धाग्याला भाव येण्यासाठी तुम्ही कुठले कुठले पैंतरे वापरता ?

Submitted by जीएस on 21 July, 2015 - 06:04

मी जालावर दिवसातून एकदा तरी कुठल्या ना कुठल्या विषयाचा धागा काढतो. कधीतरी दुसरीकडच्या उरलेल्या पोस्टपासून धागा करतो. कदाचित मस्का कमी वापरत असेल म्हणून पण माझ्या धाग्याला साध्या वादावादीचाही भाव मिळत नाही. प्लीज मला व्यवस्थित टिप्स मिळतील का धाग्याचा मुद्दा तयार करण्यासाठी ? धन्यवाद.

मी धाग्यात साधारण हे..हे टाकतो :

१) अड्डा, कट्टा, विपू याचा कॉपी पेस्ट.
२) लाल तिखट खरड - अर्धा चमचा. नाहीतरी मिरचीची अर्धीकच्ची पोस्ट.
३) अम्रिकेतले मराठी अर्धा वाटी
४) दोन चमचे मोदी आणि केजरी
५) दोन चिमुटभर गफ्रे आणि सारुक.
६) थोडासा पीळ मारून
७) जात, व्हेजनॉनव्हेज चवीप्रमाणे
८) हे सर्व एकत्रीत करुन धागा पोस्टून घेतो आणि दर १५ मिनिटांनी एडिटून वर ठेवतो.
९) मी रिक्षा बजाजचीच वापरतो.

इथे एका दादाने धागा बनवला. असा धोधो प्रतिसाद कधीच येत नाही माझ्या धाग्यांना : http://नेहेमीचे यशस्वीधागे.कॉम

आणि हो, प्लीज इथे विषयाला धरून पोस्ट टाळा.
http://www.maayboli.com/node/54714 या धाग्याशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा पाककृती आणि आहारशास्त्राचाच धागा आहे ना नक्की?

>>> नाहीतरी मिरचीची अर्धीकच्ची पोस्ट <<<< आँ? असेल असेल....

लिंब्या, आमच्यात बोलीभाषेत असंच लिहितात.. Wink Proud

नुसते धागे काढून काय होतं का राव. आधी आयडी काढा चांगला. आईडी असा पाहिजे की त्या आइडिचा धागा आला हे पाहून लोकांनी हातातली कामे सोडून धाव घ्यायला हवि धाग्याकडे.

नवीन धागा काढण्यासाठी मला गुगलची गरज लागत नाही कारण मायबोलीवरच सगळे काही असते/ नसते.:फिदी:

आणी हो माहिती मिळवणे हा माझा विशुद्ध हेत्तु असल्याने मी नवीन धागा काढणारच.

तैतरे सुरुवातीला आपल्या

तैतरे Wink

सुरुवातीला आपल्या जालीय विचारांशी मिळते जुळते विचार असणारे ऐदी (सॉरी आयडी) शोधावेत.
सतत त्यांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद, लेखाला वा वा छान छान, काहीही बोलले की सुरेख, मागच्या १० हजार वर्षात असा बाफ आला नाही असे म्हणावे. याने आपण प्रस्थापितांच्या उपद्रवी किंवा नॉन-उपद्रवी मंडळात(कंपुत) सामील होतो आपसुकच.
या महिन्यात मायबोलीचा कल कुठे आहे हे जोखुन मग भराभर आपले संभाषणास्त्र, टीकास्त्र, काड्यास्त्र, आगलावास्त्र, जुस्कोसेटलास्त्र चालवावे.( इथे जरा सांभाळावे स्वतःला, नाहीतर स्वतःच्याच यज्ञात स्वतःची आहुती)
एकदा का आपले उपद्रवमुल्य वाढले मग गावावर ओवाळुन टाकलेल्या सांडाप्रमाणे बिथरल्यासारखे मिळेल त्या बाफावर धुमाकुळ घालावा. आपल्या टोळीतले आपोआप येतीलच मागे जातील कुठे ?

अस करुन एकदाका तुम्ही माबोवर वर्ल्ड्फेमस झालात की ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हे.....प्रतिसाद.

१ ते ९ इतके जालीम उपाय योजूनही धोधो वाहत नाही म्हणजे आयडी बदला. दुसरं काही कारणच नाही.
पण थांबा... इंग्रजी विपु ट्राय मारा. एक शेवटचा उपाय.

