महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"एखाद्या सामन्यावरून मूल्यमापन करणे मलाही रुचत नाही म्हणून त्या दिवशी त्याला बेकार दिवस गेल्याने मी इथे त्यावरून चर्चा टाळली." - पण सामना जिंकल्याबरोबर, आणी त्यातही धोनी ने थोडे रन्स केल्यावर लगेच प्रश्न टाकलात की ह्या कामगिरीचं मुल्यमापन कसं कराल. Happy

"सचिनसारखेच धोनीकडूनही आपल्या अपेक्षा अवास्तव असतात" - नका हो असं करू. सचिन शी तुलना नाही होऊ शकत धोनी ची. धोनी चं करीअर सचिन च्या निम्मं सुद्धा नाहीये आणी क्लास!..let's just say that Sachin had it (Sachin exemplified it, Class was his middle name, Class, thy name is Sachin ह्यातलं काहीही चालेल.)

"विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा जिंकवून द्यायला धोनीच हवा" - असहमत. २०११ ला युवराज सेहवाग, गंभीर, युवराज, झहीर होते. २००७ ला नविन फॉर्मॅट आणी परत एकदा युवराज, गंभीर, हरभजन हे सगळे होते. कारण नुसतच धोनी च्या हातात असतं तर २०१५ ला पण जिंकलो असतो ना आणी मधे आणखी बरेच टी-२० वर्ल्डकप्स झाले ज्यात आपली डाळ शिजली नाही. यह सब मिडीया ने बनाया है| Why can't we be objective?

"एखाद्या सामन्यावरून मूल्यमापन करणे मलाही रुचत नाही म्हणून त्या दिवशी त्याला बेकार दिवस गेल्याने मी इथे त्यावरून चर्चा टाळली." - पण सामना जिंकल्याबरोबर, आणी त्यातही धोनी ने थोडे रन्स केल्यावर लगेच प्रश्न टाकलात की ह्या कामगिरीचं मुल्यमापन कसं कराल. Happy

"सचिनसारखेच धोनीकडूनही आपल्या अपेक्षा अवास्तव असतात" - नका हो असं करू. सचिन शी तुलना नाही होऊ शकत धोनी ची. धोनी चं करीअर सचिन च्या निम्मं सुद्धा नाहीये आणी क्लास!..let's just say that Sachin had it (Sachin exemplified it, Class was his middle name, Class, thy name is Sachin ह्यातलं काहीही चालेल.)

"विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा जिंकवून द्यायला धोनीच हवा" - असहमत. २०११ ला युवराज सेहवाग, गंभीर, युवराज, झहीर होते. २००७ ला नविन फॉर्मॅट आणी परत एकदा युवराज, गंभीर, हरभजन हे सगळे होते. कारण नुसतच धोनी च्या हातात असतं तर २०१५ ला पण जिंकलो असतो ना आणी मधे आणखी बरेच टी-२० वर्ल्डकप्स झाले ज्यात आपली डाळ शिजली नाही. यह सब मिडीया ने बनाया है| Why can't we be objective?

<< "विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा जिंकवून द्यायला धोनीच हवा" >> मींही असहमत. कर्णधार कितीही गुणसंपन्न व असामान्य असला तरीही ' द कॅप्टन इज अ‍ॅज गूड अ‍ॅज द टिम ही लीड्स ' , यांतही तथ्य आहेच ! शिवाय, असामान्य खेळाडूचाही कुशलतेचा आलेख कायमचा वरच जाणं/असणं अशक्य आहे. तिसरं, 'हाच हवा' असं म्हणत रहाणं म्हणजे इतर नविन, होतकरू पर्यायांना नाकारत खेळात नकारात्मकता रुजवणंच आहे. आणि, सर्वात महत्वाचं- एखाद्या खेळाडूच्या पर्यायांचा योग्य वेळीं विचार करणं म्हणजे त्याच्या कारकिर्दीचा अवमान करणं, हा विचारच कोणत्याही खेळात [ वा कोणत्याही क्षेत्रात ] घातक ठरूं शकतो !

