे ||१२|| ॥श्रीराम॥

रजस्वलेचा जो विटाळ | त्याचा आळोन जाला गाळ |
त्या गाळाचेंच केवळ | शरीर हें ||१३|| ॥श्रीराम॥

वरि वरि दिसे वैभवाचें | अंतरीं पोतडें नर्काचें |
जैसें झांकणें चर्मकुंडाचें | उघडितांच नये ||१४|| ॥श्रीराम॥

कुंड धूतां शुद्ध होतें | यास प्रत्यईं धुईजेतें |
तरी दुर्गंधी देहातें | शुद्धता नये ||१५|| ॥श्रीराम॥

अस्तीपंजर उभविला | सीरानाडीं गुंडाळिला |
मेदमांसें सरसाविला | सांदोसांदीं भरूनी ||१६|| ॥श्रीराम॥

अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं | तेंही भरलें असे देहीं |
नाना व्याधी दुःखें तेंहि | अभ्यांतरी वसती ||१७|| ॥श्रीराम॥

नर्काचें कोठार भरलें | आंत बाहेरी लिडीबिडिलें |
मूत्रपोतडें जमलें | दुर्गंधीचें ||१८|| ॥श्रीराम॥

जंत किडे आणी आंतडी | नाना दुर्गंधीची पोतडी |
अमुप लवथविती कातडी | कांटाळवाणी ||१९|| ॥श्रीराम॥

सर्वांगास सिर प्रमाण | तेथें बळसें वाहे घ्राण |
उठे घाणी फुटतां श्रवण | ते दुर्गंधी नेघवे ||२०|| ॥श्रीराम॥

डोळां निघती चिपडें | नाकीं दाटतीं मेकडें |
प्रातःकाळीं घाणी पडे | मुखीं मळासारिखी ||२१|| ॥श्रीराम॥

लाळ थुंका आणी मळ | पीत श्लेष्मा प्रबळ |
तयास म्हणती मुखकमळ | चंद्रासारिखें ||२२|| ॥श्रीराम॥

मुख ऐसें कुश्चीळ दिसे | पोटीं विष्ठा भरली असे |
प्रत्यक्षास प्रमाण नसे | भूमंडळीं ||२३|| ॥श्रीराम॥

पोटीं घालितां दिव्यान्न | कांहीं विष्ठा कांहीं वमन |
भागीरथीचें घेतां जीवन | त्याची होय लघुशंका ||२४|| ॥श्रीराम॥

एवं मळ मूत्र आणी वमन | हेंचि देहाचें जीवन |
येणेंचि देह वाढे जाण | यदर्थीं संशय नाहीं ||२५|| ॥श्रीराम॥

पोटीं नस्तां मळ मूत्र वोक | मरोन जाती सकळ लोक |
जाला राव अथवा रंक | पोटीं विष्ठा चुकेना ||२६|| ॥श्रीराम॥

निर्मळपणें काढूं जातां | तरी देह पडेल तत्वता |
एवं देहाची वेवस्ता | ऐसी असे ||२७|| ॥श्रीराम॥

ऐसा हा धड असतां | येथाभूत पाहों जातां |
मग ते दुर्दशा सांगतां | शंका बाधी ||२८|| ॥श्रीराम॥

ऐसिये कारागृहीं वस्ती | नवमास बहु विपत्ती |
नवहि द्वारें निरोधती | वायो कैंचा तेथें ||२९|| ॥श्रीराम॥

वोका नरकाचे रस झिरपती | ते जठराग्नीस्तव
तापती | तेणें सर्वही उकडती | अस्तिमांस ||३०|| ॥श्रीराम॥

त्वचेविण गर्भ खोळे | तव मातेसी होती डोहळे |
कटवतिक्षणें सर्वांग पोळे | तया बाळकाचें ||३१|| ॥श्रीराम॥

बांधलें चर्माचें मोटाळें | तेथें विष्ठेचें पेटाळें |
रसउपाय वंकनाळें | होत असे ||३२|| ॥श्रीराम॥

विष्ठा मूत्र वांती पीत | नाकीं तोंडीं निघती
जंत | तेणें निर्बुजलें चित्त | आतिशयेंसीं ||३३|| ॥श्रीराम॥

ऐसिये कारागृहीं प्राणी | पडिला अत्यंत दाटणीं |
कळवळोन म्हणे चक्रपाणी | सोडवीं येथून आतां ||३४|| ॥श्रीराम॥

देवा सोडविसी येथून | तरी मी स्वहित करीन |
गर्भवास हा चुकवीन | पुन्हां न ये येथें ||३५|| ॥श्रीराम॥

ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली | तंव जन्मवेळ पुढें आली |
माता आक्रंदों लागली | प्रसूतकाळीं ||३६|| ॥श्रीराम॥

