मी जालावर दिवसातून एकदा तरी कुठल्या ना कुठल्या विषयाचा धागा काढतो. कधीतरी दुसरीकडच्या उरलेल्या पोस्टपासून धागा करतो. कदाचित मस्का कमी वापरत असेल म्हणून पण माझ्या धाग्याला साध्या वादावादीचाही भाव मिळत नाही. प्लीज मला व्यवस्थित टिप्स मिळतील का धाग्याचा मुद्दा तयार करण्यासाठी ? धन्यवाद.
मी धाग्यात साधारण हे..हे टाकतो :
१) अड्डा, कट्टा, विपू याचा कॉपी पेस्ट.
२) लाल तिखट खरड - अर्धा चमचा. नाहीतरी मिरचीची अर्धीकच्ची पोस्ट.
३) अम्रिकेतले मराठी अर्धा वाटी
४) दोन चमचे मोदी आणि केजरी
५) दोन चिमुटभर गफ्रे आणि सारुक.
६) थोडासा पीळ मारून
७) जात, व्हेजनॉनव्हेज चवीप्रमाणे
८) हे सर्व एकत्रीत करुन धागा पोस्टून घेतो आणि दर १५ मिनिटांनी एडिटून वर ठेवतो.
९) मी रिक्षा बजाजचीच वापरतो.
इथे एका दादाने धागा बनवला. असा धोधो प्रतिसाद कधीच येत नाही माझ्या धाग्यांना : http://नेहेमीचे यशस्वीधागे.कॉम
आणि हो, प्लीज इथे विषयाला धरून पोस्ट टाळा.
http://www.maayboli.com/node/54714 या धाग्याशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
खिल्ली उडवण्यास प्रतिबंध केला
खिल्ली उडवण्यास प्रतिबंध केला तर सुमारे सत्तर टक्के सदस्यत्वे निष्क्रीय होतील.
खिल्ली उडवण्यास प्रतिबंध केला
खिल्ली उडवण्यास प्रतिबंध केला तर सुमारे सत्तर टक्के सदस्यत्वे निष्क्रीय होतील.
>>>
यात खिल्ली उडवणारे धरले आहेत की ज्यांची खिल्ली उडवली जाते ते धरले आहेत की दोन्ही?
डुप्लिकेट डुप्लिकेट !!!
डुप्लिकेट डुप्लिकेट !!!
>>>कोणत्याही धाग्याशी थेट
>>>कोणत्याही धाग्याशी थेट संबंध नाही जोडला तरी स्वतंत्रपणे हा धमाल आहे<<<
>>>मात्र माझ्या धाग्याच्या कंटेंटचा रोख अजिबातच बी किंवा कुणा एकावर नाही हे वाचताच लगेच लक्षात येत आहे असे मला वाटते.<<<
दूरान्त आणि जी एस ह्यांच्या ह्या दोन्ही विधानांशी सहमत!
मात्र जी एस ह्यांच्याशी सहमत असण्यामागे केवळ 'आजवर त्यांनी व्यक्तीगत रोख असलेले लेखन केलेले नाही' असा स्वानुभव कारणीभूत आहे. अन्यथा, हा धागा 'बी' ह्यांच्या त्या धाग्यावरून निघाला व हा धागा काढण्यामागे 'बी' ह्यांच्या (किंवा त्यांच्यासारख्यांच्या) धागे काढत राहण्याच्या सवयीची थट्टा करण्याचा हेतू आहे हे निदान मला तरी अजिबात खोटे वाटत नाही.
'जे वाटले ते म्हणणारा'
-'बेफिकीर'!
>>>यात खिल्ली उडवणारे धरले
>>>यात खिल्ली उडवणारे धरले आहेत की ज्यांची खिल्ली उडवली जाते ते धरले आहेत की दोन्ही?<<<
तुम्हालाही दंडवत!
स्वतःची खिल्ली उडवून घेऊन मग लोकप्रिय होण्याची प्रणाली राबवणारा तुमच्याशिवाय एकही आय डी माझ्या माहितीप्रमाणे नाही.
(असलोच तर कदाचित मी असेन)
स्वतःची खिल्ली उडवून घेऊन मग
स्वतःची खिल्ली उडवून घेऊन मग लोकप्रिय होण्याची प्रणाली राबवणारा तुमच्याशिवाय एकही आय डी माझ्या माहितीप्रमाणे नाही.
