होमस्टे एक संकल्पना

Submitted by आरती. on 7 July, 2015 - 05:07

स्वतःच होमस्टे सुरु करताना तसेच दुसर्‍याच्या होमस्टे मध्ये राहताना येणार्‍या अडचणी, तसेच फायदे तोटे ह्याबद्दल चर्चा करू या.

नीधप, शिर्षकासाठी धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कुठे अनलिमिटेड जेवणाचा आग्रह धरलाय? <<<< अग हे त्यासाठी नाही आहे.
दोन्हीसाठी अडचणी कश्या कळणार तुम्हाला असे म्हणता येईल.<<<< इतरांसाठी लिहिल होत. तुला माहीतच आहे अशा ठीकाणी आता ऑर्डर केली आणि लगेच १० मि. डिश हजर होणार नाही. इनजनरल होमस्टे मध्ये राहताना अशी अपेक्षा करू नका अस मला म्हणायच आहे.

.

घरच्या घरी अशी सोय करणे फार वेळखाऊ काम असू नये. एक दोन ठिकाणी कुठे जाऊन राहून ये जिथे होम स्टे असेल म्हणजे तुला त्यातून काही माहिती मिळेल. <<<< धन्यवाद बी, मला ह्या बद्दल माहिती आहे. आमच्या नातेवाईंकांचे होम स्टे आणि हॉटेल्स आहेत. वेळखाऊ काम ह्यासाठी कारण त्यांना तीन वेळा खाऊ घालणे किंवा त्यांना ज्या वेळी हव असेल तेव्हा जेवण/ ब्रेफाची सोय करणे. त्यांचे सजेशन्स अंमलात आणणे. काही इमर्जन्सी आली तर ती सॉल्व्ह करण्याची तुमच्यात कॅपॅसीटी हवी.

बी तुम्ही जिथे होमस्टे केल तिथल्या मालकांना तुम्ही जेवलात किंवा नाही जेवलात ह्याच्याशी काही देण घेण नाही. पण आमच्या इथे पर्यंटकांच खाण पिण सांभाळाव लागत.

आरती, नियम ठेवायचे ना मग. की दोनच वेळा मिळेल. हे पदार्थ असतील. हे मागू नका. हे कधीही मिळेल असे नियम ठेवले की बरे होईल तुला. आणि लिहि की हे घर आहे आणि वरकामाला असे कुणीच नाही. समजतील ना लोक. पैसे थोडे कमी घे. एका दिवसाचे किती दर आहेत?

एका दिवसाचे किती दर आहेत? <<<< बी,आम्ही अजून चालु केल नाही आहे. आमच्या एका प्लॉटवर हा उपक्रम राबवायचा आहे. ज्यांचे आहेत त्यांना विचारून रेटस तुम्हाला मेल करते. इथे ती चर्चा नको. Happy

आणि लिहि की हे घर आहे आणि वरकामाला असे कुणीच नाही. <<<<< ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण महत्वाच. इतरांचे रीव्ह्यु वाचून आपण त्या ठीकाणी जाण किंवा न जाण हा निर्णय घेत असतो.

असाच एक प्रदीर्घ होम स्टे मी करामा ( दुबई ) आणि नैरोबी मधे पण अनुभवला. दुबई मधे सिंधी तर नैरोबी मधे गुजराथी कुटुंब होते. दुबईला घराची चावीच मला दिली होती. जेवण माझे मी बघायचे होते. स्वतंत्र रुम होती. रोज हसून स्वागत होत असे पण त्यापेक्षा जास्त दखल घेतली जात नसे.