नाकीं तोंडीं बैसलें मांस | मस्तकद्वारें सांडी स्वास |
तेंहि बुजलें निशेष | जन्मकाळीं ||३७|| ॥श्रीराम॥

मस्तकद्वार तें बुजलें | तेणें चित्त निर्बुजलें |
प्राणी तळमळूं लागलें | चहूंकडे ||३८|| ॥श्रीराम॥

स्वास उस्वास कोंडला | तेणें प्राणी जाजावला |
मार्ग दिसेनासा जाला | कासावीस ||३९|| ॥श्रीराम॥

चित्त बहु निर्बुजलें | तेणें आडभरीं भरलें |
लोक म्हणती आडवें आलें | खांडून काढा ||४०|| ॥श्रीराम॥

मग ते खांडून काढिती | हस्तपाद छेदून घेती |
हातां पडिलें तेंचि कापिती | मुख नासिक उदर ||४१|| ॥श्रीराम॥

ऐसे टवके तोडिले | बाळकें प्राण सोडिले |
मातेनेंहि सांडिलें | कळिवर ||४२|| ॥श्रीराम॥

मृत्य पावला आपण | मातेचा घेतला प्राण |
दुःख भोगिलें दारुण | गर्भवासीं ||४३|| ॥श्रीराम॥

तथापी सुकृतेंकरूनी | मार्ग सांपडला योनी |
तऱ्हीं आडकला जाउनी | कंठस्कंदीं मागुता ||४४|| ॥श्रीराम॥

तये संकोचित पंथीं | बळेंचि वोढून काढिती |
तेणें गुणें प्राण जाती | बाळकाचे ||४५|| ॥श्रीराम॥

बाळकाचे जातां प्राण | अंतीं होये विस्मरण |
तेणें पूर्वील स्मरण | विसरोन गेला ||४६|| ॥श्रीराम॥

गर्भीं म्हणे सोहं सोहं | बाहेरी पडतां म्हणे कोहं |
ऐसा कष्टी जाला बहु | गर्भवासीं ||४७|| ॥श्रीराम॥

दुःखा वरपडा होता जाला | थोरा कष्टीं बाहेरी
आला | सवेंच कष्ट विसरला | गर्भवासाचे ||४८|| ॥श्रीराम॥

सुन्याकार जाली वृत्ती | कांहीं आठवेना चित्तीं |
अज्ञानें पडिली भ्रांती | तेणें सुखचि मानिलें ||४९|| ॥श्रीराम॥

देहविकार पावलें | सुखदुःखें झळंबळे |
असो ऐसें गुंडाळलें | मायाजाळीं ||५०|| ॥श्रीराम॥

ऐसें दुःख गर्भवासीं | होतें प्राणीमात्रांसीं |
म्हणोनियां भगवंतासी | शरण जावें ||५१|| ॥श्रीराम॥

जो भगवंताचा भक्त | तो जन्मापासून मुक्त |
ज्ञानबळें विरक्त | सर्वकाळ ||५२|| ॥श्रीराम॥

ऐशा गर्भवासीं विपत्ती | निरोपिल्या येथामती |
सावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||५३|| ॥श्रीराम॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला || ३.१ || ॥श्रीराम॥

॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥
॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥ ॥श्रीराम॥

दशक ३ समास १ मधील कठीण शब्दांचे / चरणांचे अर्थ व टिपा-

[१] कर्माची आटणी १.२- कर्माची मूस
[२] निच नवी १.२- नित्य नूतन,
[३] जन्म भ्रांतीचे पडळ १.३- जन्म भ्रमाचा पडदा,
[४] गथागोवी १.४- गुंतावळ,गुरफटणे,
[५] लांवेचा वळसा १.६- डाकीणीचे झपाटणे,
[६] मायेचे मैंदावे १.७- मायचे कपट/लबाडी
[७] क्रोधाचे विरावे १.७- रागक्रोध याचे वीरपण,
[८] विषय १.९-“विशेषेण सिंचन्ति इंद्रियाणि मनश्च”-ज्याच्या ठिकाणी इंद्रिये आणि मन बुडून जातात, मग्न होतात असे पदार्थ म्हणजेच इंद्रियभोग होत,
[९] वोखटी वेळ १.१०- वाईट वेळ,
[१०] प्रत्यई धुईजेते १.१५- दररोज धुतले तरी.
[११] अशुद्ध शब्दे शुद्ध नाही १.१७- अशुद्ध म्हणजे जे शुद्ध नाही असे ते रक्त
[१२] बळसे वाहे घ्राण १.२०- नाकातून शेंबूड वाहतो.
[१३] त्वचेविण गर्भ खोळे १.३१- अपूर्ण वाढलेला गर्भ हालचाल(खोळे) करतो.
[१४] कटव-तिक्षणे १.३१- कडू व तीक्ष्ण रसामुळें
[१५] वंकनाळे १.३२- वक्रवार व नाळ,
[१६] मातेने सांडिले कळिवर १.४२- आईने देह सोडून दिला,

बाप्रे... काय बारकाईने वर्णन करतात समर्थ!!!