धोणीने विश्वचषक जिंकला म्हणणे म्हणजे लई थोर. एकदमच.

युवराज / गंभीर / सेहवाग / सचिन / झहिर मुळे जिंकला

मोस्ट रन्स मध्ये सचिन ४८२ काढून २ र्‍या नंबर वर होता. आणि ६,७,८ वर गंभीर / सेहवाग आणि युवी होते. मोस्ट १००स मध्ये पण सच्याचे दोन आहेत.
मोस्ट विकेट मध्ये झहिर २१ विकेट घेउन २ र्‍या नंबर वर होता तर त्या खालोखाल १५ विकेट घेऊन युवी.

जस्ट आपलं स्टॅट. धोणी फक्त एक मॅच (फायनल ) खेळला, ती पण गंभीर ने जि़कुन दिली होती.

वल्डकप मध्ये धोणीचं कॉन्ट्रीब्युशन प्लेअर म्हणून फक्त तो शेवटचा सिक्स आहे. इतर सगळे डाव ह्या वरील पाचांनी ओढून आणले आहेत.

एखाद्या मालिका विजयात वा विश्वचषक विजयात कर्णधाराचे काय काम म्हणत त्यात चमकलेल्या विविध खेळाडूंची नावे घेणे गंमतीशीर Happy

कारण ती विविध नावे दरवेळी बदलतील पण कर्णधार धोनी कायम कर्णधार धोनीच राहणार Happy

धोनीचे कारनामे :-

विश्वचषक ५०-५० वर्ल्ड चॅम्पियन Happy

विश्वचषक २०-२० वर्ल्ड चॅम्पियन Happy

चॅम्पियन्स ट्रॉफी (यातही सर्व देश असतातच, ईंग्लंडमध्ये जिंकलेलो हे विशेष) Happy

कसोटी संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर Happy

एकदिवसीय संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर (हे जरा कन्फर्म करावे)

नुकतेच २०-२० संघ देखील आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे, आहात कुठे.. Happy

याऊपर आयपीएल आणि चॅम्पियन लीगमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार, सर्वाधिक सामने आणि स्पर्धा जिंकलेला कर्णधार Happy

क्रिकेटमध्ये एक कर्णधार म्हणून जे जे मिळवायचे असते ते सारे मिळवून झाले _/\_

विश्वचषक मिळवणे जर कर्णधाराचे नाही तर गोलंदाज आणि फलंदाज यांचीच कामगिरी असते तर जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकरला आयुष्यभर त्यासाठी तरसत राहून अखेर धोनी सारखा कर्णधार भेटायची वाट बघावी लागली नसती.

तरीही धोनीलाच नेहमीच आणि सगळीकडेच सर्वात चांगला संघ मिळत आलाय असे जर कोणाला म्हणायचे असेल तर माझी हरकत नाही Happy

"तरीही धोनीलाच नेहमीच आणि सगळीकडेच सर्वात चांगला संघ मिळत आलाय असे जर कोणाला म्हणायचे असेल तर माझी हरकत नाही " - नाही ना! मग बरं झालं. अगदी तसच म्हणायचं होतं मला, पण कुणी हरकत घेईल ही भिती होती.

"क्रिकेटमध्ये एक कर्णधार म्हणून जे जे मिळवायचे असते ते सारे मिळवून झाले " - अतिउत्तम! आता रिटायर व्हायला मोकळा. कधी होतोय?

आयपीएल मधील चेन्नईच्या विजयात श्रीनिवासन आणि गुरुनाथ मैयप्पन यांचा महत्वाचा वाटा होता असं खेदाने म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे.

<< धोनीचे कारनामे :- >> ऋन्मेशजींसारखा खंदा पाठिराखा मिळवणं हा , मला वाटतं, धोनीचा सर्वात मोठा कारनामा असावा ! Wink

shout.jpg

ऋन्मेष सहमत.

धोनिने त्याला योग्य वाटेल तेव्हा निव्रुत्ति घेतली पाहिजे. इतरांची कारकिर्द जशी लांबवली गेली तशी वेळ धोनिवर आलेली नाहि.त्याच्यात अजुन बरेच क्रिकेट शिल्लक आहे.

