वर्षाविहार२०१५-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 26 July, 2015 - 12:51

वविकर्स्,इथे वविसंदर्भातल्या प्रतिक्रिया आणि वविचे वृत्तांत टाका.वविला पहिल्यांदा आलेल्यांनी नक्की वृत्तांत टाकावेत. पुन्हा आलेल्यांनी पुन्हा आलोय तर परत कशाला वृत्तांत टाका असा कंजूसपणा न करता पुन्हा येण्याचा अनुभव लिहा. Happy काही ग्रुप फोटोज पण टाका इथे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वृत्तांत!
चेरी, तुझा वृत्तांत लिहिते आहेस ना? Happy
काल नवीन वविकरांनाही जु.जा. वविकरांबरोबर यथेच्छ दंगा करताना पाहून खूप मजा वाटली.
नव्या - जुन्या सगळ्यांनीच वविचा पुरेपूर आनंद लुटला. आता बाकीच्यांनी लिहा पटापटा! Happy

चनस,केदार,मानसी,सई सगळ्यांचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया मस्तच. रिया, तेरा वृत्तांत किधर है? Happy

लिंब्या,तू ज्यांच्याकडून गन घेतलीस ते मायबोलीकर म्हणजे साक्षात घारूअण्णा होते,:)

काय हे लोक्सांनो, अनुल्लेख करुन मारत होते लिम्बूदा घारुला...... हा शॉटही फुकट घालवलात ना त्यांचा ?

पण लिम्बूदा, घारुला गोळी मारायची सोडून भलतीकडेच कुठेतरी नेम का धरलावता ?

वॉव.. काय मज्जा केलीये सगळ्यांनी.. सुपर!!

आमच्या सारख्यां येऊ न शकलेल्यांना ही द्राक्षं गोडच लागली हां!!!! Happy

अरे व्वा.. बी युनिक आयडिया रे.. मी मिसली नं सांताक्लॉस ची विजिट!!!! Happy

अमित .. Lol

बाबूऽऽ, तुच माझा सख्खा दोस्त....
बाकिच्यांना कै समजतच नै.....!
"उस्का नाम नै लेनेका था...कायको बोले ये सब लोग?" ... Proud
(आता मी परत घारुला बोलायला मोकळा, की बाबारे, मी नाही हो तुझे नाव घेतले तिथे.... बाकिच्यांनीच चोमडेपणा केला Proud )

>>> पण लिम्बूदा, घारुला गोळी मारायची सोडून भलतीकडेच कुठेतरी नेम का धरलावता ? <<< Lol Lol Lol
अरे त्यानी माझ्या हातात गन दिली अन उलट्या पावली तिथुन पळून गेला...
मी एक शॉट मारल्यावर "गोळी भरेस्तोवरच्या" वेळात परत आला... Lol Lol

पण लिम्बूदा, घारुला गोळी मारायची सोडून भलतीकडेच कुठेतरी नेम का धरलावता ? ..>>>.हा हा हा. Rofl हे जबरीये.

घारूने मी मायबोलीकर असलो तरी वविला आलेलो नाहीये असे म्हणून बाणेदारपणे बीकडची गिफ्ट घ्यायचे नाकारले.:)

हाहा लिंब्या.. Happy तुलाबी वेड घेऊन पेडगावला जाता येते की.

घारुला गोळी मारायची सोडून भलतीकडेच कुठेतरी नेम का धरलावता ? ..>>>.:D

>>> बीकडची गिफ्ट <<<<
अरे अरे अरे , मधे स्पेस देत जा की रे.... हे काय? "बाकड्यासारखे" बीकडी वाटले मला आधी Proud

कान्द्या, अरे हे चावट लोक बरे मला जाऊ देतील पेडगावला? मला धरुन मारुन मुटकुन परत मुद्द्यावर आणतात... आता हे वरचेच उदाहरण बघ ना घारूचे.

