मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2015 - 16:35

पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!

तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.

बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्‍या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता लोकलच्या गर्दीत दोन गुजराथी शेट बोलत असताना त्यांच्या मधे उभे असतील तर गुजराथीच ऐकू येणार ना Proud

अच्छे दिन म्हटल की फक्त आणि फक्त मोदींचाच चेहरा दिसतो.
सोबतिला त्यांची भाषण आठवतात.

ते सगळे रम्य दिवस अनुभवन्यासाठी पुढिल निवडनुका पर्यन्त वाट पहावी लागेल.

ऐकल्या हो मायबोलीकर .. पुढच्या वेळी रेकॉर्ड करुन पेस्ट करतो इथे.........
बेलापूर, खारगर ,सीवूड धारावी इथे ऐकल्या ..इंग्रजी-हिंदी-गुजराती असा क्रम होता
जो है ओ बुरा है लेकिन है

सकाळीच नाही हो मी सकाळी फक्त लिंबू सरबत पितो Happy
मुंबईच्री लोक फार धावपळीत असतात त्यामुळे कान लावून ऐकत नसावेत.. असो

इंग्रजी-हिंदी-गुजराती असा क्रम होता>>.ह्या क्र्मात मराठी नाही?

जो है ओ सचमुच बुरा है

महाराष्ट्रत मराठीच कसे होणार देवा

बेलापूर, खारगर ,सीवूड धारावी इथे ऐकल्या >>>>> किरण कुमार खास तुमच्या साठी मी हा प्रवास ह्या विकांताला करणार आहे आणि तुम्ही जे लिहिलंय त्याची खातरजमा करणार आहे हे मी नम्रमणे नमुद करू इच्छितो.

बादवे, ऋन्म्या तु पण रोज ह्याच मार्गावर प्रवास करतोस ना? तुला आलाय का कधी असा अनुभव........

रच्याकने ते खारघर आणि सी-वूड दारावे आहे. मी धारावी नावाचे कोणते नविन स्टेशन आले म्हणून क्षणभर गोंधळलो होतो म्हणून................

मला एकदा ६ डिसेंबर रोजी काही मराठी माणसं घाटकोपरला उतरू न देता थेट ठाण्याला घेऊन गेली होती. असं दर ६ डिसेंबरला होतंच म्हणा.

भाईंदर स्टेशनचे नाव गुजराती मधे देखील लिहिले गेले तेव्हा कळुन आले होते. आता कोणी गुजराती मधून ऐकले तर काय करणार आहे? इथे येउन लिहिण्या व्यतिरिक्त अजुन काही करणार असेल तर आवर्जुन ऐका.

धन्यवाद

बादवे, ऋन्म्या तु पण रोज ह्याच मार्गावर प्रवास करतोस ना?
>>>>
रोज नाही पण अधनामधना, मुसाफिर आहे मी..
पण मी नाही ऐकल्या, म्हणून तर वर प्रश्नचिन्ह टाकलेय ना..
कारण मी नाही ऐकल्या म्हणून नाहीच असे ही ठामपणे बोलू शकत नाही..
तसेही ट्रेन मध्ये असताना मी येणार्या जाणार्या प्रत्येक स्टेशनाच्या प्लॅटफॉर्मवरच्या घोषणा ऐकत नाही.. Happy

याऊपर एखाद्या गुजराती बहुभाषिक स्थानकावर गुजरातीत घोषणा असतील तर मला त्यावर आक्षेपही नाहीयेच मुळात!

याऊपर एखाद्या गुजराती बहुभाषिक स्थानकावर गुजरातीत घोषणा असतील तर मला त्यावर आक्षेपही नाहीयेच मुळात! >> ते ठिक आहे पण.

आपले पंतप्रधान पंजाबी होते, मुलुंडचे खासदार की आमदार पंजाबी आहे, मुलुंडमधे पंजाबी लोक मोठ्या संख्येने राहतात परंतू मुलुंड स्टेशनावर पंजाबी भाषेत घोषणा कधी ऐकल्या नाही.

धन्यवाद

मग त्यांनीही(पंजाबी) तसा आग्रह रेल्वेप्रशानाकडे करायला हवा होता. त्यांचे कुणी हात धरले होते का?

आंग्रे,

गुजराती लोकांनी तसा आग्रह रेल्वेप्रशासनाकडे केला होता याचा पुरावा आपल्याजवळ आहे का? असे तर सादर करावा

धन्यवाद

दिनेश्क ,

गुजराती लोकांनी तसा आग्रह रेल्वेप्रशासनाकडे केला होता असे विजय आंग्रे म्हणाले आहेत याचा पुरावा आपल्याजवळ आहे का? असे तर सादर करावा

धन्यवाद

अप्पाकाका आंग्रे काय बोलले जरा नीट वाचतात का? आणि आपण स्वतःची वकिली करावी ही नम्र विनंती.

त्यांनीही(पंजाबी) तसा आग्रह रेल्वेप्रशानाकडे करायला हवा होता.

या वाक्याचा अर्थ जर आपल्याला समजला नसेल तर कृपया पुन्हा बालवाडीत जाउन शिक्षण घेण्यास सुरुवात करावी ही नम्र विनंती.

