वर्षाविहार२०१५-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 26 July, 2015 - 12:51

वविकर्स्,इथे वविसंदर्भातल्या प्रतिक्रिया आणि वविचे वृत्तांत टाका.वविला पहिल्यांदा आलेल्यांनी नक्की वृत्तांत टाकावेत. पुन्हा आलेल्यांनी पुन्हा आलोय तर परत कशाला वृत्तांत टाका असा कंजूसपणा न करता पुन्हा येण्याचा अनुभव लिहा. Happy काही ग्रुप फोटोज पण टाका इथे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! धागा आलासुध्दा! Happy

नववविकर, अनुभवी वविकर, सर्वांनी वृत्तांत लिहा रे!

Udyaparyant wel udya.
Maze paay dukhayala lagale nachun nachun Lol
Missed sayali,ruma n teju on dance floor
N missed Shyamali n ashu in bus

कालचा ववि छान झाला... मज्जा आली. धाकटीने आनंद लुटला... ( "एन्जॉय केले" म्हणण्याऐवजी हे म्हणणे बरोबर आहे ना?)
बरेच माबोकर्स (व सगेसोयरे) वविला पहिल्यांदाच आलेले होते.

यंदाची ओळखपरेड नाविन्यपूर्ण होती... आलेल्या प्रत्येक माबो आयडीच्या चिठ्ठ्या बनवुन त्या वाटल्या होत्या, व त्या चिठ्ठीतील आयडीबाबत आयडी सोडून बाकी अशी काही शब्दरचना/अ‍ॅक्शन याद्वारे ती ती आयडी सुचित करायचि व बाकिच्यांनी ओळखायची असे होते. त्यामुळे मजा आली. (कदाचीत ही कल्पना पूर्वीही वापरली असेल, मला माहित नाही)

माझ्या कायमस्वरुपी विसराळूपणामुळे मी नीलवेद व बाबु यांना ओळखण्यात भरपुर गोंधळ करीत होतो मला ते दोघे सारखेच दिसत होते.
विवेक देसाईंना मात्र लगेच ओळखले.

धाकटीला सोबतीला रिया व तिचा गृप होता, त्यामुळे ती अजिबात बोअर झाली नाही. रिया व गृप, धन्यवाद.
माझ्याकडे काही छान फोटो आहेत... खास उल्लेख म्हणजे केदार जाधवच्या लहानग्या मुलिचा.. (वय अंदाजे दीड वर्षे) ती पाण्यातून बाहेर यायलाच तयार नव्हती. एकीकडच्या तळ्यातुन बाहेर आल्यावर पुन्हा दुसर्‍या तळ्यात, ते देखिल योकु(?) च्या अंगाखांद्यावरुन पाण्यात खेळत लोळत होती... ते फोटो छान आलेत.

मयुरेश "कार्याध्यक्ष" आहे ते माहित आहे, पण "कोषाध्यक्षही" बनलेल्या मयुरेशचा एक फोटो छान आलाय.... ही अशी नोटांची गठ्ठी काळजीपूर्वक मोजतानाचा...

मायबोलीचा टीशर्ट घातलेल्या दोन लहानग्या मुलींचा फोटोही छान आलाय. मूळात "लहानांकरताही" टी शर्ट ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्यामुळेच हे शक्य होऊ शकले. ते दिसायला खूप छान वाटत होते. कल्पना अंमलात आणणारे, व लहानग्यांकरताही टीशर्ट आवर्जुन घेणारे व वविला तेच टीशर्ट घालायला लावुन लहानग्यांनाही आवर्जुन आणणारे.. दोघांचेही कौतुक.

बी यंदा पहिल्यांदाच वेळात वेळ काढून आला होता. एक कल्पना गेली कित्येक वर्षे मनात असूनही मला प्रत्यक्षात उतरवता आली नव्हती ती त्याने पहिल्याच वविला यशस्वीपणे राबवली. त्याने एक काऊंटर उघडला, तिथे बर्‍याचश्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवल्या व प्रत्येक माबोकरास त्यातिल हवी ती आवडलेली वस्तु भेट म्हणून घेण्याचे आवाहन केले. तो मला "टोपी" घ्यायचा आग्रह करीत होता, पण मी नम्रपणे त्याचेकडून "टोपी घालुन घेण्यास" नकार दिला Proud व एक छानसा सोनेरी ओपनर घेतला. बी, धन्यवाद.

