घरगुती पिझ्झा

Submitted by उदय on 27 July, 2015 - 11:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

यिस्ट (Fleischmann's, ८ ग्रॅम)
पाणी, १ कप
मैदा (रॉबिनहुड all purpose), २ कप
साखर (१ चमचा), मिठ (३/४ - १ चमचा), तेल (२ - ३ चमचे)
कॅप्सिकम (सिमला मिरची), ऑलिव्ज, टोमॅटो सॉस, चिज (Mozzarella), कान्दा

क्रमवार पाककृती: 

हलके कोमट पाण्यामधे यिस्ट मिसळले.
मैदा, तेल, मिठ, साखर, पाणी एकत्र केले - छान ५-८ मिनिटे कणिक मैदा मळण्याची प्रक्रिया केली. मग हा गोळा (dough) १ तास (फर्मेन्टेशन साठी) झाकुन ठेवला. १ - १.५ तासात गोळ्याचा आकार साधारणत: दुप्पट होतो.

ओव्हन ४५०-४६० फॅरेनहाईट साठी तयार केले. या वेळेत भाज्या चिरल्या.
A1.pngA2.jpg

पिझ्झा-स्टोन वर सुरवातीला हाताने नन्तर लाटण्याचे पिझ्झा हवा त्या आकारात (१४" व्यास) थापला. एक पातळ तेलाचा हात फिरवला आणि टोमॅटो सॉस, चिज, कॅप्सिकम, कान्दा, ऑलिव्ज, पुन्हा चिज यान्चा थर रचला.
A3.jpg

या वेळेपर्यन्त ओव्हन छान गरम झाले होते.

पिझ्झा १६ -१७ मिनिटे ओव्हनमधे भाजला.
A5.jpg

वाढणी/प्रमाण: 
चार
अधिक टिपा: 

पिझ्झा भाजण्यासाठी पिझ्झा-स्टोन नसेल तर aluminum प्लेट चालेल. हिरव्या भाज्या जास्तच टाकल्या आहेत... पण पिझ्झा लहानग्याना आवटतो म्हणुन एक सन्धी साधायचा प्रयत्न.

माहितीचा स्रोत: 
आन्तरजाल, आणि माझे फसलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पिझ्झा स्टोन घरी आहे म्हणता. मग प्रयोग फसलेला कसा?>>
------ स्टोन असण्याने खुप मोठा फरक पडत नाही हे सुचवायचे आहे... नसेल तरी चालेल. काही प्रयोगात गव्हाचे पिठ मिसळणे (५० %), मैदा कमी असे प्रकार करुन बघितले...

माझी मैत्रिण फक्त कणकेचा पिझ्झा बेस करते. छान लागतो तो ही.
मला बेस करायचा कंटाळा येतो त्यामुळे रेडीमेडच आणतो. हल्ली एक एकदम पातळ बेस आणून काही सेकंदाकरता अवनला टाकून टोस्ट करून मग टॉपिंग्ज घातलेला पिझ्झा मुलांना आवडतोय.

''एक्स्ट्रा टोपिंग '' चे पैसे देऊन सुद्धा बाहेर कुठे एवढे टोपिंग मिळणार नाहीत. दिसायलाच एवढा छान आहे तशी चव पण नक्कीच असणार…. Wink