जास्त कटकटीची पोकळ वांगी

Submitted by बेफ़िकीर on 24 April, 2012 - 16:12

लागणारा वेळ:

खायला की करायला?

करायला दोन तास, वांगी फुटून खाऊ शकण्यास तीन तास! (प्रत्येकाच्या शारीर सामर्थ्यानुसार सापेक्ष) (ए हसू नका हं) (संपे विपू बघ)

लागणारे जिन्नस:

भरली वांगी म्हंटली की ती करायला लागणारा वेळ, वाटलेले मसाले, कांदे भाजणं, वाटणं असे बरेच प्रकार आठवून करायचा कंटाळा येतो. पण ही भाजी वेगळी आहे. यात वांगी हातात घ्यायची आणि दुसर्‍या हाताला जे लागेल ते त्या वांग्यात कोंबायचे, असे केले की झाली भरली वांगी. पण आपल्याला तर पोकळ वांगी करायची आहेत नाही का? पोकळ वांगी करण्यासाठी वांगी घेऊन या व ती चिरून आतून पोकळ करा. वांगी व कोणतीही गोष्ट आतून पोकळ करण्याची पात्रता हे 'लागणारे जिन्नस' आहेत.

१० नवीन प्रतिसादक. शक्य तितके कोवळे आणि अकलेने लहान. (जांभळे असले तर चालतील)

२ जुने प्रतिसादक- शक्य तितकी माबो फिरून

१५-१६ पार्लेकरीण - बारिक नजरेने बघून

४ पोरं आल्यागेल्याचा तुकडा पाडणारी -

घरात जो कुठला रिकामटेकडा माणूस असेल तो. (दाक्षिणात्य मोलकरीण आणि तत्सम गुरखे सोडून).

१ वाटी काळं
१ वाटी येणेजाणे
पाव किंवा बनपाव
पीठ ('कसलेही' चालेल)
एक हलकट
चमचाभर लुडबूड
वाटीभर पावटे किंवा अतीशहाणे
३ वेळा हेल काढणे
१ मोठा चमचा 'घोळ'
एक गेलेला तडा
एक अती शूरवीर

क्रमवार पाककृती:

* डाळं शेंगदाणे एकत्र करून लाजून घ्यावे.

* लाजताना शेवटली १-२ मिनिटं उरली असताना तीळ घालून लाजावं. २ मिनिटात गॅस बंद करून दाणे-तीळ-डाळं यांचं वितंड होऊ द्यावं. ठार झाल्यावर त्यातले कोण खत्रूड आहे याची खात्री करून घ्यावी.

*बारिक चिरलेल्या वांध्यात ते खत्रूड, ढमाले, पिंच, शूळ, हलकट घालून नीट विसळून घ्यावं

*वांग्यांचा अनुल्लेख करून वांग्यातून 'वांगेपण' काढून घ्यावे.

*हेलकरम करून त्यात प्रतिसादांची अपेक्षा सोडावी. उरलेला हेतू सरळ त्या अपेक्षांवर ओतावा.

*हलक्या स्मायलीने ढवळून कमितकमी १०-१५ मिनिटं झाकण न ठेवता शिजू द्यावं.

*उकळीचं पाणी घालून रस्सा हवा तितका पातळ करून घ्यावा.

*अतीशहाणे आणि अनेक ठिकाणी फिरलेली तकदीर घालून झाकून देढाजवळ वांगं शिजेपर्यंत शिजवावं.

(यात दोन महत्वाचे घोळ आहेत. देढाजवळ हे वाचून 'देठाजवळ लिहायचं होतं' असे वाटेल, पण ते देढाजवळच आहे. तसेच, वांग शिजेपर्यंत शिजवावे याला काही अर्थय का असेही म्हणावेसे वाटेल, पण एखादी गोष्ट होईपर्यंत ती होत नाही हे लक्षात ठेवावे)

============================

इतर अतिरिक्त माहिती हवी असल्यास ती येथे विचारावीत

http://www.maayboli.com/node/34499

============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Biggrin हे महान आहे.

>>>> वांग्यांचा अनुल्लेख करून वांग्यातून 'वांगेपण' काढून घ्यावे. >>>>> Lol

हेलकरम >>>>> म्हणजे काय? Uhoh

बेफ़ि, फारच कूटाणा नि आटापिटा हो. एवढे जिन्नस जमवायचे म्हणजे,
खायचं काम नाही ! >>>> Lol

Lol

मात्र करतांना एक अडचण येईल, असे दिसते. पाकृ मध्ये दिलेले साहित्य आणि कृतीत वापरलेले साहित्य वेगवेगळे आहे. Uhoh Lol