वर्षाविहार२०१५-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 26 July, 2015 - 12:51

वविकर्स्,इथे वविसंदर्भातल्या प्रतिक्रिया आणि वविचे वृत्तांत टाका.वविला पहिल्यांदा आलेल्यांनी नक्की वृत्तांत टाकावेत. पुन्हा आलेल्यांनी पुन्हा आलोय तर परत कशाला वृत्तांत टाका असा कंजूसपणा न करता पुन्हा येण्याचा अनुभव लिहा. Happy काही ग्रुप फोटोज पण टाका इथे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती ती दंगाममस्ती! Proud

हिम्सकूल, ग्रूप फोटोबद्दल धन्यवाद!

रीया, गाण्यांसाठी तू केलेली (!) धडपड वाचून तुझे गाण्यांवर करायच्या दंगास्वरूप नाचावरचे प्रेम समजले! Lol
पाय उडवू चला, ठेका धरूया चला... एक लावणी होऊन जौ द्या...
मल्लीने फिरत्या चमचमत्या लाईटची बसमध्ये केलेली फर्माईश, बसच्या बॅकसाईडला रंगलेला तुफानी डान्स, रीया ऑपरेटरची डीज्जेगिरी, डान्समय झालेली वविबस यांबद्दलही लिहीकी!

मयुरेश उर्फ कार्याध्यक्षांनी आणलेल्या बाकरवडीने व बी ने आणलेल्या आणि अळ्यांच्या कोशासम आकार असलेल्या मँगो टार्टने भल्या सकाळी खादाडीला सुरूवात झाली हे नम्रपणे सांगू इच्छिते. Happy

मल्लीने फिरत्या चमचमत्या लाईटची बसमध्ये केलेली फर्माईश, बसच्या बॅकसाईडला रंगलेला तुफानी डान्स, रीया ऑपरेटरची डीज्जेगिरी, डान्समय झालेली वविबस यांबद्दलही लिहीकी!
>>
अगं सगळं मीच कुठे लिहू. आधीच मला घरी जाऊन प्रिती रागवली Uhoh Proud
किती मस्ती करतेस म्हणून. पुढे माझं लग्नाचं वय होऊनही मी असा दंगा करते म्हणून आई रागवली आणि माझं लग्नाचं वय झालंय हे माबोकरांनी पण सांगितलं तरी मी लग्न करत नाहीये हे ऐकून आजी रागवली Lol

२) तुफान दंगा केल्यावरही मी सायली, रुमा आणि तेजुला डान्सफ्लोअर वर मिस केलंच >> रीया तूच मझी मैत्रीण बघ.. बाकी कोणाला नाही तुला आठवण आली.. Lol

रीया.. मी सांगु का की तु 'मला लगीन करायं पाहिजे' वर तुफान नाचत होतीस ते बसमधे
>>
मी तर गोम संगतीनं वर पण नाचत होते की गं Wink
मला नाचायला जनरेटरचा आवाज पण पुरतो Lol

ते क्लासिकल भांडी घासण्याबद्दल पण लिहा बरं कोणी तरी वृ मधे Wink

नील, मी फोटो अनूरूपवर टाका म्हणत होते Wink

रीया तूच मझी मैत्रीण बघ.. बाकी कोणाला नाही तुला आठवण आली..
>>>
असंच काही नाही अगं! मयुरेशला आलेली Lol खरच Proud

काही म्हणा, पण कार्याध्यक्ष या वेळेस मोकळे, ढाकळे, तब्येतीत, खुशाल, विनादडपण असे वाटत होते ना? Wink

रिया, छान लिहिलेस.

रिया...तु एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशिल..

नील. वरचं वाक्य.. असं किमान १०० वेळा लिही..

रीया.. तू एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशील..

रूमा, तुझी आठवण वविबशीत सुरूवातीलाच निघाली... गेल्या वर्षीचे जे जे वविकर यावर्षी गायब होते त्या सर्वांनाच रविवारच्या भल्या सकाळी उचक्या - ठसके लागले असतील! Lol

काही म्हणा, पण कार्याध्यक्ष या वेळेस मोकळे, ढाकळे, तब्येतीत, खुशाल, विनादडपण असे वाटत होते ना? >> होना म्हणूनचं निहिराला पाठवल नव्हतं त्यच्या बरोबर..

लिंबूदा, काडी टाकू नका हो त्याला घरात रहायचंय >> अशा छोट्या काडयांनी काही होत नाही बघ..