>>>>>>
यातील प्रणाली हा शब्द मला कॉलेजच्या काळात घेऊन गेला

आलो जरा ब्रेक घेऊन
तुम्ही 'टीपापाला शिव्या' हे
तुम्ही 'टीपापाला शिव्या' हे व्यंजन वापरत नाही असं दिसतंय.
तसंच धागा एडिट करून वर येत नाही, प्रतिसाद आले की येतो हे तुम्हाला माहीत दिसत नाही.
हरकत नाही, शिकाल हळूहळू.
गद्या /पद्याचे वाक्यशः विडंबन
गद्या /पद्याचे वाक्यशः विडंबन आणि एखाद्याची वैयक्तिक खिल्ली उडवणे यात फार फरक आहे. >>> जीएस, मी १००% सहमत आहे. मी ही लोकांना अनेकदा हेच सांगायचा प्रयत्न करतो. येथे तशी धाग्याची खिल्ली उडवणे, विडंबन करणे चुकीचे आहे असे मी अजिबात म्हणत नाही. मी एवढेच म्हणत होतो की त्या लिन्कची काहीच गरज नव्हती - विडंबनाची मजा लोकांना ते स्वतःहून लक्षात येउ देण्यात आहे. पण तुझा पॉइंट समजला.
एक जुना आय डी आहे. तो सामान्य
एक जुना आय डी आहे. तो सामान्य विषयांवरचे धागे काढतो हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्याशी व्यक्तिशः अनेकांचे संकेतस्थळावर मतभेद आहेत. त्याने काढलेल्या धाग्यांमध्ये 'ह्या धाग्याची मजा करा किंवा थट्टा करा' असे पोटेन्शिअल आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. जो एक सॉफ्ट टारगेट आहे. ज्याच्या बाजूने फक्त तो एकटाच बोलतो, दुसरा कोणीही नाही. ज्याला बोलल्यामुळे आपले येथील अस्तित्त्व धोक्यात येत नाही.
ज्याच्यावर काढलेले धागे तो कधी बघतो, कधी नाही.
ज्याचे धागे काढणे हे संकेतस्थळाच्या घटनेनुसारच असते.
जो कोणत्याही प्रचलीत वादांमध्ये, जसे राजकीय, ऐतिहासिक विषय किंवा तत्सम, नसतो.
त्याची थट्टा त्याच्याच धाग्यावर जाऊन केल्यावर तो शाब्दिक प्रतिकार करून शांत बसतो. सूडबुद्धीने पुढे तसे वागत नाही.
जो खरेच निरागस आहे की नाही ह्याबाबत छातीठोकपणे कोणीही काहीही म्हणू शकत नाही.
ज्याला 'तू आता मानसोपचार घे' असे जाहीररीत्या, चारचौघांत सांगितल्यावरही जो अवास्तव आक्रमक होत नाही.
ज्याने स्वतःहून कधी कोणाला दुखावल्याचे निदान गेल्या दोन, पाच वर्षांत काही दाखले नाहीत.
त्याची थट्टा करण्यासाठी आणि त्या थट्टेवर हरकत घेणार्या प्रतिसादांवर स्वतःची ठाम भूमिका लादणारे प्रतिसाद देण्यासाठी वेगळे धागे कशाला म्हणे?
हिंदी हि राष्ट्रभाषा नाही .
हिंदी हि राष्ट्रभाषा नाही . नाही तर पुरावे दाखव.
आता अपेक्षा करा: बी ह्यांनी
आता अपेक्षा करा:
बी ह्यांनी किती धागे आकसाने काढले
बी ह्यांनी किती धागे केवळ काही आय डीं वर टीका करण्यासाठी काढले
ह्या रेकॉर्ड्सची!
ही माझी पश्चातबुद्धी असावी.
हरकत नाही.
बीं नी उगाच तसे धागे काढलेले नाहीत. बहुधा हे त्यांच्याच त्या त्या धाग्यांमध्ये सिद्ध व्हावे.
प्रश्न इतकाच आहे, की थट्टेचा विषय मिळाला ही इथे येण्याची भूक आहे का? की आपण इतरही काही करतो?