पगारे, 'निवृत्ती', 'कारकीर्द' 'धोनी', 'नाही', ह्या शब्दांची स्पेलिंगं तरी नीट लिहा आधी Happy

माझा असा अंदाज आहे की धोनी मायबोली वाचत नसणार, त्यामुळे आपल्या सल्ल्यावर तो निवृत्ती घेणं अथवा लांबवणं ह्याचा निर्णय घेणार नाही. Happy

धोनीने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश द्यायचा पराक्रम केला.
श्रीलंकेला मायदेशात पराभूत केले.
आशिया चषकमध्ये पाकिस्तानची जिरवली.
अंतिम फेरीत भारत-पाक आमनेसामने येत तिथे पुन्हा आपणच बाजी मारायची शक्यता तुर्तास जास्त वाटतेय.
पाकिस्तानला लोळवणे म्हणजे भारतात हिरो बनणे.
त्यानंतरच्या विश्वचषकात भारत भारतात चमकदार कामगिरी करणार हे निश्चित.
कर्णधार म्हणून धोनी लवकरच पुन्हा एकदा आपला नावलौकिक मिळवणार जे मध्यंतरी कसोटी पराभवांनी गमावला होता.
त्यावेळी हिच मिडीया त्याचा उदो उदो करून त्याला सुपरमॅन बनवणार हे वेगळे सांगायला नको.
आयपीएलमध्ये नवीन संघ घेऊनही तो आपली कमाल दाखवू शकतो. कारण या फॉर्मेटमधील तो बाप कर्णधार आहेच.
आता जर साडेसाती आणि फिरलेली ग्रहदशा असा काही प्रकार अस्तित्वात असेल तर तेच येत्या काळात धोनीची घोडदौड रोखू शकेल..

धोनी पर्व एवढ्यात काही संपत नाही..
गेल्या 12 सामन्यांपैकी 11 सामने भारताने जिंकले आहेत.. 20-20 मध्ये नंबर एक झालो आहोत..
आशिया कप जिंकला आहे ..
माझ्या मागील पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा मोठा कप जिंकायचा असेल तेव्हा तिथे धोनीच हवा..
आशिया कप मधील विजय हा येत्या विश्वचषकातील विजयाची रंगीत तालीम तर नव्हती ना हे येणारा काळच सांगेल..
पण तसे न होताही धोनी पर्व काही एवढ्यात संपत नाही हा विश्वास खुद्द धोनीच्या चेहर्यावर झळकतोय..

पण मला या सर्वांपेक्षा जास्त कुठली गोष्ट मनाला भावली असेल तर ती संघातील मतभेद जे मध्यंतरी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या चव्हाट्यावरही आले होते ते आता मिटलेले दिसत आहेत.. गूड साईन.. गो ईंडिया गो Happy

छान लेख आहे. पटला बराच. .. २०-२० आणि ५०-५० ची तुलना आणि त्याचे काही बाबतीत प्रेडीक्टेबल होणेही..

चुरशीच्या सामन्यात पारडे ज्याच्या बाजूने झुकू लागते त्याच्यावरचे प्रेशर वाढू लागते हा नियम आहे. म्हणून धोनी आहे त्या स्थितीला कायम ठेवत पुढे सरकायचा. हा गेमप्लान कसा वर्क करायचा हे कसबही त्याच्या अंगी होते. आता धोनीची अजून किती कारकिर्द शिल्लक राहिली आहे आणि आता अश्या किती सिच्युएशन त्यासमोर येतील कल्पना नाही, पण ईथून पुढे अश्यावेळी त्याचा गेमप्लान काय असेल हे बघणे रोचक राहील..