बाकी बर्‍याच उल्लेखनीय बाबी/क्षणचित्रे आहेत... जसा वेळ मिळेल तसे ते इथे लिहीन.
तोवर नविन वविकरांचे वृत्तान्त येऊद्या, यंगब्रिगेडचेही वृत्तान्त येऊद्यात, अनुभवी वविकरांचे खडे बोलही येऊद्यात.

वविचा सोहळा छानरितीने पार पाडल्याबद्दल सर्व वविसंयोजकांचे आभार.

अरे वा !!!!!
मस्त वृत्तांत लिंबुदा. बाकीच्यांनी लिहा की पटापट. मी पण खूप मिस केला ववि यावेळी. नाटुकले झाले का मुंबईकरांचे???

>>>> नाटुकले झाले का मुंबईकरांचे??? <<<<
नाटुकले? ते काय अस्ते?????
मुंबैकर म्हणजे सर्ववेळ "नाटकच" चाललेले अस्ते.... ! फुल्ल टू धमाल.. Proud
ते कै पुणेकरांसारखे (उगाचच) "गंभिर चेहरा" करुन जगाची चिंता वहात बसत नाहीत....

कालचा ववि खरोखरीच मस्त झाला. नेहेमीप्रमाणेच सगळ्यांच संयोजकांनी मेहेनत घेतल्याचं दिसत होतं. युकेज रेसॉर्ट्सुद्धा मस्तच आहे. वाजवी किंमतीत चांगली सोय होती. दोन मोठे ग्रूप्स असूनही खोळंबा, अडचण अशी झाली नाही.
बी चे विशेष आभार. त्यानी पार सिंगापूरहून एक हॅन्ड्बॅग कॅरी केली. याचा उलगडा वविला झाला. प्रत्येकाकरता काहीतरी भेटवस्तू होती त्यात. कॅप्स, विंड्चाईम्स, कीचेन्स, पेनं, फ्रीजवर लावण्याकरता लहान लहान शोभेच्या वस्तू इ... संयोजकांना प्रत्येकी एक प्रिंटेड मग भेटवस्तू म्हणून मिळाला. पुनश्च एकदा बीचे आभार. Happy

फोटो ?

खुप मजा आली काल. कित्येक वर्षांनी वविला गेले. खुप नवीन ओळखी झाल्या.

प्रवासासाठीची बस, युकेज'ची व्यवस्था, संयोजकांचे सगळ्यांना एंगेज ठेवणारे कार्यक्रम, पाण्यातली धमाल, पोटापाण्याची सोय, सगळं सगळं उत्तम होतं.
गाडीतला प्रवास प्रचंड रिफ्रेशिंग होता. ओवी या वविची स्टार कलाकार होती Happy

माझ्या लेकाला मल्लीकाका खुपच आवडला. आधी दादाच म्हणाला, नंतर रुद्राक्षचा बाबा म्हणल्यावर काका झाला Lol

संयोजक, तुम्हा सगळ्यांना थँक्स Happy खुप कष्ट घेता तुम्ही लोकं.
पाऊस दमदार चालू होता, वातावरणही आल्हाददायक की कायसंसं होतं त्यामुळे खरोखरचा नावाला साजेसा 'वर्षाविहार' झाला काल Happy