त्याची थट्टा करण्यासाठी आणि
त्याची थट्टा करण्यासाठी आणि त्या थट्टेवर हरकत घेणार्या प्रतिसादांवर स्वतःची ठाम भूमिका लादणारे प्रतिसाद देण्यासाठी वेगळे धागे कशाला म्हणे? >> बेफि, ही कोणाची वैयक्तिक थट्टा आहे असे तुम्हाला वाटते का? हे त्या धाग्याचे विडंबन आहे. खरे म्हणजे ते तसे नसते तरी हा धागा धमाल होताच. जेम्स बॉण्ड च्या प्रतिक्रियेवरून असेच वाटले की माझ्यासकट अनेकांनी तो सुरूवातीला त्या धाग्याचे विडंबन म्हणून न वाचता एक जेनेरिक पॅटर्न ची खिल्ली उडवणारा अशा अर्थाने वाचला (जसे मी ते एक दोन धागे काढले होते - मुद्देवंचितांकरता वगैरे, तशाच प्रकारचा वाटला मला)
हेमंत, आपल्यामते हिंदी
हेमंत, आपल्यामते हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही? आणि नसल्यास मग राष्ट्रभाषा काय आहे? पुरावे नाही दिले तरी चालेल, उत्तर द्या
>>>बेफि, ही कोणाची वैयक्तिक
>>>बेफि, ही कोणाची वैयक्तिक थट्टा आहे असे तुम्हाला वाटते का?<<< होय
वेल, अॅबसोल्यूटली नथिंग अगेन्स्ट जी एस.
पण हा धागा वैयक्तीक आहे असे मला वाटते,
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही? !ऐकावे ते नवलच..!!!
तसे असेल तर मग उत्तर ऐकायला उत्सुक आहे!!
आयला, आणि इतके दिवस मी विडंबन
आयला, आणि इतके दिवस मी विडंबन म्हणजेच एकप्रकारची थट्टा असं समजत होतो...
राज, तुम्हाला मी प्लस वन दिला
राज,
तुम्हाला मी प्लस वन दिला
फारएण्ड सहमत, तसेच, कोणी इथे
फारएण्ड सहमत,
तसेच,
कोणी इथे भरमसाठ धागे काढत असेल जे दुसर्या कोणाला आवडत नसेल आणि त्यावर त्याने भाष्य केले तर त्याला लगेच वैयक्तिक टिका नाही म्हणू शकत. माझ्यामते वैयक्तिक टिका म्हणजे वैयक्तिक बाबींवर टिप्पणी करणे.
मला सलमानचे चित्रपट आवडत नाहीत ते निव्वळ गल्लाभरू मसालापट असतात.
मला अमुक तमुक आयडीचे धागे आवडत नाहीत, ते तकलादू आणि टुक्कार असतात.
या दोन्हीमध्ये काही फरक नाही आणि कुठेही वैयक्तिक टिका नाही, हीच भावना प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो ईतकेच.
ऋन्मेष, १. विशिष्ट धाग्याची
ऋन्मेष,
१. विशिष्ट धाग्याची लिंक देणे
२. त्या धाग्याबरहुकुम आपला धागा स्ट्रक्चर करणे
३. धागा काढण्याचा इतर कोणताही उद्देश असण्याची शक्यता नसणे
४. मूळ धाग्याची खिल्ली (ह्या विडंबनात्मक धाग्यावर मूळ धाग्याची खिल्ली उडवण्यामार्फत) उडवली जावी ह्यापेक्षा वेगळा उद्देश सकृतदर्शनी नसणे
ह्या बाबी धाग्याला (माझ्यामते) व्यक्तीगत रोख असलेला धागा बनवतात.
चू भू द्या घ्या
तूर्त
हे मा शे पो
ऋनम्या, समस्त संकेतस्थळांकरता
ऋनम्या, समस्त संकेतस्थळांकरता डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु असते ते विश्वव्यापी जाळे असते. ते प्रादेशिक कसे?
धागा 15.34 ला आज काढला
धागा 15.34 ला आज काढला गेला
त्यानंतर सर्वच मान्यवरांनी प्रतिक्रिया लिहील्या आहे
मो यांची प्रतिक्रीया 20.17 ला आली त्यानंतर काही मान्यवरांना साक्षात्कार झाला. विडंबना नसून भलते आहे असे वाटू लागले. त्या आधी साक्षात्कार त्यांना झाला नव्हता
मो यांचे अभिनंदन
http://www.thehindu.com/news/
http://www.thehindu.com/news/national/hindi-not-a-national-language-cour...
