शीर्षकावर विचार चालू आहे..

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 December, 2014 - 08:12

..

मागच्या महिन्यातील मागच्या आठवड्याची गोष्ट!

मुंबई उपनगरातील एका प्रतिष्ठित रेल्वे स्थानकाबाहेरील भुयारी मार्गाने मी आणि माझी ग’फ्रेंड मार्गक्रमण करत होतो. ईतक्यात समोरून एक आमच्याच वयाचे जोडपे येताना दिसले. येस्स जोडपेच, प्रेमी युगुल नाही. कारण तिच्या गळ्यात लायसन लटकत होते. अर्थात त्याच्या नावाचेच असावे, कारण त्या दोघांनाही मी ओळखत होतो. जर त्याला एकट्यालाच पाहिले असते तर मी नक्कीच त्याला टाळून पुढे गेलो असतो पण त्याच्या बरोबर ती देखील असल्याने,,.... नाही जमले ते!.

ईतक्यात त्याचीच नजर माझ्यावर गेली. अर्थात जायचीच होती. समोरासमोरून मार्गक्रमण करत असताना एकमेकांकडे नजर न जाण्याची शक्यता कमीच होती. कॉलेजनंतर तीन-चार वर्षांनी आज,.. तो मला पाहताच कसा रिअ‍ॅक्ट करतो याची उत्सुकता मला होतीच. पण तो मात्र माझे सारे अंदाज चुकवत मोठ्या आनंदात चित्कारत माझ्या अंगावर धाऊन आला, "काय भाई रुनम्या, तू ईकडे कुठे? आहेस कुठे? आणि बरोबर हि कोण.. आमची होणारी वहिनी का..??"
बस्स त्याने असे म्हणताच त्याच्या शेजारी उभी असलेली, आमची झालेली वहिनी माझ्या ध्यानात आली आणि उत्स्फुर्तपणेच माझ्या फटकळ स्वभावाला अनुसरून तोंडातून शब्द निघाले.., "हरामखोर... तू हिच्याशीच लग्न केलेस!.."

कुठल्याही मजाकमस्करीच्या टोनमध्ये नसून अस्सल रागाच्या आवेशात!.. ते ऐकून माझी ग’फ्रेंड अवाक झाली. तो थोडाफार खजील झाला. आणि त्याची ‘ती’ म्हणजे ‘आमची वहिनी’ बस्स रडायची शिल्लक होती.

यावर त्याने प्रसंगावधान राखत "आता सोड ना यार" म्हणत माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली (ज्याची खरे तर गरज नव्हती). मी भानावर येत वहिनींना सॉरी म्हणालो. आणि माझ्या ग’फ्रेंडने त्या दोघांनाही सॉरी म्हणत मला असे काही फैलावर घेतली की बस्स थोबडवायचे शिल्लक ठेवले.

त्यानंतर आम्ही नजीकच्या उपहारगृहामध्ये फतकल मांडून चहात बिस्किटं डुबवत जुना किस्सा उगाळू लागलो.

-------------

ईजिनीअरींगच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राला नुकतीच सुरुवात झाली होती. हे शेवटचे वर्ष फुल्ल ऑन धमाल करत यादगार बनवायचे म्हणत सारेच जोशात होते. यासाठी दोनचार नियम तोडावे लागले तरी कोणाची काही हरकत नव्हती. एकाचे किडे बघून दुसर्‍याला स्फुरण चढत होते आणि ‘जो होगा सो देखा जायेगा’ अ‍ॅटीट्यूड नकळत सर्वांच्याच अंगी तयार झाला होता.

यावेळी कॉलेजच्या एकूण एक इव्हेंट आणि स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा होता, ज्यांच्याशी जुनी दुश्मनी आहे त्यांच्याशी लफडे करत सारे हिशोब सेटल करायचे होते, दर वीकेंडला ओल्या पार्ट्या करायच्या होत्या, हॉस्टेलला नाईटस मारून शक्य तितुके सारे अवैध धंदे करायचे होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षात जी टाळकी सिंगलच राहिली होती त्यांना हा बदनामीचा शिक्का पुसून काढत एखादी मुलगी पटवूनच या कॉलेजच्या बाहेर पडायचे होते. साहजिकच अश्यांच्या या उदात्त हेतूला साथ देत हे कार्य तडीस नेण्याची जबाबदारी मी स्वत: घेतली होते वा माझी ईमेज पाहता ती माझ्याच खांद्यावर येऊन पडली होती.

"रौशन, नाम तो सुना ही होगा..." आमच्या क्लासमधील एक स्मार्ट बंदा!.. पण जवानीच्या अकाऊंटमध्ये ग’फ्रेंडच्या नावाने खडखडाट!..