बाकी ब्राव्होच्या जागी ईतर कोणताही बॉलर असता तर सामना वेगळाच असता. त्याला मारणेही सोपे असते आणि त्याच्या बॉलिंगला फसणेही तितकेच सोपे असते. लास्ट ओवरला ८ च्या जागी १४-१८ धावा हव्या असत्या तरीही सामना वेगळा असता, कदाचित ब्राव्होला धोनीने सळो की पळो करून सोडले असते.. माईंड गेम आहे खरे.. यावर धोनीच चांगले उत्तर काढू शकतो..

लास्ट ओवरला फोर मारून हिरो बनणारे लक्षात राहतात..
लास्ट ओवरला विकेट टाकत सामना हरवत व्हिलन बनणारेही लक्षात राहतात...
धोनी सामना लास्ट ओवरला घेऊन जाणारा फलंदाज म्हणून लक्षात राहील Happy

वरची लिन्क अजून वाचली नाही, पण मला वाटले होते धोनी बरोबर खेळत होता. इतक्या वेळा मॅचेस जिंकल्यामुळे आत्मविश्वास असेल. तो शॉट अजून थोडा वरून गेला असता तर रन्स मिळाल्या असत्या. कधीकधी जजमेण्ट चुकू शकते.

धोनी आणी ब्राव्हो ची अतिपरिचयात अवज्ञा झाली असावी. दोघही एकमेकांच्या खेळाला खूप जवळून ओळखतात.

धोनी आणी ब्राव्हो ची अतिपरिचयात अवज्ञा झाली असावी. दोघही एकमेकांच्या खेळाला खूप जवळून ओळखतात. >> actually तसे झाले नाही. धोनी कधी नाही तो अ‍ॅक्रॉस गेला नि ब्राव्हो ने तसे करतो बघून स्लो बॉल टाकला ( हे ब्राव्हो ने सांगितलय). नि धोनी फसला. धोनी ने त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्या बॉलवर नुसता वाईल्ड स्विंग करण्याऐवजी नेहमीचा मोठा फट्का मारायचा प्रयत्न का केला नाहि हे लक्षात आले नाही. किंवा तिसर्‍या बॉलवर तसे का केले नाहि तेही लक्षात आले नाही. बरेचदा तसे करून बॉलर वर प्रेशर आणण्याची त्याची युक्ती नेहमीच चालली आहे. राहुलच्या खेळीसाठी तरी त्याने जिंकायला हवे होते असे वाटत राहिले.

http://m.timesofindia.com/sports/top-stories/indias-500th-test-dhoni-nam...

India's 500th Test: Dhoni named captain of Wisden's all-time India Test XI

NEW DELHI: India's celebrated skipper Mahendra Singh Dhoni on Wednesday was named the captain of reputed cricket magazine Wisden's all-time India Test XI.

The team, which was announced to mark India's 500th Test match starting on Thursday against New Zealand in Kanpur, includes former Test skipper Sunil Gavaskar and Virender Sehwag as openers, according to a release by Wisden India.

Rahul Dravid, Sachin Tendulkar and VVS Laxman make up the middle-order with Dravid being the No 3 batsman, followed by Tendulkar and Laxman.

Discover the level of Pro Techie in you!Ad Samsung

Dhoni, currently India's captain for one-dayer and T20 teams, also remains the wicket-keeper.

Pace legend Kapil Dev also has been named in the dream team.

Also included are pacers Javagal Srinath, Zaheer Khan and spin stalwarts Anil Kumble, Bishan Singh Bedi. Former skipper Mohammad Azharuddin was named the 12th man.

Earlier, Cricket Australia, after receiving more than 50,000 votes from fans, also named its greatest India Test XI which included former batsman Sourav Ganguly and veteran off-spinner Harbhajan Singh.

The side, similar to Wisden's, named Gavaskar and Sehwag as the openers with Rahul Dravid and Sachin Tendulkar the unsurprising choices for the No 3 and No 4 positions.

Former India skipper Sourav Ganguly was named as the No 6 batsman and Bishan Singh Bedi was replaced by offie Harbhajan Singh.

Kapil Dev led the bowling department with left-armer Zaheer Khan in a two-man pace attack, while leg-spinner Kumble and offie Harbhajan Singh rounded off the fantasy team.