Hindi, not a national language: Court
Gujarat High Court has observed that though majority of people in India have accepted Hindi as a national language, there was nothing on record to suggest that any provision has been made or order issued declaring Hindi as a national language of the country.
The observation was made by division bench of Chief Justice S.J. Mukhopadhaya and justice A.S. Dave recently while rejecting a Public Interest Litigation (PIL) by one Suresh Kachhadia.
Mr. Kachhadia had filed the PIL last year seeking direction to Central and State government to make it mandatory for manufacturers to print details of goods like price, ingredients and date of manufacture in Hindi.
The court observed, “Normally, in India, majority of the people have accepted Hindi as a national language and many people speak Hindi and write in Devanagari script but there is nothing on record to suggest that any provision has been made or order issued declaring Hindi as a national language of the country.”
“No mandamus can be issued on any manufacturer or others for giving details or particulars of package in Hindi in Devanagari script,” it further said.
It was contended by Mr. Kachhadia’s lawyer that Hindi was the national language and was understood by a large number of persons in the country.
The Counsel representing central government submitted that specific provision has been made under the Standard of Weight and Measures (Packaged Commodities) Rules of 1977 that particulars of declaration should be in Hindi in Devanagari script or in English.
The court said that the Constituent Assembly while discussing the Language Formula noticed the recommendation of the Sub-Committee on Fundamental Rights, which recommended the formula as per which, “Hindustani, written either in Devanagari or the Persian script at the option of the citizen, shall, as the national language, be the first official language of the Union. English shall be the second official language for such period as the Union may, by law, determine.”
However, in the constitution, Hindi was declared as an official language and not a national language.
The court in its order said Part XVII of the Constitution deals with Official Language. Under Article 343, official language of the Union has been prescribed, which includes Hindi in Devanagari script and English.
http://www.telegraphindia.com
http://www.telegraphindia.com/1130420/jsp/frontpage/story_16806546.jsp#....
Hindi is an official language
OUR LEGAL CORRESPONDENT
New Delhi, April 19: Article 343 of the Constitution states that Hindi in Devnagari script is the official language of India. The general misconception is that it is the national language.
The article also states that English is an additional language for official work.
Article 345 says India may officially adopt one or more languages in use in the state or Hindi/English as the language or languages to be used for all or any of the official purposes of that state.
India has also granted official status to about 22 other languages.
India cannot claim to have a national language as neither any statutory provision nor the Constitution defines any language as a national language.
In January 2010, while dealing with a complaint relating to packing of commercial products, Gujarat High Court had ruled that Hindi was not the national language.
The High Court bench, headed by then Chief Justice S.J. Mukherjee, had refused to direct the authorities to carry details of the packed goods in Hindi, saying though it was one of the official languages, it was not the national language.
The judgment has since not been challenged in any court of the country.
हे ठिक आहे पण हिंदी
हे ठिक आहे पण हिंदी राष्ट्रभाषा नाही हे इंग्लीश या परदेशी भाषेतून का सांगितले?
विडंबन नाही का?
मो यांची प्रतिक्रीया 20.17 ला
मो यांची प्रतिक्रीया 20.17 ला आली त्यानंतर काही मान्यवरांना साक्षात्कार झाला. विडंबना नसून भलते आहे असे वाटू लागले. त्या आधी साक्षात्कार त्यांना झाला नव्हता >> विशालदेव हे असेच झाले होते माझ्या बाबतीत. सकाळी उठून माबोवर पहिले हे वाचले. हे काय आहे डोक्यात शिरायला वेळ लागला तर एवढे काय त्यात?
मी बापडा पेपर वाचतो . तर मला
मी बापडा पेपर वाचतो .
तर मला घटनेत कोठे हिंदी राष्ट्रभाषा ( national language ) आहे ते दाखवाल का?
कामकाजाची भाषा ( official language ) नव्हे.