नैरोबीला मात्र अगदी घरगुति वातावरण. माझ्यासकट अनेक जण होते पण सगळेजण एकोप्याने रहात. नाश्ता, जेवण भरपूर असे. ज्यांना हवा असेल त्यांना दुपारचा डबाही मिळत असे. एरवी काही खायला हवे असेल तर किचन उघडेच असे. साधारणपणे गुजराथी घरात शनिवार रविवारी पूर्ण जेवण न करता काही खास पदार्थ भरपूर करतात, तसेच तिथे होते. जेवणाच्या टेबलवर सर्वांच्या मनमोकळ्या गप्पा होत. तशी गरज नव्हती तरी आम्ही घरी असलो तर जेवण करण्यात हातभार लावतच असू. आपली प्लेट आपणच उचलून ठेवायची असे फारसे जाचक नसणारे नियम होते. ते कुणी कुणाला मुद्दाम सांगत नसत. कपडे धुण्याची, इस्त्री करण्याची सोय त्यातच होती. प्रत्येकाच्या वैयक्तीक आवडीनिवडीकडे लक्ष दिले जात होते.

पी.जी. दुबईमधे बेकायदेशीर नाही, त्याची तशी जाहीरातही होते पण नैरोबीमधे मात्र बेकायदेशीर आहे. त्यामूळे त्याला होम स्टे च म्हणावे लागते.

मजेचा भाग सोडा, पण ही बाब सत्य आहे कि नैरोबीत सिटी कौन्सिल च्या माणसाने हटकले / विचारले तर मी त्या ऊषाबेन ( किंवा जी कुणी असेल ती ) चा भाऊ लागतो असे सांगावे लागते. पण हेही तितकेच खरे कि तिथल्या गुजराथी बायका, संसाराला हातभार लागावा म्हणून हे करत असल्या तरी त्यात व्यवहाराचा रुक्षपणा नसतो. घरे मोठी असतात, आपल्याच घरात असल्यासारखे वावरता येते. अनेकवेळा अशी सोय तिथल्या कंपन्याच करतात, त्यामुळे प्रत्यक्ष असे राहणारे लोक आणि ते कुटुंब यांच्यात पैश्याचा व्यवहार होतच नाहि.

अनेक सेल्स रिप्रेझेंटेटीव्ह असे राहतात. कारण एकतर त्यांना महिनाभर वगैरे रहायचे असते आणि तेवढा काळ हॉटेलात राहणे परवडणारे नसते.

होम स्टे एक व्यवसाय म्हणून करावयाचा असल्यास खालील बाबींचा ही विचार व्हावा.

१) बिलिन्ग कसे करतात? सेल्स टॅक्स/ सर्विस टॅक्स, लागतो का? काय बाबींचे रजिस्ट्रेशन करावे लागते?
२) लेखी बिल देतात का? का उभयपक्षी तोंडी व्यवहार करून कॅश ची देवाण घेवाण होते? मग हे टॅक्स फ्री इनकम आहे का ओनर्स साठी. काय अनुभव आहे वाचकांचा?

३) जर कार्ड अ‍ॅक्सेप्ट करत असतील तर एक फोन लाइन व नेट कनेक्षन असणे जरूरीचे आहे. कार्ड व्यवहार पूर्न होण्यासाठी.

४) एक उदाहर्णार्थ टाटा फोटोन डाँगल घेतली तर त्याचे महिन्याचे बील साधारण १२०० येते. ५ पैकी दोन ग्राहकांनी जरी नेट सुविधा मागितली तरी मालक थोडे बिलाचे पैसे रि कव्हर करू शकेल. मोठ्या सर्वर वायरिंग वगैरे हार्डवेअर ची गरज नाही. एक लॅप टॉप व डाँगल एव्ढीच गुंतवणूक अपेक्षित आहे.
हे इतर्वेळी ते स्वतःसाठी वापरू शकतात. स्वतःची वेब साइट अपडेत वगैरे करू शकतात. जाहिरात करू शकतात. प्रिया बापट हॅपी जर्नी मध्ये म्हणते त्यानुसार इंटरनेट ही काळाची गरज आहे.