तुम्ही या धाग्याच्या हेडरपोस्ट मध्ये किंग खानचे नाव घेतले आहेत तिथेच अर्धे अधिक काम झाले, निदान तुमचा हा धागा तरी आता धो धो चालेल. कारण हा बॉलीवूडचा असा सुपर्रस्टार आहे, जो आपल्या नावावर प्रादेशिक संकेतस्थळावरील धागे देखील चालवतो. Happy

एवढेच नव्हे तर त्याची झलक दिसणारा मराठी चित्रपटसृष्टीचा सुपर्रस्टार देखील षटकार नाही तर गेला बाजार चौकार मारून जातो ..

तुम्ही या धाग्याच्या हेडरपोस्ट मध्ये किंग खानचे नाव घेतले आहेत तिथेच अर्धे अधिक काम झाले,

>>> उरलेले काम (तमाम) होण्यासाठी स्वजो वापरा.

तुम्ही या धाग्याच्या हेडरपोस्ट मध्ये किंग खानचे नाव घेतले आहेत तिथेच अर्धे अधिक काम झाले, >>> __/\__

ऋनम्या, बाकी काय्बी कसबी बोलेनास आमच्या संकेतस्थळाला प्रादेशिक म्हणायचं काम न्हाई... सांगून ठिव्तो...

इथे विषयाला धरून पोस्ट टाळा. असं लिहिलंच आहे तर मला जरा चिक्की घोटाळा काये ते सांगेल काय कुणी?
सिरीयसली विचारतेय.
तटस्थ्पणे सांगा. उगा कुणाचा पुळका / कैवार घेउन नको.

>>>>> लिंब्या, आमच्यात बोलीभाषेत असंच लिहितात <<<<
असेल असेल अभि.... Proud
मला फक्त "मिर्ची" नावाची आयडी आठवली इतकेच!

तुम्ही बि-ग्रेडी आहे असे जाहीर करा. इतर मायबोली सोडा किमान लिंबूभाऊंच्या वितभर लांबीच्या अधून मधून ठळक , वाक्यावाक्याला विषयांतर केलेल्या पोस्टी गॅरंटीमधे मिळतील (दुपारी १ ते ४ प्रतिसाद येणार नाही) . Light 1 Happy

ऋनम्या, बाकी काय्बी कसबी बोलेनास आमच्या संकेतस्थळाला प्रादेशिक म्हणायचं काम न्हाई...
>>>>>
यात वाईट वाटून घ्यायचे किंवा कमीपणाचे काही नाही...

१) मराठी राज्यभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा

२) टाटा स्काय वाल्यांनी देखील हिंदी-ईंग्लिश हे वेगळे ठेवत मराठी चॅनेलला प्रादेशिक मध्ये टाकलेय.

३) स्वजोला मराठीचा शाहरूख म्हणतात, शाहरूखला बॉलीवूडचा स्वप्नील जोशी नाही..

मत्सराचा त्याग करा. भाबडे व्हा. हृदयशून्य मुलींना फोन करा. कोणाचेतरी फेव्हरिट व्हा. साजिरा ह्या आय डी शी शत्रूत्व स्थापन करा. टण्या व्यासंग दाखवत उंडारतो हे त्याला चारचौघांसमोर सांगा. दिवा घ्या.

भाबडे व्हा. >> तुम्हाला `येडा बनून पेढा खा ' असे म्हणायचे आहे का?
कारण ठरवून भाबडे होता येत नाही, तो आतूनच असावा लागतो, प्रत्येकात कमीजास्त प्रमाणात असतो, जो आहे तो जपावा लागतो.

असला कसला P Hd level चा प्रश्न पडलाय तुम्हाला ?
अगदी बेसिक बेसिक प्रश्न पडले पाहिजेत आणि मग त्याचा एक मोठा धागा करता आला पाहिजे.
उदा
माझ्याच गल्लीत चांगली चहाची टपरी कोणती?
पावसाळ्यात अंगणात चिखल होतोय काय करू ?

ऋनम्या - संकेतस्थ्ळ कसे प्रादेशिक होईल, ते वैश्विक वगैरे अस्ते ना... >> यावर एक पोल धागा यायलाच पाहिजे.

Proud

आधीचे मुद्दे हहपुवा वगैरे आहेत. वाचायला मजा आली. पण ह्यात बीच्या धाग्याची लिंक देण्याचे प्रयोजन कळले नाही.