हा माझा पहिलाच ववि.. अगदी २२ तारखेपर्यंत जायचं की नाही हे ठरतं नव्हतं पण ऐनवेळी जमलं .. मयुरेशने पण सीट बुक करुन घेतली Happy
२६ तारखेला रविवारच्या भल्या पहाटे माझा पिकअप ७.१५ ला होता .. त्यात पुण्याची बसही वेळेवर आली.. एक सायकलिस्ट युनिव्हर्सिटी रोडवरुन जात होता तो बस बघुन थांबला.. मग ओळख झाली 'द सायकलस्वार केदार'ची! मग सगळ्या जनतेने अरे कुठली राईड आहे आज? किती किमी जाणारेस? BRM चा प्लॅन ठरला का? असे प्रश्न विचारुन घेतले.. Proud .. उत्तरं मिळाल्यावर बी ने केदार सोबत सगळ्यांचे फोटोसेशन करुन घेतले.. बस आता पिंपरीला केदार जाधव नि मल्ली फॅमिली , रियाला घ्यायला निघाली .. केदार नि मल्ली आधीच येवुन थांबले होते.. रुद्र येणार म्हणुन 'लग्नाची कॅसेट टाकावी का' या विचारात आम्ही होतो Wink .. तो एकच कल्ला सुरु झाला .. 'वविस्टार ओवी' आली! सगळे हाय हॅल्लो करुन स्थानापन्न झाले .. मग रियाचा पिकअप .. १० मिनिटे झाली तरी मॅडम अजुन येतच होत्या (नंतर समजलं की प्रिती (रियाची बहिण) नि तिचे बाबा कोणती गाडी घेवुन जायचे यावर वाद घालत होते ..:फिदी: ) .. रियाची एन्ट्री झाली नि बस मधे दंगा वाढला!! हनी सिंग युएस्बी मधे जावुन बसला! अंताक्षरी सुरु झाली.. टिपी कमेंटस सुरु झाल्या.. दक्षुतैने एक गंमत सांगितली सईतैची 'दिल विल प्यार व्यार' गाण्याबद्द्ल.. मग फर्माईश कार्यक्रम झाला.. सईतैनेएअगदी 'अय्या..' पर्यंत गाणं म्हटलं
मग परत भसाड्या आवाजातले नि चालीतली गाणी म्हणे पर्यंत रिसोर्टला पोचलो.. वातावरण एकदम मस्त होतं.. हिरवाई नि मस्त धुकं!! एकदम रोमँटिक!

मुंबईकर आधीच पोचुन नाश्ता करुन तय्यार होते.. आम्ही ही गडबड केलीच! ओळखी झाल्यावर 'चलो स्विमिंगपुल'! मस्त रेन डान्स नि २ तास दंगा केल्यावर जेवणाची वेळ झालीच.. सगळ्यात जास्त मज्जा ओवी नि रुद्राक्ष ने केली पाण्यात!

जेवणानंतर संयोजकांनी झोप उडवण्यासाठी बरेच खेळ ठेवले .. फुल्ल टाईमप्पास पण शेवटी शिवाजी म्हणाला 'चहा आणाच'!
परत गप्पा टप्पा .. छोट्या माबोकरांची संगीतखुर्ची, चॉकलेट वाटप, फोटोसेशन्स झाले!

५ च्या दरम्यान परतीचा प्रवास सुरु झाला .. पुण्याच्या बशीत 'लावण्या' सुरु झाल्यावर सगळेच नाचायला लागले पण जागा अपुरी! मिळेल तिथे हातपाय हालवुन घेतले !

पण मस्त मज्जा आली .. जेवण, रिसोर्ट, संयोजन सगळचं व्यवस्थित होतं! Happy

ववि मस्त पार पडला..

बस मध्ये भिडे आणि इंद्राला मिस केलं.
राखी या वर्षिही केक घेऊन आली होती तरी सुद्धा पारंपरिक अन्नपूरेना माता केश्वीला पैन मिस केलं.
तिथे रिसॉर्ट वर रें डान्स च्या वेळी यो रॉक्स ची खुप आठवण आली.
या वेळी मुम्बईकर खुप कमी होते त्यामुळे गाणी गायला खुप कमी लोक होते. त्यात वैभव आयरे ची ढोलकी पण नव्हती.
तिथे रेन डान्स ला पप्पी दे पप्पी दे घारुला... माफ करा...पारुला गाण्यावर नाचताना घारुला पैन मिस केलं.
जिप्सी.. ******** का आला नाहीस? फ़ोटो कोण काढणार ?

अरे वा! मस्त मजा केलेली दिसतेय सगळ्यांनी!
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी मात्र ह्यावेळच्या वविला मुकलो..

