मी जालावर दिवसातून एकदा तरी कुठल्या ना कुठल्या विषयाचा धागा काढतो. कधीतरी दुसरीकडच्या उरलेल्या पोस्टपासून धागा करतो. कदाचित मस्का कमी वापरत असेल म्हणून पण माझ्या धाग्याला साध्या वादावादीचाही भाव मिळत नाही. प्लीज मला व्यवस्थित टिप्स मिळतील का धाग्याचा मुद्दा तयार करण्यासाठी ? धन्यवाद.
मी धाग्यात साधारण हे..हे टाकतो :
१) अड्डा, कट्टा, विपू याचा कॉपी पेस्ट.
२) लाल तिखट खरड - अर्धा चमचा. नाहीतरी मिरचीची अर्धीकच्ची पोस्ट.
३) अम्रिकेतले मराठी अर्धा वाटी
४) दोन चमचे मोदी आणि केजरी
५) दोन चिमुटभर गफ्रे आणि सारुक.
६) थोडासा पीळ मारून
७) जात, व्हेजनॉनव्हेज चवीप्रमाणे
८) हे सर्व एकत्रीत करुन धागा पोस्टून घेतो आणि दर १५ मिनिटांनी एडिटून वर ठेवतो.
९) मी रिक्षा बजाजचीच वापरतो.
इथे एका दादाने धागा बनवला. असा धोधो प्रतिसाद कधीच येत नाही माझ्या धाग्यांना : http://नेहेमीचे यशस्वीधागे.कॉम
आणि हो, प्लीज इथे विषयाला धरून पोस्ट टाळा.
http://www.maayboli.com/node/54714 या धाग्याशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
धागाकर्त्याला समुपदेशनाची गरज
धागाकर्त्याला समुपदेशनाची गरज असल्याचे ठोकुन द्या !
कांपो,
कांपो,
धाग्याला भाव आला १०३ वा
धाग्याला भाव आला १०३ वा प्रतिसाद
दीड माबोकर धन्स
दीड माबोकर
धन्स
अरेरे इथे ह्या फ़ड़तूस
अरेरे

इथे ह्या फ़ड़तूस धाग्यावर धो धो प्रतिसाद
आणि सायकलीसंगे जुले लदाख़ सारख्या उत्कृष्ट लेखमालेवर मात्र जेमतेम हातावर मोजण्याइतके प्रतिसाद
एक प्रतिसाद द्यायचा राहिला
एक प्रतिसाद द्यायचा राहिला होता, पेंडिंग वर्क आत्ता पूर्ण करत आहे.
>>> स्वाती_आंबोळे | 21 July, 2015 - 21:46
तुम्ही 'टीपापाला शिव्या' हे व्यंजन वापरत नाही असं दिसतंय.
तसंच धागा एडिट करून वर येत नाही, प्रतिसाद आले की येतो हे तुम्हाला माहीत दिसत नाही.
हरकत नाही, शिकाल हळूहळू.<<<
तुमचा गैरसमज झालेला दिसत आहे. बी ह्यांनी टीपापावरील मुलींना हृदय नाही असे लिहिलेले होते व ते तुम्ही टीपापाच्या हेडरमध्ये टाकलेले होतेत. माझा ह्या धाग्यावरील पहिला प्रतिसाद पूर्णपणे मजेशीर व दिलखुलासपणे दिलेला प्रतिसाद होता. धाग्याचा भाव वधारण्यासाठी करावयाचे उपाय ह्यावर मी माझ्या कुवतीनुसार मजेशीर टिपण्णी केली होती.
१. बी ह्यांनी साजिरांना 'तुझा माझ्यावर जुना राग आहे हे मला माहीत आहे' असे लिहिले होते.
२. टण्यांना 'तू व्यासंग दाखवत फिरतोस' असे लिहिलेले होते.
३. टीपापावरील महिला सदस्यांबाबत 'ह्या मुलींना हृदय नाही' असे लिहिलेले होते.
ह्या गोष्टी केल्या की धाग्याचा भाव वधारतो असे म्हणण्याचा केवळ मी एक मजेशीर प्रमाद केला इतकेच.
माझ्या प्रतिसादांना नंतर लागलेले वळण हे (बी ह्यांच्या मते हृदयशून्य असलेल्या) काही सदस्यांच्या प्रतिसादांनंतर लागलेले होते.
धागे एडिट करून नव्हे तर प्रतिसाद देऊन वर येतात हे मला माहीत आहे, पण त्याचा इथे संबंध काय आहे हे मला तेव्हाही आणि आत्ताही लक्षात आलेले नाही. मात्र 'तुम्ही शिकाल हळूहळू' ही आपली सद्भावना अंतःकरणात जपून ठेवत येथील प्रवास चालू ठेवीन ह्याची खात्री बाळगावीत.
तो प्रतिसाद
तो प्रतिसाद तुमच्याकरता/तुम्हांला उद्देशून होता हे तुम्हांला कोणी सांगितलं?
>>> सायो | 23 July, 2015 -
>>> सायो | 23 July, 2015 - 21:14 नवीन
तो प्रतिसाद तुमच्याकरता/तुम्हांला उद्देशून होता हे तुम्हांला कोणी सांगितलं?
<<<
अरेच्च्या!
मग एकूणच माफ करून टाका. मनापासून क्षमस्व!