मला वाटते कि राज ठाकरे यांनी पण हाच आक्षेप घेतला होता
मी मात्र खेळकर पध्दतीने
मी मात्र खेळकर पध्दतीने बघतोय
यात ॠन्मेश मिर्ची सतत विपूत रिक्षा फिरवणारे इ. आयडींवरून विनोद केला आहे निव्वळ गंम्मत म्हणून ठिक आहे
पण अशाच दुसर्या वैयक्तिक रोख असलेल्या धाग्यावर काही मान्यवरांना उकळ्या फुटलेल्या होत्या ते आठवले बाकी काही नाही
कोणता तो धागा?
कोणता तो धागा?
अहो मी काही मान्यवरांना बद्दल
अहो मी काही मान्यवरांना बद्दल बोललो
तुम्ही मान्यवरांमधे येत नाही
ओके ("तुम्ही" ची ही गरज नाही
ओके
("तुम्ही" ची ही गरज नाही
)
फ्री रिस्पेक्ट आहे फुकटात
फ्री रिस्पेक्ट आहे
फुकटात मिळतोय घ्या ना
कोणता तो धागा?>>>>> बहुतेक
कोणता तो धागा?>>>>>
बहुतेक हा धागा असावा.. एवढ्या मध्ये हाच तसा होता..
http://www.maayboli.com/node/54651
आणि हा धागा कुठून आला होता ते तिथेच विचारशील
अर्रे व्वा!! बघता बघता
अर्रे व्वा!! बघता बघता भरभरून प्रतिसाद मिळाले की! अभिनंदन!!
जर हिंदी राष्ट्रभाषा नाही तर कोणती राष्ट्रभाषा आहे ते देखील सांगा.
अधिकृत रीत्या घटनेत सुरुवातीला कुठलीच भाषा राष्ट्रीय भाषा म्हंटले नव्हते.
पण अनधिकृत रीत्या फिल्मी टप्पोरी भाषा, किंवा मराठी, हिंदी, उर्दू, व मोठ्या प्रमाणात इंग्रजी वापरून जे काय गचाळ वाङ्मय तयार होते त्या भाषांना राष्ट्रभाषेपेक्षा जास्त मान्यता व आदर आहे. त्यातल्या त्यात त्या भाषांमधे तरहि गझला लिहील्या तरी खूप प्रतिसाद मिळतील.
साधारण बेफिकीर, ऋन्मेष, बी यांना वेळ असेल तर धागे भरभरून वाहू लागतात. तसेहि भा़जप, काँग्रेस यांच्याबद्दल काय वाट्टेल ते लिहीले की बर्याच लोकांची झुंबड उडेल तुमच्या धाग्यांवर!!
तसा मलाहि बराच वेळ असतो पण आजकाल फारशी इच्छा नाही लिहिण्याची.
बेफिकीर, आपण जे वर चार मुद्दे
बेफिकीर,
आपण जे वर चार मुद्दे मांडलेत त्या चारही व्यक्तीगत बाबी नसून संकेतस्थळाशी निगडीत वर्तन असल्याने त्यावर संयमित भाषेत वा विडंबनाचा आधार घेत टिप्पणी करणे माझ्यामते वैयक्तिक हल्ला झाला नाही.
खालील दोन्ही लिंक वर जाऊन आपली पोस्ट बघा, मी धागा कसा हिट करतो याचे आपण सुंदर विश्लेषण या दोन्ही ठिकाणी केले होते, याला मग आपण काय म्हणाल, वैयक्तिक हल्ला ? माझ्यामते नक्कीच नाही :
१) http://www.maayboli.com/node/51814
२) http://www.maayboli.com/node/54501?page=1
वा रे रुन्म्याभाउ, याला
वा रे रुन्म्याभाउ,

याला म्हणतात 'ज्याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात घालणे'
विडंबन म्हणजे थट्टा खिल्ली
विडंबन म्हणजे थट्टा खिल्ली जे काय असते ते त्या कलाकृतिचे असते, त्या कलाक्रुतिच्च्या निर्मात्याचे नसते. मला हां धागा पाहताच मुळ कालाकृति आठवली. इथे प्रतिसाद देतानाही मी ह्या विडाम्बनाला प्रतिसाद दिलाय. मूळ साहित्याबद्दल काहीही नाही त्यात. तसेही काहीही न बोलण्याबद्दल मला बजाव्लेले आहे त्यामुले मी ते टाळते च.
