नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिची मोठी बहिण या आधी स्टारप्रवाह वरच्या लगोरी मध्ये होती ४ मैत्रिणी पैकी एक

तो हिरो चिन्मय उदगीरकर, स्टार प्रवाहच्या 'स्वप्नांच्या पलीकडले' ह्या शिरेलीत होता. तेव्हा तिथे श्री बाळ व्हिलन होता.

रूग्वेदीला कॉलेजपासून ओळखत्ये त्यामुळे "ह्या" वयात एवढ्या मोठ्या बाईचे रोल करते म्हणून वाईट वाटतं Wink (संदर्भ - उंच माझा झोका मधे माधवची आई , ह्या मालिकेतही बर्यापैकी मोठी बाई )

ते जाहीरातीत सुहास परांजपे कोणाला तरी खोटं सांगत असते कि आम्ही कालंच युरोपहून आलो.
त्यावर ती बाई म्हणते कि त्या अमुक-अमुक म्हणे परवाच तुम्हाला भेटल्या होत्या रस्त्यात.
आतुन सुनेचा आवाज.."आई.. त्या अमुक अमुक (बहुतेक जोशीबाई) नी दिलेले लाडू वळायला घ्यायचे का?"

मला काही कळलंच नाही. अमुक अमुक ने नुसतंच सारण किंवा रॉ लाडू दिला का? आपला आपण घरी जाऊन वळून घ्या म्हणून? लाडू दिलेत त्यांचा शेप नी साईझ आवडला नाही का? Uhoh

सीन जुळवुन आणायचा म्हणून कैच्याकै. Angry

सगळ्या बहिणी मिळून गप्पा मारत असतात तो सीन जाम आवडला .
स्वानंदी , संपदाच्या केसाना तेल लावत असते तो .
"हा महेश कोण गं? " जुईलीचा प्रश्न आणि संपदाची रिअ‍ॅक्शन दोन्ही मस्त Happy

<<तो महेश जरा कोणीतरी हॅण्ड्सम घ्यायचा ना ! ती संपदा किती भारी आहे>> कसले जाडे जाडे आणि बोजड लोक दाखवतात लग्नाचे मुलगे म्हणून Happy
स्टार प्रवाहच्या 'स्वप्नांच्या पलीकडले' ह्या शिरेलीत श्री बाळ व्हिलन होता? अंजू बरीच माहिती आहे ग Happy
सुहास परांजपे पण वयानी लहानच आहे पण तिच्या वाट्याला पण कायम लग्नाच्या मुला मुलींच्या आई चे रोलच असतात Happy

सुहास परांजपे आणि ऋग्वेदी लहान म्हणजे नक्की काय वयोगटात आहेत ? खरंच जाणून घ्यायला आवडेल कारण त्यांना ठराविक भूमिकांत बघून ऋग्वेदी निदान चाळीशीची आणि सुहास परांजपे पन्नाशीची असेल असं वाटतं !
मागे वादळवाट मधील मेघना वैद्य ( ? ..अदिती सारंगधरच्या आईचं काम करणार्‍या ) पण प्रत्यक्षात वयाने खूपच लहान आहेत असं वाचल्याचं आठवतं.

बाकी यच्चयावत मालिका लग्न आणि प्रेम ह्याच गोष्टींशी निगडीत असतात. त्यात नवीन एक दाखल. ह्या विषयावर फोकस नसणारी एकच आठवते ती म्हणजे 'असंभव'. पल्लवी जोशीची त्यानंतरची 'अनुबंध' ही सरोगेट मातृत्वावर होती पण ते लग्नाचंच एक्स्टेंशन तसं म्हटलं तर !

चिन्मय उदगीरकर स्वप्नांच्या पलीकडले मध्ये बरा वाटलेला, यात मठ्ठ वाटतोय! झी च्या नायकांचा थप्पा लागला की असंच होतं बहुदा...

स्वानंदीची ओव्हर अ‍ॅक्टींग नाही आवडली! ही तर जान्हवी पेक्षा ही दोन गुणांनी सरस(?) दाखवलीये! रस्त्यातील हाणामारी वै तर अनावश्यकच!!

सुहास परांजपे कॉमेडी रोलही छान करते! उगा भडक व्यक्तीरेखा मारलीये तिच्या गळ्यात ! थंडपणेही जहांबाजपणा ठसवता येतो हे झीच्या दिग्दर्शकांना ठाऊकच नाहीये का?

वच्छीची हावभाव पद्धत सेम असते. झी मध्येच एका सिरीयल मध्ये खाष्ट सासू दाखवलेली. पण यातील परीस्थितीने नाडलेली वच्छी बरी वाटतेय.

एकंदर : ओव्हरअ‍ॅक्टींग, तोच तोच पणा यामुळे या सिरीयल वर काट!