दर वेळी वविला लिम्ब्या आला कि त्याला नव्याने ओळख सांगावी लागते. तुझा रेकॉर्ड तसा आहे म्हणुन वाटल कि तु घारूला ओळखलं नसशील....

मस्त वृ.... मज्ज्जा केलिये.

कुणीतरी स्वतंत्र लेख लिहा की.... (पूर्वीसारखे)

हो नाही हो नाही करता करता शेवटी मला वविला जाता आलं. खुप बरं झालं. अर्ध्या वर्षाचा सगळा शीण एका दिवसाने उतरला.
(नेहमीप्रमाणेच) माझ्या वविची सुरुवात होते आदल्या दिवशी पासून Wink शनिवार सकाळपर्यंत 'मागच्या वर्षी जी गाणी नेली होती त्याचा फोल्डर आहेच. तीच गाणी पुन्हा नेता येतील' याच विचारात मी होते.शनिवारी दुपारी काम संपल्यावर आता गाणी पेड्रा किंवा सिडी मधे भरुयात म्हणून लॅपटॉप उघडला तेंव्हा आठवलं की इन बिटवीन पिरेड मधे आपला लॅपटॉप Format झाल्याने आता गाणी शिल्लक नाहीत. आणि गाणी आहेत की नाही ते न बघताच (नेहमी प्रमाणेच) इथल्या बीबींवर 'मी गाणी आणतेय, मी गाणी आणतेय' चा दंगा घालून झालाच होता. घरी गाणी डाऊनलोड करायला काहीही नाहीये हे लक्षात आल्यावर (नेहमीप्रमाणेच) मी सैरभैर झाले. Proud काय करू ते कळत नव्हतं इतक्यात प्रिती कॉलेजमधून आली आणि 'नकटी असावं पण धाकटी असू नये' म्हणजे काय ते प्रॅक्टीकली प्रितीला कळावं म्हणुन आल्या पावली चप्पलही न काढू देता मी तिला मैत्रिणीकडे पिटाळलं. पण गाण्यांची साडेसाती चालूच होती. कधीही कुठेही न जाणारी माझी ही मैत्रिण ऐन वेळेला कुठे तरी गावी गेली होती Angry शेवटी नको कुठलीच गाणी न्यायला असं ठरवून आम्ही शांत बसलो Sad
पण गाणं नाही तर वविला जाणं नाही (हे उगाच आपलं काही तरी. तंटा नाही तर घंटा नाहीला जुळवायचं म्हणून).
पण अचानक मग काय करावं याचं उत्तर मिळालं.
काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय ते आम्हाला कळालं.
(चारोळी झाली Proud )
इतका वेळ प्रितीच्या बरोबर इकडे तिकडे गाणी शोधत फिरणारी तिची मैत्रिण म्हणाली माझ्या मोबाईल मधे आहेत काही गाणी. हवी असतील तर बघा. आणि आम्हाला गाणी मिळाली हो! फायनली पेन ड्राईव्ह लोड करून गाणी घेतली. बॅगा भरल्या आणि शनिवार राती आम्ही निद्रेच्या आधिन झालो.
रविवार उजाडला. सकाळी साडे पाचच्या सुमारास घरातल्या ईलेक्ट्रिक कोंबड्याने बांग दिली (आलार्मची टोन कूकूचकू आहे Proud ).मी वविला येतेय हे अनेकदा सांगून अनेकदा अनेक गोष्टी सांगायला वविचा/ववि रुट्स धागा उघडला असला तरी माझ्या स्टॉपला बस कितीला येणारेय हे मी पुर्णपणे विसरले होते.नेहमी सातच्या सुमारास बस येते हे गृहित धरून आम्ही ७ वाजता आवरून तयार झालो. त्यानंतर बाबांना चला आम्हाला सोडवायला म्हणल्यावर बाबांनी विचारलं बस कुठे आणि किती वाजता येणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं, दुसर्‍याचं माहीत नाही हे लक्षात आल्या आल्या मयुरेशला पिंग केलं. त्यावर त्याने एसएनडीटी पाशी असल्याचं सांगितलं आणि मी "कसे हे किती उशीर करतात नेहमी" म्हणत मोबाईलवरून माबो लॉगिन केलं.
बघते तर आमची वेळ ७.२५ची होती Proud मग मनातल्या मनात हुश्श केलं. साडे सात ऐवजी साडे सहा असती वेळ तर? Uhoh
सव्वा सातच्या सुमारास हिम्याचा फोन आला की आम्ही पोहचत आलोय. आता बाबांना म्हणाले,' तुम्ही दोघं या तोपर्यंत मी (घराजवळच्या) देवळात जाऊन येते). १० मिनिट्स झाले तरी या दोघांचा पत्ता नाही Uhoh फोन केला तर म्हणे आम्ही निघालोय. त्यानंतर ४ मिनिट्स दोघांचा पत्ता नाही.(घर आणि मंदिर मधे १ मिनिटचं पण अंतर नाही) मयुरेशचा परत फोन आला. आम्ही पोहचलोय Uhoh मग तणतण करत काय झालंय बघायला गेले तर हे दोघं बाबा लेक कोणती गाडी न्यायची त्यावरून वाद घालत होते Uhoh मग त्यांना दोघांना रागवून एका गाडी वर फिक्स होऊन एकदाचं निघालो आणि १० मिनिट उशीर झाल्याने बस मधे ओरडा खाल्ला Proud माझी चुक नव्हती हे ऐकुन लोकांनी मला मोठ्या मनाने माफ केलं Proud