मायबोलीवर जिथे कवितांची विडंबने झालीत तिथे बहुतेकानी मुळ साहित्याची लिंक दिलेली आहे. काही वेळेस मुळ साहित्यावर ही लिंक दिलेली आहे. साहित्यासोबत कवीची खिल्ली उड़वणे हां प्रकार माझ्या मते तडका मालिकेवर झालाय. अर्थात हे माझे मत आहे.
>>विडंबन म्हणजे थट्टा खिल्ली
>>विडंबन म्हणजे थट्टा खिल्ली जे काय असते ते त्या कलाकृतिचे असते, त्या कलाक्रुतिच्च्या निर्मात्याचे नसते<<
असं काहि नसतं हो. आध्य विडंबनकार, केशवकुमार यांना मुळ कवींची थट्टा करण्याचा मोह आवरता आला नाहि (झेंडूची फुलें), तर इतरांची काय कथा...
>>>>विडंबन म्हणजे थट्टा
>>>>विडंबन म्हणजे थट्टा खिल्ली जे काय असते ते त्या कलाकृतिचे असते,<<
काहीही गृहितक. उगाच सारवासारव ......
तर मग तडका करणारे लोकांना सुद्धा हेच गृहितक लागू होइल/आहे असे 'ते' सुद्धा म्हणून शकतील.
स्वतः आचार्य अत्रे ह्यांनी म्हटलेले एका भाषणात, 'मला कोणावर टिकाच जर करायची असेल तर विडंबन हि आधारासारखी लंगडी काठी लागत नाही असे म्हटले होते. ते ही विडंबन कारांनाच उद्देशून.
मग ह्याचाच अर्थ असा निघतो की, विडंबन हे मूळ कलाकृती बरोबरच ते लिहिणार्या कलाकाराला आडून मारलेला टोला असतो.
आता समझने वाले को इशारा काफी तसेच ते फक्त कोणत्या कारणासाठी लिहिलेय हे विडंबनकारालाच माहीती असते....
बाकीचे उगीचच आहेतच विडंबन म्हणजे कलाकाराची चेष्टा नाही हो वगैरे सारवासारव करायला.....
("प्राचार्य अत्रेंचे निवडक भाषण" शोधा मग वरचा आधार सापडेल. )
आचार्य ऋन्मेष महोदय, आपण
आचार्य ऋन्मेष महोदय,
आपण डकवलेल्या लिंकांमध्ये जे धागे आहेत ते आपणच काढलेले धागे आहेत. मी आपल्याच धाग्यावर येऊन धाग्याबद्दल वा त्यातील विषयाबदल नकारात्मक / टीकात्मक बोलणे हा भाग वेगळा आहे आणि एखाद्याने काढलेल्या धाग्याची खिल्ली उडवण्यासाठी दुसरा धागा मुद्दाम काढणे हा भाग वेगळा आहे.
मी मायबोलीवर केलेल्या दोन विडंबनांच्या लिंका थोड्या वेळात देतो. ती वाचून सांगा की ती विडंबने वाचल्यावर मूळ धागाकर्त्याला वाईट वाटेल असे त्यात काही आहे का ते!
काहीच्या काही तुलना करू नका आणि उगाच चर्चा तुमच्याकडे वळवू नका अशी नम्र विनंती!
सारवासारव
सारवासारव

जीएसजी इतके सगळे उपाय करुन
जीएसजी
इतके सगळे उपाय करुन आता हतबल झाला असाल तर एक हुकुमी उपाय सांगतो:
दोन ड्युआय काढा.....आणि त्या दोघांना अखंड झगडत ठेवा धाग्यावर... धागा आपोआप वर येत राहील.... बाकीचेही रिकामटेकडे आयडी नकळत यात ओढले जातील.... तुम्ही फक्त मधुनमधुन येउन "इथे अवांतर वाद नकोत" इतके बजावत रहा... धागा सुपरहिट!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33221
http://www.maayboli.com/node/34505
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/34882
१. परेश रावल मोड ऑन करा
१. परेश रावल मोड ऑन करा (जुदाई फेम)
२. त्यानंतर मनात येतील ते प्रश्न कुठल्याही सदराखाली विचारुन मो़कळे व्हा (अगदी ठेपल्यापासुन विबासं पर्यंत व स्वैराचारापासुन योगापर्यंत)
३. प्रकाशचित्राचा धागा काढा, त्यावर राजकारणाची चर्चा करा, मधेच भूक लागली की लिंबु सरबतामधे कोकम किती प्रमाणात टाकावे हे विचारा, कोकम विदर्भात पिकते का असा प्रश्न विचारा व ते रस्त्यावर टाकले तर रस्ता लाल होतो तर माझ्याकडे गावाकडुन आणलेल्या पंचाला याचा रंग देऊन डाय करता येईल का असा प्रतिप्रश्न करा. वय झाल्याने हेयरडाय करायला गेल्यावर तिथली बाई कशी आपल्यावर खेकसल हे सांगा, तिथे वापरलेला कंगवा हा कसा म्हशीच्या शिंगांपासुन बनवल्यामुळे निसर्गाचे नुकसान होत आहे व म्हशीला पाठ खाजवणे जमत नाहीये ते बोला.