५) तसेच एसीचे आहे. २५- ३० हजारात मिळू शकेल त्यासाठी बँक लोन घेउन सहा महिने वर्श भरात फेडून टाकता येइल. कोकणातील हवेस एसी रूमची सुविधा ती ऑफर करायची क्षमता असणे हा एक प्लस पॉईन्ट आहे

६) रेस्ट रूम मध्ये वेस्टर्न पद्धती ची सुविधा, वॉटर जेट व टॉयलेट पेपर ऑफर करणे ( ऑन डिमांड) ह्या मुळे परदेश्स्थ पाव्हण्यांचा व ज्येनांचा कडून थँक्स मिळतील. वयोपरत्वे इंडियन टॉयलेट वापरणे अवघड जाते. व बरेच पाहुणे आई बाबांबरोबर क्वालिटी टाइम घालवायला अश्या ठिकाणी येउ शकतात. त्यांना हायसे वाटेल.

एखाद्या संपूर्णपणे वेगळ्या व अपरिचित फॅमिलीशी लगेच इमोशनली कनेक्ट होता येइल असे ह्या जन्मी तरी वाटत नाही. मुळात सुट्टीवर येणे हा आपला प्रायवेह्ट टाइम आहे. त्यात आपले सुखद अनुभव गाठी बांधावेत का टोटल स्ट्रेंजर शी नाते वगैरे जुळवावॅ? तशी खरी गरज आहे का? हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न सुविधांचा हट्ट नाही. तो इतर वेळी पूर्ण होउन जातो.

आरती, मंगलोरी घराची कल्पना मस्त आहे. कुठे करण्याचा विचार आहे?
लाल कोब्याची जमीन करण्याचा पण विचार करून पहा. सारवण्यापेक्षा कमी मेंटेनन्स आणि अनवाणी पायाला मस्त.

आ र्कि टेक्ट लॉरी बेकर ह्यांच्या शैलीतले घर ही फार छान वाटेल राहायला. केरळ मध्ये अशी छान घरे खूप आहेत. पण मग तो एक खास कोकणी अनुभव नाही. तुमच्या अपेक्षित ग्राहकांना ही आवडेल कि नाही कोण जाणे.

मुळशीचा एक मस्त अनुभव आहे. त्याला होमस्टे म्हणता येईल का माहित नाही.

तिथे दोन बंगले वजा घर आहेत. एकात का-काकू रहातात दुसर्यात पाहुणे. एसी, टीवी नाही. नेट कनेक्शनची कल्पना नाही. एक जेवणघर वेगळे आणि तिथेच जेवणे / ब्रेकफास्ट करणे कंपलसरी आहे.

जेवणात मेनू म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी खायला पोहे, उपमा इत्यादी. जेवण मटकी, भरली वांगी इत्यादी. टिपिकल पंजाबी पदार्थ नाहीत. चिकनही मिळते. तेही छान घरगुती. बटर चिकन वगेरे नाही. मुलांनी दुध प्यावे असा प्रेमळ आग्रह काकू करतात.

काका-काकू एकदम मस्त. जवळ एक देवराई आहे. दोघेजण हॉशीने तिकडे सकाळी फिरायला घेऊन जातात.

अम्ही ४-५ मैत्रीणी आणि आमच्या मुली असे गेलो होतो. फक्त एक दिवस मुक्काम. पण धमाल आली. रात्री मुलींनी एक नाटक बसवले तर दुसर्या दिवशी काका-काकूंनी ते आवडीने बघितले.

भारत्भर कुठेही होमस्टे शोधायचा असेल तर मग तो तिथल्या स्थानिक लोकांबरोबर असावा असं मला वाटतं.....
म्हणजे त्यांच्या पध्दतीचं जेवण, ४ दिवस पध्द्तीनं रहाणं, त्यांच्या प्रांतात त्या लोकांना सोबत घेऊन किंवा त्यांच्याकडून लोकल माहिती मिळवून यथेच्च फिरणं, स्थानिकांशी गप्पा बातचीत करून तिथल्या आख्यायिकांपासून ते अगदी सर्व गोष्टी ऐकणं..... रोजच्या गोष्टींपासून काहीतरी वेगळे.

शिवाय आपण काय २४ तास त्यांच्या गराड्यात नसणार... सो उरलेल्या फावल्या वेळात आपलं वाचन, एकट्याने भटकणं, स्वतःसाठी वेळ देणं असं काहिसे असावं .....