अवांतर : वहिनी हा शब्द बरेच जण वाहिनी असा का लिहीतात बुवा? काना-मात्रा मोजण्यात गडबड होते की हाच रूढ शब्द आहे असा (गैर)समज आहे?

भडक व्यक्तीरेखा मारलीये तिच्या गळ्यात >+१ आणि मंसु ही भडक आहे अगदी! हीरोचे वडील तर अतिशय हावरट ,आचरट दाखवले आहेत.

तुच्छी नाही टुच्ची.............हे काय आहे?आणि टुच्ची म्हणजे तरी काय?
नुस्ती बोलते ती तुच्च्छी, करते ती वच्च्छी>>>>>>>> हे काय आहे?
बाकी न बघता च अंदाज आलेला आहे शीरियलेचा! ------/\----------------------

मला त्यांचं ब्रीदवाक्यच पटलेलं नाही. माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. काहीच्या काही. आख्खा माणूस कधी खोटा असतो का? आणि नात्यात खोट यायला तो काय व्यवहार आहे का? एकीकडे भावनांचा पूर आणून नात्यातला ओलावा दाखवायचा तर कशाला हवं खरंखोटं? आपलं माणूस मानून चला की पुढं.

वच्च्छी, १७६० सासूबाईमध्ये कॉमेडी रोलमध्ये होती. निर्मिती सावंतची सासू.

बाकी ही नवीन शिरेल पहिले दोन दिवस अर्धी बघितली, आता त्राण नाही.

स्वानंदीची काकू मुकबधिरांच्या बातम्यात करतात तसे हातवारे करून बोलत होती >>> हो कालच्या भागत पण , विशय स्वानंदीच्या लग्नाचा आहे , अस म्हणताना तिने चक्क माळ घालायची अ‍ॅक्शन केली . पण मस्त आहे ती.

या स्वानंदीला काय अगदी त्याग मुर्ती वगैरे दाखवलय .बाबा-काका चा खर्च वाचवण्यासाठी मुलाचा फोटोही न बघता लग्नाला तयार होते आणि वर संपदाला लेक्चरही देते . तेही अगदी पुस्तकातून पाठ केलेले उतार्यांसारखं .

आणि परवाच्या भागात तिच्या घरचे म्हणत होते की ही मनासारखा जॉब करते म्हणून - नक्की काय करते .
बघाव तेन्व्हा सायलीला मागे घेउन स्कुटीवरून फिरत असते .
सायली तिच्या ऑफिसमध्ये आहे की सायलीला सोडायच- आणायच काम हीच आहे .

हिरो आवडला . त्या सायलीशी काय मस्त नेत्रपल्लवी करतो तो Happy .

आजचा भाग पाहीला उत्सुकतेपोटी. काय इरिटेटिंग आहे. टोमणे मारणारी सासू. बरं अश्या सासवा सिरिअल्समधे पुष्कळदा दिसतात त्यामुळे त्यात आश्चर्य नाही वाटलं. पण ती सुनेला टोमणे मारत असताना तो सासरा हसत असतो आणि टोमणे एंजॉय करत असतो त्याने तो सीन पारच डिजगस्टिंग झाला Sad काहीही दाखवतात का?

त्या हिर्वीणपेक्षा म्हाळसा अधिक उत्तम काम करते....

तो चिउ बहुतेक दुसरा आदे होईल.... (रोल च्या दृष्टीने... दिसण्यात नाही)

टायटल सौंग मधला तिचा नाच बघून अगदी धन्य वाटले की अरे कुठे नेऊन ठेवले झी मराठीने मजला !

चर्चे वरुन ही मालिका जुयेरेगा सारखी वाटते..फ़क्त लसुण मिर्ची च्या फ़ोडणी घातलीये हिर्वीण्ला तडफ़दार(म्हणजे काय त्यानांच माहित) दाखवुन
हिर्वीण चे बाबा...मनोहर पर्रिकरांन सारखे दिसतात.

पण ती सुनेला टोमणे मारत असताना तो सासरा हसत असतो आणि टोमणे एंजॉय करत असतो त्याने तो सीन पारच डिजगस्टिंग झाला >>>>>>>>>>>>>>>> + १००००००००००००००

तो महेश , संपदापेक्शा जास्त लाजत होता .
आणि त्याच्या आईवडीलांसारखा अजिबात दिसत नाही . तिसराच कोणीतरी वाटतो .

संपदाचा नवरा अगदीचं चमन घेतला आहे.

एक्झॅट उलटं - संपदाला छानछौकीची आवड तर नवरा आणि सासर साधे. हिरवीणीला साधेपणाची आस तर सासू-सासरा असे ..............

Pages