मी बी ला ओळखत नाही, त्याचे धागे इथे पाहते, त्यामुळे त्याची कैवार घेतेय, पुळका येतोय वगैरे समजूच नका. पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला सांगतेय की मी आता तुमच्या पडणार नाही आणि तुम्हीही माझ्यात पडू नका, तर त्याचा आदर करणं एवढं अवघड आहे का? आधीचेही त्याच्याबद्दल धागे काढलेले आणि मग डिलीट केलेले (का प्रतिसादाला बंद करा अशी विनंती केलेले), त्यावरचे इतरांचे प्रतिसाद पाहून असंच वाटलं होतं. आणि बी च्या ऐवजी इथे दुसरे कोणीही असतं तरी माझ्या मनात हाच विचार आला असता. एखाद्याची खिल्ली उडवण्याची आणि खाजवून खरुन काढण्याची उर्मी अकलनशक्तीच्या बाहेर आहे. Uhoh

असो. बाकीचा धागा आवडला.

आधीचे मुद्दे हहपुवा वगैरे आहेत. वाचायला मजा आली. पण ह्यात बीच्या धाग्याची लिंक देण्याचे प्रयोजन कळले नाही. >>> सहमत आहे. ती लिन्क बघितली नव्हती आधी. मला वाटले जनरल पॅटर्न दाखवणारा धागा आहे - आणि म्हणून आवडला. कोणत्याही धाग्याशी थेट संबंध नाही जोडला तरी स्वतंत्रपणे हा धमाल आहे, त्यामुळे त्या लिन्कची काहीच गरज नाही.

मो, फा, अहो हे त्या धाग्याचे वाक्यशः विडंबन आहे त्यामुळे लिंक देणे क्रमप्राप्त आहे. मात्र माझ्या धाग्याच्या कंटेंटचा रोख अजिबातच बी किंवा कुणा एकावर नाही हे वाचताच लगेच लक्षात येत आहे असे मला वाटते.

गद्या /पद्याचे वाक्यशः विडंबन आणि एखाद्याची वैयक्तिक खिल्ली उडवणे यात फार फरक आहे. पराठ्याच्या पाककृतीविषयक मूळ प्रश्न आणि तोच फॉरमॅट ठेवून धाग्याच्या पाककॄतीविषयक प्रश्न असे या विडंबनाचे स्वरूप आहे. याहून सुलभ स्पष्टीकरण देणे माझ्या आवाक्याबाहेर आहे.

यानंतरही कुणाच्या मनात धाग्याच्या उद्देशाबद्दल काही किंतु असल्यास तो स्वबुदोस.

मात्र माझ्या धाग्याच्या कंटेंटचा रोख अजिबातच बी किंवा कुणा एकावर नाही हे वाचताच लगेच लक्षात येत आहे असे मला वाटते. >> मला वाटते सुरुवातीला एक दोनदा असे विडंबणपर धागे निघाले तेव्हा ठिक होते. पण बींच्या प्रत्येक धाग्याचे विडंबण होऊ लागले आहे ते चांगले नाही वाटत आहे.

ऋनम्या - संकेतस्थ्ळ कसे प्रादेशिक होईल, ते वैश्विक वगैरे अस्ते ना...
>>>
जसे तुम्ही अमेरीकेत जाऊन मराठी बोललात तरी ती प्रादेशिक भाषाच झाली तसे मराठी भाषिकांचे संकेतस्थळ अमेरिकेतून लॉगिन झालात तरी ते प्रादेशिकच.

१) मराठी राज्यभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा
Hindi is not our National Language, its one of the official language.
>>>>>>>>
जर हिंदी राष्ट्रभाषा नाही तर कोणती राष्ट्रभाषा आहे ते देखील सांगा.

मो,
>>. पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला सांगतेय की मी आता तुमच्या पडणार नाही आणि तुम्हीही माझ्यात पडू नका, तर त्याचा आदर करणं एवढं अवघड आहे का? >> हे खरंच होतं का, लिहिण्याप्रमाणे वागलं जातं का हे बघायला बाकीचे बीबीही नजरेखालून घालत जा.

पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला सांगतेय की मी आता तुमच्या पडणार नाही आणि तुम्हीही माझ्यात पडू नका, तर त्याचा आदर करणं एवढं अवघड आहे का? >> हे जनरल स्टेटमेन्ट असेल तर हो, आदर करणे अवघड नाही - जोवर "ती" व्यक्ती स्वतः कुरापत काढत नाही!! त्या व्यक्तीने कुरापत काढली तर मात्र ऑल डील्स आर ऑफ !! Happy

Pages