रूमा, तुझी आठवण वविबशीत सुरूवातीलाच निघाली... >> ह्म्म्म

Lol मस्त मजा येतेय वृत्तांत वाचून. रीया, मला पण बसमधलं नाचणं अगदी चुकवल्यासारखं वाटतंय. पुढच्या वर्षी नक्की. Happy

बरं घारू वविकर म्हनून्का नाही आल्ला. आणि मग वविकर म्हणोन याय्चे नव्हते तर त्याच दिव्शी कसा काय आला?आ

देवकी Happy

वृ आवडल्याचं सांगणार्‍या प्रत्येकाला थँक्स Happy
आशू, पुढल्यावर्षी खरच ये आनखी धम्माल करुयात Happy

येणार येणार म्हणता, ववि२०१५ येउन झाला सुद्धा!

हा माझा सकुसप २रा ववि. नेहमीप्रमाणे वविला खूप मज्जा आली. मुंबईकर यावेळेला युके रिसार्ट्ला पहिले पोहचले. मी लिंबूला लांबून बघितलं. मला घारु आठवला कारण मला वाटलं लिंबू पुणेच्या बशीने येणार. मग जवळ जाऊन खात्री करुन घेतली. नंतर घारुण्णा स्विमिंगपूलमध्ये दुसर्या ग्रुपबरोबर पोहत असताना दिसले.

युके रिसार्ट-
vavi1.jpg

आणि हे कट्टेकरी - यावेळेच्या वविचे आकर्षण.. मला पहिल्यांदा रामसेवक/ मनसेवाले वाटलेले Happy ....

vavi9.jpg

मुलांना पोहण्याची घाई झाली होती मग पुणेकर आल्यावर स्विमिंगपूलमध्ये गेलो. इकडे मागच्यावेळेपेक्षा राईड्स कमी होत्या, पण ज्या होत्या त्या भंयकर होत्या. दुसरीकडे अजूनएक स्विमिंगपूल होतं.

स्विमिंगपूल-

vav2.jpg

युके रिसार्ट खोपोलीपासून मुंबईच्या दिशेने ५ किमीवर आहे. आजुबाजूलापण मस्त डोंगररांग होती. आणि हीच ती जागा जिकडे वविच्या दोन बुजूर्गाची भेट झाली होती.. Happy

vavi3.jpgvavi4.jpg

बी ने प्रत्येकासाठी आणलेल्या भेटवस्तू-
vavi5.jpg

यावेळेचं जेवणपण मस्त होतं
vavi6.jpg

सासं संयोजकाने खूप छान सांघिक आणि माबो आयडी खेळ घेतले. युके रिसार्टमध्ये एका रुममध्ये टीटी, चेस, कॅरम खेळण्याची व्यवस्था केली होती. काही लहान मुले तिकडे रमली.
vavi7.jpg

आणि हा बी ने वविसंयोजकांसाठी दिलेला मग..धन्स बी!
vavi8.jpg

अजून एक, युके रिसार्टची सर्व्हिस खूप छान होती. गेल्यावेळेनुसार यावेळेला रिसार्ट आणि वविसंयोजकाचा पकडापकडीचा खेळ नव्हता.. Happy

एकंदरीत या वविला खूप मज्जा आली. सर्व वविकरांचे, ववि आणि सांस संयोजकाचे आभार!

अतुल यांनी आणलेल्या बाकरवडीने>>> काय हे अकु. बाकरवडी मी आणली होती. आणि श्रेय अतुलला Proud

रिया,शाब्बास. याला म्हणतात सच्चा वविकर.. कसा मस्त सविस्तर वॄत्तांत लिहिलायस. Happy

राजू,जेवण आणि बीच्या गिफ्टसवाल्या फोटोंबद्दल धन्यवाद रे :).

काही म्हणा, पण कार्याध्यक्ष या वेळेस मोकळे, ढाकळे, तब्येतीत, खुशाल, विनादडपण असे वाटत होते ना?..>>> काहीही हा लिंब्या Proud

अय्याई!!! सॉरी रे मयुरेश... Lol करते दुरूस्ती. महत्त्वाच्या तपशीलात अशा चुका होणे योग्य नाही. Wink

वाह रीये..... मस्त लिहिलेयेस....

@ बाबु... येऊ अता पुन्हा .... ओळख ठेवा :स्मितः

बी ची गिफ्ट्स भारी....
मायबोलीचे मग्स भारी... कट्टर्स भारी....
च्या मायला सगळे फोटोज लय भारी...!!!!

Pages