४. वेड घेऊन पेडगावला जा (मधेच निरागसपणे आणखे एक प्रश्न विचारा)
५. इंग्रजीमधे धमक्या द्या. कृपया याची एकच कॉपी बनवुन ७-८ लोकांच्या विपुमधे डकवा.
६. अधुनमधुन कुटुंब, एकटेपणा वगैरे विषयी उदासपणे बोला
७. वाद किंवा चेष्टा करु नका असे आधीच नमुद करा. (वाद व चेष्टा दोन्ही होईलच याची २००% गॅरंटी)
८. काही लोक विरोध करतील व तुमचा वाईट अनुभव न आलेले लोक प्रामाणीकपणे मदत करतील. (मदत करणार्या लोकांची त्या धाग्यवर स्तुती करा. नंतर त्यांनाही वाट्टेल ते बोलुन आणखी नविन लोकांची सहानुभुटी मिळवा)
९. आपली मतेच ठामपणे मांडा व बाकी सर्व लोक मूर्ख आहेत असे दाखवा. (आपले वय व आपण बघीतलेल्या देशाचे यादीच मांडा)
१०. अधुनमधुन स्त्रीविरोधी मते मांडा (पुरुषांची सहानुभुती मिळेल)
११. जमत असेल तर हिंदु-मुस्लिम, गांधी-संघ, मराठा-दलित्-ब्राम्हण असे वाद काढा (याकरता अभ्यासाची गरज आहे त्यामुळे त्या आधी परेश रावल मोड ऑफ करायला विसरु नका.)
१२. आज ज्या व्यक्तीला सपोर्ट कराला तिला दुसर्या दिवशी विरोध करा.
१३. मिसळपाव वगैरे इतर संकेतस्थ्ळाचे दाखले द्या.
१४. अॅडमीन च्या विपुमधे तक्रार करा
१५. धाग्यातर प्रतिधागे किंवा त्याकरता लागणारे मटेरीयल गोळा करा (धागा धागा अखंड विणुया चा जप करा)
कांदापोहे अशक्य आहात आपण
कांदापोहे अशक्य आहात आपण
especially no.3
४. वेड घेऊन पेडगावला जा (मधेच
४. वेड घेऊन पेडगावला जा (मधेच निरागसपणे आणखे एक प्रश्न विचारा)
जबरी आणी अचूक लिहीलत.
५. इंग्रजीमधे धमक्या द्या. कृपया याची एकच कॉपी बनवुन ७-८ लोकांच्या विपुमधे डकवा.
६. अधुनमधुन कुटुंब, एकटेपणा वगैरे विषयी उदासपणे बोला
७. वाद किंवा चेष्टा करु नका असे आधीच नमुद करा. (वाद व चेष्टा दोन्ही होईलच याची २००% गॅरंटी)
८. काही लोक विरोध करतील व तुमचा वाईट अनुभव न आलेले लोक प्रामाणीकपणे मदत करतील. (मदत करणार्या लोकांची त्या धाग्यवर स्तुती करा. नंतर त्यांनाही वाट्टेल ते बोलुन आणखी नविन लोकांची सहानुभुटी मिळवा)
९. आपली मतेच ठामपणे मांडा व बाकी सर्व लोक मूर्ख आहेत असे दाखवा. (आपले वय व आपण बघीतलेल्या देशाचे यादीच मांडा)
>>>>>> कापो
मो आणी बाकी सहानुभूतीदार ( कृपया गै नसावा, मी या कोणावरही आगपाखड करत नाहीये, पण यानी सहानूभुती दाखवली म्हणून लिहीतेय आणी नाव घेतेय) प्लीज कान्दापोहे यानी लिहीलेले व मी हायलाईट केलेले ( कॉपी-पेस्ट केलेले) परत एकदा वाचा.