त्या व्यतिरिक्त पहुणचार खात्यात अधिक मिळालंच तर सोने पे सुहागा.... पण मुख्य हेतू हा तो परिसर तिथली माणसं तिथली संस्कृती काही दिवस आपल्या चैकटीतून कोषातून बाहेर येऊन अनुभवावी हाच असावा.

मला इथे दूर्गभ्रमणवाले नेहमी जो अनुभव घेतात ( म्हणजे गडाच्या पायथ्याशी एका घरात रात्र काढण्याचा ) त्याला होम स्टे म्हणावेसे वाटतेय. अगदी त्यांच्या स्टाईलने राहतात ते.

दिनेश, मी हेच लिहायला आले होते.
माझा दुसरा होम-स्टेचा अनुभव काल आठवलेला -
रायगडाच्या पायथ्याच्या एका घरात आम्ही एक रात्र राहिलो होतो. मी, नील, किरु, घारू आणि नीलचा मामा. तो घरमालक रायगड रोप-वेलगतच्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. संध्याकाळी ७ ते दुसर्‍या दिवशी सकाळी ७ असा आमचा मुक्काम होता. घरालगत त्यांनी एक मोठी हॉलवजा खोली बांधलेली आहे. तिथे रात्री एक मोठी चटई अंथरायला दिली. पांघरुणं आम्ही सोबत नेली होती. उशाला पाठीवरच्या सॅक्स.
घरमालकिणीनं (तिला सगळे वहिनी म्हणून हाक मारायचे) रात्री मस्त चुलीवरच्या भाकरी आणि पिठलं करून वाढलं. दुसर्‍या दिवशी पहाटे चुलीवरचं गरम पाणी आंघोळीला दिलं. घराच्या एका कोपर्‍यात पाच फुटी(च) भिंतीचा आडोसा केलेली बिनदाराची बाथरूम होती. वहिनींना मी जरा साशंक मनानंच विचारलं - "इथे करू का आंघोळ?" Lol त्या म्हणाल्या - "करा बिनधास्त, मी आहे इथे." बाथरूमच्या दाराजवळ त्यांनी पहाटे पाणी भरलेल्या बादल्या, घागरी, घंगाळी मांडून ठेवल्या आणि म्हणाल्या - आता या दिशेला कुणी येणार नाही Lol
टॉयलेट मागच्या अंगणात एका कोपर्‍यात होतं. त्याच्या दाराची मात्र जरा बोंब होती. कडी लागत नव्हती Lol फार काळजीपूर्वक वापरावं लागलं.
तिथल्या मुक्कामाचा अनुभव भारी वाटला मला!

हा एक प्रकार झाला. हे सगळ्यांनाच झेपेल असे नाही. किंवा एखाददुसर्‍या दिवसापुरते चालेल. पण सलग ८-१० दिवसाच्या सुट्टीला चालेलच असे नाही.
ट्रेकला जाताना आपण सर्व असुविधा गृहित धरूनच जातो. त्यामुळे हे सगळं आवडतं आपल्याला.

मी ट्रेक फार नाही केले पण नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्ताने खूप फिरलेय. छोटा ग्रुप, जेमतेम पैसे तरी एकांकिका स्पर्धेत उतरायचं असले उद्योग असले की हे असंच इथे तिथे पथारी पसरायची हे नॉर्मल असायचे. तेव्हा मजाही यायची.

मायबोलीवर रोजची नियमित फेरी नसल्याने खूपच उशीरा पाहिला हा धागा.. म्हटला तर ओळखीचा म्हटला तर नवीन वाटेल असा होमस्टे हा प्रकार आहे. लहानपणी ( जवळजवळ ३० वर्षांपूर्वी !) गणपतीपुळ्याला एक दिवस वाडीतल्या घरात राहिल्याची आठवण आहे. घरगुती मेतकूट भाताची न्याहारी, पुरेसं चौरस जेवण, बागेतला फेरफटका, घरच्या गाई/बैलाला जोडलेल्या रहाटावरून पाणी शेंदताना त्यात आम्ही लहान मुलांनी केलेली आंघोळ हे एवढं नक्की आठवतय. झोपायची सोय घराबाहेरच्या अंगणात उभारलेल्या शेडमध्ये गाद्या टाकून केलेली होती आणि सगळे पाहुणे आपापल्या ग्रुपमध्ये तिथेच कोपरे पकडून झोपलेले आठवताय..