बसमधले सगळेच चेहरे माझ्या ओळखीचे होतेच Happy सगळ्यांनाच मी आधी भेटलेले होते (एकदा एकदा) exception फक्त 'बी' चे. पण त्यांना ओळखणे अजिबातच अवघड नव्हते. कारण आम्ही बसमधे सेटल होण्याआधीच त्यांनी 'तुझा आयडी काय?' हे 'सिंगापूर'हून काही तरी आणलेले (त्याचं नाव मी विसरले) स्वीट देत विचारले. सिंगापूर आणि प्रश्न याचं एकच कॉम्बी असू शकतं ते म्हणजे 'बी' हे माझ्या (नेहमीच्या) बुद्धी चातुर्याने लक्षात आले. तरी पण सिंगापूरात वय मोजण्याची पद्धत भारतीय वय +१५ अशी काहीशी आहे का? हा प्रश्न त्यांना विचारायचा राहिलाच Wink
इन्नाने दक्षुतै कडे दिलेला निरोप (इथेच सगळे प्रश्न विचारून घे) बी यांनी 'त्यात धागे काढून प्रश्न विचारायची मज्जा नाही' सांगून परतावून लावला. आणि पुण्याची बस प्रश्नावलीला मुकली Proud
(नेहमीप्रमाणे) गाणी. नाच , मस्ती करत करत चहाच्या स्टॉपला पोहचलो आणि मला आणि प्रितीला साजिर्‍याची आठवण आली.एकदाही चहा न सांडवता सगळ्यांनी तिथुन निघायचं ठरवल्याने साजिर्‍याची प्रथा मोडल्याच्या दु:खात आम्ही पुढे निघालो.

अखेरीस गाडी युकेला पोहचली. नाष्टा + मुंबईकरांशी गप्पा झाल्यावर पोट गच्च भरलं (नाष्ट्याने की गप्पांनी....नेमकं कशाने ते माहीत नाही) आणि आम्ही पाण्यात उतरायचं ठरवलं. पाण्यात (नेहमीप्रमाणे) मज्जा आलीच पण सगळ्यात जास्त धम्माल आली ते रेन डान्स मधे.खूऊऊऊप खूऊऊऊऊऊउप चित्र विचित्र गाण्यांवर चित्र विचित्र डान्स केले Proud लिंबूकाकांची लेक पण मस्त सामिल झाली सगळ्यामधे.
योकू आणि त्याच्या बायडीमुळे मला काही काळ युकेजचा तो पूल यमुना नदी वाटलेली Wink का ते तोच सांगेल Wink

