हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे .
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..
प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न
प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..
हे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक
ब्रेसलेट्स ..
प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..
प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..
प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन
क्विलींग चे चेन पेंडंट :
प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. काही पेंडंट्स
प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..
प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .
हॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी
प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..
प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स
हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय ..
जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..
आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि
अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..
प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल
प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .
आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत
यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न
हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..
एकसाथ अपलोड व्हायला त्रास
एकसाथ अपलोड व्हायला त्रास होतोय म्हणुन एक एक प्रचि टाकतेय ..
मस्त..हे कसे केलेत
मस्त..हे कसे केलेत
कसले आहेत ग ?
कसले आहेत ग ?
आणखी एक..
आणखी एक..
क्विलींगचेच आहेत.. त्यावर
क्विलींगचेच आहेत..
त्यावर बिडचेन लावलीए मी
पुण्यात कुठे क्विलींगचे
पुण्यात कुठे क्विलींगचे क्लासेस आहेत क?
मी अनु.. एपॉक्झी कोटींग ? मला
मी अनु..
एपॉक्झी कोटींग ? मला शब्द नवा आहे..
असो.. मी पेपर क्विलींग शायनर म्हणुन एक सोल्युशन मिळत वॉटर प्रुफिंग आणि ग्लेझ येण्याकरीता ते वापरते
हो तेच म्हणतेय मी बहुतेक
हो तेच म्हणतेय मी बहुतेक :)नीट शब्द आठवत नाही. वॉटर्प्रूफिंग आणी ग्लेझ साठीचे काहीही
मोठ्या स्टेशनरी मध्ये मिळेल ना हे क्विलिंग शायनर?
माझ्या डोक्यात प्ले डो चे कानातले बनवायच्या पण थोड्या आयडिया आहेत.
मी अनु.. एपॉक्झी कोटींग ? मला
मी अनु..
एपॉक्झी कोटींग ? मला शब्द नवा आहे..
असो.. मी पेपर क्विलींग शायनर म्हणुन एक सोल्युशन मिळत वॉटर प्रुफिंग आणि ग्लेझ येण्याकरीता ते वापरते
टीना तुझ्या क्विलिंग कामात पण
टीना तुझ्या क्विलिंग कामात पण खूप सफाई आहे.
घरी केलेल्या गोष्टिंचे 'लूज एंड' सफाईदार पणे लपवावे कसे ही एक कला आहे.
टीना, सुंदर केले आहेस.
टीना, सुंदर केले आहेस. बीडिंग मुळे उठाव आलाय.
थँक्यु अनू आणि ममो.. आणखी
थँक्यु अनू आणि ममो..
आणखी एक..
मी अनु, हायफाय दुकानवाले
मी अनु, हायफाय दुकानवाले विकताना स्वतःची सेलींन्ग प्राईझ लावतात. उदा. मी केलेले कानातले जर मी डायरेक्ट विकताना रू . ४०/- ला विकेन तेच दुकानात त्यांचे अॅडीशनल चार्जेस लावून विकणार
क्वालीटीचा आग्रह योग्यच आहे तुझा. बर्याच साईट्स वर पण डिझाईनच्या मानाने किंमती जास्तं वाटतात पण त्यातलाही मार्केटींग फंडा हळूहळू कळतोय मला. मी सजेस्ट करेन डायरेक्ट फेसबूक पेज वरून ऑर्डर करशील तर डिल वर्थ असेल कारण तिथे बाकी खर्च कमी असतात
कोटीन्गच्या संदर्भाने: नेलपेन्ट कोटींग , कॅमल कं.च वाॅर्निश, दुधाळ रंगांचं वाॅर्निश प्रत्येकाचा लूक थोडा वेगळा वाटतो मलातरी
टीना कानातले सुरेख आहेत
टीना कानातले सुरेख आहेत
पेपर क्विलींग शायनर कंपनीचं
पेपर क्विलींग शायनर कंपनीचं नाव किंवा बाॅटलचा फोटो टाकशील का प्लीज
कविन .. फोटो आणि नाव उद्या
कविन ..
फोटो आणि नाव उद्या टाकते..
आणि हो मी पन नेलपेंट चा बेसकोट/ वॉटर्कलर कोट लावत असते
कविन, मी वापरत असलेल्या शाईनर
कविन, मी वापरत असलेल्या शाईनर चा फोटो देतेय.. Quilling Shiner Paper Varnish..
आणि हे अजुन एक..
ओके, धन्यवाद टीना. हे दुधाळ
ओके, धन्यवाद टीना. हे दुधाळ रंगाचं आहे ना? जे सुकत गेल्यावर ट्रान्स्परंट होत जातं?
तेच असेल तर याचे डाग न पडता
तेच असेल तर याचे डाग न पडता स्मूथली लावायची काही टिप आहे का?
टिना .. नविन अॅडिशन्स मस्त
टिना .. नविन अॅडिशन्स मस्त आहेत
तू आधी नेलपेन्ट चा कोट लावून
तू आधी नेलपेन्ट चा कोट लावून वरुन हे लावतेस का? आणि वॉटरकलर क्प्ट लावतेस म्हणजे नक्की कसं आणि काय ते कळलं नाही मला
टिने ___/\___ कसले सुरेख आहेत
टिने ___/\___
कसले सुरेख आहेत हे अगं
किती छान आहेत
किती छान आहेत कानातले.
अॅलर्जी मुळे असले काही वापरताच येत नाही
बाकी टीना तुझ्या कडची माहिती तु किती सहज दुसर्यांना देतेस हा मोठेपणा सगळ्यांकडे नसतो.
दुकानात बघते. नेलपेंट
दुकानात बघते.
नेलपेंट रेमोव्हर चा कोट का?
बाकी टीना तुझ्या कडची माहिती
बाकी टीना तुझ्या कडची माहिती तु किती सहज दुसर्यांना देतेस हा मोठेपणा सगळ्यांकडे नसतो.
>>>
+१
कितीही अनुमोदन!
मी_अनु, नेलपेन्ट रिमुव्हर
मी_अनु, नेलपेन्ट रिमुव्हर नाही. कलरलेस नेलपेन्ट
ओके ओके, असा पण नेलपेंट
ओके ओके, असा पण नेलपेंट प्रकार असतो काय? बघायला पहिजे.
कविन, हो तेच ते... डाग पडायचा
कविन, हो तेच ते...
डाग पडायचा मलातर अनुभव नै आला.. पेंटब्रश ने लावते मी ते.. पहिला कोट पूर्णपणे सुकल्याशिवाय दुसरा अप्लाय करत नाही..
यामधे मी फक्त आतल्या बाजुनं ते शाईनर लावलयं आणि मग वरुन बॉलचेन लावल्यानंतर ते अप्लाय केल..
शाईनर चे कोट लावल्यावर मग हव असल्यास ट्रांस्परंट नेलपेंट चा कोट लावला..
चनस, सकुरा, रीया, अनू सर्वांना धन्यवाद...
सकुरा, त्यात काय.. इथ मी सुद्धा बरचस जालावर बघुन, जाणून शिकते ना.. मग याला माझं तरी कसं म्हणावं ?
खुपच छान वाटतच नाहीये घती
खुपच छान वाटतच नाहीये घती केलयस...कीत्ती सफाईदार.. व्वा!
सायु..punctuation देत जा ग
सायु..punctuation देत जा ग माये.. मला उगा पहिल्यांदा वाचुन डिप्रेशन आलं होत ना...
Pages