नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा ओके सोनाली. मी उंच माझा झोकापण फार क्वचित बघितली आणि हीपण बघत नाही. कलर्सवरची हृदयी प्रीत जागते, बघितली. त्यात ती होती. तिच्या बोलण्याचा टोन सेम असतो बऱ्याचदा. जे काही तिचे थोडेफार काम बघितलंय त्यावरून वाटतं.

हो ऋग्वेदीच्या बोलण्याचा टोन सेम असतो.. पण तिच्या वाट्याला आजपर्यंत ज्या काही गिन्याचुन्या भुमिका आल्यात त्या काकुबाई छाप असल्याने "अगबाई" हे कायम असणार.. बाकी तिच्या हातवार्‍यांबद्दल जे सांगितलय ते खर आहे.. ती व्यक्तीरेखेची लकब आहे.

बाकी तिच्या हातवार्‍यांबद्दल जे सांगितलय ते खर आहे.. ती व्यक्तीरेखेची लकब आहे. >> पण ती खूप ओढून ताणून आणल्यासारखी वाटते. सहज वाटत नाही. आत इथे वाचल्यापासून तर हातवार्‍यांकडेच जास्त लक्ष जातं :).
साठे गुरुजी पण काल खूप हातवारे करत होते (परत हातवार्‍यांकडे लक्ष ;)) पण त्यांचे हातवारे नॅचरल वाटले, नाटकी नाही.

Kal chya Epi. madhe chakk patalyantri Lalitabai Maharashtra til dushkala chya ullekhane kasawis zali . Maze tar man bai bharun aale agadi......

Ya dhagya var mandali firkat nahit ki.kaay agadu ch. Aso, kal cha Dollar Lakshmi Saniya from USA vala Epi mast zala. Vachchi Aatya mhanate " Agabai Lalita, mazya varun bhakar tukada ovalnar aahes ki kay" hi vinodachi height hoti tyat....

आता ललिता आणि माधवराव , सानियाला सून करायच्या विचारात आहे . स्वानंदीचा पत्ता कट करायचा आहे .

या मालिकेतले बरेच जण आवडू लागले आहेत .
वच्छी आत्या , नील , संपदा , वसंतराव , ललिता , निलिमा वहिनी .

पण स्वानंदीला चांगलं बनवण्याच्या नादात संपदाला जरा जास्तच वाईट दाखवतायेत .
म्हणजे ती हट्टी आहे ते ठिक आहे पण म्हणून साखारपूड्याला स्वानंदी आजी ची साडी आणि दागिने घालण्याईतकी गुणी आणि संपदा डिझायनर साडी आणि आजीचा हार विकुन नविन हार आणणारी वाईट दाखवायची गरज नव्हती .

स्वस्ति +१. तरीही संपदा आवडतेच.

सिरियलही बरी वाटते बघायला. झी मराठीच्या इतर कुठल्याही हिरोपेक्षा नील बरा वाटतोय. फक्त त्याला घराच्या परिस्थिती बद्दल काहीच माहित नाही हे फारच खटकतंय.

सम्पदा उर्फ रेश्मा शिन्दे जय मल्हार सिरीयल मध्ये नळदुर्गच्या राणीच्या भूमिकेत होती. तेव्हा आवडली होती. मस्त दिसते ती स्वानन्दीपेक्षाही.

त्याला घराच्या परिस्थिती बद्दल काहीच माहित नाही हे फारच खटकतंय. +१

पण स्वानंदीला चांगलं बनवण्याच्या नादात संपदाला जरा जास्तच वाईट दाखवतायेत .
>> डेली सोप्स मध्ये माणसांचे ब्लॅक आणि व्हाईट असे दोनच रंग असतात.

राईट पियु, बर स्वानंदी चांगली म्हणजे काय? तर घरच्यांच्या हो मध्ये हो मिसळणारी... संपदाला नसतील जुन्या डिझाईन्सचे दागिने आवडत, किंवा तिच्या लाइफस्टाईलबद्दल तिच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत पण म्हणुन लग्गेच ती वाईट ठरत नाही..

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्नः हे आपल्याकडच्याच जु.जा लोकांनी म्हणुन ठेवलय ना?

‪#‎तात्यां‬ पासून प्रेरणा घेत आम्ही मान्य करतो कि हो नाकावर राग असलेली, जे मनात तेच ओठात असलेली, फटाकडी संपदा (नांदा सौख्य भरे फेम) आम्हाला (म्हणजे मला) प्रचंड आवडते.
बाकी काही बोला किंवा बोंबला, संपदाचा presence graceful आहे. ती आल्यावर दिल गार्डन गार्डन होतं , खोटे नाही देवाशपथ सांगतो.
नाही म्हंटले तरी साला स्टार प्रवाह वरच्या "लगोरी" पासून बघतोय, आमच्या संपदाला जरा जास्तच वाईट दाखवतायेत .
ठीक आहे चालायचंच, "कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम हैं, केहेना; छोडो बेकार कि बातोंको------"
डोळे फाडून बघू नका, बहिण आहे ही तुमची…!
- "संपदा"क_ ‪#‎jammy‬ ( inspired by आमचा लाडका ‪#‎मारियाचा‬ ‪#‎तात्या‬ )maxresdefault (2).jpg

साल्यानो डोळे फाडून बघू नका, बहिण आहे ही तुमची…!

- "संपदा"क_ ‪#‎jammy‬ ( inspired by आमचा लाडका ‪#‎मारियाचा‬ ‪#‎तात्या‬ )

गेल्या काही दिवसांपूर्वी भोंडल्याची गाणी गुणगुणत होते तर ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडूदे करीन तुझी सेवा च्या पुढे सारखं या सिरीयलचंच टायटल साँगच आठवत होतं Proud

मला त्या भोंडल्याचा धागा वाचल्यापासून प्रश्न पडलेला.... या टायटल साँगमध्ये त्या सार्‍या जणी खेळत असतात तोच भोंडला का?

कथेची थोडी फार रूपरेखा अगोदरच तयार असावी अस वाटतय .
ललिताबाई - माधवरावांची कारस्थान हळूहळू उघडकीला येतायेत .
वच्छी आत्याच्या नवर्याचा काय घोळ आहे ते अजून गुलदस्त्यात .

मालिका हळूहळू पकड घेतेय खरं

अचाट आणि अतर्क्य चालू आहे.

इतके पोचलेले माधव-ललिता त्या वच्छीचा सल्ला का घेतील ? आणि इतके हुशार वसंतराव विश्वास कसा ठेवतात की माधव-ललितीने ५० लाख + दागिने दिले ?

नील नोकरी करतो ना मग ललिताला नसते उद्योग का करावे लागतात ?

ते वच्छीचा सल्ला घ्यायला नाही जात, तर तिने वसंतरावांना हे सगळं सांगायला साथ द्यावी म्हणुन येतात.

नील नोकरी करतो ना मग ललिताला नसते उद्योग का करावे लागतात ?>> पैशांची हाव!

हो अंजली, त्या अ‍ॅक्टरच नेहमी कुठल्याही भुमिकेत हेच बेअरींग असत, जस अरुण नलावडेंच "श्वास" नंतर एकच बेअरींग घेतल गेलय.

Pages