क्विलींग आणि बरच काही

Submitted by टीना on 23 June, 2015 - 15:23

हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे Lol .

सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्‍याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच Happy

प्रचि १.

earrings (1).jpg

प्रचि २.

earrings (2).JPG

प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..

earrings (3).JPG

प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न

earrings (4).JPG

प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..

earrings (6).JPGहे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले Happy

प्रचि १.

earrings (5).JPG

प्रचि २.

earrings (7).JPG

प्रचि ३.

earrings (8).JPG

प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक Proud

earrings (9).JPGब्रेसलेट्स ..

प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..

bracelet (1).jpg

प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..

bracelet (2).jpg

प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन

bracelet (3).jpgक्विलींग चे चेन पेंडंट :

प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग

chain pendent (1).jpg

प्रचि २.

chain pendent (2).jpg

प्रचि ३.

chain pendent (4).jpg

प्रचि ४. काही पेंडंट्स

chain pendent (5).jpg

प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..

chain pendent (6).jpg

प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .

chain pendent (7).jpgहॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी Wink

प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..

hp pendent (1).jpg

प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स Happy

hp pendent (2).JPG

हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय Happy ..

neckpiece.jpg

जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..

sandal.jpg

आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि Happy

cellphone covers.jpg

अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..

frame.jpg

प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल Happy

frames (1).jpg

प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .

frames (5).jpg

आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत Lol

frames (2).jpg

यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न Wink

frames (3).jpgframes (4).jpg

हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनु..
एपॉक्झी कोटींग ? मला शब्द नवा आहे..
असो.. मी पेपर क्विलींग शायनर म्हणुन एक सोल्युशन मिळत वॉटर प्रुफिंग आणि ग्लेझ येण्याकरीता ते वापरते Happy

हो तेच म्हणतेय मी बहुतेक :)नीट शब्द आठवत नाही. वॉटर्प्रूफिंग आणी ग्लेझ साठीचे काहीही
मोठ्या स्टेशनरी मध्ये मिळेल ना हे क्विलिंग शायनर?
माझ्या डोक्यात प्ले डो चे कानातले बनवायच्या पण थोड्या आयडिया आहेत.

मी अनु..
एपॉक्झी कोटींग ? मला शब्द नवा आहे..
असो.. मी पेपर क्विलींग शायनर म्हणुन एक सोल्युशन मिळत वॉटर प्रुफिंग आणि ग्लेझ येण्याकरीता ते वापरते Happy

मी अनु, हायफाय दुकानवाले विकताना स्वतःची सेलींन्ग प्राईझ लावतात. उदा. मी केलेले कानातले जर मी डायरेक्ट विकताना रू . ४०/- ला विकेन तेच दुकानात त्यांचे अॅडीशनल चार्जेस लावून विकणार

क्वालीटीचा आग्रह योग्यच आहे तुझा. बर्याच साईट्स वर पण डिझाईनच्या मानाने किंमती जास्तं वाटतात पण त्यातलाही मार्केटींग फंडा हळूहळू कळतोय मला. मी सजेस्ट करेन डायरेक्ट फेसबूक पेज वरून ऑर्डर करशील तर डिल वर्थ असेल कारण तिथे बाकी खर्च कमी असतात

कोटीन्गच्या संदर्भाने: नेलपेन्ट कोटींग , कॅमल कं.च वाॅर्निश, दुधाळ रंगांचं वाॅर्निश प्रत्येकाचा लूक थोडा वेगळा वाटतो मलातरी

तू आधी नेलपेन्ट चा कोट लावून वरुन हे लावतेस का? आणि वॉटरकलर क्प्ट लावतेस म्हणजे नक्की कसं आणि काय ते कळलं नाही मला

किती छान आहेत कानातले.
अ‍ॅलर्जी मुळे असले काही वापरताच येत नाही
बाकी टीना तुझ्या कडची माहिती तु किती सहज दुसर्‍यांना देतेस हा मोठेपणा सगळ्यांकडे नसतो.

बाकी टीना तुझ्या कडची माहिती तु किती सहज दुसर्‍यांना देतेस हा मोठेपणा सगळ्यांकडे नसतो.
>>>
+१
कितीही अनुमोदन!

कविन, हो तेच ते...
डाग पडायचा मलातर अनुभव नै आला.. पेंटब्रश ने लावते मी ते.. पहिला कोट पूर्णपणे सुकल्याशिवाय दुसरा अप्लाय करत नाही..
यामधे मी फक्त आतल्या बाजुनं ते शाईनर लावलयं आणि मग वरुन बॉलचेन लावल्यानंतर ते अप्लाय केल..
शाईनर चे कोट लावल्यावर मग हव असल्यास ट्रांस्परंट नेलपेंट चा कोट लावला..

चनस, सकुरा, रीया, अनू सर्वांना धन्यवाद...
सकुरा, त्यात काय.. इथ मी सुद्धा बरचस जालावर बघुन, जाणून शिकते ना.. मग याला माझं तरी कसं म्हणावं ?

सायु..punctuation देत जा ग माये.. मला उगा पहिल्यांदा वाचुन डिप्रेशन आलं होत ना... Sad Wink Light 1

Pages