सेकंड ईयरसाठी आमच्या कॉलेजमध्ये नव्याने अ‍ॅडमिशन घेतलेल्या एका मुलीला याने हेरले होते. बोले तो, "सुझायना, नाम तो याद रहेगा.." रंगाने सावळी पण कमालीची आकर्षक!..

कॉलेजमधील आधीच्या मुलींना आपले सारे छक्केपंजे ठाऊक असल्याने फ्रेशर्सवरच जास्त जोर द्यायचा हि बहुधा बरेच जणांची पॉलिसी असते. इथेही रौशनने तसाच सेफ गेम खेळायचे ठरवले होते.

आता, स्टेप नंबर वन - मुलगी सिंगल आहे की कमिटेड याचा शोध घेणे. हा शोध तिच्या पाठीपाठी करत निरीक्षणातून घेण्याऐवजी तिच्या क्लासमधील ईतर मुलींची ओळख काढून त्यांच्यामार्फत पक्की खबर घेणे केव्हाही चांगलेच. सुझायना आमच्याच अभियांत्रिकी शाखेची असल्याने आमच्या ज्युनिअर्सकडून तिची माहिती काढणे फारसे कठीण गेले नाही. पण काय हा दैवदुर्विलास, नेमकी सर्वात महत्वाची आणि घातक माहितीच आमच्यापर्यंत पोहोचली नाही. बाकी मुलगी सिंगल आहे आणि पटेल त्याची चंगळ आहे एवढे मात्र समजले.

स्टेप नंबर दोन - शेवटचे वर्ष असल्याने अधल्यामधल्या सर्व स्टेप्स गाळत मुलीला थेट भिडायचे ठरवले. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कसल्याश्या "डेरीमिल्क अ‍ॅण्ड व्हॅनिला डे" चा फायदा उचलत थोडा खर्चा केला आणि तिला गाठले. ती ना हो म्हणाली, ना नाही म्हणाली, डेरीमिल्कचा पुडा तेवढे लंपास करून गेली.

पुढचे काही काही दिवस ती सुझायनाबाई रौशनला अशीच झुलवत होती आणि त्या नादात होणारा खर्चा त्याच्या पॉकेटमनीच्या १७५ टक्के होता. थोडक्यात उधारवारी सुरू झाली होती. बस्स, याच कारणासाठी मग आमच्यातीलच कोणीतरी ‘एक घाव दोन तुकडे’ होऊन जाऊ दे, म्हणत एक खोडसाळपणा केला. फरक ईतकाच, हा घाव दोन तुकडे तोडायला नाही, तर दोन मुखडे जोडायला होता. पण परीणाम झाला भलताच!.

लायब्ररीच्या दिशेने जाणार्‍या, मुख्य जिन्याच्या दर्शनी जागेत, ठळक अक्षराने कोणीतरी रौशन आणि सुझायनाचे नाव लिहित भोवताली बदाम रेखाटला.. आणि दुसर्‍याच दिवशी वीज कडाडली!..

वर उल्लेखलेली महत्वाची माहिती जी आमच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती ती अशी,.. सुझायना हि आमच्याच क्लासमधील सेलिनाची मावसबहीण होती. त्यामुळे आता हे प्रकरण कॉलेजपुरतेच न राहता घरापर्यंत जायची भिती निर्माण झाली. सुझायनाच्या मनात काय होते ते अजूनपर्यंत देवालाही ठाऊक नसल्याने तिने पलटी खाल्ली असेच म्हणता येणार नाही, पण ती या प्रकरणाची रीतसर तक्रार मात्र नोंदवून आली. रौशनने हि आयडीया माझी नव्हतीच म्हणत हात वर केले आणि मधल्या काळात आमच्या ग्रूपमधील मुलांनी मोठ्या हुशारीने त्या चित्रकारीचे नामोनिशाण मिटवत ते अक्षर नक्की कोणाचे होते याचा शोध घ्यायचा मार्ग बंद केला. प्रकरण बरेपैकी तापले होते पण सुझायनाने यात माझीच बदनामी होईल म्हणून जास्त चिघळू दिले नाही. पण डिपार्टमेटच्या हिटलिस्टवर आम्हा काही जणांची नावे तेवढी जमा झाली.

पुढचे सारे सत्र शांततेत गेले. रौशन आणि सुझायना यांच्या भेटीगाठी बंदच झाल्या होत्या. तिची मावसबहीण सेलिना आम्हा सर्वांनाच येताजाता खुन्नस देऊ लागली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही मात्र रौशनला सुझायनाच्या नावाने चिडवणे चालूच ठेवले होते..

