वर्षाविहार२०१५-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 26 July, 2015 - 12:51

वविकर्स्,इथे वविसंदर्भातल्या प्रतिक्रिया आणि वविचे वृत्तांत टाका.वविला पहिल्यांदा आलेल्यांनी नक्की वृत्तांत टाकावेत. पुन्हा आलेल्यांनी पुन्हा आलोय तर परत कशाला वृत्तांत टाका असा कंजूसपणा न करता पुन्हा येण्याचा अनुभव लिहा. Happy काही ग्रुप फोटोज पण टाका इथे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षीचा ववी म्हणजे....

१. ओवी. Happy
२. अय्या !!!!!
३. गजरा Wink
४. गजरेवाली
५. लगीन कराय पायजे... Wink
६. सर्प्राईज नं १ - कट्टर्स... ४९८१
७. सर्प्राईज नं २ - बी गिफ्ट.
८. वेगवेगळ्या आकारांच्या प्राण्यांसोबत डुंबणे
९. हरवलेलं ढापण शोधणे
१०. हरवलेली आंगठी शोधणे (साखरपुड्याची होती म्हणे, तरीच एवढं सिरियसली शोधत होता बिचारा. एवढ्या पुल मध्येही भिजलेल्या चेहर्यावर आलेला घाम दिसत होता)
११. बॉल फेकुन मारणे
१२. आण्णां? कोण आण्णा ? Uhoh
१३. चिट्ठ्या आणि डार्लींग च्या गोळ्या.
१४. जळुन खाक झालेला डोंगर.
१५. प्लेट-चमचाखुर्ची (संगीत खुर्चीच्या चालीवर वाचावे).
१६. ले ले ले सेप्ल्फि लेले रे..
१७. न लागनारा पेंड्राईव्ह. Proud
१८. नाच ग री, कशी मी नाचु...
१९. पपा नाचताहेत, मी घरी सांगनार आता.
२०. डिस्को लाईट्स
२१. लावण्या, नागीन डान्स, जनरेटर डान्स, हात-पाय मारणे.
२०. लास्ट बट नॉट लिस्ट पोठडी Happy

एकंदरीत ववी म्हणजे कल्ला कल्ला नी कल्लाच...

मल्ली , मस्त रे !!!
जळून खाक झालेला डोंगर Wink

पर्वत सुद्धा जळून खाक झाला असता एवढा वेळ पळत होते सगळे Happy

पोठडी नै.. पोतडी!!...>>> चनस,जान दे. मल्लीको माफ कर दे.. Happy (आम्ही नेहमी त्याला माफच करत आलोय.) त्याच्या डोक्यात मराठी शब्दांचा केमिकल लोचा झालाय. Proud

Sad
तुमी तिथसा मजा करुन रायले व्हते अन मी सिंहगड कालेजात ' India's dependence on Mansoon ' वर निबंध लिवत किबोर्ड umnik.gif बडवत व्हती .. यावर्षी ठरोल व्ह्त याच म्हणुन पण यक्झाम .. Sad
टाका आता एक एक जण काय झाल , कस झाल , कदि झाल , काउन झाल थे थे..
फोटुत कोण कोणच हाय कस समजाचं ?

पुढच्या वर्षी ये ववीला. मग ओळख. नायतर आता फोटोला नाक लाव अन गेसिंग कर! इथे टाक, बरोबर का चूक ते सांगू मग Wink

निव्वळ आयड्यावरुन तोंडओळख.. कठिणे रे बा..
मेरेसे नै होगा.. एक दक्षिणा वळकिची हाय फकस्त..फोटोवरुन तेबी..
बाकी इथ कोणच फोटू टाकत नै त कस्स कळणारे..आणि फोटुत लोक बोलत बी नाय त आयडी कस्सा वळखावा सांगा बर .. जाऊदेत.. इथ फक्त आय विटॅमिन घेण्याबगर पर्याय हाय का ? नाय ना.. मग तेच चालु द्याय्च.. तुमी टाका वृत्तांत त काय..फटू बिटू बी येऊदेत.. वाचते न बघते मी

मल्ली, बहोत अच्छे! Lol तरी तू कच्चा असलेला व नंतर लगेच छान पिकलेला लाडू मिस् केलास!

एक लिहायच राहून गेल. गेले काही दिवस ऑफिसमध्ये पण प्रचंड काम अन इतरही पर्सनल गोष्टींमुळे फार थकायला झाल होत . ववि झाल्यावर अगदी रिफ्रेश झालो Happy
माझ्या मते वविला यायच वेगळेपण अस की तुम्ही म्हटल तर ओळखीच्या लोकांबरोबर असता पण त्यांच्याबद्दल तुम्हाला फारस माहितीही नसत . त्यामुळे हे फिलिंग मित्राबरोबर वा फॅमिलीबरोबर जाण्यापे़क्षा वेगळ असत

>>> म्हटल तर ओळखीच्या लोकांबरोबर असता पण त्यांच्याबद्दल तुम्हाला फारस माहितीही नसत <<<
केदार, अगदी अगदी.
आता हेच बघ की तुझी माझी प्रत्यक्ष ओळख तिथेच झाली, एकमेकांबद्दल फारशी बोलाचाली न होताही आपण एकत्रीत होतो, शिवाय तुझ्या मुलिच्या खेळकरपणामुळे तर फारच बहार आली.
"आपल्या" मायबोलीचे "आपले" सदस्य येवढी एकच ओळख तिथे पुरेशी होती. Happy