प्रश्न विचारला म्हणून आपले माबोकर ( त्यात मी पण ) लगेच उत्तर द्यायला वा मदत करायला धावतात. पण नन्तर मदत करणारेच कसे मुर्ख आहेत हे ठासुन सान्गीतले जाते. आधी आभार मानले जातात, तुम्ही किती दयाळु, चान्गले आहात असे नमुद केले जाते. पण जिथे चूकले तिथे समजावायला आपण गेलो की मग तुम्ही किती पाषाणहृदयी आहात, तुम्ही किती दुसर्याला हर्ट करता ते तुमच्या विपुमध्ये येऊन सान्गीतले जाते.
अर्थ एकच की तुम्ही फक्त चान्गले आणी चान्गलेच बोला, लिहा पण वाईट दिसले तरी दुरुस्त करु नका, टीका करु नका.
तिसरे- मला अमूक ठिकाणी फडे मिळाले नाहीत. मग आम्ही म्हणणार अरे हे फडे म्हणजेच झाडु/ झाडणी/ केरसुणी आहे. ही कशी तुला मिळाली नाही? तर मग उत्तर येणार की आम्ही याला फडेच म्हणतो हे मला पुण्यात कुठेच मिळाले नाही. मग परत पुढले उत्तर की आम्ही बोलीभाषेचाच आदर करतो वगैरे. मग बाकीचे आपोआप मुर्ख ठरुन डोके भिन्तीवर आपटुन घेतात.
परत एकदा- जूनी मायबोली नीट वाचा आणी विचार करा की मोठे मोठे विद्वान ( खरच विद्वानच, कुचकटपणे लिहीत नाही ) यान्च्यापुढे कसे हरले ते. जूना शब्दार्थ बाफ वाचा. मायबोली आणी हितगूज मध्ये व्यवस्थापनावरचे आरोप वाचा आणी धन्य व्हा.
प्रकाशचित्राचा धागा काढा,
प्रकाशचित्राचा धागा काढा, त्यावर राजकारणाची चर्चा करा, मधेच भूक लागली की लिंबु सरबतामधे कोकम किती प्रमाणात टाकावे हे विचारा, कोकम विदर्भात पिकते का असा प्रश्न विचारा व ते रस्त्यावर टाकले तर रस्ता लाल होतो तर माझ्याकडे गावाकडुन आणलेल्या पंचाला याचा रंग देऊन डाय करता येईल का असा प्रतिप्रश्न करा. वय झाल्याने हेयरडाय करायला गेल्यावर तिथली बाई कशी आपल्यावर खेकसल हे सांगा, तिथे वापरलेला कंगवा हा कसा म्हशीच्या शिंगांपासुन बनवल्यामुळे निसर्गाचे नुकसान होत आहे व म्हशीला पाठ खाजवणे जमत नाहीये ते बोला.<<< त्यानंतर सर्वात शेवटी लोकांनी दिलेली माहिती कन्सोलिडेट करायला स्वयंसेवकांची गरज असल्याचे जाहीर कराअयला विसरू नका.
दुसर्या धाग्याचे बळी देता
दुसर्या धाग्याचे बळी देता येतील तर पहावे (भंडाऊन सोडुन ) पुढे मागे माबोवर लिखानच करतील नाही याची हर प्रक्रारे किस पाडुन खबरदारी घ्यावी !
जुनी मायबोली हा काय प्रकार
जुनी मायबोली हा काय प्रकार आहे?
राहुल, http://www.maayboli.co
राहुल,
http://www.maayboli.com/hitguj/messages/board-topics.html याला म्हणतात जुनी मायबोली.
सुशा नामक एक फाँट इन्स्टॉल करा आधी काँप्युटरात, मग तिकडच्या गल्लीत जावा. आणि शक्यतो इंटरनेट एक्स्प्लोरर फारच झालं तर फायरफॉक्स वापरून ब्राऊज करा.
Pages