<<जन्म जिवाचें मीपण | जन्म अहंतेचा गुण |
जन्म हेंचि विस्मरण | ईश्वराचें ||८|| ॥श्रीराम॥

गर्भीं म्हणे सोहं सोहं | बाहेरी पडतां म्हणे कोहं |
ऐसा कष्टी जाला बहु | गर्भवासीं ||४७|| ॥श्रीराम॥<<

अगदी पटलं हे समर्थांचं म्हणणं!! Happy

इथे दिल्याबद्द्ल धन्स शोभे!

श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज की जय!!

श्रीरामाच्या आणि महाराजांच्या कृपेने मुलगा १०वीत ७२% मिळवुन उत्तीर्ण झालेला आहे.
महाराजांनीच बुद्धी दिली असावी. याचं सर्व श्रेय महाराजांनाच आणि त्यात घरच्यांचे तसेच माबोकरांचे वेळोवेळी मार्गदर्शन व धीर देण्यामुळे हे शक्य झाले. Happy

ह्या गोंदवल्याच्या श्रीराममंदीरातील मुर्ती: सावळा राम आणि गोडुली सीता
1shriram.jpg
(प्रचि थोपुवरुन साभार)

श्रीराम जय राम जय जय राम!!

II जानकी जीवन स्मरण जय जय राम II
२ ० १ ३ च्या शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्षातील पुणे गोंदवले पदयात्रा मंगळवार दिनांक १ ६ जुलै ते शनिवार दिनांक २ ० जुलै २ ० १ ३ रोजी या दरम्यान होणार आहे…… सोमवार दिनांक २ २ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचे दर्शन करून पदयात्रा परत येइल.
त्या संदर्भातील meeting रविवार दिनांक १ ६ जून २ ० १ ३ रोजी संध्याकाळी ६ वाजता
श्री अमर पाटील,द्वारा सचिन डावखरे स्वातंत्र्य सैनिक सोसायटी,F-19,3रा मजला,महर्षी वाल्मिकी रोड,ठाणे (पूर्व) येथे होणार आहे.
इच्छुक साधकांनी या सभेस हजार राहावे हि विनंती….
मात्र सोबत दोन पासपोर्ट साईज फोटो आणि RESIDENCE ADDRESS PROOF व रुपये एक हजार ( as advance) घेऊन येण्यास विसरू नये हि विनंती म्हणजे आपणास सहभागी व्हावेसे वाटले तर पुढील कार्यवाही जमेल.
अधिक माहिती साठी:
१) पदयात्रा प्रमूख श्री अनिल देवधर 9869547606,
२) व्यवस्थापक श्री विजय अत्रे 9967590503,
३) पदायात्राप्रेमी श्री विनायक जोशी 9892965996

यांचेशी संपर्क साधावा हि विनंती….
श्री राम समर्थ

सौ: http://shrigondavalekar.org/ या वेबसाईटवरुन

श्रीराम जय राम जय जय राम!
दिवाळीत गोंदवल्यात ५ दिवस रहायला मिळाले. आणि खूपच छान वाटले. कुणाचीही आठवण, अगदी घरचीही आली नाही. कायम तिथेच रहायला मिळावे असे वाटले. दिवाळीत दररोज छान छान रांगोळ्या काढल्या होत्या.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी तर, महाराजांच्या बागेतील झेंडूची फ़ुले आणून, मोठे मोठे हार करून, सगळे समधी मंदिर सजवले होते. रांगोळ्यांवर पणत्यांची ताटे ठेवून, दिपोत्सव पण खूपच छान केला होता. मंदिराबाहेर "स्क्रिनवर" मंदिरातील लक्ष्मीपुजन पहाण्याची व्यवस्था केली होती. आता एक नवीन साईट सुरु केली आहे. त्यावर अजूनही हे पहाता येते. तसेच पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सवसुद्धा या साईट्वर ऑनलाईन बघायला मिळणार आहे. ती साईट आहे : 68.233.237.91/mandir
मी काढलेल काही फोटो इथे पहा.
दिवाळी गोंदवल्याची.
१.
https://www.facebook.com/photo.php?fbid=200499380135686&set=pcb.20050410...

२.
https://www.facebook.com/photo.php?fbid=200783846773906&set=pcb.20078437...

Pages