धन्यवाद

(हंसची नकल कावळ्याने करु नये. हसे होते )

बेलापूर, खारगर ,सीवूड धारावी इथे ऐकल्या ..इंग्रजी-हिंदी-गुजराती असा क्रम होता<< हे वाचल्यावर बेलापूरला राहाणार्‍या गुज्जु मैत्रीणीलाच यासंदर्भत विचारले. तर तिनं सांगितलंय की मराठीतूनच घोषणा होत आहेत. (ती रोज बेलापूर ते सीएसटीच जातेयेते) गुजरातीमधून होत नाहियेत.

रेल्वेत काम करनार्‍या एका काकूंना पण मी यासंदर्भात मेल केलंय. त्यांचंदेखील उत्तर आलं की इथं लिहीन.

दिनेश्क

आग्रह हा मुद्दामून करावा लागत नाही. पैशाच्या जोरावर अनेक गोष्टी होतात. पण तरी प्रश्न असा उरतो की पंजाबी बांधवांनी तसा आग्रह केला रेल्वे प्रशासनाकडे तर त्यांचे काय चुकेल?

(हंसची नकल कावळ्याने करु नये. हसे होते )>> सल्ल्याबद्दल धन्यवाद. म्हणूनच आपण माझी नक्कल करत नाही हे समजून आनंद झाला Proud

बाकीच्या वैय्यक्तिक टिप्पण्यांना पास.

धन्यवाद

@दिनेश्क
तसा आग्रह कुणी केला नसेल तर रेल्वेने काय स्वत:च्या मनानेच का अश्या घोषणा सुरु केल्यात? आणि तेही फक्त हार्बर लाईनवरच. मुळात वरचा नंदिनी यांचा प्रतिसादात लिहील्या प्रमाणे ही बातमीच खोटी आहे असे वाटते.

किरण कुमार, आताच, एक मध्य व एक हार्बर मार्गावरुन प्रवास करणार्‍या दोन मुंबईकर मित्रांशी बोललो. त्यांनीही हेच सांगितलं की गुजरातीतून त्यांनी कधीही उद्घोषणा ऐकलेल्या नाहीत व आताही होत नसतात.

तुम्ही कदाचित स्टेशनवर लावलेल्या टीव्हीमधली एखादी जाहीरात ऐकली असेल Wink

सो मेजोरिटी सेज... गुजरातीमधून घोषणा होत नाहीत
तसे असेल तर आनंद आहे. मी १७ मे रोजी (रविवार) सीवूड दारावे इथे स्पष्ट ऐकली होती. त्या दिवशी मेगा ब्लॉक असल्याने सीएसटीकडचा मार्ग बंद होता. मी मित्राला भेटण्यासाठी सीएसटीला जाणार होतो. ठाण्यावरुन जावे असा विचार केला आणि लोकल पकडली पण विचार बदलला आणि परत पनवेल मार्गे पुणे गाठायचे ठरविले. त्या दरम्यान सीवूड,बेलापूर येथे थाबून त्या घोषणा ऐकल्या होत्या. त्या रोज होतात कि नाही याबाबत अनभिज्ञ आहे. कदाचित रविवारी होत असाव्यात . मी पुण्यात राहतो, आतापर्यंत फार तर ३-४ वेळाच मुंबईला गेलो आहे,त्यामूळे मुंबईच्या गोष्टीबाबत ठाम नाही . सबब या विषयावर पुन्हा भाष्य नाही.

गुजरतीमधून घोषणा त्याही हार्बर मार्गावर होणं फार कठीण आहे - नवी मुंबईमध्ये मराठी लोकसंख्या जास्त आहे. तसं झालं अस्तं तर एव्हाना त्याचा पोलिटिकल इशू झाला नसता का?
आताच नवी मुंबईच्या एका राजकीय कार्यकर्त्याला या संदर्भात विचारलं. त्यानंही असल्या घोषणा होत नसल्याचं ठामपणे सांगितलंय. घोषणा मराठीतूनच असेल तुम्हाला कदाचित गुजराती ऐकू आली असेल.

हंस कुणाची नकल करत नाही अप्पाकाका Proud

असो.
आग्रह करो अथवा न करो असे लांगुलचालनचे प्रकार बंद करावे. रेल्वे राष्ट्रीय संपत्ती आहे ती नाही कुठल्या एका समाजाची अथवा पक्षाची संपत्ती नाही आहे. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यावर स्टेशन मास्तरांची नावे इ. स्टेशनवर दर्शवणारी इलेक्ट्रोनिक पाटीमधील प्रकाशात बदल केला होता. पांढर्‍या रंगावरुन हिरव्या रंगात बदल केलेला. हा प्रकार नविन होता तेव्हा देखील रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून कळवले होते. उठसूट कुठल्या प्रकारावरून बदल करत राहणे योग्य नाही. अन्यथा दर ५ वर्षांनी नवनविन पक्षाचे सरकार येईल आणि अशा अनठायी खर्चाला जनतेला सामोरे जावे लागेल.

धन्यवाद

Pages