The team:

Wisden Test XI: Sunil Gavaskar, Virender Sehwag, Rahul Dravid, Sachin Tendulkar, V.V.S. Laxman, Kapil Dev, M.S. Dhoni (capt, wk), Anil Kumble, Javagal Srinath, Zaheer Khan, Bishan Singh Bedi, Mohammad Azharuddin (12th man).

Cricket Australia's India XI: Sunil Gavaskar, Virender Sehwag, Rahul Dravid, Sachin Tendulkar, VVS Laxman, Sourav Ganguly, MS Dhoni (captain, wk), Kapil Dev, Anil Kumble, Harbhajan Singh, Zaheer Khan.

कप्तान म्हणून धोनीच्या गुणवत्तेबद्दल व त्याच्या दैदिप्यमान व अभिमानास्पद कामगिरीबद्दल दुमत नसावंच व त्या करतां विस्डेनच्या दाखल्याची गरजही नसावी. त्यामुळे, If it is suggested that Dhoni should continue indefinitely as Captain because Wisden has named him 'All time great Indian captain' , it follows that the entire all time great Indian team selected by Wisden should also continue to play indefinitely !
आणि हो; << एखाद्या मालिका विजयात वा विश्वचषक विजयात कर्णधाराचे काय काम म्हणत त्यात चमकलेल्या विविध खेळाडूंची नावे घेणे गंमतीशीर >> असेल , तर प्रस्तावनेतलं << कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.>> हें पण गंमतीशीरच म्हणावं लागेल !!

काल धोनी गेला. मॅच न काढताच गेला. काहींनी तो स्लो खेळल्याने मॅच घालवून गेला असेही तारे तोडले. ते एक असो. पण त्यानंतर आपण जवळ जाऊन जसे हरलो ते पाहता धोनीचीच किंमत जाणवली. अक्षर पटेल असो वा हार्दिक पांड्या, हे एक दोन मोठे फटके मारून जवळ घेऊन गेले सामना, रेषेपलीकडे पोहोचवता आले नाही. धोनी नेमके तेच करायचा. नाबाद राहायचा.. जिंकवून यायचा.. काल चेस करत जिंकलेल्या सामन्यातील एवरेजचे रेकॉर्ड दाखवत होते. धोनीची सर्वाधिक १०२ ची सरासरी आहे. मागे बेवन आणि कोहली ८० च्या घरात वगैरे होते. .. धोनी, बेवन, कोहली.. नावेच बोलकी आहेत.. मॅचफिनिशर !!!

व्यक्तिशः गावस्कर असताना धोनी (किंवा इतर कोणी) कप्तान असणे माझ्या पुरते शक्य नाही. दोघेही defensive mindset चे असले तरी गावस्कर चा स्पिन बॉलिंगचा उपयोग करून घेण्याचे कसब एकमेवाद्वितिय होते. त्या संघात प्रसन्ना. विनु मंकड, विजय मर्चंट, विश्वनाथ हे नावे नाहीत हे बघून आश्चर्य वाटले. एकंदर नावे बघता votes वरून ठरवलेला संघ वाटतोय.

ज्येष्ठ कुंतीपुत्र महारथी

ज्येष्ठ कुंतीपुत्र महारथी कर्णाने आपली कवचकुंडले उतरवली !

राज्याची सूत्रे अर्जुनाच्या हाती सोपवली.

धोनीने एकदिवसीय आणि २०-२० मधून कर्णधारपदाचा त्याग केला ...

http://www.loksatta.com/krida-news/mahendra-singh-dhoni-steps-down-as-ca...

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने बुधवारी भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्याचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला. कर्णधारपद सोडले असले तरी धोनी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत राहणार आहे.