आता नवर्याबरोबर हॉस्पिटॅलिटी ईंडस्ट्री अनुभवताना कळलेला/पाहिलेला होमस्टे हा प्रकार असा आहे..

होमस्टे म्हणजे थोडक्यात स्वतःच्या शेतात, टी/कॉफी प्लांटेशन, फार्मवर असलेल्या स्वतःच्या घरातील काही खोल्या आलेल्या पाहुण्यांना पैसे घेऊन रहावयास देण्यात येतात. ह्या प्रकारात घरात शंभर जरी खोल्या असल्या तरी ऑफिशिअली फक्त सहा खोल्या या होमस्टे साठी देता येतात. अॅीग्रिकल्चरल जमिनीवर उभारलेलं असल्याने ह्याला ही सहा रुम्स ची मर्यादा असते.. ह्या पेक्षा जास्त अकोमोडेशन्स हवीत तर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स असतातच आणि मग अर्थातच ही जमीन NA ( non-agricultural)केलेली असावी लागते . भरपूर जागा असल्याने सहा वेगवेगळ्या ठिकाणी सहा कॉटेजेस बांधू म्हणाल तर तसं चालत नाही. रहात्या घरातच ह्या सहा खोल्या असाव्या असा नियम आहे. गर्दी ज्यांना नको असते त्यांच्यासाठी हा होमस्टेचा ऑप्शन चांगला असतो. महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात रहायचं असेल तर हे शहरापासून दूर असे स्टे नक्कीच आवडू शकतात. होमस्टेज ना सर्विस टॅक्स, लक्जुरी टॅक्स लागू होत नसल्याने इथले रेट्स कमी असतात. काही लोकल अॅाक्टिविटीज त्यात अंतर्भूत असू शकतात किंवा त्याचे वेगळे चार्जेस असू शकतात. बरेचदा स्टे आणि ब्रेकफास्ट इनक्लूड केलेला असतो कारण दिवसा लोक बाहेर फिरायला जात असतात. लंच, डिनर सुद्धा तिथेच मिळू शकते. लोकल चवीचं जेवण चाखून बघणं हे जर अजेंड्यावर असेल तर एक वेळ होमस्टे मध्ये, एक वेळ बाहेरचं जेवण सुद्धा ट्राय करू शकता येतं.

हे होमस्टेज सुरु करण्यासाठी फारशा परवानग्यांची गरज नसल्याने आणि फारशा अतिरिक्त भांडवलाची गरज नसल्याने (राहात्या घरातच असल्याने वेगळे लॅव्हिश बांधकाम करण्याची गरज नसते..) अटॅच्ड टॉयलेट, बाथ, जरुरीपुरते बेसिक फर्निचर इतक्या कमी गोष्टीत हे सुरु करता येते. अट हीच की त्या रहात्या घरात शेतमालकाचेही वास्तव्य असावे.. नाहीतर शेतावर नोकरदार स्टाफ होमस्टे चालवतोय आणि मालक शहरात राहून सठीसहामासी शेतात फिरकतोय.. वरच्या सगळ्या अटी आणि नियम धाब्यावर बसवून अनेकानेक होमस्टेज चालत असतील आणि त्यामुळे आपण निवडलेला होमस्टे चांगला आहे की नाही हे कळणं खरच कठीण असते. वेबसाईट असली तरी त्यावरचे फोटोज कधीच्या काळी काढलेले आहेत की रिसेंट आहेत हेही कळत नाही.. अनेकदा थातुर मातुर होमस्टेच्या बुकिंग साठी पूर्ण पैसे पदरात पाडून घेतल्यावर नंतर ज्या एजंटशी ज्या मोबाईलवर बोलणे झालेले असते तो नंबर "टेंपररिली आउट ऑफ कव्हरेज एरिआ" किंवा "स्विच्ड ऑफ" असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणची फूड क्वालिटी, स्वच्छता, विश्ववासार्हता आणि हॉस्पिटॅलिटी ह्याबद्दल ओळखीतून माहिती कळली असेल तरच त्या ठिकाणी जाणे ईष्ट !