..... अश्यातच सत्र संपता संपता अखेरीस ती काळरात्र उजाडली!

भाग २ ईथे वाचा - http://www.maayboli.com/node/51894

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुर्तास क्रमशा आहे.
शीर्षक सुचत नसल्याने ते देखील बाकी ठेवलेय.
पुढचा भाग पुर्णत्वास नेउन वेगळा धागा न काढता इथेच अपडेटेन.

तुर्तास क्रमशा आहे.
शीर्षक सुचत नसल्याने ते देखील बाकी ठेवलेय.
पुढचा भाग पुर्णत्वास नेउन वेगळा धागा न काढता इथेच अपडेटेन.

येस्स स्सर्र् , क्रमश: कर्रेक्ट
जसजसे मी जास्तीत जास्त क्रमश: कथा आणि लेख लिहायला लागेन तसतसे हि चूक सुधारत जाईल..

शिर्षक का.. व्याकरणाची फारच बोंब आहे माझी.. सुधारणेबद्दल धन्यवाद, एकच चूक पुन्हा नाही करणार खात्री बाळगा..

बेफिकीर, नक्की काय नाही समजले?
एक विलक्षण सत्यघटना आहे, विश्वास बसला तर लेख नाही बसला तर कथा विभागात हलवेन..
तुर्तास वाचनखूण म्हणून साठवून ठेवा.. Happy

पहिल्या वाक्यातच गर्ल फ्रेन्ड आल्यामुळे पुढे काय असेल ह्याची कल्पना आली. म्हणुन वाचल नाही. प्रतिक्रिया नक्की वाचेन Lol

गर्लफ्रेंड = रुन्मेष , रुन्मेष = गर्लफ्रेंड Happy काल वाचलं होतं डोक्यावरुन गेलं ... क्रमश: आहे होय .... अंदाज आलाय..

लायब्ररीच्या दिशेने जाणार्‍या, मुख्य जिन्याच्या दर्शनी जागेत, ठळक अक्षराने कोणीतरी रौशन आणि सुझायनाचे नाव लिहित भोवताली बदाम रेखाटला>> हॅरॅस करता काय असे मुलींना. विचित्रच आहे प्रकार. त्याचे ग्लोरिफिकेशन का करायचे? पटले नाही.

बाकी मुलगी सिंगल आहे आणि पटेल त्याची चंगळ आहे एवढे मात्र समजले.>> हे विधान डिरोगेटरी आहे.

अमा,
ग्लोरीफिकेशन करतोय असे का वाटले? चूक कबूल करतोय असे का नाही वाटले? अर्थात, तसेही करत नाहीयेच, तर जे घडलेय ते सांगतोय इतकेच..

पुढचे विधान तुम्हाला खराब वाटले त्याच्याशी सहमत. ते फक्त त्या वयाची आमच्या ग्रूपची मानसिकता दर्शवण्यासाठी आले होते, कुठल्याही कथेत वा चित्रपटातही त्या वातावरणाला अनुसरूनच संवाद असतात.

अर्थात, हे देखील कुठल्याही प्रकारचे जस्टीफिकेशन नाही. किंबहुना मी कॉलेजमधील एक वाह्यात टपोरी टाईप मुलगा म्हणूनच ओळखला जायचो हे कबूल करतो. पण गंमत म्हणजे आता मला ओळखणार्यांना मी माझे किस्से सांगतो तेव्हा त्यांना विश्वास बसत नाही अशी मी ईमेज करून ठेवलीय..

असो, एखादी गोष्ट चूक की बरोबर याचे बेंचमार्क वयोपरत्वे, कालानुसार बदलत असतात, तसेच एखादी घटना घडताना तिच्यात आपला सहभाग कुठल्या भुमिकेत होता वा तटस्थ होता या नुसारही आपण तिचे मूल्यमापन करतो.

तर तुर्तास मी देवाकडे एवढीच प्रार्थना करू इच्छितो की पुढचा भाग मला प्रामाणिकपणे लिहायची हिम्मत दे, ज्यात वात्रटपणाचा बेंचमार्क थोडा आणखी उंचावणार आहे. Happy

ग्लोरीफिकेशन करतोय असे का वाटले? चूक कबूल करतोय असे का नाही वाटले? अर्थात, तसेही करत नाहीयेच, तर जे घडलेय ते सांगतोय इतकेच..>> ह्यात त्या मुलीला काही मानसिक त्रास झाला असेल वगिअरे काही वाट्लेले दिसत नाही आहे. नो रिमोर्स. कठीण आहे. कधीकाळी तुम्हाला मुलगी झाली तर आणि तिच्या बाबतीत कोणी असे लिहीले तर चालेल का? का तुम्ही तसे करणार्‍याला फोडून काढाल? निदान पक्षी कंप्लेंट तरी कराल? वाह्यात पणाचे कौतूक करावे असे तुमची अपेक्षा आहे का?