राहुल द्रविडकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने २००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाला गवसणी घातली. याच काळात कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीतही भारताने अव्वल स्थान पटकावले. मात्र, त्यानंतरच्या काळात धोनीच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली होती. त्यामुळे २०१५ मध्ये धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. कॅप्टन कूल अशी बिरुदावली मिरवणाऱ्या धोनीने २००४मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतरच्या काळात धोनी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी ठरलेला कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Test msg

महेंद्र सिंग धोनी जन्मसोहळा

७ जुलै ,
भारताची आण ,बाण आणि शान ,आम्हा सर्वांची जान, आमच्या गळ्यातील ताईत ....ज्यासाठी आम्ही कसोटी सामना पण बघत होतो... भारतासाठी पोतीभरून  कप जिंकून देणारा.... .....निस्वार्थ पणे खेळणारा...शतक  जरी झालं तरी कधीही दंगा न करणारा......ढीगभर कंपन्यांचा BRAND AMBASEDOR .... जी ह्यांच्या नावाने बोंबलतात त्यांना बॅटनेच उत्तर देणारा....टीम चा कॅप्टन हे पद सोडून नुसता एक खेळाडू म्हणून खेळणारा (याला वाघाच काळीज लागतं) सगळ्या प्रकारचे कप जिंकून देणारा जगातील एकमेव वाघ ...घरातच बाईक शोरूम काढेल ईतक्या गाड्यांचा मालक..तिन्ही
ऋतु मध्ये कायम COOL असलेला.. प्रकाशाच्या वेगाच्या तिप्पट स्पीडने स्टंपींग  करणारा एकमेव 5G OPERATOR .. 5-6 NO. ला बॅटींगला येऊनही 50 च्या वर AVG.असलेला....सगळ्या  बाॅलर्स चा बाप ...भारतीय टीमचा माजी कॅप्टन(अजुन ह्योच आहे सोडा).. असा आमचा लाडका , अखंड क्रिकेट जगताचा देव , भल्याभल्याना मैदानावर घाम फोडायला लावणारा , आपल्या बॅटिंग ने चाहत्यांचे मन मोहित करून सोडणारा , आम्हा तरुण मुलांचे प्रेरणा स्थान , साक्षी वहिनींची जान , मा. श्री. श्री. महेंद्र सिंह धोनी साहेब (कॅप्टन कुल...माही...MSD....)यांना वाढदिवसाच्या २०१९ च्या world cup ला winning sixer मारू पर्यंत मन भरून हार्दिक शुभेच्छा ..
शुभेच्छुक :- अखिल भारतीय "तुम्ही यॉर्कर बॉल टाका मी सिक्स मारतो" संघटना , अखिल भारतीय " बॉल हातात आल्या आल्या throw टाका रे "संघटना , अखिल भारतीय "सगळे cup आमचे आहेत रे "संघटना ...

धोनीला २०-२० संघातून काढला !
अत्यंत मुर्खपणाचा निर्णय..
जर धोनीला येता विश्वचषक खेळवणार असतील तर त्याला ५०-५० आणि २०-२० च्या सामन्यात मॅच प्रॆक्टीस दिली गेलीच पाहिजे.
आता या लोकांचे असे झालेय की धोनी यांना नकोसाही झालाय पण धोनीची विश्वचषकात यांना गरजही आहेच!

धोनीला २०-२० संघातून काढला !
अत्यंत मुर्खपणाचा निर्णय..
जर धोनीला येता विश्वचषक खेळवणार असतील तर त्याला ५०-५० आणि २०-२० च्या सामन्यात मॅच प्रॆक्टीस दिली गेलीच पाहिजे.>> ५० overs च्या सामन्यामधे खेळायला २०-२० मधे का हवा ? एव्हढ्या वर्षानंतर त्याला मॅच प्रॅक्टिस ची गरज आहे असे का वाटते बाबा तुला ?

एव्हढ्या वर्षानंतर त्याला मॅच प्रॅक्टिस ची गरज आहे असे का वाटते बाबा तुला ?
<<<

सिरीअसली?
मॅच प्रॅक्टीसची गरज खूप वर्षे खेळलेल्यांना नसते का?

एकवेळ असे म्हणालात की वन डे खेळून मिळणारी मॅच प्रॅक्टीस पुरेशी आहे तर समजू शकलो असतो.. पण मॅच प्रॅक्टीसची गरज काय हे समजणे अवघड जातेय..

