तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 July, 2015 - 16:09

खूप दिवसांनी फेसबूक प्रोफाईलवरची धूळ झटकत, विस्मरणात गेलेला पासवर्ड आठवत, डिअ‍ॅक्टीवेट झालेल्या प्रोफाईलला अ‍ॅक्टीवेट केले. प्रोफाईलमध्ये कधीकाळी मौजमजेसाठी जमा केलेले सवंगडी कसे आहेत, त्यांची खुशाली घेऊया म्हणून थोडीफार चाळाचाळ केली. तर दहापैकी सात जणांचे प्रोफाईल पिक्चर सप्तरंगी रंगात नटलेले दिसले. फेसबूकवरचेच एखादे फॅड म्हणत इग्नोर करावेसे वाटले, पण उथळ गोष्टींना थारा न देणार्‍या काही मित्रांनी देखील या ऊपक्रमात सहभाग घेतला होता ते पाहून हे काहीतरी स्पेशल आहे असे जाणवले. चारचौघांना विचारले तर कोणालाही ठामपणे काही सांगता आले नाही. काय ते प्राईड प्राईडसाठी म्हणत थातुर मातुर उत्तर दिले. थोडीफार शोधाशोध करता करता हाताला खालचा फोटो, नेमके कसले प्राईड आणि आपल्या प्रोफाईलला रंगीन करणारे नक्की कश्याचे समर्थन करत होते ते समजले. अर्थात जाणतेपणी वा अजाणतेपणी, दिखावा करायला वा मनापासून हे त्यांनाच ठाऊक.

तर यामागचे कारण असे की नुकतेच अमेरीकेत समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता मिळाली. तर ज्यांचा या कायद्याला पाठिंबा आहे त्यांनी तो दर्शवायला आपले प्रोफाईल पिक्चर रंगीत पट्ट्यांत रंगवायचे होते.

gay colour code 1.jpggay colour code.jpg

सेक्शुअल ओरिएंटेशन - Sexual orientation (मराठीत काय म्हणतात देव जाणे)
पण हा शब्द मला पहिल्यांदा ऑर्कुट प्रोफाईलवर समजला. त्यातील नाव-गाव-फळ-फूल माहितीत आपापले सेक्शुअल ओरिएंटेशन सुद्धा लिहायचे होते. गंमतच वाटली होती. आणि त्यापेक्षा जास्त गंमत तेव्हा वाटली होती जेव्हा काही महाभागांनी आम्ही "स्ट्रेट" आहोत असे प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का?

.. पण बघता बघता दिवस बदलले, आणि आता ही सांगायची गोष्ट असू शकते असे माझे मतपरिवर्तन झालेय.

असो, तर मग मला माझ्या त्या सर्व फेसबूक बंधूंची फिरकी घेण्याचा मोह झाला.

एकाला सहज विचारले, काय रे तुझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?
तर गडी चिडला!
लगेच मला समजून चुकले की याने आपले प्रोफाईल पिक अजाणतेपणे रंगवले आहे.
त्याला म्हटले काही नाही झमन्या, अर्ध्या गावाची तुला माहीती नसते आणि सगळीकडे पुढे पुढे करण्याची घाई असते.
माहिती देताच त्याने घाईघाईत आपले प्रोफाईल पिक्चर बदलले.

हाच प्रयोग आणखी दोघाचौघांवर केल्यावर एक जण असा निघाला ज्याला यामागचे कारण माहीत होते. तसेच आपण अश्या संबंधांना आणि त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला सपोर्ट करतो असेही तो म्हणाला.
त्याला देखील मी विचारले, "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." .. तर हा देखील चिडला! जरा जास्तच चिडला.
थोडक्यात त्याचा सपोर्ट किती पोकळ होता ते मला समजून चुकले. जे स्वत:ला कोणी समजले तर त्याला ती एक शिवी वाटते अश्यांना तो कसा मनापासून सपोर्ट करणार होता.

