मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2015 - 16:35

पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!

तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.

बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्‍या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तुम्ही लिहा की त्यावर" ही उत्तम पळवाट आहे. समस्या फक्त मुंबईतच आहे या आविर्भावात लोक असतात म्हणून म्हणालो.
मग तुम्ही पुण्यावर लिहीले की कुणितरी लिहील की जळगावात काय समस्या नसतात का? फक्त पुण्या मुंबईतच समस्या आहेत अश्या अविर्भावात लोक असतात!
मग चाळीसगाव, मग बड्नेरा, मग ठाकुर्ली, मग मौजे अमुक तमुक असे गावोगावी ऋन्मेष नि आप्पाकाका जागे होऊन मायबोलीला पूर येईल.

मग लोक म्हणतील मायबोलीला अच्छे दिन आले किंवा कुणि अच्चे दिन म्हणेल. मग मायबोलीच्या पोष्टींत अधिकच वाढ होईल.

आनंदी आनंद गडे!!

"तुम्ही लिहा की त्यावर" ही उत्तम पळवाट आहे. समस्या फक्त मुंबईतच आहे या आविर्भावात लोक असतात म्हणून म्हणालो.
मग तुम्ही पुण्यावर लिहीले की कुणितरी लिहील की जळगावात काय समस्या नसतात का? फक्त पुण्या मुंबईतच समस्या आहेत अश्या अविर्भावात लोक असतात!
मग चाळीसगाव, मग बड्नेरा, मग ठाकुर्ली, मग मौजे अमुक तमुक असे गावोगावी ऋन्मेष नि आप्पाकाका जागे होऊन मायबोलीला पूर येईल.

मग लोक म्हणतील मायबोलीला अच्छे दिन आले किंवा कुणि अच्चे दिन म्हणेल. मग मायबोलीच्या पोष्टींत अधिकच वाढ होईल.

आनंदी आनंद गडे!!

कॉंग्रेसच्या काळात देश गरीब होता, देशापुढे मोठ्या मोठ्या समस्या होत्या, देशावर ३ वेळा युद्धे लादली गेली,शिक्षणाचे प्रमाण कमी होते, बालविवाह, बालमृत्यूंचे प्रमाण जास्त होते ते रोखायचे होते, देशाला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचे होते, धार्मिक उन्माद असणार्यांना रोखून देशाची एकात्मता राखायची होती..........

>>

तुम्ही हे दर वेळी लिहितात की कॉपी पेस्ट करून टाकत असतात? Light 1

पुण्यात सार्वजनिक वाहतूक समस्या आहे? अरे सगळे पुणेकर्स आपापले घोडे बग्या घेऊन धावत असतात! सार्वजनिक वगरे गोष्टी वापरत नाहीत हे.

> ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!> हे खरे दु:ख आहे का रे ऋन्मेऽऽष? मग वेळ काढत बसायच ना ऑफिसातच.. मोबाईल ऐवजी लॅपटॉपवर छान अजुन मोठा लेख टाईप करायला मिळाला असता! Wink

अप्पाकाका, पहिल्या प्रतिसादातली कविता आवडली Happy

सचिन पगारे - लोकसत्ता मधील हा लेख वाचा आणि कृपया रेल्वेच्या खासगीकरणाबद्दल आपला गैरसमज दूर करा. म्हणजे उगाच अपप्रचार होणार नाही.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/debroy-committee-suggests-corpor...

कॉंग्रेसच्या काळात .........देशाची एकात्मता राखायची होती....

पण त्यातले काहीच जमलेले दिसत नाहीये. फक्त सोनिया च्या जावयाचे कल्याण झाले.
देश तसाच.
मग येऊ दे भाजप ला निवडून, खरे तर कुणिही दुसरे निवडून आले असते तरी सोनियाला चालले असते.
कारण सगळा दोष आपल्याकडे येतो असे दिसायला लागल्यावर पाय काढला. आता परदेशी जाऊन चैन करायची नि मधून मधून भारतात जाऊन सरकारला शिव्या द्यायच्या. मज्जा आहे 'न काय?

पैशाची गरज पडली तर परत निवडून यायचे. त्या साठीच सरकारला शिव्या देत रहायचे.

हे खरे दु:ख आहे का रे ऋन्मेऽऽष?
>>>
हे खरे असे नाही, पण हे देखील एक दुख आहेच. प्रश्न पैश्याचा नाही तर फुकट गेलेल्या वेळेचा आहे. मला हा स्वतंत्र लेखाचा विषय दिसतो. सविस्तर लिहितो यावर फुरसतीने.