आज रणजी सुरू झाली, जर खरच मॅच प्रॅक्टीस हा एकमेव आक्षेप असेल तर मोठा पर्याय उपलब्ध आहे कि. त्याचे ड्रीम स्टंपिंग पाहता खर तर त्याचीही गरज नाही वाटत. रेग्युलर प्रॅक्टीस सुद्धा पुरी होईल.

ड्रीम स्टंपिंग - आता ह्या फ्रेज चा सुद्धा कंटाळा यायला लागलाय. परवाच्या देवधर ट्रॉफी च्या मॅच मधे इशान किशन ने देखील एका बॅट्समन ला गाफील क्षणी पकडून स्टंप केलं. विंडीज विरूद्ध टेस्ट मधे ऋषभ पंत ने एका बॅट्समन ला बॉल कलेक्ट केल्यावर, हात मागे न नेता स्टंप केलं. करतात लोकं हे सगळं. इतकं काही युनिक नाहीये त्यात की ज्यासाठी बॅटींग लायेबिलिटी ठरणारा, ३७ वर्षाच्या धोनी ला आमंत्रण द्यावं.

आणी ते एबी चं - 'ऐंशीव्या वर्षी, व्हील चेयर मधल्या धोनी ला संघात घेण्याविषयी चं वक्तव्य सुद्धा असच आचरट आहे. बाबा रे, तु आधी स्वतःच्या संघाचा विचार न करता, लीग क्रिकेट खेळता यावं म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून रिटायरमेंट घेतलीस ना, मग उगाच उंटावरून - मधूच्या आत्याबाईंना मिशा असत्या छापाच्या - शेळ्या हाकू नकोस.

आणी असामीच्या रणजी क्रिकेट च्या मुद्द्याला सहमत. त्याला वन-डे च्या आधी मॅच प्रॅक्टीस म्हणून देवधर ट्रॉफी ची मॅच खेळायला सिलेक्टर्स नी सांगितलं होतं. त्यावर कुठलही कम्युनिकेशन न करता (असं सिलेक्टर्स नी सांगितलं), हा मॅच ला गेलाच नाही. इतका जर धोनी खेळापेक्षा मोठा असेल, तर त्याच्या मॅच प्रॅक्टीस ची चिंता करायचं कारणच नाही.

हात मागे न नेता स्टंप केलं. करतात लोकं हे सगळं. इतकं काही युनिक नाहीये त्यात की ज्यासाठी बॅटींग लायेबिलिटी ठरणारा, ३७ वर्षाच्या धोनी ला आमंत्रण द्यावं. >>> seriously ?? खरच त्यात काही विशेष नाही अस वाटत ?? कठीण आहे.
धोनी ला स्टम्पिंग करताना त्याच्या हातातील ग्लोंव्हस् चा उपयोग कसा करावा. इथपर्यंत माहीती आहे. ती प्रत्त्येक खेळाडुला नसते. स्टम्पिंग विकेट घेताना काहीवेळा हातातील ग्लोव्हस् काढुन थ्रोव्ह् करावा लागतो. इतरांच्यामानाने धोनीची ती हालचाल इतकी क्षणार्धात असते की बस्स. अजुन बऱ्याच गोष्टी आहेत.

आणी ते एबी चं - 'ऐंशीव्या वर्षी, व्हील चेयर मधल्या धोनी ला संघात घेण्याविषयी चं वक्तव्य सुद्धा असच आचरट आहे. >> अगदी योग्य आहे विधान एबीच.

मला वाटते फे फेचा "हात मागे न नेता स्टंप" हा मुद्दा, अशाच प्रकारे नवे किपर्स पण करायला लागले आहेत ह्या भूमिकेतून लिहिला आहे.

अरे बॉल रिसीव्ह करताना हात बॉल बरोबर मागे न नेता, तसेच पुढे नेऊन (बॉल हाता असताना) स्टंपिंग करणे. त्याने काय जो शतांश वेळ वाचतो त्यामूळे on the lines असलेले बरेच जण गंडतात. धोनी मागचे २-३ वर्षे हे सर्रास नि मुख्यत्वे खोर्‍याने करतोय. नवे कीपर पण आत्ता हे करायचा प्रयत्न करताहेत.