कालचा ववि "लय भारी " झाला Happy
सकाळी बसमधे अंताक्षरीला धमाल मजा आली . कसली कसली गाणी अन काय काय एकेकांचे आवाज . त्या नादात रिसॉर्ट कधी आला कळलेही नाही . अगदी वेळेत रिसॉर्ट्ला पोहोचलो .
मुंबईकरांना भेटल्यावर भरपेट नाश्ता करून पाण्यात उतरलो .
पाण्यात एकदम धमाल आली . विशेषतः टेनिस बॉल ने खेळण्यात . बाकी सगळे निघून गेले तरी मी , अतुल आणि त्याचा मुलगा आणखी अर्धा तास खेळलो .
सगळ्यानी रेन डान्स मस्त एंजॉय केला .
पण सगळ्यात जास्त धमाल केली ओवीने (माझी मुलगी)
एकदा पाण्यात गेल्यावर बाहेत यायच सोडा तिचे हात जरी पाण्याबाहेर काढले तरी भोंगा पसरत होती .
रेन डान्स मधेही तिला अगदी जास्त जोर असलेल्या पाण्यातच राहायच होत .

जेवणाला एकच शब्द योग्य आहे , अप्रतिम . त्यातच दमलेले असल्याने भरपेट खाल्ल गेल . त्यात ओवी शेजारी झोपलेली असल्याने आम्ही दोघात एकच ताट घेतल होत . आमच्या ताटातल्या हाडांचा ढीग पाहून सर्व्ह करणारे काळजीत दिसत होते Wink

जेवल्यानंतर पेंगुळले होतो . पण डोंगराला आग लागली + शिवाजी म्हणतो ने मजा आणली .

वविकरांची ओळख करून द्यायची पद्धत पण छान होती . मी फक्त एका शब्दात "अय्या SSS" ओळख करून दिली .

नंतर झालेले सगळेच खेळ मस्त विशेषतः फुगा पास करण्याचा . आमच्या टीमचे नाव "द़क्षिणा" असल्याने आम्ही सहज जिंकलो यात काही आश्चर्य नव्हतेच Wink

मग मस्तपैकी चहा , कॉफी अन भजीचा आस्वाद घेतला अन ५:३० वाजता मुंबईकरांचा निरोप घेऊन परतीला निघालो.
परतीला सगळे थोडे सुस्तावले होते . पण मल्ली अन रियाच्या प्रयत्नानी सगळ्यानी गाडीत धमाल डान्स केला.

एकूणच ववि मी , कविता अन ओवी सगळ्यानीच प्रचंड एंजॉय केला Happy

हा माझा पहिलाच ववि. मायबोलीवरही मी इतर सगळ्यांच्या मानाने बरिच नवीन आहे. अकु सोडली तर इतर कुणालाही फारसं ओळखत नव्हते. त्यामुळे वविला जावे की न जावे या संभ्रमात होते. पण जर गेले नसते तर एक अफाट सुंदर अनुभव मिस केला असता हे परतताना जाणवलं आणि स्वतःच्या निर्णयावर खुष झाले!
खूप खूप मजा केली हे वेगळं सांगायला नकोच. माझ्या लेकीनेही प्रचंड धमाल केली. ववि संपत आला तशी आणखीन धम्माल मूड ऑन होत होता तिचा. घरी जाऊन सगळ्यांना तिनं तिच्या बोबड्या बोलीत सांगितलेला 'ववि वृत्तांत' इथल्या भल्याभल्या शब्दप्रभूंना जमणार नाही! त्यातही 'शगले शिमिंग करत होते आणि आई घसरगुंडीवरून पाण्यात बद्कन् पल्ली. मी घाबल्ले नै कै...' ने जाम हसवलं सगळ्यांना.
येतानाच्या प्रवासात नाच गाण्यांनी फूल्ल टू धम्माल आली. सोबत पाऊस आणि लोणावळ्याला डोंगरावर उतरलेले ढग आणि धबधबे... प्रवास कसा संपला ते समजलेच नाही. बसमध्ये सईने मुग्धाला पोळीचा 'कच्चा' लाडू खायला दिला. मग तो पिकलाय याची खात्री झाल्यावरच तिनं तो खाल्ला. खरं वाटत नसेल तर सईच्या नील ला विचारा... Proud

आणि हो... बी चे विशेष आभार मानायचे राहिले. त्याने सगळ्यांसाठी सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. मला एक छान पर्स मिळाली आहे. Happy धन्यवाद बी.