इथे चांगल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवाचून पुणेकरांचे चाललेले हाल कुणालाच दिसत नाहीत.
"तुम्ही लिहा की त्यावर" ही उत्तम पळवाट आहे. समस्या फक्त मुंबईतच आहे या आविर्भावात लोक असतात म्हणून म्हणालो.
>>>>>>>>
अप्पाकाका मी पाहिले आहेत ते हाल. आणि कबूल करतो की पुणेकरांचे हाल आणखी दयनीय आहेत.
पण एका मुंबईकराने त्यावर आपले मत आणि अनुभव मांडले तर हा पुणेकरांना कदाचित ते आवडणार नाही, किंबहुना मी भल्या हेतूने लिहायचो आणि ते वेगळ्याच अर्थाने घेतले जाईल. तरी तुम्हाला वाटत असेल मी त्यावरही लिहावे तर बघतो विचार करतो, तरीही पुढाकार कोणी पुणेकरानेच घ्यावा असे वाटते. मी १०-१५ दिवस थांबतो, कोणी नाही लिहिले तर लिहितो. Happy

जेव्हा आपल्याला what really matters हे उमजेल तेव्हा! "कोणी केले, कोणी नाही केले आणि कोणी केले पाहिजे" अशा व्यक्तीकेंद्रित मानसिकतेतून बाहेर पडून " काय केले गेले आहे,काय केले जाते आहे आणि काय केले पाहिजे" ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून विचार करायला, मांडायला आणि कृती करायला लागू तेव्हा मुंबईकरांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील!

Where the clear stream of reason has not lost its way into the dreary deserts,
Sands of dead habits,
Where the mind is lead forward by Thee,
Into ever-widening thoughts and action.
Into that heaven of freedom my Father,
Let my country awake!
- Tagore

'ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे, समाधान!',या संतांच्या शिकवणी नुसार जगावे.

ही शिकवन फक्त सर्वसामान्य जनते साठी आहे राजकारण्यांना लागु होत नाही.

काय बोलताय..अजून अच्छे दिन आले नाहीत...........
मागच्या महिन्यात पनवेल ते सीएसटी दरम्यान लोकल प्रवास केला , बहुतांशी स्टेशनवर लोकलच्या घोषणा /सूचना (अनौंसमेंट) चक्क गुजराती मध्ये ऐकल्या आता हे अच्छे दिन नाहीतर काय ? आधीच जो तो हिदी बोलतो तिथे आता गुजराती शिकायचे का?
अजून काही वर्षात मुंबईत मराठी राहील का नाही देव जाणे.

पनवेल ते सीएसटी दरम्यान लोकल प्रवास केला , बहुतांशी स्टेशनवर लोकलच्या घोषणा /सूचना (अनौंसमेंट) चक्क गुजराती मध्ये ऐकल्या
>>>>>

पनवेल ते सीएसटी का गुजराती?
विरार बोरीवली साईडला जास्त गुज्ज्जू आहेत ना?

मागच्या महिन्यात पनवेल ते सीएसटी दरम्यान लोकल प्रवास केला , बहुतांशी स्टेशनवर लोकलच्या घोषणा /सूचना (अनौंसमेंट) चक्क गुजराती मध्ये ऐकल्या>>>>> लिहायचं म्हणून काहीही लिहायचं? मी गेली पंधरा वर्षे नियमीत लोकलने प्रवास करत आहे. हार्बर लाईनवरसुध्दा महिन्यातून दोन ते तीन वेळा कुर्ला ते बेलापूर असा प्रवास घडत असतो. मी कधीही गुजराती भाषेत घोषणा ऐकलेल्या नाहीत. तुम्ही कोणत्या स्टेशनवर ऐकल्यात ते सविस्तर सांगा म्हणजे स्वतः जाऊन अनुभव घेईन म्हणतो.

मागच्या महिन्यात पनवेल ते सीएसटी दरम्यान लोकल प्रवास केला , बहुतांशी स्टेशनवर लोकलच्या घोषणा /सूचना (अनौंसमेंट) चक्क गुजराती मध्ये ऐकल्या>>>>> काहीतरीच. असं काहीही नाहीये.

मागच्या महिन्यात पनवेल ते सीएसटी दरम्यान लोकल प्रवास केला , बहुतांशी स्टेशनवर लोकलच्या घोषणा /सूचना (अनौंसमेंट) चक्क गुजराती मध्ये ऐकल्या आता हे अच्छे दिन नाहीतर काय ?>>>>>> आम्ही कधी नाही ऐकल्या गुजरातीत घोषणा. ऐ.ते.न.

अनाकलनीय असली तरी दुर्दैवाने जगात तेच चालू आहे सगळीकडे.

व्यर्थ हे सारेच टाहो
एक हे ध्यानात राहो
मूठ पोलादी जयांची
ही धरा दासी तयांची

किरण कुमारजी, हे सस्मित आणि नरेश माने म्हणत आहेत त्यांनी गुजराथी उद्घोषणा कधीच ऐकल्या नाहीत. यावर आपले काय म्हणणे आहे?

तुम्ही थांबा हो, तुम्हाला संधी दिली जाईल नंतर बोलायला (मी थांबलो तर). हां तर किरण कुमारजी, तुम्ही आता बोला. बोला किरणजी. आता बोला.

Proud

Pages