प्रतिसाद दिल्यावर धागा वर
प्रतिसाद दिल्यावर धागा वर येऊन भाव वधारतो का बघतो आहे.
पैतरा हा शब्द अनेकांच्या
पैतरा हा शब्द अनेकांच्या स्मरणातुन गेलाय. पैतरा हा शब्द पवित्रा ( पवित्रा घेतला ) या शब्दाचा अपभंश असावा की काय ? शुध्द मराठीत स्टॅड घेणे असा भासमान होताना दिसतोय.
बाकी चालुदे.
पैतरा हा शब्द अनेकांच्या
पैतरा हा शब्द अनेकांच्या स्मरणातुन गेलाय. >> मला तर तो हिंदीच वाटला
पैतरा म्हणजे शक्कल
पैतरा म्हणजे शक्कल
कान्दापोहे - भन्नाट कलेक्शन.
कान्दापोहे - भन्नाट कलेक्शन.
कुठल्याही काळात १० -१२ भोळे (बहुतेक नवे) सदस्य नेहेमीच असतात... काही काळानन्तर ते अनुभवाने शहाणे होतातही पण तो पर्यन्त नव्या दहान्चे आगमन झालेले असते. चार शब्दान्चे मार बसल्याने आणि म्हणुन अनुभवाने शहाणे झालेली कालची भोळी मन्डळी आज सुरक्षित अन्तर ठेवतात, तसा प्रयन्त करतात. पैकी काही मोजके आयडी शब्दान्ची परतफेड करण्याकरता सन्धिची वाट बघतात.
गुगलल्यावर ज्या गोष्टी ३० सेकन्दात अगदी सहजपणे मिळतात (उदा: दोन दिवसाच्या मुक्कामी कॅलगिरी येथे तेल कमी असलेले व्हेज जेवण कुठे चान्गले मिळेल? किव्वा पुण्यावरुन मुम्बई कडे जाण्या साठी स्वस्तातले प्रवास पर्याय कोण-कोणते आहेत ? येथे शहराची नावे बदलली आहेत पण त्याने काही फरक पडत नाही.) त्या विषयावरही बाफ काढायला फार मोठे धाडस लागते असे माझे मत आहे...
गुगलल्यावर ज्या गोष्टी ३०
गुगलल्यावर ज्या गोष्टी ३० सेकन्दात अगदी सहजपणे मिळतात>>
छे पण त्याने फक्त मलाच माहीती मिळेल. माझ्यासारखी अनेक गरजुबी लोकं आहेत. त्यांना ही माहीती मिळावी हा उदात्त हेतु असतो. जगाच्या कल्याणा असे धाडस करावे लागते यु नो.
त्या लिंकवरच्या धाग्याशी
त्या लिंकवरच्या धाग्याशी साम्य आहे. टिंगल आहे का ?
<< लिंकवरच्या धाग्याशी साम्य
<< लिंकवरच्या धाग्याशी साम्य आहे. टिंगल आहे का ?>>
--- योगायोग समजावा असे धागा विणणार्याची अपेक्षा आहे.
हा धागा आणि त्या मधे आलेल्या प्रतिक्रिया वाचल्यावरच विडम्बन, थट्टा हे दोन भिन्न प्रकार आहेत असे मला तसेच अजुन काहीन्ना समजले.
धन्यवाद उदयसाहेब. आणखी एका,
धन्यवाद उदयसाहेब.
आणखी एका, बहुतेक विलयघाट की काय, तिथे समुर्द, खाडी आणि विदर्भ असे संदर्भ आल्याने माझ्यावर चकीत होण्याची वेळ आली होती. पण आता असे वाटू लागले आहे की इथे जो अर्थ दिसतो तो नसून काही भलताच अर्थ त्यामागे असावा. यास श्लेष की काय असं म्हणतात असं ऐकलंय.
बीयांचे धागे अद्याप वाचले नाहीत, पण इच्छ होत आहे.
बीयांचे >>>>>>>>>
बीयांचे >>>>>>>>>
बीयांचे धागे>>>>>>>>>
बीयांचे धागे>>>>>>>>>:)
आवडतिल वाचायला पेरणीचे दिवस आहेत.
उंदीर मारण्यापासून ते बूट नरम
उंदीर मारण्यापासून ते बूट नरम करणे. पोहताना चष्मा घालणे ते एसी चा रिमोट दुरुस्ती पर्यंत असंख्य धागे आहेत.
अगदी 'डोळा फडफडणे' ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात इथपर्यंत.
उगीच बि चाऱ्या एकट्याला टार्गेट करतात सगळे, टारगट कुठले!
(No subject)
प्रतिसाद वाचायचे तर पहिल्या
प्रतिसाद वाचायचे तर पहिल्या पानापासून वाचत जावे की शेवटून उलट वाचत यावे?.....हे अवांतर होईल का?
लोकहो, यावरून एक आठवलं. 'गरीब
लोकहो,
यावरून एक आठवलं. 'गरीब बिचाऱ्या चिमणीला, टपले सगळे छळायला' अशी ओळ असलेली एक कविता आम्हाला लहानपणी होती.
तर केवळ भूतदयेसाठी (रिक्षेतून) जाहीर आव्हान देतोय.
हौस आणि हिम्मत असेल तर या धाग्याचं सानुभव विडंबन करून दाखवा : http://www.maayboli.com/node/44429
आ.न.,
-गा.पै.
Pages