"मला वाटते फे फेचा "हात मागे न नेता स्टंप" हा मुद्दा, अशाच प्रकारे नवे किपर्स पण करायला लागले आहेत ह्या भूमिकेतून लिहिला आहे." - येस्स! यू गॉट इट असामी!

"खरच त्यात काही विशेष नाही अस वाटत ?? कठीण आहे." - मुद्दा चुकून मिस केलाय की उगा पेडगावचं तिकीट काढलय? त्यात युनिक असं काही राहिलेलं नाहीये आणी जरी विशेष असलं, तरी तेव्हढ्याकडे बघून त्याची बॅटींगमधली घसरण दुर्लक्षित करणं घातक आहे. ज्या धोनी ने स्वतःच्या कारकिर्दीत ज्येष्ठ खेळाडूंना, वयाचा, फॉर्म चा दाखला देत बाहेर काढलं, त्याच्यावर आज वय / बॅटींग फॉर्म मुळे बाहेर जायची वेळ आलीये.

"अगदी योग्य आहे विधान एबीच." - त्याला आयपीएल खेळायची आहे. तो हे बोलणारच. घेणंं नास्ति, देणं नास्ति. व्यर्थ अतिशयोक्ती आहे. असो. तो म्हट्ल्याने, ते कुणाला पटल्याने / न पटल्याने काहीच फरक पडत नाही, पण म्हातारी मेल्याचं दु:ख नाहीये, काळ सोकावतो.

धोनी म्हणजे निव्वळ हात मागे न नेता स्टंपिंग नाहीये. तो कीपर म्हणून असताना फिरकी गोलंदाज निर्धास्त असतात. तो त्यांना मागून गाईड करतो ते वेगळेच. गाईड तर तो कोहलीलाही करतो. कोहली स्वतः कबूल करेन हे. डीआरएस सिस्टमला धोनी रिव्यू सिस्टम बोलले जाते हे ऐकले असेलच. त्याचे थ्रो कलेक्ट करत रन आऊट करणे हे सुद्धा वेगळे मोजा. वन डे मध्ये या सर्वांची वॅल्यू खूप असते. गेमला टर्निंग प्वाईंट देतो तो. त्यालाही कल्पना आहे की २०१९ विश्वचषकाला त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि संघहितासाठी तो आपली कारकिर्द तिथवर खेचणारच... आणि विश्वचषक संपल्यावर कसलाही गाजावाजा न करता तो निवृत्ती घोषित करणार .. कदाचित निरोपाचा सामनाही नसेल त्याच्यासाठी...

"२०१९ विश्वचषकाला त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि संघहितासाठी तो आपली कारकिर्द तिथवर खेचणारच... आणि विश्वचषक संपल्यावर कसलाही गाजावाजा न करता तो निवृत्ती घोषित करणार" - पर्याय नाही, देशहितासाठी तो कारकिर्द खेचणार - असं काहीही नाहीये. भारतात चालणार्या व्यक्तीपुजेचं आणखी एक उदाहरण आहे हे. असं कुठेही घडत नाही. गाजावाजा वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही. २०१९ नंतर तो जाणारच आहे. हे उघड आहे आणी स्वाभाविक सुद्धा.

हॅपी बड्डे माही.

ईंडियाज ऑल टाईम ग्रेटेस्ट क्रिकेटर !!

तू जन्म घेतला नसतास तर गौरवाने सांगावे असे फार काही नसते आम्हा क्रिकेटप्रेमींकडे ! निव्वळ वैयक्तिक रेकॉर्डचेच गुणगाण गाण्यात समाधान मानावे लागले असते !

फेसबुकवरचा माझा उस्फूर्त प्रतिसाद -
" A unique combination of cricketing intelligence, cool temperament, great leadership, fitness, fast reflexes and inimitable batting style ! He took indian cricket to new heights !! Salute and best wishes to MSD !!! "

Pages