मग बीने सगळ्यांसाठी आणलेले सुंदर गिफ्ट्स घेतले.(बी, प्लिज त्या गिफ्ट्सचे फोटोज इकडे टाका Happy ) दमलेल्या सगळ्यांनी रुचकर अशा जेवणाचा अस्वाद घेतला. आणि याच्या त्याच्याशी बोलण्यासाठी इकडे तिकडे पांगापांग होतच होती इतक्यात दक्षुतैने एक आवाज मारला आणि सगळे स्टेजपाशी जमले. (काय बिशाद लोकांची न ऐकण्याची Proud ).
हीच ती सांसच्या खेळांच्या वेळेची वेळ Wink
या वेळेला आयडी ओळख एका अनोख्या पद्धतीने झाली.आम्हा प्रत्येकाला (माबोकरांना) एक एक चिट्ठी देण्यात आली होती.त्या चिठ्ठीत ज्या माबोकराच्या आयडीचे नाव होते त्याने त्या माबोकराबद्दल एक एक हिंट द्यायची होती. मला आवडला हा प्रकार. मज्जा आली. पहिल्याच वाक्यात जेंव्हा मला प्रत्येक आयडी ओळखता आला तेंव्हा मात्र माझं माबोव्यसन वाढत चालल्याची जाणिव मला झाली. आता कदाचित काही दिवस संन्यास घ्यावा या विचारात मी आहे.आयडी ओळखल्यावर त्या त्या व्यक्तीने पुढे येऊन स्वतःची ओळख करून द्यायची होती. सांसंसाठी एक सुचना आहे की हा किंवा अशाप्रकारचा खेळ प्रत्येक ववि मधे ठेवण्यात यावा आणि त्या आयडी सोबत आलेल्या नातेवाईकांनाही त्याच वेळेला स्टेज वर बोलवून ओळख करून द्यायची संधी द्यावी.
सासंनी खेळ इतके मस्त अरेंज केले होते की हे नेहमीचेच खेळ खेळायला पुन्हा नव्याने मज्जा आली.
डोंगराला आग लागली खेळ खेळताना अकुने जेंव्हा सांगितलं की 'फक्त शिवाजी म्हणतो ते ऐकायचंय. बाकीच्यांचं ऐकायचं नाहीये' तेंव्हा मी 'हा सावरकर आणि गांधींवर अन्याय आहे' असं म्हणून केविलवाणा जोक करायचा प्रयत्न केला. पण जास्त कोणी ऐकलाच नाही.चार -दोन लोकं हसली. माईक वर मारायला हवा होता तो जोक Proud
त्यानंतर ग्रूप बनले. एका ग्रूपचे नाव होते -किल्वर मेंढी. ते किती तरी वेळ मला किल्वर भेंडी वातले होते. त्यावर मी काहीही नावं ठेवतात येडे असं म्हणल्यावर मला नंदिनीने ते किल्वर मेंढी असल्याचे सांगितले Proud
ज्याने कोणी दमशेराग साठी म्हणी शोधल्या होत्या तो आयडी जामच खादाडू आहे हे नक्की. प्रत्येक अ‍ॅक्टींग करायला येणारा कँडीडेट पहिली कृती खायचीच करत होता Lol
फुगे फुगवायच्या खेळात मात्र फुग्यांवर अन्याय झाला Proud जेवढा वेळ एक फुगा फुगवायला लागतो त्यापेक्षा कमी मार्क्स त्या फुगे फुगवण्याच्या कृतीला देण्यात आले होते. या बद्दल टिंब टिंब टिंब (मला खरं तर सांसचा निषेध करायचा आहे पण संयोजकांमधे दक्षुतै असल्याने मी गप्प बसते याची तिने नोंद घ्यावी :फिदी:)
थिमबेस्ड गाणे गाण्यामधे आणखी एक मज्जा झाली. एक कुठलीशी थिम होती देशभक्ती आणि आमच्या संपुर्ण ग्रूपला ऐकू आलेलं मेणबत्ती Proud बराच वेळ आम्ही हात वर करत होतो तरी आम्हाला चान्स मिळत नव्हता म्हणून आम्ही थिम ऐकायच्या आधीच पहिल्या अक्षरावरच हात वर करायचा हे ठरवून टाकलं आणि नेमका गाणं गायचा चान्स आम्हाला मिळाला. आता सगळेच्या सगळे मेणबत्तीवर गाणं आठवायला लागले Lol .मी कही दिप जले कही दिल म्हणणार इतक्यात कुठुन आणि कसं कोणास ठाऊक पण मैत्रीला देशभक्ती आहे हे कळालं आणि त्याने गाणं गाऊन आम्हाला गुण मिळवून दिले. देशभक्तीवर कही दिल जले गायलं असतं तर मला काय काय रिअ‍ॅक्शन्स मिळाल्या असत्या ते आठवून मी बराच वेळ विचार करून हसत होते .
मला हनीसिंगचे गाणे गायची संधी (जबरदस्तीने) दिल्याबद्दल मी सांसचे (जबरदस्तीने) आभार मानते Proud (रच्याकने मला हनीसिंग आवडतो हे लोकांना कोणी सांगितलंय देव जाणे. आणि मी दारू पिते हे पण बीला कोणी सांगितलंय देव जाणे Uhoh Proud )
एक दोनदा चिटींग करून दक्षिणा ग्रूप जिंकल्या बद्दल त्यांना गिफ्ट देण्यात आलं (जे मला पण मिळालं Proud ) दुसर्‍या नंबरचं जे गिफ्ट होतं ती बिस्किटं आम्हाला आवडत नसल्याने आम्ही मुद्दाम तिसरे आलो आणि चॉकलेट्स पटकवली Proud तिन्ही ग्रूप्सना गिफ्ट देण्याची कल्पना पण आवडली सांस Happy
फायनली खुप सार्‍या दंग्यांनंतर चहा-भजी आली आणि सगळे तिकडे पळाले.
आणि बागुलबुवा, नील या दोघांनी मला मनोसोक्त छळून घेतले Proud (याचे डिटेल्स कोणालाही मिळणार नाहीत Proud ). नील आपला राहून राहून माझ्या लग्नाचा विषय काढत होती. त्याची व्यवस्थीत नोंद घेऊन प्रितीने ही गोष्ट सगळ्यात आधी घरच्यांपर्यंत पोहचवली आहे. फायनली कोणाकडून तरी चहा सांडला आणि साजिर्‍याची प्रथा पाळली गेली याचा आनंद हिम्या आणि कार्याध्यक्षांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहू लागला Wink
आणि एवढं होता होता सकाळपासून गायब आलेला पाऊस आला. मग मात्र निघायचं ठरलं Happy
राखीने लक्षात ठेवून पुणेकरांसाठी आणलेला केक माझ्याकडे दिला आणि आम्ही निघालो. गडबडीत माझी आणि राखीची निरोपमिठी राहिलीच Wink राखी मी पुढच्या महिन्यात मुमंबईत येतेय तेंव्हा घेऊ गं नीटसा निरोप.
गाडी पुण्याकडे निघाली. बस मधे राखीने दिलेला केक आवडल्याचं सगळ्यांनी मलाच सांगितलं Lol
रस्त्यात थोडं ट्राफिक लागलं.२ लेनमधे गाड्या चालल्या होत्या. आम्ही ज्या लेनमधे जात होतो त्याऐवजी दुसरी लेन मस्तपैकी पुढे सरकत होती. आम्ही लेन बदलल्यावर ती थंड आणि दुसरी चालू Uhoh Angry याचं कारण 'कोणीतरी अंघोळ करून आल्याने असं होतंय' असं मल्लीने डिक्लेअर केलं. अंघोळ न केल्याने अंगाला वास येतो त्यामुळे लोकं स्वतःहुन वाट करून देतात. कोणी तरी अंघोळ केल्याने त्या वासाची इंटेन्सिटी कमी झाली असं काहीसं कारण होतं ते Proud या प्रवासात निसर्गाचं सुंदर रूप अनूभवत आम्ही पुढे निघालो. या दोन वाक्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही :फिदी