बायदिवे, मी मात्र माझ्या जुन्याजाणत्या "शत्रुपक्षाला" फार म्हणजे फारच मिस्स केलं हो! काही म्हणा, त्यांच्याशिवाय मजा नाही. मित्र पण हवेत, थोडेफार खटके उडायला "शत्रूही" हवेत, थोडीफार मस्करी उडवायला "माझ्यासारखे गबाळेही" हवेत. होय ना? Proud

"आपल्या" मायबोलीचे "आपले" सदस्य येवढी एकच ओळख तिथे पुरेशी होती. स्मित >> +१०० लिंबूटिंबू Happy

@बाबु... येऊ अता पुन्हा
>>>
भुंग्या मी हे लक्षात ठेवतेय Wink

"आपल्या" मायबोलीचे "आपले" सदस्य येवढी एकच ओळख तिथे पुरेशी होती. स्मित >> +१०० लिंबूटिंबू
मस्त आहेत सगळेच वृत्तांत. ववि तर काय भन्नाट असणारच. यावेळी इच्छा असुनही येता आले नाही. Sad
नेक्ट टाईम नक्की.
बी पुढच्या वेळी पण असे मस्त मस्त गीफ्ट आणणार ना Wink
री नेकी और.... पुढच्या वविला 'मेहुण' घातल्याच पुण्य मिळु देत ना. काय वविकर्स???? Light 1 घे गो.

रिया, मल्ली, मस्त वृत्तांत Happy
हे 'पोतडी' काय आहे लक्षात येईना.

मयुरेश, बीचा मोबाईल मिळाला का रे?

मानसी, मुग्धाची वॉटर बॉटल दक्षिणाकडे आहे गं.

हे 'पोतडी' काय आहे लक्षात येईना. >> +१
मयुरेश, बीचा मोबाईल मिळाला का रे? >>> अय्यो हरवलेला की काय? Uhoh
सई, धन्स गं! तू पण लिहीना खास तुझ्या शैलीत. सगळ्या वृत्तांतामधे मिसलेलं गजरा प्रकरण डिटेल मधे लिही बरं Wink

हे 'पोतडी' काय आहे लक्षात येईना. >> असं कसं झालं!

परत निघालो तेव्हा दक्षुतैचा घसा दुखतोय म्हणाली .. तर हळुच आलेपाक, चिंचेच्या गोळ्या आल्या ना .. तेव्हा मल्ली म्हणे आता अकुच्या पोतडीतुन एकेक गोष्टी बाहेर येतील बघ Proud

मला वाटलं अकु फक्त खादाडीच्या वस्तु घेवुन आली पण ...
अतुल नि ज्यु.अतुल डान्स फ्लोअरवर आले तेव्हा मल्ली ओरडत होता की कोणीतरी मागची लाईट सुरु करा गाडीतली.. पण ऐकलचं नाही कुणी ..अकु सोडुन! मग तिने आपली बॅग .. नै पोतडी चाचपायला सुरु केली ..
मल्लीला काय आत्मविश्वास अकुच्या पोतडीवर .. त्यातुन एक पिल्लुसा टॉर्च बाहेर निघाला!! हो हो!
मग मल्लीने तो टॉर्च पकडला, त्यावर २ बोटं ठेवली नि मस्त डिस्को इफेक्ट देवुन फिरवत होता मागे Proud

हीच ती अकुची पोतडी .. बस सीट खाली लपवलेली पण अलिबाबाचा खजिना असलेली Proud Lol

कालचा ववि मस्त झाला.रेन डान्स तर भारीच होता.सर्वजण एकदम जोशात होते.बी ने आवर्जुन सगळ्यांसाठी भेटी आणल्या आणि प्रत्येकाला अगदी आग्रहपुर्वक दिल्या. डोंगराला आग लागली + शिवाजी म्हणतो ने मजा आणली .मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटून प्रचंड आनंद झाला मिसेस ला बरे वाटत न्हवते म्हणून रवी ला सांगून निघालो. एकंदरीत खूप मझा आली.

घरी आल्यावर मला 'पोतडी'विषयी एक्सपर्ट कमेंट ऐकायला मिळाली ना.... "अरे, तू सुई-दोरा नेला नव्हतास?!! काय हे!!" (सदर वाक्य कुफेहेपा... शोनाहो च्या चालीवर वाचावे... Proud ) कमेंटकर्त्या व्यक्तीने किती जरी टोमणे हाणले तरी अस्सल पुणेकर सर्व प्रकारच्या हवामानाला व परिस्थितीला तय्यार राहायचा आटोकाट प्रयत्न करत असतो हे त्या व्यक्तीस पुरेपूर ठाऊक आहे! Wink

टॉर्च साठी अकुला तिच्या पोतडीत शोधाशोध करावी लागली ह्यात सगळ्या स्मार्टफोन वापरणार्‍या व्यक्तींचे अपयश आहे.... इतके पॉवरबाज लाईट असताना अकुला तुम्ही अंधारात बॅटरी शोधायला लावलीत.. शोभतंय का तुम्हाला आँ...

सकाळपासून एवढा दंगा केल्यावर तेवढा उजेड डोक्यात राहिला असता तर स्मार्टफोनची तरी गरज काय होती?
पुढच्या वेळेस मिशन वविसाठी खाणकामगारांसारखी टोपीलाच टॉर्च असलेली डोकी संयोजकांनी त्याच खर्चात द्यावीत ही नम्र विनंती. Proud

Pages