एकूण सगळ्याच मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटून प्रचंड आनंद झाला. कालचा दिवस खूप छान गेला. यापुढे मी प्रत्येक वविला जाणार! धन्यवाद लोकहो!

कालचा ववि मस्त झाला. पुणेकर एकदम जोशात होते.

बीचे खास आभार. त्याने आवर्जुन सगळ्यांसाठी भेटी आणल्या आणि प्रत्येकाला अगदी आग्रहपुर्वक घ्यायला लावल्या.

'शगले शिमिंग करत होते आणि आई घसरगुंडीवरून पाण्यात बद्कन् पल्ली. मी घाबल्ले नै कै...' ने जाम हसवलं सगळ्यांना.>> Rofl

बर, काल अजुन एक गम्मत झाली.
तिथे एक जुने जाणते माबोकर आलेले होते पण बहुधा त्यांच्या खाजगी गृपसोबत होते.
मी त्यांना चेहर्‍यावरुन बरोब्बर ओळखले (पण आयडी नाही लक्षात आली - काय फरक पडतो?)
त्यांना हायबाय वगैरे करुन झाले.
नंतर काय झाले, की बाहेर लॉनवर हेच माबोकर बंदुक घेऊन छर्रे मारीत होते....
आता माझे काय? वय झाले तरी लाठीकाठी/दंड, बंदुक, धनुष्यबाण, तलवार वगैरे बाबी दिसल्या की अगदि रहावत नाही, हात नुस्ते शिवशिवतात.... मग काय?
मी सरळ त्यांचेपाशी गेलो, अन म्हणालो की मलाही हवाय एक शॉट मारायला....
त्या शुटिंगकरता बहुधा वेगळे पैसे /चार्जेस असावेत. पण माझ्या डोक्यात तेव्हा ते कुठले यायला?
मी आपला लहान मुलाप्रमाणे हटून बसलो, मला आत्ताच्या आत्ता ती गन हवी... एक मुलगा होता रांगेत, त्यालाही सांगितले, तू थांब, आधी मी मारणार शॉट.....
तो मुलगा बिचारा थांबला. अन त्या मायबोलीकरांनी बंदुकवाल्याला सांगितले की "दहापैकी सात झालेत, बाकीचे तीन शॉट्स यान्ना द्या"
अरे हे वाक्य ऐकले मात्र, माझी ट्युबलाईट पेटली, की इथे काही खेळांना वेगळे चार्जेसही असतील, अन मी हट्टाने पण फुकटच शॉट्स घेतोय.
पण एकदा हात पुढे केला, तर मागे हटून कसे चालेल?
मी मस्त पैकी पोझ वगैरे घेतली... शॉट मारला... अर्थातच तो हुकलाही.... तितक्यात धाकटीने दोनतिन स्नॅप्स घेतले.... अन एकाच शॉटनंतर मी बंदुक परत देऊन टाकली... म्हणले की निदान उरलेले दोन शॉट्स तरी त्या लहान मुलाला मिळूदेत. धाकटीने काढलेला फोटो आज फेसबुक वर टाकला.
पण इथे त्या बेनाम/अननोन माबोकराचे आभार मानायचे राहिले... ते मानुन टाकतो. Happy त्यांनी सहजगत्या माझ्या हातात (काठीच्या ऐवजी) बंदुक दिल्यामुळे माझा एक छान फोटो निघाला. सो ... धन्यवाद. Happy

सुंदर. वर्षाविहारात भाग घेतलेल्यांनी दिवसभरातील घडामोडींचे हर्षभरीत होऊन लिहिलेले वर्णन वाचताना सर्वांनी किती आनंदाने कालचा दिवस व्यतीत केला त्याचे तितकेच देखणे चित्र नजरेसमोर उभे राहिले आहे.

मुग्धमानसीच्या लेकीने ववितील सर्वात मोठी घटना...."...आई घसरगुंडीवरून पाण्यात बद्कन् पल्ली...." ज्या रितीने आपल्या घरी सांगितली ती ऐकताना खुद्द आईसुद्धा हसत बसली असेल.....'बद्कन पल्ली..." धम्मालच !

Pages