गाडी गर्दीतून बाहेर आल्यावर मात्र पुन्हा माझा पेड्रा मागवला गेला आणि मग बराच वेळ मी आणि मल्ली दोघंच नाचत होतो. सिद्धार्थने न नाचण्याचं कारण सांगितलं 'कसली बोअर गाणी आहेत. आपल्या पिढीतली गाणी तरी आणायची' बी यांनी न नाचण्याचं कारण सांगितलं ' कसली बोअर गाणी आहेत. आमच्या वेळेचे गाणी तरी आणायची' Uhoh मग मी नेमकी कुठल्या पिढीतली गाणी आपण आणलीयेत या विचाराने कन्फ्युज होतच होते. इतक्यात दिक्षितांच्या माधुरीने माझी लाज राखली Wink
'१ २ ३' ला बी उठले आणि 'बगदाद से लेके दिल्ली व्हाया आग्रा' ला सिद्धार्थ आणि मग सगळीच बस त्या डान्सग्रूपात सामिल झाली Happy पुढचा कल्ला शब्दात सांगता येणं शक्य नाही.
आणि मग एक एक स्टॉप जवळ येत गेले. मल्ली आणि केदर उतरले. केदारची ओवी तुफ्फाआआन गोड आहे Happy
रुद्रचं विषेश कौतुक. आई सोबत नसतानाही त्याने बाबाला अगदी व्यवस्थीत सांभाळलं Proud
मग माझा स्टॉप आला आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही घरकडे निघालो Happy