पुढे दोनेक दिवसातच हळूहळू काही प्रोफाईल पिक्चर बदलताना दिसले. बहुतेक खरे कारण समजल्याने काही जणांनी ओशाळून बदलले असावेत, वा काही जणांनी दाखवला तेवढा सपोर्ट पुरेसा म्हणत बदलले असावेत. तर काही जणांचे प्रोफाईल पिक्चर आजही रंगीत पट्ट्यात दिसत आहेत. खंबीर पाठिंबा!

अर्थात, मला स्वत:ला देखील अजून ठामपणे मत बनवता येत नाहीये की या प्रकारचे संबंध योग्य की अयोग्य? नैसर्गिक की अनैसर्गिक? आजार, विकृती की फक्त एक प्रकारचे सेक्शुअल ओरिएंटेशन..

पण याला किमान अंश भर सपोर्ट करणार्‍यांना मला एक विचारावेसे वाटते, आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह म्हणजे फार मोठा सामाजिक अपराध ठरवला जातो. या अपराधाची शिक्षा तो समाजच देतो. वेळप्रसंगी पोटच्या पोरांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तर असल्या समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, मनःपूर्वक धन्यवाद... Happy
फक्त मी जरा वेगळाच विचार करतोय या विषयानिमित्ताने. तो असा की शिवाचे स्वरुप नरनारी असे एकत्रीत मानले आहे. त्याची लक्षणे यच्चयावत पुरुष-स्त्रीयात दृगोच्चर होतच असतात. तर या गोष्टींचा अंदाज कुंडलीमार्फत कसा लावता येईल हे बघतो आहे.

मित्रांमध्ये काय किती फ्रीडमने बोलावे हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, जो काढणे माझाच हक्क आहे आणि मी तो बजावणारच.

पण यातून एक गोष्ट जाणवते, जसे आपण एखाद्या जेमतेम ओळख असलेल्यालाही "तुम्ही घेता का? (दारू)" असे बिनधास्त विचारून आमंत्रण देऊ शकतो पण खास मित्रालाही त्याचे सेक्शुअल ईंटरेस्ट विचारणे त्याच्या वैयक्तिक बाबीत ढवळाढवळ करायचा भोचकपणा ठरू शकतो.

याचाच अर्थ असा की याला घेऊन आपल्यात अजून तितकीशी सहजता आली नाहीये.

सॉरी काम आले, डिटेल पोस्ट नंतर.....

जसे आपण एखाद्या जेमतेम ओळख असलेल्यालाही "तुम्ही घेता का? (दारू)" असे बिनधास्त विचारून आमंत्रण देऊ शकतो>>> तोच तर मुद्दा आहे ना?
आमंत्रण द्यायच नसेल तर विचारावच का ओरियेन्टेशन? मग ती खाजगी बाब होते.

सातीची पोस्ट माहितीपुर्ण.
तिचा एक लेख आठवला.

काम होईल हो नंतर !
इतक समाज प्रबोधनाच व्रत घेतलय हाती उगाच कामाच्या त्याची नावाने चाल ढकल करु नका !!

काम होईल हो नंतर !
इतक समाज प्रबोधनाच व्रत घेतलय हाती उगाच कामाच्या त्याची नावाने चाल ढकल करु नका !!

सॉरी काम आले, डिटेल पोस्ट नंतर.....
>> तुला असंच काम येत राहो मित्रा, म्हणजे आम्ही वाचू तुझ्या भयंकर धाग्यांपासून Proud

आमंत्रण द्यायच नसेल तर विचारावच का ओरियेन्टेशन?
>>>
माझी पोस्ट लिहितानाही माझ्या डोक्यात हेच घोळत होते की एक्झॅक्ट अशी पोस्ट पडणारच,
तसेच त्या खाली आलेल्या चार खळखळून हसर्‍या स्माईली देखील..

यातून एखाद्याला म्हणजे इथे मला "गे" बोलून जी काही विनोदनिर्मिती झाली आहे तेच आपल्या समाजात खर्‍याखुर्‍या समलिंगी लोकांचे स्थान आहे. थट्टेचा विषय !