मी स्वतः चिकमगलूर ला कॉफी एस्टेट मधे राहिले होते कारण आम्हीच सहा कपल्स चा ग्रुप घेऊन तिथे गेलो होतो.. सहा रुम्स ऑक्युपाय होणार म्हटल्यावर अजून रुम देता येऊ शकत नसल्याने आम्ही पोहोचायच्या आत आमच्यासाठी एक स्विस टेंट कॉटेजच्या गच्चीवर तयार होता, जिन्यावरून खाली आलं की तिथेच स्वतंत्र टॉयलेट्,बाथ होतं. टेंटच्या बाहेर सामानासाठी एक लोखंडी कपाट चावीसहीत होतं.. घरातली अजून एक जरा छोटी रुम तुम्हाला देतो असं सांगितलं तरीही आम्ही मात्र माझ्या तीन वर्षाच्या लेकासकट त्या स्वतंत्र टेंट मध्ये रहाणंच पसंत केलं.. अगत्याने बनवलेलं स्थानिक पद्धतीचं जेवण, कॉफी एस्टेटची दीड तासाची पायी केलेली रपेट आणि कॉफी प्लांट ला दिलेली भेट - लक्षात राहील असा अनुभव ठरला.

कमी अटी आणि नियमांची पूर्तता करताना नसलेल्या अडचणी ह्यामुळे आजकाल कोणीही उठतो आणि होमस्टे सुरु करतो हा अनुभव आम्हाला नवीन नाही त्यामुळे आमच्याकडे चौकशीसाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्याची टूर डिझाईन करताना आम्ही पूर्ण खात्री असलेल्याच ठिकाणी च बुकिंग करून देतो. ( कृपया ह्यात जाहिरातीचा हेतू नाही ही नोंद घ्यावी..) तसेच सगळे होमस्टे वाईट असतात असं म्हणून घाबरवण्याचाही हेतू नाही पण किमान मा.बो. करांनी अशा ठिकाणी जाताना आपली फसवणूक होणार नाही हे पहावे ह्यासाठी एवढ्या सविस्तरपणे पोस्ट लिहिली. धन्यवाद !

होमस्टे आणि माणसांचे दोन प्रकार या धाग्यावर दिसले.
प्रॅक्टीकल आणि इमोशनल.
आपले मेजॉरटी टारगेट गिर्हाईक यात कुठे बसते हे ओळखणे उत्तम Happy

टॉयलेट मागच्या अंगणात एका कोपर्‍यात होतं. त्याच्या दाराची मात्र जरा बोंब होती. कडी लागत नव्हती हा

>>
अशा वेळी गायनकलेचे महत्व पटते ::फिदी:

रॉबिनहूड,

>> अशा वेळी गायनकलेचे महत्व पटते

झडझडून असहमत. अस्तित्वाचा गंध म्हणून काही हुन्नर आहे की नाही अंगी!

आ.न.,
-गा.पै.

हॉटेल तर हल्ली १०० वर्षात आले आहेत. त्यापुर्वी पर्यटनाला जाताना लोक होम्स्टे करत होते. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर अंनदीबाई जोशीनी Mrs. Carpenter ला लिहलेल्या पत्रात त्याचा उल्लेख आहे.

२५ वर्षापुर्वी मी जेजुरीत होम्स्टे घेतला होता. एका पुजार्याने होम्स्टे (२ जेवण आणि सकाळचा नास्ता) , गोधळ , खंडोबाचे दर्शन, पुजा आणि बैलगाडीने रेल्वे स्थानक प्रवास असे पुर्ण पॅकेज दिले होते. जेवण पण खुप चांगले होते आणि राहाणाची पण चांगली सोय केली होती.

होम्स्टे बरोबर पॅकेज असल्यास बिसनेस चांगला होऊ शकेल.

Pages