प्रतिक्रिया वाचल्या!! (सगळ्या नाहीत)
लोकांकडे भरपुssssssssssssssssssssssर वेळ आहे हे समजलं Happy (आणि आज माझ्याकडे पण आहे थोडा, प्रतिक्रिया वाचण्यापुरता आणि हा प्रतिसाद देण्यापुरता Wink )..
असो, तर लोकहो तुमच्या टाईम मॅनेजमेंट ला ___/\__

वाह्यात पणाचे कौतूक करावे असे तुमची अपेक्षा आहे का?
>>>
आधी ग्लोरीफिकेशन हा शब्द वापरलात आणि आता वेगळ्या शब्दात तेच मांडत आहात.
कौतुक करावे अशी अपेक्षा कुठे व्यक्त केली आहे. उलट यावर टिका होण्याचीच शक्यता होतीच, ती होतेय तर त्यावरही मी ना प्रतिवाद करत आहे ना वरच्या घटनेचे जस्टीफिकेशन. तुम्हीच हे अर्थ काढत आहात Happy

त्या कोणत्या तरी न पाहिलेल्या मुलीसाठी माझी धडपड आहे. तिची बाजू काही असेल असे तुम्हाला कोणासही वाटले नाही आहे का? तसे असेल तर किती वेळ घालवणार. चालुद्या क्रमशा

तिची बाजू काही असेल असे तुम्हाला कोणासही वाटले नाही आहे का?
>>>>>>
वाटले ना, तेव्हा जे वाटले त्यानुसार तेव्हा वागलो. आज जे वाटतेय त्यानुसार आज लिहितोय. दोन्ही वाटन्यांमध्ये तेव्हाच्या आणि आजच्या प्रगल्भतेनुसार फरक आहेच.

याउपर आपणही आपल्या जागी योग्यच आहात.

मला थोडीशी गेम लक्षात आली आहे. Happy

एक धागा - ज्यात काही स्मृती, त्यात स्वतःसकट अनेकांचे वर्तन किंचित हरकतपात्र, किंचित 'सगळ्या जगाचे असते तसेच' आणि विषय अगदी 'आम', ज्यावर कोणालाही बोलता येईल.

प्रतिसाददाते - तुमचे वर्तन खटकले म्हणणार, हा धागा हवाच कशाला म्हणणार, मस्करी करणार, डोकेफोड करणार

धागाकर्ता - सर्व आरोप मान्य आहेत आणि स्तुती अपेक्षित आहे असे म्हंटलेलेच नाही आहे असे म्हणणार

प्रतिसाददाते - कळप बनवून एकमेकांना सामील होऊन प्रतिसाद देऊ लागणार, हेटाई करू लागणार

धागाकर्ता - हिमालयासारखा शांत, प्रत्येकाशी विनम्रपणे हितगुज करणार

धागा सुमारे एक आठवडाभर पहिल्या दहात!

परिणामः

धागाकर्ता - शांत, अधिकच चिवट होणे!

प्रतिसाददाते - उच्च रक्तदाब, डोकेदुखी, चिडचिड, नैराश्य, शीघ्रकोप ह्यासारख्या व्याधींना बळी पडून दुसरा धागा वाचायला घेणार!

शिकण्यासारख्या गोष्टी:

१. धागा कशावरही असू शकतो
२. धागा कशावरही असला तरी चर्चा गाजू शकते
३. आपण शांत राहून दुसर्‍याला अशांत करू शकतो
४. जगात विषयांची कमतरता नाही. कबूतराची अंडीपासून शेजार्‍याची बंडीपर्यंत काहीही विषय मिळू शकतो.
५. धकाधकीच्या जीवनशैलीने'च' होतात असे ज्या व्याधींबाबत बोलले / म्हंटले जाते त्या व्याधी दुसर्‍याला आपण फक्त एक धागा काढूनही देऊ शकतो.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

बेफी, अत्यंत अचूक. माझ्यातर्फे तुम्हास कोट टोपी शाल नारळ.

शाल नारळ >> महावस्त्र श्रीफळ असे लिहा. पुणेरी मराठीत नारळाला श्रीफळ म्हणतात आणि चादरीला महावस्त्र Proud

चादरीला महावस्त्र >> Uhoh

अमा चादर कुठे देणारेत?
बेफींना झोपवायचा विचार आहे कि पुणेरी थंडी बाधु नये म्हणून शालीऐवजी एकदम चादर? Lol

Pages