तुमचे मस्त आहे ऋन्मेषः

तुम्ही एक धागा काढता तेव्हा तुम्ही चिकमंगळूरला असता. जगाच्या कानाकोपर्‍यातील वाचक त्यामुळे चिकमंगळूरला पोचून धाग्याची गाडि पकडतात आणि आरक्षण असो नसो लटकून उभे राहतात. तुमचे वचन असते की गाडी न्यू जलपाई गुडीला पोचणार! अधेमधे वाट्टेल त्या असलेल्या नसलेल्या स्थानकांवर पब्लिक गाडीत घुसते. अतीव घुसाघुसीमुळे प्रवाश्यांच्या एकमेकांशीच मारामार्‍या होतात. खूनबिन पडतात. कंपू तयार होतात. गाडी आतून घुसळली जाऊ लागते. काही नको असलेले प्रवासी अपमानास्पदरीत्या बाहेर फेकले जातात. गाडीत इमर्जन्सीला ओढायला म्हणून जी साखळी असते त्याने गाडी थांबायच्या ऐवजी तिची दिशाच बदलते. मुघलसराय जंक्शनला गाडी 'शिवारात सांड उधळावा' तशी हरियाणाकडे धावू लागते. ज्यांना 'आपल्या स्थानकावर गाडी येईल' असे अजिबात वाटत नसते ते हबकून ती गाडी बघतात आणि संधी जायला नको म्हणून तेही त्यात चढतात. ते ना चिकमंगळूरचे असतात ना न्यू जलपाई गुडीचे! तोवर तुम्ही 'नवीन जे प्रवासी चढले आहेत' त्यांच्या इच्छेला मान देऊन गाडी वळवत राहता. जुन्यांचा तुम्हाला कंटाळाही आलेला असतो आणि तसेही जिथे जायचे वचन जुन्यांना दिले गेलेले असते तिकडे आता गाडी जाणारच नसते. आता गाडीत कोण कशासाठी चढला आहे आणि मी का चढलो होतो माणसाला स्वतःचे स्वतःलाही कळेनासे होते. गाडी तुफान वेगाने खैबर खिंडीच्या तोंडाशी जाऊन पोचते तेव्हा तुम्ही हबकून बाहे उडी मारता. आतमध्ये निव्वळ अगणित प्रवासी, अमर्याद वादग्रस्त विषयांचे इंधन आणि चिकमंगळूरपासून मिळालेला नॉनस्टॉप इनर्शिया ह्याच्या जोरावर गाडी अफगाणिस्तानात जाऊन उपडी होते. अनेक प्रवाश्यांची भीषण कलेवरे नैराश्याच्या गर्तेतून उठून आपापल्या देशाला जाऊ लागतात. तेव्हा तुम्ही दुसरी नवीन गाडी जगन्नाथपुरीहून त्रावणकोरला चालली असल्याची घोषणा करत असता.

-'बेफिकीर'!

हा हा बेफि मस्त Happy
लिखाण म्हणून..

अवांतर - माझे नाव संस्कृतमध्ये का लिहिले?
ऋन्मेषः

>>> आमंत्रण द्यायच नसेल तर विचारावच का ओरियेन्टेशन? मग ती खाजगी बाब होते. <<< झकोबा... परफेक्ट.
बेफिकीर... मला ते अशोककुमारच रेल्वेगाडिवरचे गाणे आठवले.... Lol

झकासराव Lol बेफिकीर, तुमच्या पोस्टमधली सर्वं स्टेशनांची नावं आवडली.

यातून एखाद्याला म्हणजे इथे मला "गे" बोलून जी काही विनोदनिर्मिती झाली आहे तेच आपल्या समाजात खर्‍याखुर्‍या समलिंगी लोकांचे स्थान आहे. थट्टेचा विषय >> इथल्या शाब्दिक खेळावरून निर्माण झालेल्या विनोदावरून जगातल्या काही टक्के लोकांचे सामाजिक स्थान ठरवण्याची कुवत या जगात कुणाकडेही असू शकत नाही.

मला तर अगदी मनापासून असा धागा काढावासा वाटतो आहे की भारतातही समलिंगी व्यक्तीस लग्नाची मुभा असावी का?