या वविच्या बाबतीत काही सांगायलाच हव्यात अशा गोष्टी -
१) बसमधे सगळ्यांसोबत खुप एंजॉय केल्यानंतरही मी आशुडी आणि श्यामलीला मिस केलंच Happy
२) तुफान दंगा केल्यावरही मी सायली, रुमा आणि तेजुला डान्सफ्लोअर वर मिस केलंच
३) ओवी,सामी, विनय, देवकाका,मेधा, कविन, मोना, स्नेहश्री, यांची आठवणही काढण्यात आलीच.
(इन शॉर्ट पुढच्या वविपासून जास्त भाव न खाता गपचुप वविला यायचंय तुम्ही सगळ्यांनीच :फिदी:)
४) माबोकरांइतकीच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त धमाल बच्चे कंपनींने केली असं वाटून गेलं Happy
५) मी घारूआण्णांचा अनुल्लेख केला आहे Proud
६) लास्ट बट नॉट लिस्ट- ओळख परेडीत अनेक पहिलटकरांनी पुन्हा वविला येत राहिन असं म्हणल्याचं ऐकून बरं वाटलं खुप. आणि याचं श्रेय पुर्णपणे संयोजकांना. आम्हाला इतका आनंद दिल्याबद्दल खुप खुप खुप धन्यवाद Happy

वरच्या लिस्टमधे अनेकांची नावं मिसिंग आहेत लोकहो. त्याबद्दल सॉरी! तुम्ही आला होतात हे सांगायचं असेल तर तुम्ही पण वृ लिहा बरं Wink

रीयुडे.. वाह वाह! लिहलसं एकदाच!
ग्रुप चिटिंग बद्द्ल +१..;) मी विसरलेच ते लिहायचं..
प्रितीने घरी योग्य निरोप पोचवला ते बरं झालं Proud

Pages