अमेरिकेने हा निर्णय घेऊन एक वेगळी वाट निर्माण केली. माझ्यामते ह्या पुर्वी नेदरलॅन्डमधे समलिंगी लग्नास अनुमती मिळालेली आहे. ह्या निर्णयाचा समाजावर आणि लहान मुलांवर काय परिणाम झाला ते ऐकावेसे वाटते आहे.

काल इथल्या म्हणजे सिंगापुरातील स्थानिक वर्तमानपत्रात एक लेख वाचला की सिंगापुरमधे तरी हा निर्णय घेऊ नये कारण हा देश नवीन आहे. ह्याचे विपरित परिणाम ह्या देशाची प्रगती खुंटवेल.

आज सकाळी माझा एक मित्र म्हणाला जगात तर भाऊ बहिण, आई मुलगा, दीर वहिनी अशा अनेक पवित्र नात्यातही शारिरिक संबंध ठेवले जातात. इतकेच काय प्राण्यांसोबतही संबंध ठेवले जातात. मग काय अशा नात्यासही उद्या तुम्ही लग्न करा असे म्हणाल!!!!

>>आज सकाळी माझा एक मित्र म्हणाला जगात तर भाऊ बहिण, आई मुलगा, दीर वहिनी अशा अनेक पवित्र नात्यातही शारिरिक संबंध ठेवले जातात. इतकेच काय प्राण्यांसोबतही संबंध ठेवले जातात. मग काय अशा नात्यासही उद्या तुम्ही लग्न करा असे म्हणाल!!!
>>
बी, गल्लत होतेय. इंसेस्ट आणि बिस्टिलीटी हे कायद्याने गुन्हे आहेत. दीर - वहिनी नात्यात अफेअर असू शकते मात्र त्यातली एक व्यक्ती(वहिनी) विवाह बंधनात असताना लग्न केले तर बायगॅमी म्हणजे गुन्हा. जर लग्न संपले/मोडले तर कायद्याने जोडलेले नातेही संपते. अशावेळी लग्न होऊ शकते आणि होतेही.

एखाद्याला म्हणजे इथे मला "गे" बोलून जी काही विनोदनिर्मिती झाली आहे तेच आपल्या समाजात खर्‍याखुर्‍या समलिंगी लोकांचे स्थान आहे>> अहो, मी कुणाला काहि बोललो नाहिये हो.
तुमच्या दारुच्या वाक्यातील लॉजिक तुमच्या प्रश्नांना लावुन दाखवल आहे.
थिन्क अगेन प्लीज.

बी, गल्लत होतेय. इंसेस्ट आणि बिस्टिलीटी हे कायद्याने गुन्हे आहेत..>>

पुर्वी गे संबंध सुद्धा गुन्हाच होता ना? पण आता अमेरिकेत हा गुन्हा नाही.

इथे चार्ली रोज यांच्या शोमधे गेली काही वर्षे ब्रेन सिरीज सुरु आहे. त्यातील नुकताच झालेला एपिसोड जेंडर आयडेंटिटी बद्दल - http://www.charlierose.com/watch/60578677
भारतात ही लिंक चालते की नाही ते माहित नाही.

हो पण इंसेस्ट मधे लहान मुलांच्या व्यतिरिक्त मोठे पण येतात ह्या व्याख्यामधे.

incest = sexual relations between people classed as being too closely related to marry each other.
the crime of having sexual intercourse with a parent, child, sibling, or grandchild.

बी, त्याबाबत प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे आहेत. काही देशात कंसेंटिंग अ‍ॅडल्ट असल्यास असे संबंध कायद्याने मान्य आहेत तर काही देशात कझिन्समधे लग्न देखील गुन्हा आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Laws_regarding_incest
याच लिंकच्या आधारे बोलायचे तर भारतातच याबाबत ठाम असा कुठलाच कायदा नाहिये.

बॅफी --/\-- Happy

धागा धागा अखंड काढू

यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?
ज्यांच्या अंगी वळवळ
ते उभारतील चळवळ

Pages